आग्रा धर्मांतरण

Submitted by बेफ़िकीर on 9 December, 2014 - 11:00

मूळ लेख मी काढून टाकलेला आहे. प्रशासकांना लेखाखालील प्रतिसादांच्या सोयीला कुलूप लावण्याची विनंती केली होती, पण ती विनंती अजून विचारात घेतली गेलेली नाही.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तलवारीच्या धाकाने कधीही कोणालाही हिंदू धर्म स्वीकारण्यास लावण्याची जबरदस्ती करण्यात आलेली नाही

...
अंगचा आळस हो ! याला सहिष्णु स्वभाव म्हणणे म्हणजे आनंदच !

अंगचा आळस हो ! याला सहिष्णु स्वभाव म्हणणे म्हणजे आनंदच ! >>>

तुमच्या बुद्धीची तारीफ करावी तितकी कमीच आहे !

छत्रपती शिवाजी महाराजांना तलवारीचा धाक दाखवून धर्मांतर करवून घेणं अशक्यं होतं का हो?
पण एक नेताजी पालकराचा अपवाद वगळता कोणालाही हिंदु धर्मात पुन्हा घेतल्याचं उदाहरण महाराजांच्या इतिहासात आढळत नाही.

जेते असूनही आपला धर्म न लादणं याला सहिष्णूता म्हणतात जी पूर्वापार हिंदू राजे वगळता कोणीही दाखवलेली आढळत नाही.

>>जेते असूनही आपला धर्म न लादणं याला सहिष्णूता म्हणतात जी पूर्वापार हिंदू राजे वगळता कोणीही दाखवलेली आढळत नाही.
वाह एका वाक्यात फार लाखमोलाची गोष्ट सांगितलीत. Happy

>>महेश, तुम्ही जपान सारख्या देशात रहात आहात त्या देषात राहताना किंवा त्या देशाची आणी आपली तुलना करताना तुम्हाला जाणवत नाही का?!की आपल्या देशाच्या कुठल्या गोष्टींमुळे आपण एवढे मागे आहोत?

सुरेख, तुम्हाला जर असे म्हणायचे असेल की आपण भेदामुळे / दुहीमुळे मागे आहोत तर ते बरोबर असले तरी हे पद्धतशीरपणे निर्माण करण्यात आले राजकीय फायद्यांसाठी. आजवर पारडे एकाच बाजूला झुकत होते.
आता जरा ते दुसर्‍या बाजुला झुकले तर आधीच्या पारड्याने लगेच एवढी कुरकुर करण्याचे कारण नाही.

प्रितिका यांनी त्यांच्या एक दोन पोस्टसमधे फारच टू द पॉईन्ट लिहिलेले आहे. ग्रेट !

जर कोणी आम्ही किती चांगले आहोत हे ओरडून ओरडून आणि रागावून सांगत असेल तर त्यावर काय प्रतिक्रिया असतील ऐकणार्‍यांच्या ? Happy
एक प्रकारचा भेद नष्ट करण्यासाठी, त्याजागी वेगळ्या प्रकारचा भेद आणून कसे चालेल ? Happy

हे भारताच्या संविधान मुळे शक्य झाले आहे असे नाही का वाटत?>>>>>>> अजिबात नाही.त्यापूर्वीपासून आपले समाजसुधारक कार्यरत होतेच.अगदी आधीच्या काळातील चार्वाकापासून ही परंपरा चालू आहे.

अगदी बरोबर, परस्पर विरोधी मतांना देखील सामावून घेणारी होती आर्य सनातन वैदिक संस्कृती.
पुर्वी अनेक लोकांनी अनेक चर्चा, वादविवाद करून समाजाची सुयोग्य रचना कशी असावी याचा फार सखोल विचार करून अनेक आचार, विचार सुचविलेले होते. आणि ते फक्त कर्मकांडासाठी नाही तर अगदी मुलभूत विचार / तत्वज्ञान देखील.

प्रितिका,
आदिशंकराचार्यानी धर्मप्रचार कसा काय केला बरे?
छत्रपतींच्या आधी वा नंतरच्या तसेच महाराष्ट्रा बाहेरच्या इतिहासाचा अभ्यास वाढवा. फक्त प्रचारकी साहित्य तुम्ही वाचत आहात.

महेश
तुमचे सो कॉल्ड संतुलन कुठे ढळत आहे ते दिसले का? संतुलानाच्या नावाखाली अपण कशाला समर्थन देतोय हेच लक्षात येत नाहिये का?

