निसर्गाच्या गप्पा (भाग -२४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 December, 2014 - 06:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २४ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

डिसेंबर .. म्हणजे वर्षाचा शेवट! निरोप!! गुड-बाय!!! असं म्हणताना खूप वाईट वाटतं पण नाही त्याचबरोबर डिसेंबर म्हणजे लखलखता-झगमगता नाताळ, नवीन वर्षाचे धुमधडाक्याने होणारे आगमन, नाच गाणी आणि पार्ट्या, थोडे जुने.. थोडे नवीन संकल्प, नवीन स्वप्न रंगवायला.. पाहिलेल्या स्वप्नांना खरे रुप द्यायला
मिळालेले आणखी एक करकरीत वर्ष!

मायबोलिवरील समस्त सभासदांना आणि ह्या चराचर सृष्टीतील प्रत्येक जिवाला २०१५ च्या अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला गोड जावो!

कसा असतो डिसेंबरचा निसर्ग?! निरभ्र आकाशाचे.. निरभ्र हसू, कुडकुडणारे अंग..हुडहुडणारे दात, अंगावर येणारी
शिरशिरी..ओठावर चरचरणार्‍या फुल्या, कुठे थंडीची लाट... तर कुठे भुरभुर कोसळत राहणारा बर्फ, कुणाला प्रिय असतो बुवा हिवाळ्यातील पहाटेचा वाफाळता चहा... तर कुणाला प्रिय असते बाई दुलईतील ती झोप!!!! बाहेर फक्त दिवसाचे पाच वाजलेले असतात आणि काळोख घरात शिरलेला असतो. पहाटे जागे येते तर पहावं दुरदुरवर काहीच दिसत नाही.. दुपारपर्यंत धुकं ओसरतच नाही! असं हे धुकं फक्त पाहून मन भरत
नाही.. ते आपल्या कॅमेरात उतरवल्या शिवाय चैन पडतं नाही!

धुक्याची गोधडी पांघरुन निसर्ग अजून झोपलेलाच असतो. झाडांच्या कळ्या अजून मिटलेल्याच असतात. दिवसा ढवळ्या वाहनांचे आणि रस्त्यावरचे दिवे लागलेले असतात. अंघोळ नकोशी वाटते. शेकोटीभोवती कोंडाळा करुन गावकरी बसलेले असतात. देशसेवा करणारे सैनिक मात्र येवढ्या थंडीतही परेड करायला सज्ज
असतात. एखादे गाव, एखादे शेत अजून शांत झोप घेत असते. डोक्यावर गवताचे भारे घेऊन बायका शेतावर निघालेल्या असतात. नखशिखांत कपडे चढवून कुणी बाहेर पडायच्या तयारीत असतं:

ग्लोबलायझेशनच्या ह्या युगात आपले भारतीय कुठे कुठे जाऊन पोचलेत! युरप-अमेरिका ह्या सारख्या देशात टोकाचा हिवाळा असतो. कुठे आपल्याकडील हवीहवीशी गुलाबी थंडी आणि कुठे तिथला चार-पाच
महिन्यांचा गोठलेला हिवाळा. बाकी इतर झाडे जरी आपला विरक्त काळ कंठत असली तरी ख्रिसमस-ट्री मात्र आपल्या तारुण्यात असते. संपूर्ण बर्फानी झाकलेले ख्रिसमस-ट्री असो की लाल-गुलाबी दिव्यांनी मढवलेले ख्रिसमस-ट्री असो दोन्ही शोभूनच दिसतात. एखादा दिवस बर्फ पडून निरभ्र निघाला तर बाहेर जरी कडाक्याची थंडी असली तरी कोवळ्या स्वच्छ हसर्‍या उन्हात सोनसळलेली ती सृष्टी बघायची मौज असते.

