निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.
हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..
तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.
या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...
आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..
शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.
तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.
(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)
नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
बी, ते उजवीकडचं खालचं फूल
बी, ते उजवीकडचं खालचं फूल अगदी नाक डोळे असलेलं वाटतंय!!
खरंतर हिरवी फुलं खूप कमी असतात नै! पण अगदीच नाहीत असं व्हायला नको म्हणून थोडी असावीत!!
मागे मी डिसेम्बर मधे गोव्याला
मागे मी डिसेम्बर मधे गोव्याला गेलो. चर्च पाहिले. चर्च समोर एक पुरातन वस्तुंचे संग्रहायल आहे. ती इमारत खूप सुरेख आहे. दुपारच्या चारचे उन्ह अगदी चटके देत होते. जीव पाणी पाणी करत होता. अशावेळी मी समोर दोन गुलाबी शेजारी पाहिले आणि मीही गुलाबी झालो. तिथे संग्रहायला बघायला आलेल्या लोकांच्या नजरा इतक्या अरसिक होत्या. की समोर ही दोन झाडे अंगाग फुललेली असताना एकही नजर वेअर उचलून त्यांच्याकडे ब्वघत नव्हती. मी मात्र प्रत्येक कोनातून फोटो घ्यायला सुरवात केली. मग सगळे जागे झाले
संग्रहायलाच्या आतमधे गेलेलो असताना जिथे संङ्राहालय संपते तिथे एक जुनीए पाटी आहे. त्यावर खाली एक च्तिर अहे. ते चित्र ह्या दोन झाडांचे होते मत्र ते कृष्णधवल होते. हे झाड तोडू नका. हात लावू नका. ही इथली अमात आहे. असे खूप छान ह्या तरुन्बद्दल लिहिले होते. ट्युतोबिया की काय ह्या झाडाचे नाव आहे. ही फुले सिंङापुरमधेही फुलतात पण उन्हामुळे इतकी गुलाबी झालेली फुले इथे पाहिली नाहीत.
शांकली मी कधीच हिरवी फुले
शांकली मी कधीच हिरवी फुले पाहिली नाहीत. इथे एक झाड आहे ज्याची पाने वरतून हिरवी आणि पानाच्या मागची बाजू मरुम लाल रंगाची असते.
ह्याला गुलबहार म्हणतात.
ह्याला गुलबहार म्हणतात. श्रीकांत इंगळहळ्ळीकरांच्या आसमंत मधे (पहिले पुस्तक) मधे याचा फोटो आहे. तबुबियाचा प्रकार आहे.
बी, हिरवी म्हणजे अगदी
बी, हिरवी म्हणजे अगदी हिरवीगार नाहीत, आपल्याकडची रातराणी, हिरणदोडी,माळकांगणी इ. आणि (मला वाटतं अव्हाकॅडोची फुलं सुद्धा) ही बर्यापैकी हिरव्याकडे झुकणारी फुलं आहेत.
वा किती सुंदर गुलाबी झाड...
वा किती सुंदर गुलाबी झाड... मला आवडले असते हे याची डोळा पाहायला. पहिला फोटो पाहताच गुलाबी टॅबेबुयाची आठवण झाली.
शांकली गुलबहार म्हणजे गुलाबी टॅबेबुया ना? की आपण गुलाबी टॅबेबुया म्हणतो तो वेगळा आणि हा वेगळा? इथे मुंबईत गुलाबी टॅबेबुया फुलतो तेव्हा पानांनी गच्च भरलेला असतो आणि त्याचा गुलाबी रंग अगदीच फिका असतो. फुल अगदीच चैतन्यहीन वाटते. मी पुण्याला एक गुलाबी टॅबेबुया पाहिलेला तो साधारण असा होता पण इतका भरुन नव्हता आलेला. आणि त्याची फांद्याची रचना सुद्धा जरा वेगळी होती.
शांकली बी ने टाकलेली ही हिरवी
शांकली बी ने टाकलेली ही हिरवी फुले मला कावळीच्या फुलांसारखी वाटली.
धन्यवाद बी. 3-4 दिवसात काल
धन्यवाद बी.
3-4 दिवसात काल आणलेला कुंदा आणि मोगरा लावणार आहे कुंड्यांमध्ये. ते लावलेली लगेच टाकते फोटो बाल्कनीचा.