हे भारताच्या संविधान मुळे शक्य झाले आहे असे नाही का वाटत?>>>>>>> अजिबात नाही.त्यापूर्वीपासून आपले समाजसुधारक कार्यरत होतेच.अगदी आधीच्या काळातील चार्वाकापासून ही परंपरा चालू आहे

------ सुधारणेचे श्रेय कुणाला द्यावे यावरुनही वाद? Sad
भारताचे संविधान अस्तित्वात नसते तर ज्या (वैचारिक, सामाजिक) सुधारणा आज दिसत आहेत त्या निव्वळ सुधारकान्च्या कार्यामुळे दिसल्या असत्या? पुर्वीच्या काळातही सुधारक काम करत होतेच हे मान्य पण आज जोडीला कायद्याचे पाठवळ आहे त्यामुळे दृष्य फरक जाणवतो.

उदय कायद्याच्या पाठबळाबद्दल सहमत.

अन्यथा एकनाथ महाराजांनंतर इतक्या वर्षांनी चवदार तळं करावं लागलं नसतं.

शिवाजी महाराजांचे आणि नेताजी पालकरांचे उदाहरण आले ते छानच झाले.
महाराजांचा राज्याभिषेक आणि पालकरांची घरवापसी, दोन्ही अगदी सुखासुखी झाले होते; नाही का?

>>तुमचे सो कॉल्ड संतुलन कुठे ढळत आहे ते दिसले का? संतुलानाच्या नावाखाली अपण कशाला समर्थन देतोय हेच लक्षात येत नाहिये का?

मुळात एखाद्या गोष्टीला समर्थन दिले याचा अर्थ मी इतर गोष्टींचा तिरस्कार किंवा द्वेष करतो असा होत नाही. तुम्ही जो बायनरी प्रमाणे ० / १ विचार करता तो येथे लागू होत नाही. पहा विचार करून.
स्वधर्माचा अभिमान असुनही परधर्माबद्दल देखील आदर असावाच नव्हे ते हिंदू धर्माचे खरे लक्षण आहे हे मला माहित नाही असे नाही. पण म्हणुन स्वतःला सारखेच नावे ठेवून आणि कमी लेखून कसे चालेल. त्याने एक प्रकारचे सामाजिक औदासिन्य / आक्रमकताच वाढीस लागेल ना.

धर्मग्रंथात हिंदू हा शब्दच नाही
हिंदू म्हणविणारयांच्या धर्मग्रंथांच्या यादीत ४ वेद, १८ पुराणे, ६ शास्त्रे, ६४ कला यांचा समावेश करण्याची हौस हिंदूत्ववादी लेखकांना आहे. पण यापैकी एकाही ग्रंथात हिंदू हा शब्द आढळत नाही. हिंदू हा जर धर्म असेल, तर हा शब्द कुठल्या तरी धर्मग्रंथात असायला हवा होता. पण तो नाही. इतकेच काय अगदी अलीकडील काळातील वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी सांप्रदायांच्या वाङ्मयातही हिंदू हा शब्द आढळत नाही. असे का? याचे उत्तर कोणाकडेही नाही. याउलट आर्य आणि ब्राह्मण यांचे उल्लेख मात्र जागोजाग सापडतात. वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी हे सांप्रदाय वेद प्रणीत हिंदू पंथ नाहीत. त्यांचे नंतर हिंदुकरण झाले आहे.

इब्लिस,
इतिहासाचा अभ्यास तुम्ही करावा अशी तुम्हाला नम्र सूचना आहे. शिवाजी महाराजांच्या आधी अखंड हिंदुस्तानाला मोगल आणि दक्षिणेतील पाच बादशहांनी कसं भरडून काढलं होतं याचा इतिहास वाचलात तरी बरंच काही समजेल.

आदी शंकराचार्यांनी धर्मप्रसार केला तो स्वतःच्या जोरावर, कोणत्याही राजसत्तेच्या बळावर किंवा जबरद्स्तीने नाही. हे देखील तुम्हाला माहीत नसेल तर प्रश्नच संपला.

