निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.
हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..
तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.
या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...
आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..
शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.
तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.
(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)
नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
साधना, मी नाताळाच्या सुमारास
साधना, मी नाताळाच्या सुमारास गोव्यात होतो. म्हणजे आत्ता तुला हा फुललेला टॅबेबुया बघता येईल. तेच हवामान असेल. जा बघून ये...
हो जातेच आता आंबोलीला
हो जातेच आता
आंबोलीला जाऊन बराच काळ लोटला आता जाणे आवश्यक.
बी काय मस्त फोटो टाकतोयस!
बी काय मस्त फोटो टाकतोयस! पिवळं फूल फारच नाजुक सुंदर.
हे बघ........डीसीतल्या स्प्रिन्गची सुरवात. तुझ्या गोव्यातल्या गुलाबी बहरासारखाच फोटो......

झाड फूल वेगळं आहे ....तरीही!
अरे वा साधना.................प्राउड मॉम!
साधना रोझीया पण खुप फुलतो.
साधना रोझीया पण खुप फुलतो. बहुतेक फेब्रुवारीमध्ये. पूर्ण झाडच फिकट गुलाबी रंगाच
एकारस्त्याअवर हीच झाडं लावली आहेत तर सगळा रस्ता गुलाबी सुंदर असतो.
गुगल क्रोमब्वर मराठी उमटतेय पण खोडता येत नाही. एक्सप्लोरर वर मराठीउमटन्त नाही. कायकर्यु?
हिरवा चाफा रहिला ना !!
हिरवा चाफा रहिला ना !!
क्रोम मध्ये प्रोब्लेम आहे
क्रोम मध्ये प्रोब्लेम आहे
खोडायचे आणि एक स्पेस द्यायची आणि मग टायपायचे. असे के ल्या ने असे टाईप होते. ते नंतर जोडायचे..
(यापेक्षा क्रोमच खोडले तर बरे
)
रोझिया पण खुप फुलत असणार कारण माझ्या मुलीने अणुशक्ती नगर डेपोत पाहिलेले झाड पुर्ण फुललेले आणि म्हणुनच तिच्या लक्षात आले. पण दुर्दैवाने मला हिरवीच झाडे दिसलीत. नव्या मुंबईत इतका फुललेला नाही पाहिलाय अजुन. कदाचित झाड जवान झाले नसेल
बहावा नोवेंबरपासुन इथे फुलतोय. नेहमीसारखा पुर्ण झाड पिवळॅ नाही पण दहा फांद्याच्या मध्ये एखादे झुंबर.. निसर्गचक्र उलटे फिरतेय.. आणि दहा झाडांमध्ये एखाद्-दुसरे झाड दोन तिन झुंबरे घेऊन उभे आहे.
मानुषी
शिकतेय हळूहळू. ती बिन्दास चालवते पण मीच घाबरत राहते. मग चुकून जोरात ओरडले की ती ओरडते, अशी ओरडुन मला घाबरवु नकोस 
बी, गुलाबी चाफ्याचा फोटो
बी, गुलाबी चाफ्याचा फोटो अत्यंत सुंदर आहे.
मानुषीताई, सुरेख आहेत फोटो.
मानुषीताई, सुरेख आहेत फोटो.
आकास निरभ्र आणि उन्ह असेल तर फुलांचे फोटो छानच निघतात. आकाशाची ती पार्श्वभुमी फुलांचे फोटो घेताना लाभायला हवी.
मग चुकून जोरात ओरडले की ती
मग चुकून जोरात ओरडले की ती ओरडते, अशी ओरडुन मला घाबरवु नकोस स्मित>>>>> साधना मी या सगळ्यातून गेलीये. माझ्या लेकीला मीच गाडी शिकवायला सुरुवात केली. पण आरडाओरदा(दोघींचा), किंकाळ्या (माझ्याच)यातून बचावण्यासाठी शेवटी तिने १ महिना क्लास लावला. म्हणज क्रेडिट त्या मास्तरांना! असो.........
