निसर्गाच्या गप्पा (भाग २३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 November, 2014 - 14:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.

हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..

तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.

या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...

आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्‍या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..

शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.

तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्‍या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.

(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षू, सांजण या गावी असेच चालणारे आंब्याचे झाड आहे. ते पुढे पुढे चालत जातेय. त्याला दरवर्षी आंबे पण लागतात.
मिलिंद गुणाजी च्या एका पुस्तकात वाचले मी.

कोल्हापूरला, रंकाळा तलावाच्या जवळही असेच एक झाड आहे.

दिनेश दा, तुमच्या कडे असणार्‍या माहितीच्या खजिन्याला आणि प्रत्येक वेळी ते तुम्हाला बरोब्बर आठवण्याला सलाम !!!

जिप्स्या बिझलाय, कशात ते काय सांगितलं नाईये त्याने>>>>>>.. काहीही विचारता का त्याला? Wink
एखाद वेळी लागलं तर जाऊन नाजूक हाताने काही पानं घेऊन येते स्मित>>>>> वर्षू !!!!!!!!!!
मधुमालतीचा वेलही असाच फिरतो.>...... मधुमालती गेटवर सोडण्याचं स्वप्न आहे. एकांकडून आणणार आहे.
वर्षू .........खरंच वेडं झाड आहे.
कढिपत्ता अमर आहे.>>>. साधना +१००
आणि मी भरपूर वापरते सगळ्यात. त्याची चटणी मस्त होते. पानं स्वच्छ धुवून जराशी वाळवून तेलात तळून त्याच तेलात एखादं चिंच बुटुकही तळा. मग त्यात तिखटमीठजिरेसुकेखोबरेसाखरतीळ असं काहीबाही घालून मिक्सरमधे वाटणे.

परवाच्या ११ वाजता बसस्टॉपशी उभा असताना हे एक फुल पायाशी पडले आणि एक ओळ आठवली 'समयीच्या शुभ्र कळ्या उमलून लवते आणि केसातली जाई पायाशी पडते'. जरी ही ओळ ह्या प्रसगांशी मेळ खात नाही तरी पण तिचे आठवणे छान वाटले. उन्ह इतके दाट होते त्यादिवशी की इतकुशा फुलाची सावली डोळ्यात सामावून गेली.

पुर्वी इथे २००४ मधे दिनेश बोलतोय नावाचा एक आयडी होता. त्यानी ह्या ओळीचा अर्थ सांगितला तो असा की देवाविषयी मन भावनेने आणि श्रद्धेने इतके ओतप्रोत भरुन आलेले आहे की केसातली जाई समयी तेवताना देवाच्या पायाशी निखळून पडली. ... समर्पित झाली. अर्थात खर्‍या अर्थाने मन देवाला समर्पित झाले. पण प्रश्न पडत्प की पुरुष तर केसात फुल माळित नाहीत मग त्यांच्ने मन देवाला कसे समर्पित होत असावे??? उत्तर पुढे आहे...

आणि हा एक देवचाफा: देवाला देवचाफा वाहून Happy

हो ना.. आता ऑन अँड ऑफ जात राहतो... पूर्णपणे संबंध नाही तोडलाय.. याच वर्षी ४,५ ट्रिप्स झाल्यात Happy

टी वी वर पाहीले होते चीनमध्ये की कुठेतरी पाण्यामधे शेती केली होती, शेतातील भाजी काढुण एक रेसिपी केली. त्यावर सजावट म्हणुन देवचाफा या फुलाच्या पाकळ्या वापरल्या होत्या. त्याचे नाव चंपा असे म्हणाली.
पदार्थ खाताना दाखवला नव्हता, चाफ्याच्या पाकळ्या तिकडे खात असतील का.

चाफ्याच्या खात नसतील.. पण शेवंतीच्या खातात. ( त्याचा चहा करतात ) पिओनी च्याही खातात. झेंडूच्या पाकळ्या कोंबड्यांना खाऊ घालतात.. मग "तिचे" चिकन छान केशरी रंगाचे होते. ( तंदुरी करायला छान ना ! )

पाणवनस्पति खाता येतात. जपानी सुशी चे बाहेरचे कव्हर त्याचेच असते. आपण भारतात खातो ती जेली ( अगर अगर, चायना ग्रास ) पण समुद्री वनस्पतीचेच करतात.

बायबलमधे उल्लेख आहे कि ४० वर्षे काही ज्यू वाळवंटातून ( सध्याचा इथिओपिया ते सध्याचा इस्त्रायल ) प्रवास करत होते, त्या काळात त्यांना देवाने "मयना" नावाचे अन्न पुरवले होते. तेही कदाचित समुद्री शैवालच असावे, असा कयास आहे.

मला ते समुद्री शैवाल खूप्प आवडतं.. इस्पेशली जपान मधे मिळणारं.. चीन मधे जर्रासं उग्र वासा चं मिलतं Happy

त्याचे पातळ थर ,पापडांसारखे पॅकेट्स मधे मिळतात.. पौष्टिक स्नॅक..

