निसर्गाच्या गप्पा (भाग २३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 November, 2014 - 14:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.

हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..

तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.

या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...

आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्‍या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..

शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.

तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्‍या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.

(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायली, काळजी घे बाई. नेमका थंडीत त्रास होतो हाडाच्या दुखण्यांचा. कोमट तेलाने शेक नंतर डॉकने परमिशन दिली की.
तुझ्या मिस्टरांना लवकर बरे वाटो ही परमेश्वरापाशी सदिच्छा.....

कामिनी खरच ग मी पण जाऊन पाहीले अबईच्या शेंगांचा फोटो गायब आहे.

शांकली आमच्याकडे पक्षी संध्याकाळी मला झाडावर सुस्तावलेले दिसतात. संध्याकाळी मी ऑफिसवरून घरी येऊन खिडकीबाहेर झाडांवर नजर टाकली की हळ्यद्या मला खुप शांतपणे आराम करताना की आपल्या जोडीदाराच्या शोधात असेल कदाची तसा दिसतो.

हॉर्नबिल, कावळे, भारद्वाज हे सकाळी सुस्त वाटतात.

ही कावळ्याची एक जोडी रोज ह्याच जागी सकाळी असते.

हा संध्याकाळचा शांत हळद्या.

हा सकाळचा कार्यमग्न हळद्या.

सकाळची कोकीळा

जागु सुंदर टिपलेस पक्षी

हॉर्नबिल चा रंग उडालेला दिस्तोय.. बिच्चारा Happy

डुक्कर गाडी?????? हे काय आहे????>>> अग वर्षू त्यांच्या गाडीसमोर अचानक डुक्कर आले असणार.
डुक्कर गाडी >>> कुठुन शोधलिस?

अग हो गं वाचले. पण त्याचा अर्थ मी वर सांगीतला तो आहे.
बाकी तुझ्या प्रविसादामुळे मी घोडागाडी, बैलगाडी, रेनडीअरगाडी सारखी डुक्करगाडी इमॅजुन पाहिली Happy

सायलीच्या यजमानांना लवकर बरे वाटो.
>>सुदैवाने वेगवान भल्या मोठ्या गाड्यांऐवजी डुक्कर आल्याने मोठा अपघात वाचला असे सायलीचे म्हणणे आहे.>>
सायली, सकारात्मक विचार. आवडलं.
अनिल अवचटांच्या एका लेखात या "तरी बरं" विषयी आहे. म्हणजे, काही वाईट घडलं की "तरी बरं" ने सुरु होणारी वाक्यं शोधायची. "तरी बरं, समोर मोठी गाडी नाही आली." "तरी बरं हाताचं नुसत्या मारावर निभावलं."

सायली, काळजी घ्या. यजमानांना लवकर बरे वाटो.

अदीजो, तुमची पोस्ट आता वाचली, पण त्या आधी जागुची पोस्ट वाचली आणि अपघाताने झालेली दुखापत पाहाता मनात पहीला हाच विचार आला, 'तरी बरं, मला इतकं काही झाल नाही.' कारण ऑगस्टमधे माझ्या गाडी समोर कुत्रा आल्याने मी पण पडले होते. पण गाडी जोरात नव्हती, डोक्यावर हेल्मेट होते म्हणून खरचटणं आणि उजव्या हाताचा अंगठा थोडा दुखावण इतक्यावर निभावलं.

पुढचे काही दिवस गाडी चालवतांना मनात सारखी धुक धुक होत होती, समोर कुणी येणार तर नाही. या विचाराने खुप सावकाश गाडी चालवत होते. शेवटी एकदा पुण्यातल्या रस्त्यावर आडव्या येणार्‍या, गाई, म्हशी, कुत्री, घोडे या प्राण्यांना मोकाट सोडणार्‍या त्यांच्या मालकांवर काही कारवाई करता येईल का अशी तक्रार ट्रॅफिक पोलीसाकडे केली होती.

माझ्या तक्रारीचा परीणाम होता की नाही माहित नाही पण पुढच्या २ - ४ दिवसात निदान रस्त्यात बसणार्‍या गाई म्हशी आणि घोडे दिसेनासे झाले.

