इतर घडामोडी

इतर घडामोडी


उदय मला ब्रिगेडची भरपुर माहीती आहे. त्यांची वेबसाईटही माहीत आहे.

हो ना! टोणगा ब्रिगेदचा आहे ही ही (चुकीची )माहीतीही चिन्याला आहे स्मित



टोणगा ब्रिगेदचा आहे ही ही (चुकीची )माहीतीही चिन्याला आहे
टोणगा काही आर आर पाटील किंवा शरद पवार नाही की ज्याबद्दल सर्वांना माहीती असावी.

आता सेवा संघवाले विदर्भात भाजपचाही प्रचार करतात
अरे हो पण मुळ प्रश्नाचे उत्तर दे ना!!!की ज्या विचारसरणीच्या विरोधात हे लोक आहेत त्यातच यांचा सहभाग समर्थकांना कसा चालतो???



@टोणगा
समर्थकाना चालण्याचा प्रश्न नाही. ब्राम्हणाना उघड उघड शिव्या देणारे कुटुम्ब भाजपला कसे चालते हा खरा प्रश्न आहे. याचा अर्थ सरळ आहे भाजपचा लोचट पणा. आणि म्हणे पार्टी विथ डिफरन्स...

ब्राह्मणांना शिव्या देणे आणि भाजपाचा संबंध काय? भाजपा काय कुणा एका जातीचा मक्ता घेतलेला पक्ष नाहिये.. उलट तुम्ही ज्या मराठा सेवा संघाचा उल्लेख केला आहे ते जर कुठल्या विशिष्ट जातीच्या विरोधात असतील तर तो त्यांचा प्रश्ण आहे..



चिन्या,
अरे जरा आधीचे पोस्ट्स नीट वाच. मी आणि उदय कोणत्या अग्रलेखाबद्दल चर्चा करत होतो, ते बघ, आणि मग केतकरांनी माफी मागावी, ही मागणी कर.



ब्राम्हणाना उघड उघड शिव्या देणारे कुटुम्ब भाजपला कसे चालते हा खरा प्रश्न आहे.
---- अच्छा म्हणुन का लोकं म्हणतात Party with a difference(s) स्मित.

chinoox - धन्यवाद, ज्ञानात भर पाडल्याबद्दल. पण मग हेच (अग्रलेखातील मत हे मुख्यसंपादकाचे असावेच असे नाही) ईतर वृत्तपत्रां बाबतही लागु होते कां? मग सामान्य लोकांना कसे समजणार चांगल्या अथवा वाईट लेखाचे श्रेय कुणाला द्यावे?



केतकरांचा अग्रलेख असता तर ही पुतळा उभारायची कल्पना अमेरिकेत जाऊन भाजपला पैसा पुरवणार्‍या तमाम भारतीयांच्या मस्तीतून आली आहे. अशा कुत्र्यांनी कितीही भुंकले तरी त्याकडे हाड म्हणायलाही लक्ष देउ नये. पुतळा उभारायचा तर सोनियाचा उभारा, भारतात न कोणी असे महान झाले जवाहर, इंदिरा, राजीव सोडता न कोणी होईल राहूल, प्रियांका, रेहान वगळता अशी विचारमौक्तिके दिसली असती. पण या लेखात असलेला प्रत्येक परिच्छेदातील शिवराळ भाषेचा, लाळघोटेपणाचा, संघविरोधी तळतळाटाचा अभाव बघता लेख केतकरांनी लिहिलेला नाही असे वाटते.

संभाजी ब्रिगेड आणि शिवसंग्रांम हे राष्ट्रवादीतलेच दोन गट आहेत, आर आर आबा विरुद्ध अजितदादा.



अरे जरा आधीचे पोस्ट्स नीट वाच. मी आणि उदय कोणत्या अग्रलेखाबद्दल चर्चा करत होतो, ते बघ
बहुतेक तुम्ही 'राजीव गांधी'च्या अग्रलेखाबद्दल बोलत असाल. फरक काय पडतो त्याने???साफ चुकिची माहीती आम्ही पसरवली म्हणुन माफी मागावी असे माझे म्हणने होते. का दररोजचा लोकसत्ताही केतकर वाचत नाहीत???

