आग्रा धर्मांतरण

Submitted by बेफ़िकीर on 9 December, 2014 - 11:00

मूळ लेख मी काढून टाकलेला आहे. प्रशासकांना लेखाखालील प्रतिसादांच्या सोयीला कुलूप लावण्याची विनंती केली होती, पण ती विनंती अजून विचारात घेतली गेलेली नाही.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Biggrin Rofl

लबाड गामाने नेहमीप्रमाने अर्धवट ज्ञान पाजळले आहे.

कुंतीचा तो संदर्भ नियोगाद्वारे म्हणजे परपुरुषापासुन मुले होण्याबाबत आहे.

स्वतःच्या नवर्‍यापसुन स्त्रीला कितीही मुले झाली तर हिंदुत्वाला चालते.

स्वतःच्या नवर्‍यापसुन स्त्रीला कितीही मुले झाली तर हिंदुत्वाला चालते.>>>> अस दादा कोन्डके टाईप द्वर्थी लिहीत नका जाऊ.:फिदी: यातुन दुसर्‍या धर्मा विषयी पण अनुद्गार निघु शकतील हा प्रेमळ पण गम्भीर सल्ला.( म्हणजे आम्ही नाही काढणार पण तसा अर्थ निघतोय बघा.)

यात अनुद्गार काय आहेत ?

स्वतःच्या नवर्‍यापासुन कितीही मुले होऊ दिलीत तरी हिंदु धर्म ( किंवा इतर कोणताही धर्म जसे की इस्लाम , ख्रिस्चन , बौद्ध्ह इ इ ) मुलांची संख्या किती असावी यावर कोणतेही बंधन घालत नाही.

बास का ?

अरेरे, सुरेखबाईंचा आधार म्हणजे अनिता पाटील आहे होय. त्या जीवावर यांच्या उड्या.....

आख्ख्या आयुष्यात इतके तद्दन टाकाऊ लिखाण करणारे कुणी असेल असे वाटले नव्हते. ती एक आणि तो पुरुषोत्तम म्हणवून घेणारा खेडेकर....

इथे माबोवरतरी त्यांच्या लिखाणाचा आधार कुणी देत असेल असे वाटले नव्हते पण आता म्हणजे अगदीच हद्द झाली.

आख्ख्या आयुष्यात इतके तद्दन टाकाऊ लिखाण करणारे कुणी असेल असे वाटले नव्हते. ती एक आणि तो पुरुषोत्तम म्हणवून घेणारा खेडेकर.... >>>> श्रीमंत कोकाटे विसरलात का?

++++++++++त्या काळात राजेशाही होती. आज लोकशाही आहे. ++++++++++++

हे मात्र बरोबर बोललात "काउ" आजच लोकशाही आहे, आता पर्यंत फक्त राजेशाहीच होती.

:G: :G: :G:

अनिता पाट्लचा संदर्भ दिला म्हनुन इथले धर्ममार्तंड हसतात.

पैलवानमुनी चुकीचे संदर्भ देत आहेत , त्याबद्दल मात्र कुणी बोलत नाहीत.

<<<आख्ख्या आयुष्यात इतके तद्दन टाकाऊ लिखाण करणारे कुणी असेल असे वाटले नव्हते. ती एक आणि तो पुरुषोत्तम म्हणवून घेणारा खेडेकर...>>त्यांनी त्यांच्या मणच काहिच काहीच लिहलेल नाही हो, त्यांनी त्याचे सगळे आधार,पुरावे आणि .संदर्भ : लेकाच्या खालि दीले आहेत ते निट वाचा..
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या सारख्या महान इतिहासाचार्य चे संदर्भ दिले आहेत..

यांचे लिखाण इतके तद्दन टाकाऊ वाटत असेल तर मुळ लिखान किती टाकावु असेल.?

यांचे लिखाण इतके तद्दन टाकाऊ वाटत असेल तर मुळलिखान किती टाकावु असेल.?>>>>>>.अक्षरामध्ये अन्तर / गॅप सोडत चला. आधी वाचताना वाटले की कुठल्या तरी खान नावाच्या माणसाबद्दल लिहीत आहेत.

रश्मी,
शुद्धलेखन शिकवताना तोंडघशी पडलात.

*

जामोप्या, तुम्ही पर्फेक्ट पकडालाय पैलवानाला.

कुंतीला अजून मुले जन्माला घाल, असा आग्रह नवर्‍यानेच केल्यावर, "नियोगातून"* अधिक मुले जन्माला घातलीत तर मी व्यभिचारिणी ठरेन असे तिने सांगितले. नवर्‍याला अधिक मुले हवीच होती. ती दुसर्‍या बायकोकडून मिळवली.

