आग्रा धर्मांतरण

Submitted by बेफ़िकीर on 9 December, 2014 - 11:00

मूळ लेख मी काढून टाकलेला आहे. प्रशासकांना लेखाखालील प्रतिसादांच्या सोयीला कुलूप लावण्याची विनंती केली होती, पण ती विनंती अजून विचारात घेतली गेलेली नाही.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काउ,

१.
>> ते शाळेतलं कुत्रया मांजाराच्या गोष्टीतलं संस्कृत शिकुन महाभारताचा अर्थ लावावा इतकं पांडित्य मला
>> तरी आलेलं नाही.

तुम्हाला इतकंही समजत नाही म्हणूनच तुम्ही गप्प राहायला शिका.

२.
>> बाकी , तुमच्या त्या 'अष्टम पुत्राचा' आशिर्वाद कुणी कुणाला नाहीच दिला तर बरे होईल .
>> गांधारीच्या शापाने कृष्ण निर्वंश होऊन मेला.
>> भीष्मदेखील निर्वंशच मेला !

कृष्णाचा निर्वंश गांधारीच्या शापाने झालेला आहे हेही तुम्हीच लिहिलंय ना? मग अष्टम्पुत्रा च्या नावाने खडे कशाला फोडता? तीच गोष्ट भीष्माची. निर्वंशाचा आशीर्वादाशी काय संबंध? तुम्हाला इतकंही समजत नाही म्हणूनच तुम्ही गप्प राहायला शिका.

३.
>> तुमचे शब्दलालित्य व पांडित्य पाहुन पुना ओकांचा आत्मा सुखावला असेल. आहे ! मला कुणीतरी वारस आहे !

हिंदूंच्या धर्मग्रंथांत निरर्थक खुसपटं काढून हिंदूंना हिणवण्याची तुमची वृत्ती पाहता कुणाचे आत्मे संतुष्ट झाले असतील ते कळलं आम्हाला.

हिंदूंचे धर्मग्रंथ काळानुसार बदलत असतात. किमान एव्हढा तरी बोध घ्या.

४.
>> हिंदु धर्मात सुखी नसलेल्या एका अभागी जिवाला साक्षात हिंदुंच्याच एका देवाने मुसलमान होण्यास सांगितले .
>> त्याप्रमाणे ( पुढच्या जन्मात ) तो मुसलमान राजा झाला व अल्ला की दुवा से सुखमय आयुष्य जगला.

कारण त्याला देवाचा आशीर्वाद होता म्हणून. तरीही तुम्ही अष्टंपुत्रा या आशीर्वादाला आक्षेप घेता. कमाल आहे.

हिंदूंना जसे सर्वांना सारखे समजतात तसे मुसलमान सर्वांना सारखं समजत नाहीत. तुम्हाला इतकंही समजत नाही म्हणूनच तुम्ही गप्प राहायला शिका.

स्वेच्छेने धर्मांतर करायचं असेल तर त्यास कोणाचीही कसलीही हरकत नाही.

५.
>> हिंदुने धर्मांतर केले तर त्यावर हिंदु देवच हरकत घेत नाही.
>> लब्बाड हिंदुत्ववाद्यांनी का बरे ऑब्जेक्शन घ्यावे ?

कारण भारताचे जे भाग मुस्लिमबहुल झाले ते भारतापासून तुटले. भारतातल्या हिंदूंना मुसलमानांच्या सोबत राहावं लागतं. हिंदूंच्या देवांना तसं राहावं लागत नाही. तुम्हाला इतकंही समजत नाही म्हणूनच तुम्ही गप्प राहायला शिका.

आ.न.,
-गा.पै.

Gama Pailwan

I admire your patience and persistence in answering this guys, and God knows you are doing the correct thing here.

However, please do not be under the impression that they are going to stop maligning Hindu religion or talking filthy about our Gods and culture. They live in a Hindu majority country, which by default is a tolerant and liberal by its very nature, and yet choose to turn against that very religion and society. Neither do they understand they are breaking the law of the land by doing so.

They do not understand what it means to live in a tightly controlled intolerant society and government.