अच्छा म्हणुन का लोकं म्हणतात Party with a difference(s)
टन्याने म्हटलेले बरोबर आहे. पण टोणग्या आज इकड फिरकला नाहीये वाटत.



तेला च्या राजकारणावर चांगला लेख लोकप्रभा मधे आला आहे,
http://www.loksatta.com/lokprabha/20080613/cover.htm

हे गिरीश कुबेर (इकॉनॉमिक टाईम्स मधले आहेत हे नवीन कळाले), त्यांचे 'हा तेल नावाचा इतिहास आहे' हे पुस्तक याच विषयावर चांगली माहिती देणारे आहे. जुन्या हितगुज वर येथे थोडी माहिती मी टाकली होती या पुस्तकाची.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/123211.html?1172680790



छान लेख आहे फारेंड. या खाचाखोचा माहिती नव्हत्या.

    ***
    The facts expressed here belong to everybody, the opinions to me. The distinction is yours to draw.



    मागे एक लेख वाचला होता.. त्यामध्ये इराक वरील हल्ल्यामागे, सद्दाम हुसेनचा तेल ऍम्स्टर्डॅम कमोडिटीज एक्स्चेंजवर तेल विकण्याचा प्रयत्न हे एक महत्त्वाचे कारण आहे असे म्हटले होते.. आज डॉलरची सगळ्यात जास्त मागणी ही तेलाच्या व्यवहारामुळेच आहे.. अमेरिकेची निर्यात किती आहे आणि तेल व्यवहारात किती डॉलरची उलाढाल होते हे बघण्यासारखे आहे.. गम्मत म्हणजे, कुबेरांच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, कुणीही तेलाचा सौदा करो, व्यवहार डॉलर मध्ये.. आता कुठलाही देश डॉलर काय कपाटात भरून ठेवत नाही.. तो परत बाजारातच गुंतला जातो.. आणि डॉलर गुंतवायला अमेरिकन सरकारी बाँड ह्यापेक्षा अजुन कुठले सुरक्षित हत्यार.. म्हणजे डॉलर आला परत अमेरिकेच्याच बाजारपेठेत..

    ह्या संपूर्ण व्यवहारात अमेरिकेत उत्पादन शून्य, निर्यात शून्य पण चलन अमेरिकेचे आणि ते राहिले पण अमिरेकेतच..





    ह्या संकेतस्थळावर खूपच विनोदी माहिती दिली आहे. ती वाचून हसावे की या लोकांची कीव करावी असा मला प्रश्न पडला. काहि जणांनी कॉमेंटस् दिल्या आहेत. त्या खूपच मनोरंजक आहेत.



    अरे हि शिवसंग्राम काहि मोठि संघटना नाहि.
    हिला बिड जिल्ह्यातिल मराठा-वंजारि सन्घर्शा चि किनार आहे.
    बिड जिल्ह्यात वंजारि समाज (मुंडे) हा बर्‍यापैकि वर्चस्व ठेवुन आहे.
    त्याना तोंड देण्यासाठि मेटेने हि सन्घटना काढलि आहे.
    तसेच भुजबळा च्या समता परिषदेला(माळि समाज) उत्तर म्हणुन
    म्हणुन च तर शरद पवारानि मेटेला प्रोस्ताहन दिले आहे.
    खरे तर हि सन्घटना पहिल्यान्दा भुजबळा साठि च काढलि होति.



    लोकमन्च हा नविन ब्लॉग हा छान आहे.
    ज्या बातम्या धर्म निरपेक्ष मिडिया लपवुन ठेवतो.
    तो हा लोक मन्च बेधडक देतो.
    एकदा वाचवा असा आहे.





    http://www.shivdharma.com/campaign_bamaninegate.asp#Tulsi_Vivah

    अत्यन्त मुर्ख साइट आहे ही. स्वतःच्या नसलेल्या अकलेचे तारे तोडणे ह्यालाच म्हणत असावेत.