मैत्रिणीने अगदी बोटभर उंचीची लिंबाची रोपं दिली होती एका टिनमधे. चार पाच.
दोन दिवसांनी पाहिलं(२ दिवस पुण्यात होतो.) तर सगळी कोवळी पानं गायबलीत. नुस्त्या काड्या उभ्या आहेत.
काय झालं असेल?
चिमण्या खातात का, की किडे इ.इ.? :रागः
अगदी बारिक गोगलगाई असतात.
अगदी बारिक गोगलगाई असतात. शंखाच्या आकाराच्या, एक सेमी लांब. आता त्या गोगलगाईच की दुसरे काही माहित नाही पण मीगोगलगाई म्हणते. हे पान खायचे उद्योग त्यांचे.
(No subject)
हं...लक्ष ठेवायला पाहिजे.
हं...लक्ष ठेवायला पाहिजे. कारण अश्या शंखयुक्त गोगा दिसलेल्या नाहीत एवढ्यात.
गुर्जी का हसू रार्हायले?
मानुषीताई, कै नै असंच
मानुषीताई, कै नै असंच
मातकटरंगी फांद्यांच्या पार्श्वभुमीवर जर्द पिवळ्या रंगात फुललेला पिवळा टॅबेबुया पाहिल्यानंतर गुलाबीकडुनही माझी अशीच काहीशी अपेक्षा होती आणि त्याची पुर्ती करणारा एकही टॅबेबुया मी अद्याप पाहिला नाही.>>>>>>साधना +१
हा गुलाबी टॅबेबुया:

विक्रोळी (ईस्टर्न एक्सप्रेस) पासुन घाटकोपर डेपो पर्यंत डाव्या बाजुला सगळी याचीच झाडे आहेत.
माझ्या घराजवळ येणार्या
माझ्या घराजवळ येणार्या सनबर्डच्या जोडीतल्या बाईसाहेबांचा फोटो घेणं काय जमत नव्हतं. शेवटी हा असा फोटो मिळाला. खाली डोकं वर पाय.

purple rumped sunbird female
ती फुले ती पाने ते प्रकाशाचे
ती फुले ती पाने ते प्रकाशाचे लोभस कवडसे आणि हा गोड पक्षी! वर्षा खूपच छान!!! तू हा फोटो कुठे काढलास? मुंबईमधे?
वा क्या बात है वर्षा !!!
वा क्या बात है वर्षा !!!
वर्षा, क्या बात है!
वर्षा, क्या बात है!
जबरदस्त फोटो, वर्षा लेन्स
जबरदस्त फोटो, वर्षा
लेन्स कुठली?
गुलाबी टॅबुबिया आणि सनबर्ड
गुलाबी टॅबुबिया आणि सनबर्ड दोन्ही मस्तच!
वर्षा, मस्त फोटो. लिंबाची
वर्षा, मस्त फोटो.
लिंबाची पाने खाणार्या फुलपाखराच्या अळ्या पण असू शकतील.. त्या कधीही परवडल्या. पण कुठल्याही गोगलगायी असतील तर त्यांचा नायनाट करायलाच पाहिजे. भारी चेंगट असतात त्या.
मी फ्रीलवाल्या फुलांचा फोटो
मी फ्रीलवाल्या फुलांचा फोटो टाकला होता तो न्यू झीलंडमधल्या निलगिरीच्या फुलांचा.. बी च्या फोटोतले झाड वेगळेच आहे. पिवळ्या रंगाची छटा पण मस्तच आहे.
आमच्या बालपणी पाऊस पडला की
आमच्या बालपणी पाऊस पडला की मातिच्या भुसभुशीत खोप्यासाठी आम्हला लाल मासल गोगलगायी लागायच्या. त्या पाऊस पडला की बरोबर दिसायच्या. त्या गोगलगायी एकदम नाहिश्याच झाल्या पण मध्यंतरी ह्याच गोगयगायीबद्दल फेबुवर बोलते होते. त्यांनी जे नाव लिहिले होते ते मी विसरलोच. ही मेमरी ना..हल्ली साथच देत नाही!