If Admin wants their TRP, let them have it. Stop wasting your time and energy here. Start your own blog to show and spread your knowledge and educate people. These people cannot hurt your blog, obviously you have the authority to delete any nonsense from over there. Really meaningful discussions can be possible over there.

I don't mean to discourage you from fighting it out over here, I just don't think that it's worth it. You are a very genuine and mature person, it is just that it's simply just not worth it!

Sorry for English post. I cannot type fast in Marathi on my cellphone.

भारतातल्या हिंदूंना मुसलमानांच्या सोबत राहावं लागतं. हिंदूंच्या देवांना तसं राहावं लागत नाही. तुम्हाला इतकंही समजत नाही म्हणूनच तुम्ही गप्प राहायला शिका

...........

Proud

However, please do not be under the impression that they are going to stop maligning Hindu religion or talking filthy about our Gods and culture. They live in a Hindu majority country, which by default is a tolerant and liberal by its very nature, and yet choose to turn against that very religion and society. Neither do they understand they are breaking the law of the land by doing so.

They do not understand what it means to live in a tightly controlled intolerant society and government.

<<

जोशी,

एक्झॅक्टली याच कारणांमुळे तुमच्यासारख्यांच्या विचारांना माझा विरोध असतो.

रोजच्या जगण्यात काडीच्याही महत्वाची नसलेली 'धर्म' नावाची गोष्ट अती महत्वाची दाखवून त्याचं अवडंबर माजवणं मला पटत नाही.

दुसरं, इंटॉलरन्ट सोसायटी उर्फ मुस्लीम देशांत वाईट वातावरण असते, म्हणून तुम्हालाही हिंदू धर्माचे व आपल्या देशाचे तसेच टाईटली कन्ट्रोल्ड इन्टॉलरन्ट सोसायटीमध्ये परिवर्तन करणे अपेक्षित आहे काय?

'दे लिव्ह इन हिंदू मेजॉरिटी कन्ट्री अँड दे टर्न अगेन्स्ट इट?'
<<
व्हू द हेल आर यू टू स्पीक फॉर द ओव्हरऑल हिंदू कम्युनिटी? कोणत्या अधिकाराने तुम्ही 'they turn against it' म्हणत आमच्याबद्दल हे असले डायलॉग बोलता आहात? तुम्हाला हिंदू धर्माचे रक्षक, वा मुखंड घोषित कुणी केले?? I would say that you are not even an example of a good Hindu, let alone being spokesperson for Hinduism.

हजार वेळा आधी सांगितलंय तेच परत सांगतो. आम्हीच ते टॉलरन्ट व सर्वसमावेशक हिंदू आहोत, ज्यांच्या आजवरच्या सभ्य व शालीन वागणूकीमुळेच आपला धर्म महान म्हणवतो, व तुम्ही या हिंदू धर्माचे गोडवे गाऊ शकताहात. इतर धर्मांच्या इन्टॉलरन्सचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमच्या शालीन व सर्वसमावेशक हिंदू धर्माच्या मुळावरच घाव घालण्याचे घरभेदी धंदे तर तुम्ही व गापैसारखे तुमचे समविचारी लोक करीत आहात.

या धर्मातल्या सत्यनारायणासारख्या निरर्थक, 'बाजूला बसण्या'सारख्या जुनाट वा सतीसारख्याही तिरस्करणीय प्रथांचा तुम्ही / तुमच्यासारखी मते मांडणारे लोक गौरव करतात, तसेच त्यातील भेदाभेदावर आधारित जातीसंस्थेचे समर्थनही. या बाबींना विरोध करणे म्हणजे हिंदू धर्माला विरोध करणे असे अजिबात होत नाही. पण, राजकीय स्वार्थापायी सर्वच पुरोगामी हिंदूंना हिंदूविरोधी असे लेबल लावीत उर बडवणे सध्या फार वाढले आहे, व तुमच्यासारखे भाजपा समर्थकच त्यात सहभागी आहेत.

