आग्रा धर्मांतरण

Submitted by बेफ़िकीर on 9 December, 2014 - 11:00

मूळ लेख मी काढून टाकलेला आहे. प्रशासकांना लेखाखालील प्रतिसादांच्या सोयीला कुलूप लावण्याची विनंती केली होती, पण ती विनंती अजून विचारात घेतली गेलेली नाही.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाती, पोटजाती तळापर्यंत प्रत्येक ठिकाणी आहेत हो.
नुसते भौगोलिक परीस्थितीनुसार असलेली शारीरीक जडणघडण आणि जीवनमान वा राहणीमानाच्या सवयींनुसार माणूस माणसांमध्ये भेद करतो आणि स्वताला काहीतरी उच्च समजायला लागतो हे जगभर आहेच. असो, तो वेगळ्या धाग्याचा विषय आहे.

ह्याशिवाय महाराजांनी एका ठिकाणचे हिंदूंचे मंदिर पाडून जेथे मशीद बांधण्यात आली होती तेथे पुन्हा मंदिर बांधवून घेतल्याचा उल्लेख एका पुस्तकात वाचल्याचे आठवते. ह्याउप्पर असे उल्लेख इतरत्र वाचलील नाहीत.<< रायगडावरील महाराजांचा नगारखान्याचा भाग, त्यांचे सिंहासनाची जागा, तसेच जगदिश्वराचे मंदिर निट निरखुन पाहिल्यास लक्षात येते. कदाचित तुम्ही वाचलेला उल्लेख याच भागाचा असेल

त्याचे परिणाम काय होऊ शकतील?<<< परत एकदा खतरेमे चा फतवा काढला जाईल

>>>> असो, तो वेगळ्या धाग्याचा विषय आहे <<<< हा वेगळ्या धाग्याचा विषय कसा काय होईल? याच धाग्यात, इथेच हे देखिल विचारात घ्यावेच लागेल.
कारण चर्चेमधे, हिंदु धर्मात आलेल्यांची "जात" कोणती या चिंतेने पछाडलेल्यांना चिंतामुक्त होण्यासाठी (किंवा निव्वळ हिंदु धर्माबाबतच चिंताग्रस्त होऊन नक्राश्रू ढाळण्याऐवजी, सर्वच धर्माबाबत चिंताग्रस्त होण्यासाठी), हिंदु धर्मातून अन्य धर्मात गेलेल्यांच्या मूळच्या "जातीचे" काय झाले हे कळणे आवश्यक नव्हे काय?
अन्यथा, तुम्हा सर्वांवर केवळ "हिंदुधर्मीयांचीच" तेवढी चिंता/काळजी वाहता असा दोषारोप होणार नाही काय? Proud

लिंबुकाका हा तुमच्यासाठी दुसर्या धाग्यावर मीच लिहिलेला प्रतिसाद कॉपीपेस्ट करते-

साती | 10 December, 2014 - 08:37
होय.
कितीही दुर्दैवी असलं तरी खरं आहे.
माझ्या नवर्याच्या पूर्वजांनी किमान ७०० वर्षांपूर्वी धर्मांतर केलं.
आणि तरिही त्यांची मूळ जात ७००वर्षे त्यांच्याबरोबर चालत आलीय.
आता मी दहा वर्षांपूर्वी धर्मांतर केलं (अनॉफिशीयली कारण गॅझेटात फक्तं नाव बदललं , धर्म नाही) तर ती जात मलाही चिकटली आणि आता आमच्या मुलांनाही.

Wink

>>>मला एक प्रश्न पडला आहे, चुकीचा वाटला तर इग्नोरास्त्र वापरा, पण योग्य वाटला तर तुम्ही किंवा येथील इतर जाणकारांनी प्रकाश टाकावा...मुळात आपल्या हिंदु धर्मामध्ये अशी convert व्हायची सोय आहे काय ?
किंवा अशी काही procedure आहे का?<<<

प्रसन्न,

१. ह्याबाबत मला काहीही माहीत नव्हते.

२. काल त्या वाहिनीवरील चर्चा पाहताना समजले की असे प्रकार विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून नव्यानेच सुरू करण्यात आलेले होते.

३. हाच प्रश्न त्या वाहिनीवर एकाने विहिंपच्या नेत्याला ठणकावून विचारला होता.

पण ह्याबाबत माझे मत असे आहे की:

समजा काही कारणाने इतरधर्मीयाला हिंदू धर्मात यायचे असेल तर त्याला ते स्वातंत्र्य का नसावे व तशी तरतूद हिंदूच नव्हे तर प्रत्येकच धर्मात का नसावी (परधर्मीयांना आपल्या धर्मात स्वीकारण्याची).

