निसर्गाच्या गप्पा (भाग -२४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 December, 2014 - 06:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २४ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

डिसेंबर .. म्हणजे वर्षाचा शेवट! निरोप!! गुड-बाय!!! असं म्हणताना खूप वाईट वाटतं पण नाही त्याचबरोबर डिसेंबर म्हणजे लखलखता-झगमगता नाताळ, नवीन वर्षाचे धुमधडाक्याने होणारे आगमन, नाच गाणी आणि पार्ट्या, थोडे जुने.. थोडे नवीन संकल्प, नवीन स्वप्न रंगवायला.. पाहिलेल्या स्वप्नांना खरे रुप द्यायला
मिळालेले आणखी एक करकरीत वर्ष!

मायबोलिवरील समस्त सभासदांना आणि ह्या चराचर सृष्टीतील प्रत्येक जिवाला २०१५ च्या अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला गोड जावो!

कसा असतो डिसेंबरचा निसर्ग?! निरभ्र आकाशाचे.. निरभ्र हसू, कुडकुडणारे अंग..हुडहुडणारे दात, अंगावर येणारी
शिरशिरी..ओठावर चरचरणार्‍या फुल्या, कुठे थंडीची लाट... तर कुठे भुरभुर कोसळत राहणारा बर्फ, कुणाला प्रिय असतो बुवा हिवाळ्यातील पहाटेचा वाफाळता चहा... तर कुणाला प्रिय असते बाई दुलईतील ती झोप!!!! बाहेर फक्त दिवसाचे पाच वाजलेले असतात आणि काळोख घरात शिरलेला असतो. पहाटे जागे येते तर पहावं दुरदुरवर काहीच दिसत नाही.. दुपारपर्यंत धुकं ओसरतच नाही! असं हे धुकं फक्त पाहून मन भरत
नाही.. ते आपल्या कॅमेरात उतरवल्या शिवाय चैन पडतं नाही!

धुक्याची गोधडी पांघरुन निसर्ग अजून झोपलेलाच असतो. झाडांच्या कळ्या अजून मिटलेल्याच असतात. दिवसा ढवळ्या वाहनांचे आणि रस्त्यावरचे दिवे लागलेले असतात. अंघोळ नकोशी वाटते. शेकोटीभोवती कोंडाळा करुन गावकरी बसलेले असतात. देशसेवा करणारे सैनिक मात्र येवढ्या थंडीतही परेड करायला सज्ज
असतात. एखादे गाव, एखादे शेत अजून शांत झोप घेत असते. डोक्यावर गवताचे भारे घेऊन बायका शेतावर निघालेल्या असतात. नखशिखांत कपडे चढवून कुणी बाहेर पडायच्या तयारीत असतं:

ग्लोबलायझेशनच्या ह्या युगात आपले भारतीय कुठे कुठे जाऊन पोचलेत! युरप-अमेरिका ह्या सारख्या देशात टोकाचा हिवाळा असतो. कुठे आपल्याकडील हवीहवीशी गुलाबी थंडी आणि कुठे तिथला चार-पाच
महिन्यांचा गोठलेला हिवाळा. बाकी इतर झाडे जरी आपला विरक्त काळ कंठत असली तरी ख्रिसमस-ट्री मात्र आपल्या तारुण्यात असते. संपूर्ण बर्फानी झाकलेले ख्रिसमस-ट्री असो की लाल-गुलाबी दिव्यांनी मढवलेले ख्रिसमस-ट्री असो दोन्ही शोभूनच दिसतात. एखादा दिवस बर्फ पडून निरभ्र निघाला तर बाहेर जरी कडाक्याची थंडी असली तरी कोवळ्या स्वच्छ हसर्‍या उन्हात सोनसळलेली ती सृष्टी बघायची मौज असते.

परदेशात राहून खूप काही 'मिस' होते! अहो आजकाल काय नाही मिळत असे जरी म्हंटले तरी प्रत्येकाची मागणी वेगळी असते. ती दरवेळी आयात-निर्यात करता येत नाही. आपल्याकडील वाटाण्याच्या शेंगाचे ढीग, एकावर एक रचलेली गाजरे, हातगाडीवरील हरभर्‍याचे गाठे, जांभळ्या उसाचे करवे, गव्हाच्या ओंब्या, रसरशीत पेरू, निबर बोरं! हे सगळं असून बनवलेल्या अनेक पाककृती. हे सारं काही मिस होतं! इतकंच नाही तर वेगवेगळ्या रंगातली शेवंतीची फुले, मधुमालतीचे गुलाबी रुपडे, बुचाच्या फुलांचा सडा, गावठी गुलाबाचा गंध!!!

गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात आदिवासींसाठी काम करताना डॉ. प्रकाश आमटे व विलास मनोहर यांनी विरंगुळा म्हणून वन्य प्राणी बाळगले-वाढवले. सृष्टीतील रूप, रस, रंगगंधांच्या लावण्य विभ्रमांचे प्रत्ययकारी
चित्ररूप दुर्गाबाईंनी 'ऋतुचक्र'मध्ये रेखाटले आहे. मारुती चितमपल्ली ह्यांचा उभा जन्म गेलाय तो खर्‍याखुर्‍या जंगलात. त्यांना माणसांपेक्षा पशुपक्ष्यांचा सहवास अधिक मिळालाय. माणसांच्या भाषेपेक्षाही अरण्यातली हिरवी अक्षरं त्यांना अधिक चांगली कळत असणार. या जिवंत, रसरशीत हिरव्या अक्षरांची काळ्या शाईतली प्रतिबिंबं म्हणजे चितमपल्लींचं लेखन. रुढार्थाने लेखिका नसून निसर्गावर प्रेम करणार्‍या शरदिनी डहाणूकर ह्यांचे लेखन काही और! चित्रपटांमधे काम करणारे मिलिंद गुणाजी ह्यांची भटकंती.. वाचाल तेवढे
कमी आहे!!!

..पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या
शुभेच्छा!

(वरील लेखन व फोटो मायबोलीकर बी यांच्यातर्फे.)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गाच्या गप्पांचे मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंद्रा तोपासु त्या फोटोने.

मानुषीताई आता हुरडापार्टी झालीच पाहीजे. पण मलाच कसे जमवता येईल माहीत नाही.

कालच्या मटा मधे काय झालंय या झाडांना...! या शिर्षका खाली रेन ट्रीच्या रोगा बद्दल माहिती आली होती. या विषयीची चर्चा इथे घडावी म्हणुन वर मटा मधिल दुवा दिला आहे.

मी काल एक नविन आणि वेगळंच फळ पाहिलं.
म्हणजे चव अगदी बोरासारखी पण ते चिकू एवढालं मोठं आणि रंग हिरव्या सफरचंदसारखा. त्याचं टेक्शरही हिरव्या सफरचंदासारखंच आहे.
त्याला म्हणे अ‍ॅपल बोर म्हणतात आणि ते डायबेटीससाठी चांगलं असतं.
टेस्ट आवडली.

रिया, तू म्हणते आहेस ती बोरं नवीन नाहीत. आम्ही त्यांना नागपुरी बोरं म्हणतो. थोडी लांबुळकी असतात. ही बोरं फिकट गोड असतात पण आंबटपणा जराही नसतो. ईंग्रजीत ह्यांना रेड डेट्स म्हणतात.

मी अलिकडे पुण्यात खाऊ गल्लीमधे एके ठिकाणी ईसकाळचे एक खाद्य प्रदर्शन लागले होते तिथे गेलो. गर्दी उचंबळून आली होती. मी हावरटपणानी १००० हजार रुपयाची कुपन्स घेतलीत. पण खर्च मात्र ५०० चेच केलेत. तिथे मी ९० रुपयाला वाटीभर हुरडा घेतला.

ईंग्रजीत ह्यांना रेड डेट्स म्हणतात.
>>>
पण ही फळं तर हिरवी आहेत.

ती बोरं नवीन नाहीत.
ती फळ आमच्याइथेही येतात विकायला.
>>
खरं की का Uhoh
मी तर पहिल्यांदाच पाहिली. Happy
पण ती खरचं डायबेटीसवर प्रभावी आहेत का?
मी ३ किलो घेऊन आले कौतुकाने इथे सगळ्यांना दाखवायला Uhoh Lol

सुदुपार निगकर्स ! सगळेच फोटो छान! बी, नागपूरलाही आला होता का? माझा आनंद तुमच्याबरोबर वाटतेय ... बापू व काकु महाजन व अनिल अवचट ह्यांच्याबरोबर ४ - ५ तास घालवता आले न मला गुळाची पोळी त्यांना खाऊ घालता आली व त्यांना खूप आवडली...

मंजू, नशिबवाण आहेस अगदी! अकोला अमरावती मोझरी चिखलदरा वर्धा कारंजा इतके ठिकाणी फिरलो पण आनंदवन आणि ताडोबा राहून गेले. एकाएकी पावसाने मात केली. मी १० लोकांचा प्लान केला होता. आनंदवनात विकास आमटेंशी बोलून रहायची व्यवस्थापण केली होती. पण पावसामुळे मला बेत रद्द करावा लागला. माझा मी एकटा गेलो असतो पण घरच्यांनी मला जाऊ दिले नाही. बहिण म्हणाली तिकडे नक्षलवादी असतात. Sad

रिया, हीच बोरे सुकुन लाल निबर होता. अगदी हिरवी रहात नाही.