या धाग्यातील मी आतापर्यंत केलेले सर्व प्रतिवाद हे या प्रकारच्या भाकड समर्थनांबद्दलचे आहेत. उदा. नियोगाची प्रथा तुम्हाला पुन्हा सुरू करून हवी आहे की काय? मुलगाच जन्माला यायला हवा, तो नसला तर मुक्ती नाही अशा प्रकारची तक्रार तिथे माद्री करते मग पांडू कुंतीला आज्ञा देऊन नियोगाचा उर्वरित मंत्र तिला द्यायला सांगतो इ. गमती पुराणे म्हणून करमणूकीकरता ठीक आहेत. पण यातून मुलगेच जन्मावेत म्हणून मुलींची भ्रूणहत्या करण्यास तुम्ही अप्रत्यक्ष समर्थन देताहात, हे तुमच्या लक्षात कसे येत नाही?

साक्षर अन सुशिक्षित मधला फरक तुमच्या या असल्या पोस्टी वाचून ताबडतोब लक्षात येतो.

काही कुणाची हिम्मत नाहीये हिंदूंच्या देवदेवतांना 'मालिन' वगैरे करायची. असे कुणी विनाकारण करील, त्यांचा समाचार घ्यायला आम्ही समर्थ आहोत. पण पांडूच्या नियोगाबद्दल बोलले, तर 'आमच्या धर्मातल्या उज्वल प्रथांना हेटाळले' वगैरे बोलायचे काम नाही.

तुमच्यासारख्या प्रतिगामी, क्षूद्रविचारी, व निर्मळ हिंदू धर्माचे रूपांतर इस्लामसारख्या फतवेबाज संकुचित धर्मात करण्याचे प्रयत्न करणार्‍या 'हिंदुत्ववादी' लोकांनी हे पालथे धंदे तात्काळ थांबवावेत, असे आवाहन करतो.

तुम्हाला, तुम्ही चांगले हिंदूही नाहीत असे का म्हटलो, ते सांगतो आता.

एकदम बेसिक उदाहरण : 'कोकणस्थ', 'चित्पावन' अशी नावं घेत मला अमुक जातीचा असल्याबद्दल अभिमान आहे असे दाखवता का तुम्ही? एक सच्चा हिंदू म्हणून असले जातीभेद आपल्या धर्मात आहेत, याचीच मुळातून लाज वाटली पाहिजे माणसाला. Why are you flaunting the caste?

भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणत धर्म सुधारणा करू पहाणारे, वय व्यवसाय जाती विसरून एकमेकांच्या पाया पडणारे संतही हिंदूधर्मविरोधी आहेत अशी बोंबाबोंब त्याकाळचे तुमच्यासारखे स्वयंघोषित धर्ममार्तंडच करीत होते, अन असल्या भोंदू फतवेबाजांनीच घाऊकपणे विहिरीत पाव टाकून बाटवलेल्या हिंदूंना धर्माबाहेर जाण्यास भाग पाडले होते.

इतर धर्माचे लोक हिंदू जीवनपद्धती स्वीकारताहेत हे उत्तम! आनंद आहे. पण अहो, हे तर आपल्या देशात आधीपासून होतंय की! दुनियेतल्या कोणत्या देशातल्या मुसलमान बायका मंगळसूत्र घालतात हो? पण गेल्या १५ एक वर्षांत उलटा ट्रेंड का सुरु झाला बरं? बुरखे अन टोप्या, तशाच भीकबाळ्या का दिसायला लागल्या रस्त्यावर?

व्हय जोशी, आय अ‍ॅम प्रूव्हिंग युअर पॉइंट, फक्त तुमचाच पॉइंट नीट एक्स्प्लेन करतोय लोकांसाठी. तुमची संकुचित वृत्ती उघडी पाडतोय.

Gaama Pailwan

See, this is why I was telling you what I was telling you. Wink

दुर्योधन, कंटाळा आणि वेळेचा अभाव.

वेळेचा अभाव हे मुख्य कारण.आणि उपयोग काहीच नाही हो त्याचा. बाकीची कारणे गामा यांना उद्देशून लिहीलेल्या पोष्टीत आहेत.