आणि प्रचारकी साहीत्याचं म्हणाल, तर मी अमेरीकेत बसून काय वाचते याचा तुम्हाला भारतात बसून साक्षात्कार झाला म्हणजे तुम्ही चमत्कारी अवतार आहात असंच म्हणायला हवं! हिंदू धर्माबद्दल ठणकावून मत मांडणारा प्रचारकी साहीत्य वाचतो असं असेल तर विरोधात बोलणारे महंमदाच्या मांडीवर बसून कुराण आणि ख्रिस्ताकडून बायबलची दिक्षा घेऊन आले असं म्हणावं का?

अ‍ॅडमिनच्या विपूत जाऊन तक्रार करालच आता. किंवा कोणीतरी दुसरा करेल.

प्रितिका, यांना हिंदु धर्म म्ह्णजे वैदिक ब्राह्मण किंवा आर्य ब्राह्मण असे म्ह्णायचे आहे का?

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला कुणी नकार दिला होता आणी का? काशी वरुन ब्राह्मणला का बोलवावे लागले होते?

मुस्लिम राज्यकर्त्यांनी तलवारीच्या धाकाने नक्की कोणाचे धर्मांतर केले असा प्रश्न पडलाय. शिवाजी महाराजांचे पूर्वज आणि अनेक राजपूत शूरवीर या शाह्यांच्या नोकरीत होते. त्यांच्यावर धर्मांतराची गाज का नाही पडली?

धर्मांतर करून घ्यायला तलवारीचा धाक लागतो का हा एक मुद्दा. पण धर्माबाहेर घालवायला, धर्मातल्या धर्मात वेगळी पायरी द्यायला तलवारीच्या पाठबळाची गरजही नसते.

भारताचे संविधान अस्तित्वात नसते तर ज्या (वैचारिक, सामाजिक) सुधारणा आज दिसत आहेत त्या निव्वळ सुधारकान्च्या कार्यामुळे दिसल्या असत्या? पुर्वीच्या काळातही सुधारक काम करत होतेच हे मान्य पण आज जोडीला कायद्याचे पाठवळ आहे त्यामुळे दृष्य फरक जाणवतो. >>>

उदय,
भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच्या काळातही सुधारणा झाल्या होत्या आणि त्याला कायद्याचं पाठबळही मिळालं होतं. सतीची प्रथा बंद होणं हे याचं लख्खं उदाहरण. तसेच स्वातंत्रपूर्व कालातच ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुल्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढही रोवली होती. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही हिंदुस्तानच्या संविधानाच्या अस्तित्वानंतर झालेली आहे असं म्हणता येणार नाही. त्याचबरोबर हुंडाबळीविरोधी कायदा अस्तित्वात आल्यावरही हुंडाबळी जाण्याचं आजही थांबलेलं नाही हे जळजळीत वास्तव आहे.

कायद्याचा धाक अत्यावश्यक आहे, पण त्याचबरोबर पूर्वग्रहरहीत समाजाची बांधणीही तितकीच आवश्यक आहे. आणि यासाठी कोणत्याही धर्माचा अतिरेक वाढू देणं हे शहाणपणाचं नाही. पण त्याचबरोबर केवळ एकाच धर्मावर वाटेल तसे आरोप आणि टीका ही देखील निषेधार्हच आहे.

सुरेख, सिंधू नदीच्या आसपास आणि विशेषतः पलिकडे राहणारे लोक यांना सिंधू म्हणले जायचे, पण इराणी(?) भाषेत स ला ह म्हणतात म्हणुन त्याचे हिंदू झाले.
आणि तसेही या भूभागातील संस्कृतीला (वैदिक तसेच अवैदिक, द्वैत तसेच अद्वैत, इ. इ.) काहीतरी नाव दिले तर लक्षात येईल म्हणुन आता जगन्मान्य असलेला शब्द आहे हिंदू (काही लोकांना आवडो न आवडो)
हे तुम्हाला ठाऊक नसेल असे नाही, पण तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने अनेक वाचकांना पुन्हा एकदा कळेल. धन्यवाद Happy

<<एकाच धर्मावर वाटेल तसे आरोप आणि टीका ही देखील निषेधार्हच आहे>>

असं सांगा. हिंदू धर्मातील अनिष्ट गोष्टींवर टीका केल्याने त्यात सुधारणा होणार असतील तर कोणता धर्म बळकट होईल? वाटेल तसे अरोप वाटत असतील तर त्या आरोपांचा प्रतिवाद करता यायला हवा. की प्रतिवाद करता येत नाहीत म्हणून ते वाटेल तसे?