    मूलभूत सेवांसाठी नऊशे कोटींचा मलिदा
    सकाळ न्यूज नेटवर्क
    नवी दिल्ली, ता. २८ - रेशन, पाणीपुरवठा, वैद्यकीय सेवा यांसारख्या मूलभूत सेवा व पोलिस, बॅंकिंग, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांसारख्या गरजेच्या सेवा मिळविण्यासाठी देशातील दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना सुमारे नऊशे कोटी रुपयांची लाच द्यावी लागत असल्याची लाजीरवाणी व भयानक वस्तुस्थिती "इंडिया करप्शन स्टडी- २००७' या पाहणी अहवालातून समोर आली आहे.
    बिहार, जम्मू-काश्‍मीर, आसाम, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश व गोवा या राज्यांत एकूण भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे.

    सर्वाधिक भ्रष्टाचार पोलिस सेवेमध्ये असून, मागील वर्षी दारिद्य्ररेषेखालील २५ लाख कुटुंबांनी या-ना-त्या कामासाठी पोलिसांना २१४ कोटी ८० लाख रुपये दिले. यातील बहुतांश लाच ही केवळ तक्रार नोंदणीसाठी होती! लाच देण्याचे हे प्रमाण ४८ टक्के असून, तुलनेने बारावीपर्यंतच्या शालेय शिक्षणासाठी लाच द्यावी लागण्याचे प्रमाण सर्वांत कमी म्हणजे३.४ टक्के इतके आहे. उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांच्या हस्ते आज या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल व सेंटर फॉर मीडिया स्टडीज्‌ या दोन संस्थांनी महाराष्ट्र, गोवा, आसामसह ३१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत नोव्हेंबर २००७ ते जानेवारी २००८ दरम्यान संयुक्तरीत्या ही पाहणी केली होती. दारिद्य्ररेषेखालील २२ हजार ७०० कुटुंबांना या पाहणीदरम्यान मूलभूत व गरजेच्या ११ सेवांबाबत त्यांचा अनुभव व आकलन, याबद्दल प्रश्‍न विचारण्यात आले.

    महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, पश्‍चिम बंगाल, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांत हे प्रमाण माफक आहे.

    अहवाल प्रकाशनानंतर बोलताना, उपराष्ट्रपती श्री. अन्सारी म्हणाले, ""भ्रष्टाचारामुळे गरीब लोकांना भोगाव्या लागणाऱ्या हालाचे विश्‍लेषण या अहवालात केले आहे. लाच न देऊ शकल्यामुळे किंवा योग्य जागी "ओळख' किंवा संबंधांचा अभाव, यामुळे दारिद्य्ररेषेखालील दोन तृतीयांश कुटुंबांना सार्वजनिक वाटप पद्धती, शिक्षण परवडू शकलेले नाही, ही खेदाची बाब आहे.'' भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी राष्ट्रीय मतैक्‍याची गरज आहे व सतत दक्षता ही सु-शासनाची हमी आहे, असे त्यांनी सांगितले. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल इंडिया संस्थेचे अध्यक्ष सेवानिवृत्त नौदल सेनाप्रमुख ऍडमिरल आर.एच. ताहिलिहानी म्हणाले, ""मूलभूत व गरजेच्या सेवा अधिकारांबाबत दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांमध्ये प्रशिक्षित व्यक्तींमार्फत जागरुकता निर्माण केली जाईल. तसेच त्यांच्या अधिकारांची माहिती देणारी पासबुके त्यांना देण्यात येतील.''

    महाराष्ट्रात मुंबई, नगर, यवतमाळ, नंदूरबार व नांदेड या पाच जिल्ह्यांमधील दारिद्य्ररेषेखालील ९०४ कुटुंबांना या पाहणीदरम्यान प्रश्‍न विचारण्यात आले. मात्र, राज्यातील भ्रष्टाचाराची नेमकी माहिती मिळू शकली नाही. वरील ११ सेवांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचे राज्यनिहाय अहवाल येत्या काही दिवसांत प्रसिद्ध होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

    "रोहयो'तील कामांसाठी लाच
    राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील दारिद्य्ररेषेखालील ७ टक्के म्हणजे ९ लाख ६० हजार कुटुंबांनी मागील वर्षी ७ कोटी १५ लाख रुपयांची लाच अधिकाऱ्यांना दिली. यापैकी ५० टक्के कुटुंबांनी दैनंदिन रोजगार योजनेत काम करण्यास आपली तयारी सांगून नाव नोंदविण्यासाठी ही लाच दिली होती, असे या अहवालात म्हटले आहे.

