होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काका जे वागला ते योग्य होतं असं मला व्यक्तिशः वाटतं.
लगे हाथ दोन श्री ला पण द्यायला हव्या होत्या Proud ( हेमनात ;))

वॉल्क पर्यंत ठिक होत पण चॅरेक्टर?>>>>>>> Lol
हेमनात>>>> काय असावं असा विचार केला बराच वेळ. Happy

नाटकात काम सुरु केल्यावर बाई सिरेल सोडणार का? की सिरेल आपल्यला सोड्णार??
आपण सिरेल सोडणे माझ्या हातात नाही.

- जे जे दिसेल ते ते पहावे मोडमधे असलेली मजबुर मी.

काय बो$$$$$र करतात हे सिरियल वाले. मी पहात नाही आजकाल, मधुन मधुन झलक दिसते. काल ओवी जाण्याचा प्रसंग असा कही दळला गोखल्यांनी की सांगता सोय नाही.

आई ग्ग! काय सुतकात असल्यासारखे वावरताहेत आणि बोलताहेत हे गोखले कुटुंबीय! मेलोड्रामा किती करावा ह्याला काही लिमिट?!!!!

नवीन प्रोमो जानव्ही बाई श्री बाळाला विचारतात श्री आपल्याला मुल का होत नाहीये मग !! म्हणजे अजून बरेच दळण दळायचं बाकी आहे !

बेफी Lol

घेतला का विकत जावई??
होसुमित्याघ एवढ्यात नाही. जान्हवीला अ‍ॅक्टींग करायची संधी तर मिळुदेत.

अस कसं, अस कसं ! आता ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं! जानु नाटकात कामे करणार म्हणजे करणार. ( सोबत दाढीवाल्या श्री बाळाला पण घेणार)

सस्मित या घरची, त्या घरची नव्हे Lol
का ह्या घरची झाली आता त्या घरची पण? Uhoh प्रेक्षकांचा छळ काय म ऑन च का? Proud

आमच्या इथला एक मारुती मी नीट जवळ जाऊन पाहिला तेव्हा तो मारुती असल्याचे समजले.

लांबून तेलाच्या थरामुळे श्री बाळच वाटत होते.

मारुती आणि कृष्ण ह्या गोंधळापेक्षा मारुती आणि श्री बाळ हा गोंधळ जरा तरी स्वीकारार्ह आहे.

तसेही लोक आता बघता बघताच डुलक्या घेऊ लागले असावेत त्यामुळे डुल्या मारूती जास्त जुळतेय..

डॉक्टरांनी सांगितलंय मुल होण्यासाठी जास्तीत जास्त वेळ एकमेकांबरोबर घालवा. पण आम्हाला एकमेकाना भेटायला वेळच नाही म्हणून ती जानव्ही रडतेय. काय पण पाचकळपणा Happy
डोकच फिरवताहेत ( तरीही बघण चालूच आहे ) Happy

Pages