आणि मी ते फक्त गामा यांना उद्देशून लिहीले होते कारण त्यांची विद्वत्ता फुकट जाते आहे इथे असे वाटले म्हणून, ते हक्काने मी त्यांना बोलू शकतो मित्र (समविचारी) या नात्याने. त्यांच्या तब्येतीच्या दृष्टीने पण काळजी वाटली.

असो.

छे छे! दुर्योधना, ते यांच्याकडून शक्य नाही.

यांचा पिंडच वेगळा आहे!

यांनी आधी माझ्या 'इब्लिस' नावावरून मी मुसलमान आहे अशी व्यनि/ईमेल मोहिम चालवली, त्यानंतर माझ्या डिस्प्लेवर स्लीपिंग बुद्धाचा सुंदर पुतळा आहे, म्हणून मी बौद्ध असावा, अशी विकृत कुजबुज चालवली.

यांच्या विकृत विचारांच्या विरुद्ध बोलले रे बोलले, की समोरच्याने पाकिस्तानात जावे असे ह्यांचे खासदार म्हणतात, अन यांच्यासारखे लोक तात्काळ त्या माणसाला हिंदू धर्मातून वाळीत टाकण्याचे प्रयत्न करतात.

अन हे लोक, मी हिंदू धर्माविरोधी बोलतो, असे म्हणतात!

हास्यास्पद !!

गामा यांना लिहिलेल्या प्रतिसादात मला एकही मुद्दा दिसत नाहीये...
खरच मुद्दे आहेत ना तुमच्याकडे??

जाऊ दे, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे असोच...

दुर्योद्यन, गामा यांचा एकच प्रतिसाद बघून मी त्यांना थांबायची विनंती केली नाही. त्यांच्या त्या प्रतिसादाशी मी सहमत आहे किंवा असहमत आहे याबद्दल मला काहीही भाष्य करायचे नाही. मी त्यांचा एकंदरित इथला वावर बघतो आहे आणि मग बोललो. I was talking about his overall posts etc. Not a single post. जाउद्या.

<<हजार वेळा आधी सांगितलंय तेच परत सांगतो. आम्हीच ते टॉलरन्ट व सर्वसमावेशक हिंदू आहोत, ज्यांच्या आजवरच्या सभ्य व शालीन वागणूकीमुळेच आपला धर्म महान म्हणवतो, व तुम्ही या हिंदू धर्माचे गोडवे गाऊ शकताहात. इतर धर्मांच्या इन्टॉलरन्सचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमच्या शालीन व सर्वसमावेशक हिंदू धर्माच्या मुळावरच घाव घालण्याचे घरभेदी धंदे तर तुम्ही व गापैसारखे तुमचे समविचारी लोक करीत आहात.>>

इथे एक उदाहरन देते माझी मुलगी जपान मधे राहते तिथे तिची एक जापनिज मैत्रिन आहे.जी टिचर आहे.ती प्रत्येक वर्षि भारतात बुध्दगयेला येते बुध्दांची भुमी म्ह्णुन. भारताच्या वास्तव्यात एकदा तिला वाईट अनुभव आला तिने तो माझ्या मुलिशी शेअर केला .माझ्या मुलिने तिला विचारलेकी तुला राग आला असेल ना आमच्या देशाचा? तेंव्हा तीम्हणाली होती की नाही आला राग त्या देषाचे खुप उपकार आहेत आमच्यावर त्यांनी आम्हाला बुध्द दिला आहे आणी बुध्दांनी आम्हाला माफ करायला शिकवल आहे
कुणी मानो अगर न मानो बर्‍याच देशात भारताची ओळख बुध्दांचा देश अशिच आहे.
.

इब्लिसकाका,

एकदम बेसिक उदाहरण : 'कोकणस्थ', 'चित्पावन' अशी नावं घेत मला अमुक जातीचा असल्याबद्दल अभिमान आहे असे दाखवता का तुम्ही? एक सच्चा हिंदू म्हणून असले जातीभेद आपल्या धर्मात आहेत, याचीच मुळातून लाज वाटली पाहिजे माणसाला. Why are you flaunting the caste? >>>

याच न्यायाने तुम्हाला इतर धर्मांचीही लाज वाटते का?