नाही साधना, तू म्हणतेस तो
नाही साधना, तू म्हणतेस तो तबेबुया हा नाही. हा तबेबुयाच पण पानं खूप आखूड अस्तात. रचनापण वेगळी आहे. पण रंग अगदी वरती बी यांनी दिलेल्या प्रमाणे अगदी शॉकिंग पिंक असतो. तुला बोटॅनिकल नाव बघून सांगते.
अशाच एका कडाक्याच्या थंडीमधे
अशाच एका कडाक्याच्या थंडीमधे मी वर्जिनिया बीच फिरायला गेलो होतो. वाळूवर ही अक्षरे गिरवताना माझी बोटे हुळहुळली होती:
इथे प्रत्येकाच जग वेगळ असत. आपली दु:खे कुणापुढे वदायची? म्हणून स्वत:लाच बजावायचा की नाही .. हे जग सुंदर आहे. रम्य आहे. भव्य आहे. दिव्य आहे!
Tabebuia palliada हे आहे या
Tabebuia palliada हे आहे या गुलाबी तबेबुयाचं बोटॅनिकल नाव.
ती हिरवी फुलं कावळीसारखी नाहीत गं. कावळीची फुलं ह्या नावाने सर्च कर बरं...क्रिप्टोलेपिस बुचानानी...
हिरव्या फुलांमधे हिरव्या
हिरव्या फुलांमधे हिरव्या चाफ्याचं नाव विसरलेच!! तो पहिल्या नंबरचा भिडू!!!
हो बरोबर. तुला वेळेवर आठवल
हो बरोबर. तुला वेळेवर आठवल
हो मी केला नंतर सर्च. तुझा
हो मी केला नंतर सर्च. तुझा धागा आहे की.
माझ्याकडे एक फोटो आहे हिरव्या फुलांचा. नंतर टाकेन. बाकी हिरवा चाफा मस्तच... काय भन्नाट वास आहे त्याचा. मला आवडतो
पण नंतर डोके दुखते.
ओके. म्हणजे मुंबईतला
ओके. म्हणजे मुंबईतला टॅबेबुया वेगळा.
(मला शक आलेलाच. इथला टॅबेबुया बेक्कार आहे. पिवळा टॅबेबुया मस्त आहे पण गुलाबी एकदम बेक्कार)
मग बी त्या चर्चचे नावही टाका
मग बी त्या चर्चचे नावही टाका ना. मी तिकडे गेले तर पाहिन..
माझ्या भावाचे नाव यशवंत आहे. माझ्या आजोबांचे नाव त्याला ठेवलेय.
वा! हिरवी फुले आणि गुलाबी
वा! हिरवी फुले आणि गुलाबी टबेबुया!


'कास'ला दुधीची फुले दिसतात, तीही हिरवी असतात.
इथला टॅबेबुया बेक्कार आहे.>>>
इथला टॅबेबुया बेक्कार आहे.>>> :स्मितः... अगं तो पुण्यातपण आहेच!! रंग मात्र फारच मळकट/मातकट गुलाबी अस्तो...
साधना त्या चर्चचं नावं
साधना त्या चर्चचं नावं http://en.wikipedia.org/wiki/Church_of_St._Francis_of_Assisi अस आहे. Church of St. Francis of Assisi. ह्या चर्चसमोरच The Archaeological Museum, Old Goa आहे. हा भाग ओल्ड गोव्यात येतो.
बी, तूमच्याकडे अमाप येणारे
बी, तूमच्याकडे अमाप येणारे ylang ylang पण हिरवेच असते कि. खुप सुंदर सुगंध असतो त्याचा. मी ते पहिल्यांदा सिंगापूरच्या सेंट गार्डन मधेच बघितले. गोव्यात, नायजेरियात, बालितही खुप दिसले ( त्यावरून असे अनुमान काढले कि समुद्रकिनार्याची हवा मानवत असावी त्याला. )
अवाकाडोची फुले हिरवी असतात पण ती अगदीच लहान असतात. आंब्याचा, मेंदीचा, कडूनिंबाचा मोहोर हिरवाच असतो पण त्याला बाकी रंगांची झाक असते. शिरिषाचे फुल हिरवट पांढरे असते. हिरवा गुलाबही असतो ( पण तो गुलाबापेक्षा शेवंतीसारखा जास्त दिसतो )
दिनेशदा, तुम्ही वायलॅन्ग
दिनेशदा, तुम्ही वायलॅन्ग वायलॅन्ग जे म्ह्णत आहे ते नाव मला माहिती नव्हते. पण मला तर ती फुले सोनचाफ्यासारखी वाटली. इथे सोनचाफा विपुल प्रमाणात आहे.