मोझेसच्या वा़ळवंटात फिरण्यावरुन आठवले. बाहेरगावी गाडी घेऊन जाताना बहुतेकवेळा भावाची फॅमिली आणि आम्ही असतो. सगळे एका गाडीत मावत नाही त्यामुळे माझी गाडीही निघते. माझ्या गाडीत सगळी लेडीज पार्टी असते. आम्ही गुगलमॅप्सवाले, तर भाऊ स्वत्:च्या रस्तेज्ञानावर विश्वास ठेवणारा. मग तो रस्ता चुकला की आम्ही "मोझेस १०० वर्षे वाळवंटात फिरत राहिला पण जरा थांबुन रस्ता विचारायचे सुचले नाही त्याला. आजचे पुरूषही तसेच" हे उद्गार काढत भावाच्या गाडीतील मंडळींना हसत राहतो. मोझेस फक्त ४० वर्षेच भरकटत होता काय? मी कुठेतरी वाचलेले १०० वर्षे.

दिनेश, जर ते पातळ पापुद्रांसारखे (खाखरे ,आपल्याकडले) फ्लॅट पॅक्स मधे असतील तर ते तसेच्या तसेच खायचे असतात

पण मशरूम्स आणी तत्सम ताज्या भाज्या विकणार्‍यांजवळ हे ओले ,ताजे सी वीड चे लांबट तुकडे गाठी मारून ठेवलेले असतात ते मात्र सूप मधे नीट उकळून खातात. त्यांना जर्रा समुद्री वास असतो,(मला आवडतो Happy )

ते पहिल्या फोटोत आहेत तसे आहेत इथे सुपरमार्केटमधे ! ( आणून बघतो, नाहीच आवडले तर काय करायचे ते माहित आहे मला Happy )

लूकींग स्ट्रेट इन्टू द कॅमेरा! अँग्री बर्ड बहुतेक Proud
टेलर बर्ड उर्फ शिंपी! हा पक्षी इतका गोड दिसतो! ऑलिव्ह ग्रीन पंख, लालसर डोकं. फोटो काढू देईल तर शप्पथ.

वर्षा - चित्रे काढताना जितका सुपर्ब हात चालतो तुझा तितकाच फोटो काढतानाही ....
काय जबरी फोटु आलाय... Happy

थँक्स शशांक, जयु, अदीजो.

वर्षू ही (सीवीड) तर नोरी आहे ना. तुला आवडते ?___/\___ Happy

वर्षा - चित्रे काढताना जितका सुपर्ब हात चालतो तुझा तितकाच फोटो काढतानाही ....
काय जबरी फोटु आलाय..>>>>>>+१ Happy

जबरदस्त फोटो Happy

जा बाई, आमी नाई जा.... आम्ही फोटो काढू गेलो तर कुठलाही पक्षी एक सेकंद तरी स्तब्ध बसेल तर शपथ! आणि इथे वर्षा,जागू, दिनेशदा, जिप्सी,कां पो इ अनेक जणांना मात्र मस्त पोझेस देतात!! Angry
:स्मित:, वर्षा, मस्त अगदी सुपर्ब आलाय फोटो. आणि काय पोझ पकडलीयेस! तो अगदी 'ऑ, हे काय?' असं विचारतोय असं वाटतंय!!

शो क्यूटीपाय आहे अँग्री बर्डी.. Happy मस्तच गं वर्षा..

हो खूप आवडतं सी वीड, इस्पेशली शेल्स(तिसर्‍या) सूप आणी सलाद मधे ते ओलं वालं, उगीच नाही १३ वर्षं काढली चायनात Wink Proud

सुप्रभात.

आपली मैत्रीण सायली पातुरकर हिच्या मिस्टरांचा डुक्कर गाडीसमोर आल्याने अपघात झाला आहे. त्यांच्या पायाला व हाताला मार बसला आहे. पायात रॉड टाकावे लागले आहेत. त्यांची तब्बेत आता चांगली आहे. सोमवारपर्यंत डिश्चार्ज मिळेल असे ती म्हणाली.

सुदैवाने वेगवान भल्या मोठ्या गाड्यांऐवजी डुक्कर आल्याने मोठा अपघात वाचला असे सायलीचे म्हणणे आहे.

>>>>>>आपली मैत्रीण सायली पातुरकर हिच्या मिस्टरांचा डुक्कर गाडीसमोर आल्याने अपघात झाला आहे. त्यांच्या पायाला व हाताला मार बसला आहे. पायात रॉड टाकावे लागले आहेत. त्यांची तब्बेत आता चांगली आहे. सोमवारपर्यंत डिश्चार्ज मिळेल असे ती म्हणाली.

सुदैवाने वेगवान भल्या मोठ्या गाड्यांऐवजी डुक्कर आल्याने मोठा अपघात वाचला असे सायलीचे म्हणणे आहे.>>>>>लवकर रिकव्हरी व्हावी ही परमेश्वरापाशी सदिच्छा..

सायलीच्या यजमानांना लवकर बरे वाटो.

सुदैवाने वेगवान भल्या मोठ्या गाड्यांऐवजी डुक्कर आल्याने मोठा अपघात वाचला असे सायलीचे म्हणणे आहे.>> खरच आहे.

अरे बापरे. सायली काळजी घ्या.
>> लवकर रिकव्हरी व्हावी ही परमेश्वरापाशी सदिच्छा..
हेच म्हणते.

Pages