मुसलमानांमध्ये शिया आणि सुन्नींमधील रक्तरंजित संघर्ष जगजाहीर आहेत.
ख्रिश्चनांमध्ये कॅथलिक आणि प्रोटेस्टंट आणि त्यांच्यातील वाद आणि संघर्ष आहेत. त्यांची चर्चेसही वेगळी आहेत. त्याबरोबरच मॉर्मेन हा पंथही वेगळाच आहे.
जैनांमध्येही श्वेतांबर आणि दिगंबर आहेत. जे एकमेकांशी रोटी-बेटी व्यवहार शक्यतो टाळतात.
बौद्धांमध्येही नवबौद्ध हा वाद आहेच.

इब्लिस महोदय, जर तुम्हाला हिंदू धर्माबद्दल खरेच कळकळ असेल तर तुम्ही जो अव्याहत विरोधी विचारांचा आसूड चालवला आहे तो तुम्हाला आवरावा लागेल. कारण जर चिडून सांगत राहिले की हे चांगले नाहीये ते चांगले नाहीये तर त्याने तुमचा जनजागृतीचा हेतू साध्य न होता विपरीत परिणाम होण्याची शक्यताच जास्त. Sad

सद्ध्या हिंदू धर्मात एक प्रकारे आग्रही भुमिका वाढली आहे. माझे असे मत आहे, ती तशी वाढणे हे अतिशय आवश्यक होते आणि आहे. याचा अर्थ लगेच बाकीचे खतरेमे असा होत नाही. आणि असे मत आहे म्हणुन मी लगेच पक्षपातीदेखील होत नाही. Wink

ती नागाची गोष्ट माहिती आहे ना ? एका नागाला सांगितलेले असते की कोणाला त्रास देऊ नकोस, चावू नकोस, इ.
पुढची गोष्ट सांगत नाही. Happy

इब्लिस यांच्या या २-३ पोस्ट्स हिंदू धर्म विरोधी आहेत असे मला तरी वाटले नाही. सत्यनारायणाबद्दलच्या त्यांच्या मताशी मी सहमत नाही, पण त्यांची सगळी मते माझ्या विरोधी असली तरी त्यांना ती असायचा व ती लिहायचा हक्क आहे, EXACTLY हीच हिंदुधर्मियांची खासीयत आहे, जी जगात अजूनही सर्वत्र नाही.

आज हिंदू लोकांची स्थिती १०० वर्षांपूर्वी होती त्यापेक्षा चांगली असण्याचे कारण वेळोवेळी अशी चिकित्सा केली गेली आहे.

महेश, तुम्ही जपान सारख्या देशात रहात आहात त्या देषात राहताना किंवा त्या देशाची आणी आपली तुलना करताना तुम्हाला जाणवत नाही का?!की आपल्या देशाच्या कुठल्या गोष्टींमुळे आपण एवढे मागे आहोत?

इब्लिस - छान पोस्टी आणि विचार... आवडले.

प्रत्येक धर्मात काही तुरळक लोक टोकाची मते बाळगुन असतात. शिक्षणामुळे मनुष्य विचार करतो, विचार कसा करायला हवा हे शिकतो असा सर्वसाधारण अनुभव आहे पण त्यालाही काही अपवाद आहे. प्रथा, रिती रिवाज बाबत अनेक प्रश्न निर्माण करतात आणि काळाच्या कसोटीत त्या प्रथान्मधे काहीच तथ्य नाही हे लक्षात आल्यावर ते
विचार आणि प्रथा मागे पडतात. ज्या लोकान्चे पोट, रोजन्दारी त्या प्रथा पाळण्याशी निगडीत आहे त्या लोकान्चा प्रथा बदलाला (आणि म्हणुन सुधारणान्ना) विरोध असतो. उदा: एका छोट्या वर्गाचा computer technology भारतात आणण्याला प्रखर विरोध होता कारण त्या वर्गाची रोजी रोटी धोक्यात येण्याची शक्यता होती. काही लोकान्चे जॉब जातील हे मान्य पण एका सम्पुर्ण नव्या वर्गासाठी जॉब निर्माण झालेत. आणि आज सन्गणक आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे, त्याचे अनेक फायदे बघत आहोत. याला बदल असे म्हणतात.