नियोग तर नियोग. मुलं हवीतच!

तेव्हा पैलवान, तुमच्या त्या कोणत्याश्या अपत्याविना मुक्तीचं काय झालं हो?

* टीप : आपल्या प्राचीन अ‍ॅडव्हान्स्ड सायन्स नुसार "आर्टिफिशियल इन्सेमिनेशन (बाय डायरेक्ट डोनर विदाऊट क्लिनिकल इन्टर्व्हेन्शन)" अशा प्रकारे मुले उत्पन्न करण्याच्या क्रीयेला नियोग असे म्हणत.

पडु द्या हो. निदान सुरेखनी त्यान्ची पोस्ट तरी दुरुस्त केली. भावना,चित्रा, रेखा सगळ्या पोचल्या तिथे. आणी मला लागलेले पण नाहीये कुठे.

चांगलाच कैचीत पकडला बाकी पैलवान मैदान सोडुन पळाले Lol असे ही जुनी सवय आहे.
आता दुसर्‍याच विषयावर बोलायला सुरुवात करतील

धागा वाचायला मिळाला नाही.पण शीर्षकावरून आग्रा येथे झालेल्या धर्मान्तारासंबंधी असावा. बेफिंनी धाग्यात त्याचे समर्थन केले कि निषेध ते कळू शकले नाही. परंतु माझ्या मते जे झाले ते योग्यच झाले.

धर्म म्हणजे एक जीवनपद्धती असते. माणसाने संसारात पाळावयाचे सर्वसाधारण नियम असतात. जसे लग्न कसे करावे, मृत्युनंतर देहाची विल्हेवाट कशी लावावी,तसेच इतर बाबी ह्याबाबत नियम असतात. अर्थात माणूस मेल्यावर त्याला जाळा अथवा पुरा किंवा एखाद्या विहिरीत टाका त्या माणसाला काही फरक पडत नसतो. कारण मृत्युनंतर त्याच्या देहाची कशीही विल्हेवाट लावली तरी सत्य एकच असते ते म्हणजे त्या माणसाचा झालेला मृत्यू.

धर्म म्हणजे नियम. आपले नियम हे दुसऱ्याच्या नियमापेक्षा कसे श्रेष्ठ आहे हे सांगण्याची चढाओढ लागलेली असते. आपापल्या धर्माचे नियम स्वधार्मियांनी पाळावे म्हणून आपल्या पुर्वाज्जांनी बऱ्याच शकली लढवलेल्या असाव्यात जसे कि हे नियम खुद्द देवाने निर्माण केलेत, त्यामुळे हे पाळावेच लागतील.नाहीतर नरकात जावे लागेल वैगरे. अद्याप हि त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे वय म्हातारे झाले तरी बुद्धी बाल्यावस्थेतच असण्यासारखे आहे.

आता चांगला धर्म कोणता असेल ? तर आपल्या मनाला पटेल ज्यात आपला विकास होवू शकेल असे व्यक्तीला वाटेल तो धर्म स्वीकारण्यास त्याला हरकत नसावी. आणि धर्म हा मेल्यावर व्यक्तीला काय फायदे होतील हे सांगणारा नसावा तर इथलेच पृथ्वीवरचे जीवन कसे चांगले व्यतीत होईल ह्याचे मार्गदर्शन करणारा असावा. प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक स्वतंत्र जग असते आपल्या कोणत्या नियमाने आपले जीवन व्यतीत करायचे आहे ते ठरवण्याचा हक्क त्या त्या व्यक्तीला असावा.

आग्र्यातील दोनशे कुटुंबांना हिंदू जीवनपद्धतीत आपला विकास घडेल आपले जीवन चांगले जाईन असा विश्वास वाटला असावा म्हणून त्यांनी धर्मांतर केले तसेच हिंदू धर्मात आपला विकास होवू शकत नाही म्हणून करोडो हिंदूंनी अन्य धर्मात धर्मांतर करून आपल्या पसंतीची जीवनपद्धती स्वीकारली. त्यांचेही अभिनंदन.

सध्या संसदेत धर्मांतरावर बंदी आणावी असे वक्तव्य वैकैया नायडू ह्यांनी केले ते घातक आहे प्रत्येकाला आपला धर्म निवडण्याची मुभा असावी. नायडूंनी हे विधान केले कारण त्यांना चांगलेच ठावूक आहे आपले इनकमिंग कमी आहे आउटगोइंगच जास्त आहे. आता हे आउटगोइंग रोखण्यासाठी धर्मान्तरावरच बंदी घालावी. जेणेकरून झाकली मुठ सव्वा लाखाची राहील .