आमच्या बालपणी पाऊस पडला की
आमच्या बालपणी पाऊस पडला की मातिच्या भुसभुशीत खोप्यासाठी आम्हला लाल मासल गोगलगायी लागायच्या. <<< बी, या गोगलगायी मातीच्या भिंतीवरून चालत गेल्या की मागे चमकणारी रुपेरी वाट काढून जात. त्याच ना?
किती सुंदर सुंदर, मनमोहक फोटो
किती सुंदर सुंदर, मनमोहक फोटो सगळे. अगदी फ्रेश वाटतं इथे येऊन. सिमेंटच्या घरात राहून छान निसर्गात असल्याचा फील येतो.
धन्यवाद निसर्गप्रेमीनो
साळूंक्या, चिमण्या आणि
साळूंक्या, चिमण्या आणि कबुतराची ही गम्मत बघा. ही गम्मत मी डिसीच्या रस्त्यावर टिपली आहे:
रस्त्यावर काही चिमण्यांना टिश्यू पेपरमधे गुंडाळलेले मास सापडते आणि त्या चिवचिवत ते मास टिश्यू पेपरमधून बाहेर काढतात आणि चिमण्यांचा गलका वाढतच जातो:
इतक्यात तिथे साळू़यांचा एक थवा उतरतो आणि चिमण्यांना उडवून लावतो:
बिचार्या मुठभर चिमण्या उडून जातात.. इतक्यात गोल भरारी घेत मोठ्या एटीत एक शुभ्र कबुतर तिथे उतरतो आणि साळूंक्यां हताश होऊन एकटम बघत राहतात. हा प्रकार दुरवरुन चिमण्या बघतात आणि त्यातून काही प्रकाशचित्र साकार होतात
गजानन, तेवढे माहिती नाही. मी
गजानन, तेवढे माहिती नाही. मी ह्या गोगलगायी नेहमी गवतात दूर ओसाड ठिकाणीच पाहिल्या आहेत. आम्हा ह्या गोगलगायी तळहातावर बंद करुन नंतर त्यांना काडेपेटीमधे डांबून ठेवत असू. खेळून झाले की परत तिथे नेऊन सोडत असू.
पोस्ट नही लिखनी कभी दोबारा...
पोस्ट नही लिखनी कभी दोबारा...
जिप्सि, तू मागाहून ती फुले
जिप्सि, तू मागाहून ती फुले टाकलीस का .. आत्ता पेज रीफ्रेश करताना दिसलीतः
हा गुलाबी टॅबेबुया:> खूप सही कॅप्चर केलेस.
धन्यवाद सर्वांना. बी, हो
धन्यवाद सर्वांना.
बी, हो मुंबईतच काढला आहे फोटो. पार्ल्यामध्ये राहते मी.
जिप्सी, नुकताच निकॉन कूलपिक्स पी६०० कॅमेरा घेतला आहे. त्याला 60x optical zoom (4.3 - 258mm) लेन्स आहे. मला फोटोग्राफीचं तंत्र वगैरे काही येत नाही पण या कॅमेर्यात बर्ड फोटोग्राफीचा एक मोड आहे. तो वापरतेय सध्या. नीट वेळ मिळाला की शिकून घ्यायचा आहे कॅमेरा.
वर्षा, अजून काय शिकायच! एकदम
वर्षा, अजून काय शिकायच! एकदम ट्रेन्ड झालेली दिसतेस की. माझा एक फ्रेन्च कलीग मला नेहमी म्हणतो. कॅमेराचे फीचर्से कितीही जोरदार असो पण शेवटी आपला डोळा समर्थ असायला हवा. त्याला कळायला हव प्रकाश काय, कोन काय, रंगसंगती काय, बॅकग्रांउड काय, एकून विषयाचे पोत काय. मला त्याची येवढी टिप अजून पुरते आहे. मी त्या वेगवेगळ्या मोडच्या मागे कधी लागलोच नाही.
Pages