स्व-कर्तुत्वाने मिळवलेल्या गोष्टी बाबत अभिमान बाळगणे मला समजते, आणि त्याबाबत आदरही असतो.
जात, धर्म, वर्ण ह्या गोष्टी मिळवण्यासाठी कुठलेही कर्तुत्व लागत नाही आणि त्या बहुतेकवेळा (आग्रा घटना अपवाद) जन्माने मिळतात, त्यात अभिमान वाटायला हवे असे काहीच नाही.

धर्म, जात, वर्ण या गोष्टी विचारणे आणि सान्गणे किव्वा आय डी चा किवा अजुन कुठला कल्पक मार्ग वापरुन प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरितीने सुचवणे ह्या गोष्टी अत्यन्त चुकीच्या समजतो.

प्रत्येक व्यक्तीला कुठला धर्माने आचरण करावे याचे स्वातन्त्र्य असायला हवे.

एकदम बेसिक उदाहरण : 'कोकणस्थ', 'चित्पावन' अशी नावं घेत मला अमुक जातीचा असल्याबद्दल अभिमान आहे असे दाखवता का तुम्ही? एक सच्चा हिंदू म्हणून असले जातीभेद आपल्या धर्मात आहेत, याचीच मुळातून लाज वाटली पाहिजे माणसाला. >>>>>>> सहमत.कोणालाही स्वतःच्या जातीचा अभिमान का बाळगावा हे न उलगडलेले कोडे आहे.

जातीभेदामुळे (आंम्हा हिंदुंचा) होणारा सार्वत्रिक अधःपात पाहून (तो सत्य आहे,हे पटल्यामुळे..) मी जात पाळायची बंद केलेली आहे.

सहमत.कोणालाही स्वतःच्या जातीचा अभिमान का बाळगावा हे न उलगडलेले कोडे आहे. >>>

जात पाळल्याने सध्या मिळणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आरक्षण! जोपर्यंत ते बंद होत नाही तोपर्यंत लोक जात पाळणार.

मी जात पाळायची बंद केलेली आहे. >>>

स्वतःपासून सुरवात करावी हे चांगलंच!

<< पण त्यांची सगळी मते माझ्या विरोधी असली तरी त्यांना ती असायचा व ती लिहायचा हक्क आहे, EXACTLY हीच हिंदुधर्मियांची खासीयत आहे, जी जगात अजूनही सर्वत्र नाही>>.

हे भारताच्या संविधान मुळे शक्य झाले आहे असे नाही का वाटत?

तेच तर ! ' हिंदु ' धर्मापेक्षा ' भारत देश ' अधिक सहिष्णु आहे

' हिंदु ' धर्मापेक्षा ' भारत देश ' अधिक सहिष्णु आहे >>>> वा! काय पण तुलना आहे!

भारत देश अस्तित्वात आला १९४७ साली हिंदुस्तानची फाळणी झाल्यावर. हिंदू धर्म त्यापूर्वी शतकानुशतके अस्तित्वात आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे तलवारी धरून मुसलमान आणि ख्रिश्चनांनी जो धर्मप्रसार केला आणि सम्राट अशोकाने आपल्या मुला-मुलीला पाठवून बौद्ध धर्माचा प्रसार केला, तसा प्रसार हिंदू धर्मियांनी कधीच केला नाही. तलवारीच्या धाकाने कधीही कोणालाही हिंदू धर्म स्वीकारण्यास लावण्याची जबरदस्ती करण्यात आलेली नाही.

हिंदू आणि इतर धर्मांमध्ये हा फरक आहे, फक्त येनेकेनप्रकारेण डोळ्यावर झापडं लावून हिंदू धर्माला आणि हिंदूधर्मियांना झोडपणं आणि त्याचं अश्लाघ्य समर्थन करणं हेच ज्यांचं ईसिप्त आहे, त्यांना हे कळणार नाही, खरंतर कळतं सगळं, पण तोंडाने कबूल करवणार नाही.

Pages