बोराच्या बिया फोडून खायचे काम आम्ही दिवसभर करायचो. आणि नागपुरी बोराच्या लांब बिया मला फार आवडत.

बी, बोरकूट करतात ती बोरं वेगळी ना ? ते कूट आंबट गोड लागतं.

इंद्रा... हुरडा मस्तच रे.

पर्जन्यवृक्षाची झाडे भारतात निदान १०० वर्षांपासून तरी आहेत. पण तरी ती परकीच आहेत. इथल्या रोगांना प्रतिकार करायची शक्ती बहुतेक नाही त्यांच्याकडे.

त्यांच्या जागी आपला शिरिष लावला पाहिजे. नगर भागात शिरीषाची झाडे खुप आहेत. मानुषीना सांगून बिया मिळव.. या शेंगांचा आवाज नर्तकीच्या पायातल्या पैंजणासारखा येतो. फुलांना सुगंधही असतो.. त्यामूळे ते झाड पर्जन्यवृक्षापेक्षा कधीही चांगले.

दिनेशदा, बोरकुटाची बोरे खूप बारकी लहान असतात त्यांना विदर्भात चनिया बेर म्हणतात. आमच्याकडे चनिया बेराचे बोरकुट मिळते ते जास्त आंबट गोड असते. ह्या नागपुरी बोराचे बोरकुट कुणी करत नसावे. हल्ली खरे तर मुलांना बोरकुट आवडेल का माहिती नाही. माझ्या भाच्यांना तर दुकानातले क्रॅकर्स खूप आवडतात. दिवसभर जरी खा म्ह्टले तरी नाही म्हणणार नाही.

वॉव हुरडा मस्त दिसतोय.

मंजुताई मस्तच, मेन अनिल अवचट यांची मी fan आहे.

मानुषीताई नगर जिल्ह्यातील 'कर्जत' ना.

केळ करांच बोरकुट हे विदर्भातल्या (बारीक बोरांचच) असतं आणि भरपूर खप आहे. मी पुण्याला जाताना हल्दीराम बरोबर बोरकुटही असतच. वाॅव हुरडा माझा अतिशय प्रिय ! हाॅटेलात जेवायला जाताना एम्बियन्स चांगला हवा तसा हुर्ड्यासाठी शेत ... मराठवाडी हुर्डापार्टी मिसतेय ...

तज्ञ खापर मिलीबगवर फोडत असतील तर ते खरेही असेल पण मिलीबग हा काही फार मोठा, झाडांचा कर्दनकाळ असा किडा नाहीय. तो इथे कायमचा आहे. थंडीत तो पपई, पेरु इत्यादी खुप झाडांच्या पानांच्या मागे असतो. कित्तीतरी फुलझाडांवर असतो. पण त्यामुळे अख्खे झाड मेल्याचे काही पाहिले नाही. फांदी कापली की बाकीचे झाड वाचवता येते. आमच्या इथल्या पेरुंवर तो दरवर्षी येतो पण ती झाडे अजुनही जिवंत आहेत.

मुंबईत जे रेन्ट्री मेलेत ते मेल्यावर वेगळेच दिसतात, त्यांची साल अधुनमधुन झडुन गेलेली, जी शिल्लक आहे ती खुप काळी अशी असते. (रेंन ट्री तसाही काळाच असतो). माझी आई सांगत होती की तिच्या रोजच्या वाटेवर जो रेनट्री होता त्याला मरताना खुप दिवस खुप तिव्र असा केमिकलचा वास येत होता, त्याच्या बुंध्यातुन वाफा निघताना दिसत होत्या.

मला तरी रेनट्री मरण्याचे कारण मानव निर्मित वाट्ते. पण ते तसे असेल तर मग फक्त रेनट्रीच का? त्याच्या आजुबाजुची सगळी झाडे हिरवीगार असताना फक्त रेनट्रीज का मरावेत? मिलीबग हे मोजक्याच झाडांवर पडणारे किडे नाहीयेत. ते सरसकट सगळ्याच झाडांवर येतात. मग फक्त मुंबईत ते रेनट्री सोडुन बाकी कुठेही का दिसत नाहीयेत?

रीया, ती अ‍ॅपल बोरं खूप आली आहेत सगळीकडे विकायला. मला अगदी आवडली नाहीत ती चवीला :(.
हुरडा पार्टी > मस्तच !!

आम्ही चिनिमिनी बोरं म्हणतो बोरकुटाच्या बोरांना Happy
मला फार आवडतात ती.
मला अ‍ॅपल बोरं बरी वाटली खायली. पण काहीच्या काही महाग आहेत Happy

बी, ओके Happy
मला एखादं लाल बोर पाहिला मिळायला हवं होतं.