<<* टीप : आपल्या प्राचीन अ‍ॅडव्हान्स्ड सायन्स नुसार "आर्टिफिशियल इन्सेमिनेशन (बाय डायरेक्ट डोनर विदाऊट क्लिनिकल इन्टर्व्हेन्शन)" अशा प्रकारे मुले उत्पन्न करण्याच्या क्रीयेला नियोग असे म्हणत.>>.

इब्लिस, माहिती लै भारी ! कुठुन कुठुन शोधुन काढता हो तुम्ही ?

सध्या संसदेत धर्मांतरावर बंदी आणावी असे वक्तव्य वैकैया नायडू ह्यांनी केले ते घातक आहे प्रत्येकाला आपला धर्म निवडण्याची मुभा असावी. नायडूंनी हे विधान केले कारण त्यांना चांगलेच ठावूक आहे आपले इनकमिंग कमी आहे आउटगोइंगच जास्त आहे. आता हे आउटगोइंग रोखण्यासाठी धर्मान्तरावरच बंदी घालावी. जेणेकरून झाकली मुठ सव्वा लाखाची राहील .

याला मात्र अनुमोदन, किंबहुना हा प्रस्ताव आणण्याची पार्श्वभूमी म्हणूनच तो धर्मातराचा घाट घालण्यात आला असावा. त्यामुळे वरवर जरी अतिरेकी हिंदूंना आवरण्याचा भाजपाचा इमेज बिल्डींगचा प्रयत्न असल्यासारखा वाटतोय तो मुळात हिंदुना दुसऱ्या धर्मात जाणे रोखण्यासाठी आहे.

सुदैवाने, विरोधकांची डोकी अजून शाबूत आहेत आणि हा कावा उघडकीस आणतील अशी आशा आहे

पगारे +१

धर्मांतराच्या मुद्याला आता धर्मयुद्धाचे स्वरुप येवू लागले आहे इथे. सगळ्याच धर्मात आपले लोक कसे श्रेष्ठ आहेत हे ठासून ठासून लिहून ठेवलय ते किती खरे मानावे हा प्रत्येकाचा व्ययक्तिक प्रश्न आहे. इथे चर्चा धर्मांतरबाबत चालू असताना इतिहासाचा तास चालू झाल्यासारखे वाटते आहे.
धर्म बदलून त्यातून काही निष्पन्न होणार असेल तर काहीच हरकत नाही बदलायला. ही कट्टर धर्मव्यवस्था आणि जातीव्यवस्था असल्यामुळे आजपर्यंत व्यवसाय क्षेत्रेही मर्यादित होती. जसे गावात जर चिकण मटणाचे दूकान असेल तर ते मुसलमानांचेच , किराणा दूकाने ही मारवाड्यांचीच वगैरे आता तसेही काही राहिले नाही. उद्या एखाद्याला हिंदू व्हायचे असेल तर कुठला विधी कशाला करायला हवा त्याने ? स्वतःला हिंदू म्हणवून घ्यावे कुठलीही जाहिरात न करता. जगात कुठेही मिडीयाला चघळायला एक च्युंगम पाहिजे असते त्यात भारतात भिन्न धर्म आहेत त्यामुळे अशा बातम्यांची टी आर पी वाढणारच प्रत्यक्षात कोणीही धर्मांतर केले तरी त्या धर्माला किंवा इतरांना काहीही फरक पडत नाही.

किकु,
हे शाब्बास! पर्फेक्ट वाक्य आहे →

>>उद्या एखाद्याला हिंदू व्हायचे असेल तर कुठला विधी कशाला करायला हवा त्याने ? स्वतःला हिंदू म्हणवून घ्यावे कुठलीही जाहिरात न करता<

>>उद्या एखाद्याला हिंदू व्हायचे असेल तर कुठला विधी कशाला करायला हवा त्याने ? स्वतःला हिंदू म्हणवून घ्यावे कुठलीही जाहिरात न करता<
------
सहमत... त्या ईच्छुकान्चे धर्मान्तर करण्यापेक्षा त्या प्रक्रियान्ची जाहिरात करणे हाच मोठा उद्देश होता का असे वाटायला लागले आहे.

याने काय साध्य होणार आहे? शम्भर लोकान्ना कुठला धर्म ठेवायचा ह्याचे स्वातन्त्र्य आहे हे दाखवायचे होते?

किरणकुमार बाकी पोस्टशी सहमत, विशेषतः इब्लिस यांनी उल्लेख केलेला भाग.

पण
सगळ्याच धर्मात आपले लोक कसे श्रेष्ठ आहेत हे ठासून ठासून लिहून ठेवलय >>> हे हिंदुंच्या कोणत्याच ग्रंथांत लिहीलेले नसावे. कारण मुळात एक प्रमाण ग्रंथच कोणता धरला जात नाही.

Pages