मस्तच.छान आहे वाक्य 'जग सुंदर
मस्तच.छान आहे वाक्य 'जग सुंदर आहे' .मला हे जास्त आवडतं 'जीवन सुंदर आहे' असं गाणं आहे 'चौकट राजा' मधे दां च्या लिस्ट मधे आहे .माझी फेवरेट दोन गाणी आशाजींची पण आधीच दोन्ही गाण्यांची आवड कळवली होती.
हे गाणं खरच मस्त आहे .
Sorry for writing in English,
Sorry for writing in English, for some reason I am not able to write in Marathi for last couple of weeks.(help)
In Bangalore there are three varieties of Tabebuia.
1. Tabebuia rosea : this is a light pink shade
2 Tabebuia avellanedae: this is the above plant with dark shade
3. Tabebuia argentea : this is yellow tabubia but leave are very different than above two
हिरवी फुले आणि गुलाबी झाड
हिरवी फुले आणि गुलाबी झाड मस्तच, बी!
Tabebuia argentea नव्या
Tabebuia argentea नव्या मुंबईत आहे दोन चार ठिकाणी आणि फुलल्यावर (बंगाली भाषेत म्हणायचे तर) भीषण सुंदर दिसतो, अगदी नेटवर अस्लेल्या फोटोंसारखाच.
avellanedae and rosea नेटवर सारखेच वाटताहेत पण अर्थात ते वेगवेगळे असणार. रोसीला जरा कमी फुले असावीत.
आता फक्त मुंबैत दिसणारा भरपुर पाने आणि अगदीच नावाला फुले असलेला अग्दीच् बेक्कार गुलाबी टॅबेबुया कोणता हे शोधकाम केले की झाले.
साधना, चेंबूरला डायमंड
साधना, चेंबूरला डायमंड गार्डनजवळ आहे गुलाबी टॅबेबुया. त्याला पाने आणि फुले दोन्ही असतात. पण बेक्कार नाही दिसत तो.
पिवळा टॅबेबुया, बेळगावला सगळ्यात सुंदर दिसला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूने आहे तो.
सुप्रभात मंडळी.
सुप्रभात मंडळी.
धन्यवाद सर्वांचे.
धन्यवाद सर्वांचे.
सुप्रभात.
हे फुल मी फक्त सिंगापुरमधेच पाहिलेले आहे. ह्या फुलाची पाने फ्रॉकच्या फ्रीलसारखी वाटतात.
उन्ह, आकाश आणि चाफा ..
उन्ह, आकाश आणि चाफा ..
दिनेश मी पाहिलाय तो. काशी
दिनेश मी पाहिलाय तो. काशी डेअरी दुकानाच्या समोर आहे बहुतेक. तुम्हाला बेकार वाटला नसेल पण पर्णहीन होऊन मग मातकटरंगी फांद्यांच्या पार्श्वभुमीवर जर्द पिवळ्या रंगात फुललेला पिवळा टॅबेबुया पाहिल्यानंतर गुलाबीकडुनही माझी अशीच काहीशी अपेक्षा होती आणि त्याची पुर्ती करणारा एकही टॅबेबुया मी अद्याप पाहिला नाही.
गुलाबी टॅबेबुया खारघरच्या एका आतल्या रस्त्यावरही दुतर्फा लावलाय. गर्द डेरेदार, उंचीला १५-१८ मिटर वाढलेले वृक्ष आहेत त्याचे तिथे. पाने गच्च भरलेली पण फुले मात्र जेमतेम, फिकट गुलाबी. खाली पडलेली दिसली की मग वर मान करुन पाहायचे आणि कुठेतरी पानाआड दडलेली त्याची फुले पाहायची. त्यामानाने एकदा ऐशुने पकडलेला अणुशक्ती नगर डेपोतला गुलाबी टॅबेबुया बराच बरा होता. बी ने पकडलेला टॅबेबुया कधीतरी पाहिनच.
बी मस्त फोटो. ते फ्रिलवाले फुल बहुतेक दिनेशनीच टाक्लेले इथे. पाहिल्यासारखे वाटतेय. चाफाही सुंदर.
माझ्याकडे बरेच फोटो जमा झालेत. गेल्या शनवारी सक्काळी रामपारी उठुन गाडी घेऊन नविन फ्रीवेने मुंबईला गेलेले (ऐशुने स्वतः केलेले पहिले लाँग ड्राईव
) मुंबई विद्यापिठामागे दोन इटुकले पिटुकले बुच फुलांनी भरुन खाली झुकलेले. त्यांचे फोटो टाकेन जमेल तसे.
Pages