प्रश्न हा आहे की जबरदस्तीने बाटवले गेले का / धर्मांतर केले गेले का?

सदर उदाहरणात जबरदस्ती आढळत नसली तरी आमीष आहे आणि जाहिरातबाजी आहे.

आता आमीष आहे हे मान्य केले तर मुळात हिंदूंचे मुसलमान होतानाचे कारण काय होते ह्याबाबत उत्सुकता आहे.

ते कारण जर 'जबरदस्तीने केलेले धर्मांतर' असेल तर आज आमीष दाखवण्यात गैर नाही. ते कारण जर 'आमीष दाखवणे' असेल तरीही आज आमीष दाखवण्यात गैर नाही. ते कारण जर 'स्वेच्छेने इस्लाम धर्म पत्करला' असे असेल तर आमीष दाखवणे गैर ठरू शकेल, तेही इतक्याच मर्यादीत अर्थाने की हिंदू अश्या पद्धतीने धर्मप्रसार करण्यासाठी प्रसिद्ध नाहीत. अन्यथा, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीयांनी आमीषे, जबरदस्ती ह्या प्रकारानेच धर्मांतरे केली हे मान्य होत असेल त्यांना हिंदूंनी हे करण्यात काय वावगे दिसते असा प्रश्न आहे.

धन्यवाद!

लिंबूभाऊ,

हिंदू असलेल्यांनी धर्मांतर करून इस्लाम किंवा अन्य धर्म स्वीकारला तर त्यांच्या जातीचे काय होते आणि अन्य धर्मीयांनी हिंदू धर्म स्वीकारला तर त्यांना हिंदूंपैकी कोणती जात प्राप्त होते ह्यावर काही सर्वमान्य तोडगा (अनुक्रमे) असेलही किंवा निघू शकेलही.

पण गाजावाजा झालेल्या ह्या धर्मांतर प्रकरणाची चर्चा करताना तूर्त 'जात' हा विषय टाळून चर्चा करणे का जमू नये हे लक्षात येत नाही आहे. तसेही, ज्यांचे धर्मांतर झाले (आग्र्यात) आणि ते ज्यांनी घडवून आणले त्यांनी ह्याबाबत काहीतरी विचार केलेलाच असेल.

बेफिकीर, या सगळ्या कन्फ्यूजनचे एकच कारण आहे की 'हिंदु' नावाचा एक धर्म हा टिपीकल पाश्चात्य 'धर्म' पद्धतीत बसणारा धर्म नाही. त्यामुळे एखाद्याला धर्म द्या, धर्म स्विकारा, धर्म बदला याविषयी काही प्रोसिजर निश्चित करायची जरूर हिंदु धर्माला नव्हती.
एका ठराविक भूभागावर रहाणार्या एका ग्रूपची जीवनपद्धती म्हणजे हिंदुधर्मं.
अर्थात आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एखाद्याला या पद्धतीने जीवन जगायचे असेल तर त्याला धर्मात समाविष्टं होता यायची काही प्रोसिजर हवी.

>>> दिवाकर देशमुख | 10 December, 2014 - 10:35 नवीन

http://www.maayboli.com/node/2018
<<<

हा प्रतिसाद ह्या चर्चेतील एक कंट्रिब्युटरी प्रतिसाद न ठरता निव्वळ इतर ठिकाणचा संदर्भ देऊन काहीतरी सिद्ध केल्याचा आव आणणारा प्रतिसाद आहे. सूज्ञांना विनंती की ह्यावर भाष्य करून येथील चर्चेचा तोल कृपया बिघडवला दिला जाऊ नये. धन्यवाद!

तसेच, तो एक वाहता धागा असल्याने उद्या, परवा तेथील प्रतिसाद वाचले तर कोणालाही काहीही ताळमेळ लागणार नाही. सबब, असे प्रतिसाद अनुल्लेखिले जावेत असे आवाहन!

>>>अर्थात आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एखाद्याला या पद्धतीने जीवन जगायचे असेल तर त्याला धर्मात समाविष्टं होता यायची काही प्रोसिजर हवी.<<<

धन्यवाद, त्या मुद्यावर सहमती दर्शवल्याबद्दल!

जे श्री यांनी इथे प्रश्न विचारलेला तोच प्रश्न मी तिथे विचारलेला परंतु तिथे या प्रश्नाची काहिंना मिर्ची लागली.
तेच आता यावर इथे चर्चा करत आहेत हे पाहुन नवल वाटले. इथे साळसुदपणाचा "आव" आणत आहेत. तिथे मात्र असोच

.

