निसर्गाच्या गप्पा (भाग २३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 November, 2014 - 14:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.

हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..

तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.

या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...

आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्‍या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..

शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.

तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्‍या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.

(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.maayboli.com/node/17556

आर्टीचोक बद्दल सविस्तर माहीती आणि त्याच्या सुंदर फुलांचा फोटो पण आहे.. ( मीच काढलाय तो Happy )

दुसरी भाजी, माझ्या मते चिकोरी आहे. ( कॉफीत वापरतात तीच ) कडवट लागते.

आज मि सायलींना भेटून आले ठीक आहेत ते. दीड महीना विश्रांती. चेहरा फ्रेश वाटला. बोललेही व्यवस्थित. तरी बरं ... असं बरचंस बोलण झालं..

आज मि सायलींना भेटून आले ठीक आहेत ते. दीड महीना विश्रांती. चेहरा फ्रेश वाटला. बोललेही व्यवस्थित. >>>> वा, वा चांगली बातमी - लवकरच बरं वाटेल त्यांना ....

"तरी बरं..." - हा अगदी मंत्रच दिलाय डॉ. अवचटांनी ... Happy खूप पॉझिटिव्ह विचार आहेत त्यांचे, कुटुंबियांचे ... ग्रेट .. Happy

वर्षू तुझे ते हिरवे पदार्थ दिसण्यास खूपच सुंदर आहेत पण त्याचा समुद्री वास (नाक वाकडं करणारी बाहुली) इथपर्यंत आला बरं! अगा(.......... हा खास वर्षूचा शब्द आहे. खूप गोड!) आम्ही अट्टल घासफूसवाले!
वर्षा............माणसाचं मूळचं ड्रॉइन्गच चांगलं असलं की त्याला उपजतच एक सौंदर्य दृष्टी येते. अँग्री बर्ड खूपच गोड! कॅमेर्‍याला खुन्नस देतोय!
जागूकडचे पक्षी मस्तच.
बी आर्टीचोकच आहे.
अरे बापरे............सायलीच्या मिस्टरांना लवकर बरं वाटू दे.

वर्षा............माणसाचं मूळचं ड्रॉइन्गच चांगलं असलं की त्याला उपजतच एक सौंदर्य दृष्टी येते. >>>> अग्दी अग्दी .. आणि ते उपजतच असतं - आपल्या अक्षरासारखे... Happy (इथे एक बरं आहे - आपलं अक्षर कसं आहे हे कुणाला कळत नाही ते.... नाहीतर..... अरारा रा - काय गहजब उडाला असता, आधीच विचार- धुळीने अनेक धागे माखलेले असतात - त्यात या चित्रविचित्र अक्षरांचीही भर पडली असती !!! Happy Wink ... )

वर्षा ....
काय जबरी फोटु आलाय... >>>. +१
सायलीच्या यजमानांना बरं वाटूदे लवकर. >>>>>अगदी अगदी!

किती पुढे गेलाय धागा . वर्षा यांनी टाकलेला शिंपी पक्षाचा फोटो जबरीच आहे .पण तो अँग्री बर्ड न वाटता मला काँन्शस बर्ड वाट्तोय माझ्यासारखा ,फोटो काढायच्या आधी जरा नीट तयारी तरी करु द्यायची ना त्याला !! त्याचे पाय कीती नाजुक आहेत. Happy गदा ,मोराचे पण फोटो छान.

...त्यात या चित्रविचित्र अक्षरांचीही भर पडली असती >> Happy मग होउन जाउद्या अक्षरांचा एक धागा सगळ्यांनी स्वतःच्या हाताने लिहिलेले वाक्याचे फोटो टाकायचे . Proud मी सेफ आहे कारण माझं ड्रॉइन्ग बरं आहे .पण जर का तुम्ही रोज चार वाक्य हाताने लिहित असाल तर तुमचही हस्ताक्षर चांगलच असेल.कारण प्रॅक्टीस केली तर अक्षर सुधारता येतं अगदी ड्रॉइंग चांगलं नसेल तरी. Happy

आहे आहे मी इथेच.
आज मला आमच्याकडे चक्क बहावा फुललेला दिसला. ( आमचा वसंत ऋतू Happy )
गुलमोहोर पण फुललाय. माझ्या मित्राला म्हणालो, आम्ही याला मेफ्लॉवर पण म्हणतो कारण तो आमच्याकडे मे महिन्यात फुलतो Happy हे असले उत्तर गोलार्धातले ( आपण उत्तर भारतीय ज्या टोनमधे म्हणतो त्याच टोनमधे ) शब्द, इथे काय कामाचे ?