    सार्वजनिक वाटप पद्धती, शाळा शिक्षण, गृहबांधणी या क्षेत्रांत मध्यम प्रमाणात, तर, पोलिस भरती, पाणी व वीजपुरवठा, बॅंकिंग, वन क्षेत्र सेवेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचे या पाहणीत आढळले. जमीनविषयक रेकॉर्ड नोंदणी, तसेच संबंधित माहिती मिळविण्यासाठी पोलिस सेवेच्या खालोखाल लाच द्यावी लागते, असे अहवालात दिसून आले आहे. दारिद्य्ररेषेखालील कुटुंबीयांबाबतच्या अभ्यासानुसार वैद्यकीय सेवांमध्येही भ्रष्टाचार बोकाळला आहे.



    किंवा योग्य जागी "ओळख' किंवा संबंधांचा अभाव,
    याचा अनुभव मला अमेरिकेत पण येतो. पद्धतशीर रीत्या अमेरिकन व्हिसासाठी अर्ज केला, तो फेटाळण्यात आला, मुंबईमधे. पण इकडून सिनेटरच्या ऑफिसातल्या ओळखीच्या माणसाचा वशिला लावताच लग्गेच व्हिसा!
    १९७९ साली, माझे आईवडील इथे आले असता, योगायोगाने त्यांची आणी ओहायोच्या एका काँग्रेसमनची ओळख झाली. नि काय विचारता? घर बसल्या ग्रीन कार्ड. अर्ज वगैरे नावापुरता केला, पण ग्रीन कार्ड घरीच.

    मला फार वाईट वाटते की हिलरी क्लिंटनला नॉमिनेशन मिळाले नाही, कारण तिच्या जवळच्या सहाय्यकांपैकी एकजण आमच्या चांगल्याच ओळखीचा आहे. त्याला मुलगा झाल्याबरोबर दुसर्‍याच दिवशी स्वतः हिलरीने आपणहून फोन करून बाळ बाळंतिणीची खुशाली विचारली. नंतर तिच्याबरोबर त्या मुलाचा फोटोहि काढला! हे आत्ता तीन महिन्यापूर्वी. आता तिला निदान कॅबिनेटमधे तरी जागा मिळावी. नाहीतर ती सिनेटर राहीलच म्हणा! मीहि आता गावातल्या राजकारणात भाग घ्यावा म्हणतो!

    पण गरजेच्या सेवाच काय, ड्रायव्हिंग लायसन इ. गोष्टींसाठी सुद्धा इथे लाच द्यावी लागत नाही. फोनवर तक्रार केली तरी १० मिनिटात पोलीसची गाडी घरी हजर होते.
    नागपुरात असताना माझ्या मोठ्या भावाचा मित्र मोटर सायकलचे लायसन देणारा अधिकारी होता. मागितल्याबरोबर दुसर्‍या दिवशी लायसन घरी!
    माझा भाऊ मिलिटरीतला, तीस वर्षांपूर्वी रिटायर झाला. बरीच वर्षे इथे राहिला, अमेरिकन नागरिकत्व घेतले. मग कायमचा भारतात गेला. मग तिथलेहि नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केला. अर्ज पाठवला दिल्लीला. एका मित्राला फोन केल दिल्लीत. आठ दिवसात सर्व सह्या होऊन नागरिकत्वाचे कागद हातात!



    भारतीय नागरिक (?), दहा वर्षे पाकिस्तानात नरक यातना भोगुन, देशात परत येत होता. वाघा सिमेवरून त्याला कर्तव्य-तत्पर यंत्रणेने परत पाकिस्तानात पाठवले.

    http://news.in.msn.com/international/article.aspx?cp-documentid=1536499

    ही बातमी खरी असेल तर खुपच लाजिरवाणि अशी घटना आहे. या देशात लाखो लोकं बेकायदेशी प्रवेश करतात, आणि रमतात. मग अजुन एकाने (तोही भारतीय माणुस) काय फरक पडला असता?