धन्यवाद बेफी,

शंकेचे थोडेफार समाधान झाले....>>बेफिकीर, या सगळ्या कन्फ्यूजनचे एकच कारण आहे की 'हिंदु' नावाचा एक धर्म हा टिपीकल पाश्चात्य 'धर्म' पद्धतीत बसणारा धर्म नाही. त्यामुळे एखाद्याला धर्म द्या, धर्म स्विकारा, धर्म बदला याविषयी काही प्रोसिजर निश्चित करायची जरूर हिंदु धर्माला नव्हती.
एका ठराविक भूभागावर रहाणार्या एका ग्रूपची जीवनपद्धती म्हणजे हिंदुधर्मं..<< साती ताईंचा हा प्रतिसाद ही विचार करायला लावणारा आहे.
आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एखाद्याला या पद्धतीने जीवन जगायचे असेल तर त्याला धर्मात समाविष्टं होता यायची काही प्रोसिजर हवी हे ही...

मयेकरांनी दिलेली बातमी वाचून प्रश्न पडले.

१. ह्या प्रकरणातील सत्याचा छडा लावला जाणार का?
२. दडपशाहीने किंवा फसवून धर्मांतर करण्यात आले असे सिद्ध झाले तर पुन्हा त्यांना मुस्लिम बनवणार का?
३. संबंधितांना शिक्षा होणार का?
४. मुस्लिम मुल्ला मौलवी त्या लोकांना पुन्हा मुस्लिम करून घेण्यास राजी होणार का?
५. नेशनने दिलेली बातमीच खरी आहे हे कशावरून?
६. क्लिपमध्ये दिसत असलेले लोक दबावाखाली असल्याचे एकही चिन्ह का दिसत नव्हते?
७. मुस्लिम समाज, ओवेसी बंधू अजून शांत कसे?

बेफिकीरजी,

हिंदु धर्मीयामधे पुन्हा हिंदु करुन घेण्याची सोय आहे. शिवाजी महाराज जन्माला येण्यापुर्वी अशी सोय नव्हती. याच कारणाने आजही मकबुल बट ( मुळच आडनाव भट ) इ लोक आहेत आणि दुर्दैवाने त्यातले काही दशहतवादी / हुरीयत कारवायात गुंतले आहेत.

शिवाजी महाराजांनी हा धोका ओळखुन नेताजी पालकर हा जबरदस्तीने मुस्लीम झालेल्या सेनापतीला पुन्हा धर्ममार्तंडांच्या सहमतीने रितसर पुन्हा हिंदु करुन घेतले.

स्वा. सावरकरांनी सुध्दा ही सोय नसल्याने काही - शतके आपण पारतंत्र्यात राहिलो ही लिहले आहे. जगाचा इतिहास पाहिल्यानंतर मात्र मुस्लीम आक्रमणात बळजबरीने मुस्लीम झालेली जनता पुन्हा ख्रिश्चन झालेली अनेक उदाहरणे आहेत.

भारतात समाधर्मसमभाव ह्या शब्दाखाली अनेकांनी ह्या कृतीला विरोध दर्शवला. संपुर्ण समाजच पुन्हा मुळच्या धर्मात आल्यावर जातीच्या प्रश्न फारसा गंभीर रहात नाही.

या संदर्भातला अ. नगर ला ख्रिश्चन असलेल्या अ‍ॅड. बाळासाहेब गायकवाड यांचे एकट्याचे धर्मपरिवर्तन आणि पुढे पुन्हा ख्रिश्चन होणे यामागची कारणे जाणली तर संपुर्ण समाजाचे परिवर्तन जास्त उत्तम झाल्याचे दिसते.

कोकम,

तुम्ही दिलेली लिंक धाग्याशी संबंधीत निश्चीत वाटत आहे पण एकुणच याहू अ‍ॅन्सर्ससारख्या लिंक्स विश्वासार्ह नसतात असे ऐकले आहे.

तरीही त्यातील 'बेस्ट अ‍ॅन्सर'मधील हे हे विधान आणखीनच प्रश्न निर्माण करते.

>>>Hinduism is not a religion like christianity or islam. You can follow hinduism principles in life but hinduism never accepts conversions. <<<

असे असेल तर 'सारा जहाँ हमारा' म्हणणार्‍या इस्लामवाद्यांपेक्षा हिंदूंनीच सारा जहाँ हमारा म्हणायला हवे कारण कोणत्याही धर्माचा होण्याआधी माणूस हिंदू असू शकतोच हे सिद्ध होते आणि हेही सिद्ध होते की हिंदू जीवनशैली आयुष्यातील कोणत्याही टप्प्यावर अंगिकारता येते. तसेच, हे उत्तर योग्य मानले तर हिंदूत्ववादी संघटनांनी काल आग्र्यात घडवून आणलेल्या धर्मांतराची व त्याच्या जाहिरातींची गरज नव्हती हेही सिद्ध होते आणि हेही सिद्ध होते की त्यांना अशी धर्मांतराची नवीन प्रथा पाडायचीच असेल तर त्याला 'ना' म्हणणे हेही हिंदू जीवनशैलीत कुठेच म्हंटले जाऊ शकत नाही.