खूप दिवसांनी या भागाचा बॅक्लॉग पूर्ण झाला ! सुरेख फोटो आहेत सगळेच!
माझ्या घरासमोरील झाडावर काही महिन्यांपूर्वी एक मधमाशांचं मोठं पोळं झालं होत. पण आता ते गायब झालं आहे. मधमाशा पोळ्यासकट स्थलांतर करतात का ?

मधमाशा पोळ्यासकट स्थलांतर करतात का ?>>रावी, नाही! ते पोळं कोणीतरी काढलं असावं.
सगळेच फोटो सुंदर आहेत.
सायलीच्या मिस्टरांना लवकर बरं वाटू दे. त्यांचा अपघात हा डुक्कर गाडीने झाला की गाडीसमोर डुक्कर आल्याने?डुक्कर गाडी म्हणजे काळी पिवळी ६ सिटर रिक्षा.
दिनेशदादा, तुझ्या जुन्या सगळ्या लेखमाला परत एकदा वाचायला हव्यात.

>>फोटो काढायच्या आधी जरा नीट तयारी तरी करु द्यायची ना त्याला !!

मी लाख तयार आहे हो थांबायला, पण त्याने पण थांबलं पाहिजे ना एका जागी तयारी दिसू द्यायला :))
असो सर्वांना धन्यवाद.
वर अक्षराचा विषय निघालाय तर. कोणे एके काळी माझं अक्षर इतकं चांगलं होतं की हस्ताक्षर स्पर्धेत कधी नंबर सोडला नाही.. आणि आता?! आता माझ्या अक्षरावर माझा स्वतःचाही विश्वास बसत नाही. एकतर हाताने लिहिणं कमी झालंय आणि त्यातून मराठी अजूनच कमी. त्यामुळे आनंदी आनंद!
>>कारण प्रॅक्टीस केली तर अक्षर सुधारता येतं अगदी ड्रॉइंग चांगलं नसेल तरी.

या वाक्याशी पूर्ण सहमत.

खूप सुर्रेख आणी नीटस आहे तुझं गार्डन, पिंकी>>>> +१००... Happy
कोरफडीच्या कुंडीत कुठलं रोप आलंय? लिंबाचं आहे का? लिंबाचं असेल तर प्लीज ते वेगळ्या कुंडीत लावाल का? कारण ते 'स्वतंत्र उमेदवार' आहे!! Wink

धन्यवाद सगळ्यांना.
तुम्हा सगळ्यांचा या धाग्यावरचा वावर बघुन माझा हुरूप वाढतो.
काल मी कुंदाच रोप आणले.
@शांकली ती रातराणीची फांदी आहे. कोरफडच्या झाडाजवळ आहे म्हणुन वेगळे झाड वाटले.

पिंकी, रातराणीच काय पण कुठल्याही रोपाच्या फुलं येऊन गेली की; फुलं येऊन गेलेल्या जागेपासून २-३ इंच अंतरावर फांदी छाटावी.

पिंकू खूप छान. माझ्या पुतणीने, तिचेही नाव पिंकुच आहे Happy तिने गॅलरीमधे गुलाबाची बाग फुलवली. थंडी असली की गुलाबाला मस्त फुले येतात. मी फ्रान्सला असताना तिथे थंडीमधे फक्त मी गुलाब फुललेला पाहिला आणि फुलांचा सुवास इतका छान यायचा की बास!

पिंकु, जमल्यास पुर्ण गॅलारीचा एक फोटो टाक.

बहाव्यासारखी झाडं आत्ता हिवाळ्यात फुलायला लागली म्हणजे आपल्याकडचं तापमान नक्की काय गुण दाखवतंय तेच कळत नाही!! ह्याचा अर्थ यंदाही हिवाळा कमी आणि उन्हाळा खूप लवकर सुरू होणार की काय?

Pages