    अशीच लाजिरवाणि घटना काही आठवडे आधी अन्सार बर्नी (पाकिस्तानात मानव अधिकारा साठी लढणार्‍या) यांच्या बाबत घडली होती. ह्या व्यक्तीला दिल्ली विमान तळावरून २-३ तासातच दुबईला परतवले (deport) होते. बर्नी सारख्या व्यक्तिला दिल्ली विमानतळावरच्या आधिकार्‍यांनी ओळखु नये म्हणजे काय म्हणावे? ह्या व्यक्तीने ३५ वर्ष पाकिस्तानी तुरुंगात सडणार्‍या काश्मिर सिंग यांच्या सोडवणुकीत महत्वाची भुमिका बजावली होती. अशा व्यक्तीच्या स्वागता साठी हार-तुरे नाही पण तिला प्रवेश मीळायला तर हरकत नसावी, पण आपण त्यांची परत पाठवणुक केली. मग २-३ दिवसांनी परराष्ट्र मंत्रालय 'बर्नी यांचे भारतात केव्हाही स्वागतच आहे' असे पत्रक काढल...बुंद से गई... असे झाले. नुकसान तर झालेच होते.

    या दोन्ही उदाहरणांना किती सतर्क, तत्पर, कटेकोर, शिस्तबद्ध आपली सरकारी यंत्रणा आहे असे म्हणावे ?



    http://esakal.com/esakal/07142008/Specialnews15AA96D485.htm

    सतिश माढेकरांनी मागे या विषया वर हितगुज मधे लिहले होते, या बाईंचा पुन्हा सासरी परतण्याचा मानस आहे, आता काय म्हणणार ?



    Supreme court new law.
    .
    http://www.ibnlive.com/news/rape-victims-statement-needs-no-backing-apex...
    .
    So now you can take anyone to court.



  1. सुवोच्च न्यायालयाचा त्रागा.
  2. http://www.rediff.com/news/2008/aug/05house.htm

  3. थोड्याशा याच धरतीवर २००६ मधे एक बातमी वाचली होती
  4. http://www.rediff.com/money/2006/sep/11power.htm
  5. विज तोडणार्‍याची कर्मचार्याची/ अधिकार्‍याची नंतर काही दिवसातच बदली झाली, विलासराव म्हणाले होते 'बदलीचा आणि त्याच्या कर्तव्य दक्षतेचा काही संबंध नाही आहे'. बदली होणे हा प्रशासनाचाच एक भाग आहे हे सुजाण जनता जाणतेच.


  6. reddit clone for India related news

    http://indiahacker.com/



    This is wrong



    http://www.expressindia.com/latest-news/iBigg-Boss2-i-They-dropped-me-be...

    कुणाला कशाचे दु:ख तर आठवलेना वगळल्याचे दु:ख. आठवले साहेब - तुम्ही खासदार आहात, जनतेची देवा करा, त्यांच्यासाठी वेळ द्या, कुठे त्या शो च्या मागे लागता आहात? जनतेचे प्रश्न जाणुन घेण्यासाठी वेळ कमी पडावा एव्हढी कामे शिल्लक आहेत. अनुयायी तर तोड-फोड करायला निमित्त शोधतच असतात कां?

    मागे आपले लाडके रेल्वे मंत्री लाल यादव 'पाचवी पास से तेज' मधे भाग घ्यायला आले होते, सर्व प्रश्न आधी माहीत होते हा भाग वेगळा. रेल्वे चे सर्व उच्च पदस्थ अधिकारी मंडळी कार्यक्रमाला झाडुन हजर होती... ललवा क्या तेज है...



    जनतेची देवा करा, त्यांच्यासाठी वेळ द्या, कुठे त्या शो च्या मागे लागता आहात? जनतेचे प्रश्न जाणुन घेण्यासाठी वेळ कमी पडावा एव्हढी कामे शिल्लक आहेत. अनुयायी तर तोड-फोड करायला निमित्त शोधतच असतात कां?

    हो ते करतोच आहे. जन्तेचि शेवा करण्यापायीच तर टीवी वर चाललो हुतो. पण म्या बामण नाय ना (च्या मारी पार 'आठवले' असे बामणि नाव घेतले तरी यास्नि कसा पता लागला?) म्हूनशान दंगा. आता खासदारकी मिलाली, फुडल्या येळी परत निवडून यायचे तर टीवी वर दिसले पायजेल समद्यास्नि आमि कोन हाय ते!
    आता त्ये जन्तेचि शेवा नि त्यांचे प्रस्न कराले इतर लई खास्दार हायतं की!