एकुण काय, हिंदू हा धर्म नसून जीवनशैली किंवा विचारसरणी आहे हे विधान तूर्त तरी फारच संदिग्धता व धूसरता निर्माण करणारे वाटत आहे.

.

hinduism never accepts conversions>> हे चूक आहे. हिंदू धर्मात कधीही येता येते.

तसेच, हे उत्तर योग्य मानले तर हिंदूत्ववादी संघटनांनी काल आग्र्यात घडवून आणलेल्या धर्मांतराची व त्याच्या जाहिरातींची गरज नव्हती हेही सिद्ध होते >>

आपण साधारणपणे उत्सव आणि कर्मकांडप्रिय आहोत. म्हणून अशा समारंभाची गरज भासत असावी. शिवाय जाहीरात करण्याची गरजही असतेच, कारण काठावर असणार्‍या इच्छुकांना माहिती मिळून ते ही धर्मांतरास प्रवृत्त होऊ शकत असले पाहीजेत.

ओके मयेकर,

तुम्ही देत असलेल्या लिंक्सवरून हे दिसत आहे की बहुतांशी माध्यमांनी संघ व संघाच्या शाखांना ह्या प्रकरणात दोषी मानलेले आहे.

त्यामुळे पहिल्या पानावर काल विचारलेल्या प्रश्नांपैकीच प्रश्न आता विचारतो.

१. हे लोक किंवा त्यांचे पूर्वज (जे मुळात अरब नाहीत) मुस्लिम स्वेच्छेने बनले होते हे सिद्ध झाले आहे काय?

२. स्वेच्छेने बनले नसतील तर तेव्हाच्या धर्मांतराचे कारण काय होते हे ज्ञात आहे काय?

३. मुस्लिम व ख्रिश्चन धर्म हिंसा व आमीषे ह्यांचा वापर धर्मप्रसारासाठी करतात तर हिंदू (धर्म म्हणा, जीवनशैली म्हणा, विचारसरणी म्हणा) लोकांनी आमीष दाखवण्यात नेमके कोणाचे व काय बिनसते?

माध्यमांना दुसरा उद्योग काय असतो? संघ काय आहे हेच मुळात समजून न घेता उचलले बोट लावले कीबोर्डला करत सुटायचे.

मुस्लिम व ख्रिश्चन धर्म हिंसा व आमीषे ह्यांचा वापर धर्मप्रसारासाठी करतात तर हिंदू (धर्म म्हणा, जीवनशैली म्हणा, विचारसरणी म्हणा) लोकांनी आमीष दाखवण्यात नेमके कोणाचे व काय बिनसते?>>

Happy

>>>माध्यमांना दुसरा उद्योग काय असतो? संघ काय आहे हेच मुळात समजून न घेता उचलले बोट लावले कीबोर्डला करत सुटायचे.<<<

सैल ताशेरा वाटत आहे. क्षमस्व!

माध्यमांच्या बेजबाबदार आणि पूर्वग्रहदूषित वृत्तीवर ती एक टिप्पणी आहे. तो ताशेरा वाटला असल्यास शब्दयोजना चुकली हे कबूल करतो. परंतू त्यातला विचार चुकीचा नाही.

>>>माध्यमांच्या बेजबाबदार आणि पूर्वग्रहदूषित वृत्तीवर ती एक टिप्पणी आहे.<<<

आग्रा धर्मांतर ह्या विषयाबाबत माध्यमे बेजबाबदारपणे वागल्याचे सिद्ध झालेले नसावे.

भारतातली बहुसंख्य माध्यमे पूर्वग्रहदूषित आहेत असे सांगायचे होते.

अवांतर चर्चेबद्दल क्षमस्व. आता काही भर घालता आली तर टाकेन. अन्यथा, हेमाशेपो.

.

एक प्रश्न किंवा शंका:

नेताजी पालकरला जबरदस्तीने मुस्लिम बनवण्यात आले व कालांतराने महाराजांनी त्याला पुन्हा हिंदू धर्मात येण्याची परवानगी दिली व काही धार्मिक सोपस्कार घडवून त्याला हिंदू धर्मात आणल्याचे घोषितही केले.

धर्मनिरपेक्ष लोकशाहीत असे करू नये असे म्हणणे असेल तर आज होत असलेली हिंदू टू मुस्लिम किंवा हिंदू टू ख्रिश्चन ही कन्व्हर्जन्स रोखण्यासाठी कोणीकोणी आवाज उठवला? त्यापैकी ह्या व्यासपीठावर किती जण होते?

Pages