परदेशात राहून खूप काही 'मिस' होते! अहो आजकाल काय नाही मिळत असे जरी म्हंटले तरी प्रत्येकाची मागणी वेगळी असते. ती दरवेळी आयात-निर्यात करता येत नाही. आपल्याकडील वाटाण्याच्या शेंगाचे ढीग, एकावर एक रचलेली गाजरे, हातगाडीवरील हरभर्‍याचे गाठे, जांभळ्या उसाचे करवे, गव्हाच्या ओंब्या, रसरशीत पेरू, निबर बोरं! हे सगळं असून बनवलेल्या अनेक पाककृती. हे सारं काही मिस होतं! इतकंच नाही तर वेगवेगळ्या रंगातली शेवंतीची फुले, मधुमालतीचे गुलाबी रुपडे, बुचाच्या फुलांचा सडा, गावठी गुलाबाचा गंध!!!

गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात आदिवासींसाठी काम करताना डॉ. प्रकाश आमटे व विलास मनोहर यांनी विरंगुळा म्हणून वन्य प्राणी बाळगले-वाढवले. सृष्टीतील रूप, रस, रंगगंधांच्या लावण्य विभ्रमांचे प्रत्ययकारी
चित्ररूप दुर्गाबाईंनी 'ऋतुचक्र'मध्ये रेखाटले आहे. मारुती चितमपल्ली ह्यांचा उभा जन्म गेलाय तो खर्‍याखुर्‍या जंगलात. त्यांना माणसांपेक्षा पशुपक्ष्यांचा सहवास अधिक मिळालाय. माणसांच्या भाषेपेक्षाही अरण्यातली हिरवी अक्षरं त्यांना अधिक चांगली कळत असणार. या जिवंत, रसरशीत हिरव्या अक्षरांची काळ्या शाईतली प्रतिबिंबं म्हणजे चितमपल्लींचं लेखन. रुढार्थाने लेखिका नसून निसर्गावर प्रेम करणार्‍या शरदिनी डहाणूकर ह्यांचे लेखन काही और! चित्रपटांमधे काम करणारे मिलिंद गुणाजी ह्यांची भटकंती.. वाचाल तेवढे
कमी आहे!!!

..पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या
शुभेच्छा!

(वरील लेखन व फोटो मायबोलीकर बी यांच्यातर्फे.)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गाच्या गप्पांचे मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्स ऑल.
माझ्या मुलाच्या शाळेच्या आवारातला (पार्ले टिळक) एक मोठा वृक्षदेखील अचानक तोडून टाकला आहे. Sad

साधना म्हणते तसं जाहिरातींसाठी वृक्षतोड होते असं असेल तर फारच निंदनीय आहे हे.
आजकाल पुण्यात त्या वांझळेनी सुरू केल्यावर इतर अनेक टगे आपापले दागिन्यांसह प्रचंड मोठे फ्लेक्स लावताहेत.
गळ्यात २/३ सोन्याचे साखळदंड, हातात सोन्याचेच (आता पाटल्या बिलवर म्हणू का याला?) कडं टाइप दागिने, दाही बोटात मोठमोमोठ्या अंगठ्या आणि हे धारण करणारा मठ्ठ आणि मंद, गुंड चेहेरा. आणि क्वालिफिकेशन काय तर जि.प. सदस्य किंवा असंच काही.
चीड येते हे फ्लेक्स पाहून. कोणा आहेत हे?

मस्त फोटो वर्षा...

साधना, हिंदू कॉलनीत पण बरेच होते ( अजून असावेत ) पण त्या इमारती अशा बांधल्यात कि त्यांना मस्त सावली मिळते. पोद्दार कॉलेजच्या समोरचे वृक्ष पण असेच त्या सर्व परीसरात मिसळून गेलेत.

जाहीरातींबद्दल नगरपालिकेचे नियम असतात.. पण ही बडी धेंडे असल्याने कार्यवाही होत नसावी.. आणि ती रावणासारखी थोबाडं.. बघण्यासारखी तरी असतात का ?

सुप्रभात!
सनबर्डची ही छायाचित्रे. वेगवेगळ्या वेळेस काढलेली.
purple rumped sunbird male

purple rumped sunbird female

दिनेशदा - तुम्ही वर दिलेली लिंक एकदम भारी आहे हां - किती वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करुन मांडल्या आहेत त्यात.... खूप मज्जा येतीय बघताना ते - पुन्हा, पुन्हा पहात आहे ते ....

रच्याकने, 'मुंगेरीलाल' कुठे लापता झालेत काही कळायला मार्गच नाही !!!