ज्ञानेश्वरादी भावंडे , शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, नेताजी पालकरांची घरवापसी व बाजीराव-मस्तानीच्या मुलाच्या हिंदूधर्मप्रवेश या प्रकरणांत काय संदेश घ्यायचा?

या विषयासंदर्भात दादा धर्माधिकारींनी एका पुस्तकात विचारमंथन केले आहे.
-------------------------
हिंदू धर्माची एक मोठी समस्या आहे ती म्हणजे हा धर्म केवळ जन्माने मिळू शकतो. तसेच जे लोक अन्य धर्मात गेले आहेत त्यांना परत येण्याची सोय नाही. अनेक धर्मांतरे ही जरी जोरजबरदस्तीने झाली असली तरी अनेक वेळा आपणच आपल्या लोकांना विषम वागणूक देऊन त्यांच्या उत्थानासाठी काही केले नाही म्हणुन देखील झालेली आहेत. Sad
-------------------------
यातील दुसरा भाग महत्वाचा आहे. पुर्वीची गावगाडा (बलुतेदार) पद्धती ही सर्वांच्या मुलभूत गरजा भागण्याच्या दृष्टीने केली गेलेली एक सुनियोजित पद्धत होती. कालांतराने त्यामधे काही त्रूटी निर्माण होत गेल्या आणि त्यातुन भेदाभेद जास्तच वाढत गेले. आता शहरीकरणामुळे जरी ते नाहीत असे दिसत असले तरी मनामनात अजुनही मोठ्या प्रमाणावर आहेत. ते नाहीसे करण्यासाठी काय करता येऊ शकेल याचा विचार केला जावा, केवळ वादविवादाने आणि आम्ही म्हणतो तेच योग्य, तुम्ही वाईट असे दोषारोप करत राहण्याने काही साध्य व्हावयाचे नाही. पहा मंडळी विचार करून.

कबिरा खडा बाजार में, माँगे सबकी खैर,
ना कोहूसे दोस्ती, ना कोहूसे बैर Happy

एक सच्चा हिंदू म्हणून असले जातीभेद आपल्या धर्मात आहेत, याचीच मुळातून लाज वाटली पाहिजे माणसाला. >>>>>>> सहमत.कोणालाही स्वतःच्या जातीचा अभिमान का बाळगावा हे न उलगडलेले कोडे आहे.

>>>>>>>>>>>

जातीचा अभिमान का बाळगावा हे न उलगडलेले कोडे आहे तर धर्माचा अभिमान बाळगावा हे कोडे कसे उलगडले?
एक माणूस म्हणून माणसामाणसांमध्ये धर्मभेद आहेत याची आपल्या सर्वांनाच मुळातून लाज का वाटत नाही?

<<भूभागातील संस्कृतीला आता जगन्मान्य असलेला शब्द आहे हिंदू >असे असेल तर तो हिंदू धर्म कसा होऊ शकतो?
मग अमेरिकेत जी संस्कृती आहे त्यांचे खाने पिने वेषभुषा केषभुषा त्यांचे सार्वजनिक ठिकानी चालनारे त्यांचे चाळे हाच त्यांचा धर्म का? भुभागावरुन आपण फक्त एवढेच म्ह्णु शकतो भारतात राहनारे भारतिय, अमेरिकेत राहनारे
अमेरिकेन, जापान मधे राहनारे जापनिज याला आपण धर्म म्ह्णु शकत नाही फारतर हिंदूस्तानात राहनारे हिंदूस्तानी
असे आपण म्ह्णू शकतो नाकी हिंदू धर्मिय.

१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातल्या नेत्यांची आडनावे आणि जात काढणारे लोक इथे भाषणे ठोकत आहेत हे पाहून अंमळ मौज वाटली.

maheshjivipu.jpg

अच्छा म्हणजे समोरचे साहेब जाती जमातींवरच बोलत होते म्हणुन इब्लिस यांना "प्रश्न जातीजमातीचा नाही गांधीवाद समजुन घ्या" असे त्यांना समजावुन सांगावे लागले. Proud

धन्यवाद निरीक्षक Wink

उगाच वाट्टेल ते बडबडू नका, त्या पोस्टीचा संदर्भ तिथेच दिलेला आहे तो पहा.
अन्यथा तो कुलूपवाला बाफ उघडून पुर्ण पोस्टस पाहून काय बोलायचे ते बोला.

हे वर निरीक्षकांना सांगा
अर्थाचा अनर्थ त्यांनी केलेला चालतो वाटते तुम्हाला ?

Pages