वॉव, स सा.. खूपच सुंदर आहे जागा.. डीटेल्स टाक बरं कसं जायरून, म्हंजे ड्राईव करून.. इथे कुणीच हा प्रश्न विचारला नाहीये, म्हणून त्या सर्वांना ही जागा माहीतच असेल..असं गृहित धरलंय Happy

हुर्डा .. स्लर्प.. दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद हून पुण्याला येताना वाटेत थांबून शेतावरचा हुर्डा आणी लगेचच तिकडूनच तोडून आणलेल्या ऊसा चा रस मनसोक्त एंजॉय केला.. ऊसाचा रस चक्क बैला कडून चरक चालवून काढताना पहिल्यांदाच पाहिलं.. तेलाचा घाणा फिरवून उरलेल्या वेळात हा जॉब ही त्याच्याच कडे आला असेल

वर्षुताई इथे डोंबिवलीत ह्या सिझनमध्ये बैल-चरक उसाचा रस बघायला मिळतो, विदर्भातून वगैरे येतात ते लोक इकडे ह्या मोसमात.

मरताना खुप दिवस खुप तिव्र असा केमिकलचा वास येत होता, त्याच्या बुंध्यातुन वाफा निघताना दिसत होत्या. साधना Sad Angry

मुंबईत जे रेन्ट्री मेलेत ते मेल्यावर वेगळेच दिसतात, त्यांची साल अधुनमधुन झडुन गेलेली, >>> अगदी अगदी.. आणि त्यांच्या वरिल फांद्या वर पांढरा थर दिसतोय... खोडांची सालं गळुन पडत आहेत. आणि तो उघडा बोडका रेन ट्री बघताना जास्त यातना होतात.

थंडीत तो पपई, पेरु इत्यादी खुप झाडांच्या पानांच्या मागे असतो. >> आमच्या कडे जास्वंदीचे झाड होते त्याच्या फांद्यां वर हा मिलिबग दिसला की आम्ही ती फांदी तोडून टाकायचो.

प दिवस खुप तिव्र असा केमिकलचा वास येत होता, त्याच्या बुंध्यातुन वाफा निघताना दिसत होत्या >> हे खर असेल तर फार वाईट प्रकार आहे.

दिनेशदा... शिरिष झाडाची पाने रेन ट्री सारखिच असतात का? त्याला गुलाबी-पांढरी रंगाची फुले येतात ना

समजा केमिकल मारलेच असेल तर बाकिच्या झाडांवर पण परिणाम दिसला असता. कदाचित ते इंजेक्शनने टोचले असेल.

हो इंद्रा.. अगदी जुळे भाऊ म्हणावेत असे पण महत्वाचे फरकही आहेत. फुलांचा रंग, पानांचा रंग, शेंगांचा आकार व गर .. वगैरे.

चनिया मनिया बोर, एकेक करून नाही खाता येत.. मूठभर तोंडात टाकायची आणि खुप चघळल्यावर बिया ठो करून बाहेर टाकायच्या. मुंबईत जरा टपोरी विटकरी रंगांची सुकलेली बोरे पण मिळतात. ती पण मस्तच लागतात.

इंद्रा तोपासु त्या फोटोने.
मानुषीताई आता हुरडापार्टी झालीच पाहीजे. >>>>+११११, मी कसंही करुन जमवीन आणि येईन Lol

ओक्के पण आता कधी ठरवणार? येत्या शनी/रवी येता का सगळे? मला आधी कळवा. बुकिंग करायला लागेल ना..
जागुले.............व्हॉट से?
दिनेश शिरीषाच्या शेंगा वाजतात तर छानच. पण त्याचं रूपही आवडतं मला. अगदी आखीव रेखीव कप्पे, छान्सा तपकिरी रंग. मस्त उंची! Happy Happy Happy
हो गं अन्जू ...नगर जिल्ह्यातलं कर्जत.

मारूती चित्तमपल्लींच रानवाटा वाचतेय.

त्यातल हे वाक्य मला आवडल.
रोपाबरोबर गवतही वाढत होत. आणि रोप मात्र हळूहळू. सत्प्रवृत्तीचं रोपही असच ह्ळूह्ळू वाढतं. दुष्ट प्रवृत्तीचं तण नेहमीच माजतं."

ह्या पुस्तकात खंजन पक्षी म्हणून उल्लेख आहे. तो कोणता. पुढे लिहीले आहे. खंजन पक्षी बागेत शेपटी उडवीत चालू लागले. हे पक्षी दिसू लागले की पावसाळा संपला असे समजावे.

जागू, खंजन हा चिमणी सारखाच दिसणारा पक्षी आहे. शेपटी जरा लांब असते. थोडासा पारव्यासारखा दिसतो.

इथे अधिक वाच आणि चित्रही बघः

http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8

खंजन हिन्दी नाव आहे.

हे बघः

https://www.google.com.sg/search?q=%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8&...

खंजर!!!

Pages