सुप्रभात सर्व निगकर्स..........
दिनेश मस्त आहे लिंक ...बरेचजण पहायला मिळाले.बाकी रेस्पीजचे फुटु मस्तच!
अगं वर्षा ..वॉटरमार्क करत जा ना अश्या अप्रतीम फोटोंवर. माझ्याही बागेत खूप येतात सनबर्ड्स सध्या.
खूप चिवचिवाट करतात.

वा मस्त वाटले नवीन ५० मजकुर आणि फोटो बघून. इथे येऊन नेहमीच झाडाच्या गार सावलीत येऊन विसावा घेतल्यासारखे वाटते मला.

मानुषी फोटोंच्या मध्यभागी वॉटरमार्क टाकला आहे. फोटोला बाधा येऊ नये म्हणून फार मोठे वॉटरमार्क टाकत नाही.

वर्षा... फोटो छानच.
मलाही हे वॉटरमार्क प्रकरण नाही आवडत... आपला सहभाग फार थोडा, सगळे श्रेय निसर्गालाच.

हो शशांक, मुंगेरीलाल सध्या नाहीच दिसत.. त्यांचे दर्जेदार विनोदी लेख.. फार मिस करतोय.

खूप छान वर्षा>>>>>>>> फोटोंच्या मध्यभागी वॉटरमार्क टाकला आहे. फोटोला बाधा येऊ नये म्हणून फार मोठे वॉटरमार्क टाकत नाही.>>>>>. मला चष्मा लावूनही दिसला नाही. आणि फोटोच्या सौंदर्यात जराही बाधा आली नाही. गुड!
कालच मंद मठ्ठ (रावण)गुंडाच्या फ्लेक्सवर चर्चा झाली.
आज आमच्या नगरातले सगळे फ्लेक्स काढण्याची प्रक्रीया चालू होती. गणपती मंदिराबहेर आधीच भक्तांची गर्दी त्यात पोलिस कारवाई बघायला रिकामटेकड्या बघ्यांची गर्दी!
पण असो............. फ्लेक्स निघाले.
दिल्ली गेट(वेस) दगडी कमान इतकी वेगळीच आणि सुंदर दिसतेय. एरवी संपूर्णपणे फ्लेक्सनी झाकलेली. बघू किती दिवस जातात! थंडी कमी झाली थोडी.

फ्लेक्स प्रिंटींग स्वस्त झाल्यापासून याचा अतिरेक होतोय.. पुर्वी म्हणजे अगदी शोले, दिवार पर्यंत सिनेमाची मोठी पोस्टर्स हातानी रंगवत असत.. फार सुंदर दिसत असे ते. दादरचा टिळक ब्रिज, ऑपेरा हाऊस इथे अगदी सुंदर पोस्टर्स असत..

मला सध्या रोज अकाशात संध्याकाळी अशी पोस्टर्स दिसतात.. आता काही दिवसच इथे ढग असतील, मग दोन तीन महिने रखरखीत उन्हाळा !

सर्व निसर्गप्रेमींना नववर्षाच्या शुभेच्छांं
मि. बी यान्चे मनोगत आवडल .वर्षाचे फोटो छान आहेत.
शान्कलीने पिल्लांच्या हालचालीन्चे केलेले वर्णन एकदम खास वाटले .या धाग्यावर
लिहिणारे सर्वच अकृत्रिम भाषेत सहज सुन्दर लिहीतात...सर्वांचेच धन्यवाद...

उद्यापासून माझा दौरा सुरु... किलांबा- झांगो - लुआंडा- दुबई - मुंबई - मस्कत - सलालाह - मस्कत - मुंबई - दुबई - लुआंडा - किलांबा !

लोकप्रभातील एका लेखाचा अंश

http://www.loksatta.com/lokprabha/how-and-how-much-to-dring-water-1059394/

आजकाल मोठय़ा संख्येने लोक पर्यटनाला जातात. लहान-मोठे प्रवास करतात, लडाख, काश्मीर, कैलास, मानस सरोवरासकट ट्रेकिंग यात्रा करतात. बाटलीबंद पाण्याचे प्रचंड प्रस्थ माजले आहे. त्याऐवजी नागरमोथा या वनस्पतीचे चूर्ण- एक लिटर पाण्याकरिता पाच ग्रॅम या हिशोबात वापर केला तर प्रवासात कसलेही पाणी मिळाले तरी 'वॉटरबोर्न' रोगांची चिंता बाळगावी लागणार नाही. नागरमोथ्याचे कंद पाणथळ जागी उगवतात. त्यांना एक विलक्षण सुगंध असतो. नागरमोथा चूर्ण उपलब्ध न झाल्यास आणखी एक प्रकारचे शुद्ध जल आपणास आपल्या घरी करता येईल. त्याचे नाव आहे 'सुधाजल.' लाईम वॉटर असा इंग्रजी शब्द आहे. दिवसाला आपणास किती पिण्याचे पाणी लागते त्या हिशोबाने हे सुरक्षित पाणी विनासायास, विनाखर्चाचे तयार करता येते. विविध रंगाची माती, चुना विकणाऱ्या दुकानातून खालच्या थरांत असणारी चुनखडी आणावी. ती विरी न गेलेली, स्पर्शाला थोडी गरम असलेली असावी. रात्री एक लिटर पाण्याकरिता १० ग्रॅम या हिशोबाने चुनखडी पण स्टीलच्या भांडय़ात भिजवावी. सकाळी ते पाणी स्वच्छ फडके, टिपकागद किंवा फिल्टर पेपरने गाळावे. खाली चुना येऊ देऊ नये. २०० मिलीच्या पाच बाटल्यांत भरावे. या बाटल्यांत मोकळी जागा ठेवू नये. असे पाणी कधीही खराब होत नाही. जगाच्या अंतापर्यंत ते टिकते. लहान मुलांच्या व महिलांच्या विविध विकारांत, वजन घटणे, गंडमाळा, भूक नसणे, वाढ न होणे, कॅन्सरसारख्या गाठीच्या विकारात असे पाणी विकारांना लवकरच काबूत आणते. सुरक्षित पाण्याचे अंतरिक्ष जल, सुंठ सिद्ध जल, नागरमोथा चूर्णयुक्त पाणी व चुन्याची निवळी यांचे प्रयोग दैनंदिन जीवनात जरूर करा, अनुभवा, अनेक रोगांपासून मुक्ती मिळवा.

सर्वसामान्यपणे तहान लागली तरच पाणी प्यावे, हे तत्त्व सगळेच पाळतात. कडक उन्हाळा, ग्रीष्म ऋतू, शरद ऋतू, मे महिना किंवा ऑक्टोबर महिना या काळात ठरवून पाणी प्यावे. ज्यांना वजन वाढवायचे आहे, जे कृश आहेत त्यांनी जेवणानंतर थोडय़ा वेळाने जरूर पाणी प्यावे. कृश व्यक्तीने जेवणाअगोदर किंवा जेवणामध्ये पाणी पिऊ नये. ज्यांना खूप बोलण्याचा व्यवसाय आहे, डोकेदुखी, चक्कर, पित्त होणे या तक्रारी आहेत, त्यांनी रात्री दहा-पंधरा चांगल्या दर्जाच्या मनुका, बिया काढून भिजत टाकाव्यात. सकाळी मनुका खाव्यात व वर ते पाणी प्यावे. कृश व हृदयरोगाच्या तक्रारी असणाऱ्यांनी या प्रकारेच दोन खजूर भिजत टाकून सकाळी त्याचे पाणी घ्यावे. त्यामुळे दुखण्याच्या तक्रारींकरिता इतर गोळय़ा घ्याव्या लागत नाहीत. कॉलरा, जुलाब, उलटय़ा या विकारात, शरीरातील ओलावा कमी झाला असल्यास पाणी, गूळ किंवा साखरपाणी काही काळ घ्यावे. स्थूल व्यक्तींनी शक्यतो पाणी कमी प्यावे. आपल्या शरीराचे बरेचसे वजन हे पाण्याचे असते. ज्यांना शोष पडतो, अशा स्थूल व्यक्तींनी जेवणाअगोदर पाणी प्यावे, त्यामुळे आहार कमी जातो, वजन वाढत नाही.
यकृताचे विकार, कावीळ, उदरविकार, जलोदर या विकारात पाणी अजिबात पिऊ नये. त्याऐवजी दूध, गोमूत्र, कोरफड रस असे पातळ पदार्थ घ्यावेत. जुनाट त्वचाविकार, कंड, इसब गजकर्ण, नायटा, पू वाहणे, व्रण, मधुमेहाच्या किंवा महारोगाचा जखमा, मधुमेह, स्थूल व्यक्तींचा रक्तदाब विकार, सूज, शय्यामूत्र, सर्दी पडसे या विकारात शक्यतो पाणी पिऊ नये. या विविध विकारात शरीराला पाण्याची गरज नसते. फाजील जलतत्त्वाने शरीरात पू तयार होतो. त्वचाविकार आणि जखमा सुकत नाहीत. संधिवात, आमवात, पाठ-कंबर-मान किंवा गुडघेदुखी या वात विकारात स्थूल व्यक्तींनी पाणी पिऊ नये. प्यावयाचे झाल्यास थोडे आणि सुंठचूर्ण मिश्रित पाणी प्यावे. पोटदुखी विकारात पोट केव्हा दुखते, या कालावर पाणी केव्हा प्यावे, किंवा पिऊ नये हे अवलंबून आहे. जेवणानंतर लगेचच पोट दुखत असेल किंवा रिकाम्यापोटी पोट दुखत असेल, तर पाणी पिऊ नये. प्रथम अन्नपचनाला, आतडय़ांत अन्न आपणहून सरकण्याची संधी द्यावी. जेवणानंतर तीन-चार तासाने पोट दुखत असेल तर पाणी जरूर प्यावे. क्रॉनिक रिनल फेल्युअर सी.आर.एफ्. या विकारात संपूर्ण दिवसात एकूण पाणी वा द्रव ५०० मिली. एवढेच प्यावे.
लहान वयातच मुलांना चष्मा लागणे, वर्ष सहा महिन्यांनी चष्म्याचा नंबर वाढता असणे, ही मोठीच समस्या अनेक बालकांत दिसून येते आहे. ज्यांना चष्म्याचा नंबर कमी करावयाचा आहे, त्यांनी नाकाने पाणी पिण्याची सवय ठेवावी. त्यामुळे डोळय़ाचा अश्रू मार्ग मोकळा राहतो. सुरुवातीला नाकाने पाणी पिणे जमले नाही तर चमच्याने नाकात पाणी सोडावे. मानवी तोंडापेक्षा नाक हा अवयव उत्तम फिल्टर आहे.
एकाएकी उसण भरणे, पाठ दुखणे, कंबर दुखणे, अस कळा येणे; तसेच खूप नाक वाहणे, अस सर्दी-पडसे होणे. या अनुक्रमे वात व कफप्रधान विकारांत, एकदम गरम-गरम पाणी, दरदरून घाम येईल अशा पद्धतीने पिणे हा एक 'अक्सर' इलाज आहे.
आपण अनुभवा, अनुभवाचा फायदा झाला तर इतरांना सांगा. शुभं भवतु!
वैद्य प. य. खडीवाले वैद्य

नंदन कलबाग यांचा पण एक छान लेख आहे इथे..

http://www.loksatta.com/lokprabha/begonia-rex-1059397/

हिरवाई : बिगोनिया रेक्स

''आम्हाला घरामध्येही फुलझाडेच हवीत'' असे सांगणारे अनेक भेटतात. फुलझाडे सर्वानाच आवडत असली तरी घरात, सावलीत ठेवण्याजोगी फुलझाडे त्या मानाने कमीच असतात. परंतु फुलांएवढीच मनमोहक, रंगीत पानांची छोटेखानी वनस्पती म्हणजे बिगोनिया रेक्स. या वनस्पतीला फुले असतात, परंतु ती काही फारशी सुरेख नसतात. बऱ्याच वेळा ती पानांखाली दडलेली राहतात. या वनस्पतीची मुळे तंतूमय असतात; तसेच ती फार खोलवर न जाता मातीच्या वरच्या थरातच वाढत असतात. म्हणून यांना उथळ व पसरट कुंडय़ाच जास्त उपयुक्त ठरतात. हँगिंग बास्केटमधूनही शोभून दिसतात. रोपे जसजशी वाढत जातात तसतशी ती पसरत जाऊन आपल्या पसरट, मोठाल्या, शोभिवंत पानांनी सर्वच कुंडी व्यापून टाकतात. जणू काही पानांचा गालिचाच पसरला आहे असे वाटते.

या वनस्पतीचे सर्वच भाग अतिमृदू असतात; त्यामुळे हाताळताना जराही धसमुसळेपणा झाला तर पाने फाटू शकतात. बिगोनिया रेक्सला दमट हवामान खूपच मानवते. त्यामुळे वातानुकूलित खोलीत ती मुळीच टिकू शकत नाही. कोरडय़ा वातावरणात पानांच्या कडा सुकून जातात. तसेच पंख्याखाली कुंडी ठेवल्यास तेही या वनस्पतीला मानवत नाही. इतर अनेक झाडांच्या कुंडय़ांच्या घोळक्यात ठेवल्यास ते फायदेशीर ठरू शकते. कारण कुंडय़ांतील ओल्या मातीतून आणि पानांतूनही बाष्प बाहेर पडत असते. हवा स्तब्ध असल्यास ते बाष्प सर्वच कुंडय़ांसभोवार टिकून राहून, एकप्रकारे कृत्रिम दमट वातावरण बनते. आपण ज्यांना इनडोअर प्लांट्स म्हणतो त्या बहुतेक सर्वच झाडांना दमट वातावरणच मानवते. अशी झाडे एकटीदुकटी ठेवायची असल्यास त्यांच्या कुंडय़ा पसरट थाळीत पाणी भरून त्यात ठेवल्यासही त्यांना चालू शकते.
बिगोनिया रेक्सला मातीचे मिश्रण भुसभुशीतच असावे; कारण चिकण, कडक मातीत हिची तंतूमुळे चांगल्या प्रकारे वाढू शकत नाहीत. लागवडीसाठी बागकामाची माती आणि शेणखत किंवा कंपोस्ट मातीएवढेच घ्यावे. हल्ली नारळाच्या सालपटांपासून काढलेला भुसा 'कोकोपीट' नावाने मिळतो; तोसुद्धा काही प्रमाणात मिसळण्यास हरकत नाही. परंतु मातीत कोकोपीट मिसळल्यास शेणखत/ कंपोस्टची मात्रा मात्र त्या प्रमाणात कमी करावी.
दमट वातावरण करणे म्हणजे कुंडीत जास्त पाणी टाकणे नव्हे. बिगोनिया रेक्सला कमी पाण्याने जितके नुकसान होते तितकेच जास्त पाण्याने होऊ शकते. म्हणून जोपर्यंत मातीत ओलावा दिसतो तोपर्यंत पाणी घालू नये. तसेच माती पूर्ण कोरडीही होऊ देऊ नये.
बिगोनिया रेक्सची खोडे आखूड व जाडसर असतात. अभिवृद्धी खोडाचे तुकडे लावून करू शकत असलो तरीही तसे केल्यास मूळ झाडाची शोभा नष्ट होते; परंतु पानांपासूनही याची अभिवृद्धी सहज करता येते. अभिवृद्धीसाठी अगदी कोवळे किंवा जून पान घेऊ नये. पानाचा देठ साधारण एक इंच लांब ठेवावा. तीन भाग वाळू आणि प्रत्येक एक भाग माती व कोकोपीट मिसळून ती पसरट, उथळ कुंडीत भरावी. तयार मिश्रणात फक्त पानांचे देठ पुरावेत. पाने शक्यतो मातीस समांतर ठेवावीत. साधारण एक महिन्यात प्रत्येक पानापासून ३ ते ४ रोपे उगवतात. रोपांना सधारण चार ते पाच पाने फुटली की त्यांचे निरनिराळ्या कुंडय़ांत पुनरेपण करावे.
लेखन, छायाचित्रण : नंदन कलबाग
(समाप्त)
नंदन कलबाग

Pages