सायली, त्यांना लबकर बरे वाटो. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेतच.

जागू, हळद्या एवढा शांत मी क्वचितच बघितलाय. संध्याकाळी फोटो काढलेस म्हणजे दिवसभराच्या श्रमाने थकलेले असतील पक्षी. हॉर्नबील ची पिल्ले आहेत का ती ? डोक्यावर टोपी आलेली दिसत नाही अजून.
खरं तर पक्षी उद्याचा विचार करत नाहीत, पण या सगळ्यांच्या चेहर्‍यावर तेच भाव दिसताहेत.

वर्षा, काय मस्त पोझ दिली आहे.

माझ्या अनुभवाप्रमाणे शहर भागात पक्षी जास्त सतर्क असतात, कुठून गाडी येईल, कुठून माणूस येईल, कुठून मांजर येईल अशी धास्ती असावी.
तेच पक्षी जंगलात मात्र थोडे निवांत असतात... तरी माणूस आजूबाजूला दिसला तर लगेच सावध होतात.

काल फिल ह्युजेस चेंडू मानेला लागून गेला. त्याचे इतके वाईट वाटत आहे ना.. त्या बॉलरला काय वाटत असेल! किती अपराधाची भावना तो सहन करत असेल!!! आणि फिलच्या डोक्याला हेल्मेट असूनही दुखापत मानेला होऊन नंतर ब्रेन हॅमरेज होऊन तो गेला.

माझ्या अनुभवाप्रमाणे शहर भागात पक्षी जास्त सतर्क असतात, कुठून गाडी येईल, कुठून माणूस येईल, कुठून मांजर येईल अशी धास्ती असावी.>>>> अगदी अगदी!! (मनात म्हणत असतील - काही गॅरंटी नाही या माणसाची!)

बी, माझ्याही मनात तेच येतेय.. या विषयावर "सितम" नावाचा एक छान चित्रपट आला होता. स्मिता पाटील, विक्रम आणि नासिरुद्दीन शाह होते त्यात.

शांकली, नैरोबीत हे फार जाणवायचे. तिथे शहराला लागूनच त्यांचे नॅशनल पार्क आहे. शहरात सावध असणारे तेच पक्षी त्या जंगलात मात्र अगदी बिनधास्त वावरायचे.

हे फोटो व्हर्जिनिया अमेरिकेमधील आहेत. मला हे फोटो बघून कपाशिचे बोंड आठवले. कापूस काढून झाले मी टरफले असेच दिसतात.

पनामा जवळ च्या एका रीझॉर्ट मधे हा दिसला. भलामोठ्ठा होता पण पीपल शाय वाटला.. सारखं तोंड लपवत होता, थकलेल्या चालीवरून बर्‍याच वयाचा वाटत होता

हे फोटो वॅगमॅनमधील आहे. अमेरिकेमधील के सुपरमार्केटः मी ही भाजी नेहमी बघत आलेलो आहे. इथे पण काहीवेळी दिसते. पण कशी करायची माहिती नाही. नाव स्मरत नाही.

खूप सुंदर आकार आहे. त्या खाचांमुळे भाजीला वेगळे रुप आले आहे.

बी, आपल्या कडच्या तामणीची बोंडं अशीच दिसतात. शिवाय या (तुम्ही दिलेल्या) बोंडांची रचना पण तामणीच्या बोंडांसारखीच आहे.
वर्षूतै, फोटो छान पण तू म्हणतेस तसा तो वयस्कर असावा, पिसारा जरा झड्ल्यासारखा वाटतोय.

हे आर्टिचोक असावेत. फेसबुकामध्ये शेती जोरात सुरू होती तेव्हा यांचे अमाप पिक घेतले जात होते... Happy

शांकली मलाही तामणीची बोंडेच आठवली. अशीच दिसतात.

फिल ह्युजेसला ज्याने तो बॉल टाकला त्याची अवस्था खरेच दयनीय झाली असणार. बिचारा, भयानक कुतरओढ होत असणार त्याच्या मनाची. म्हटले तर त्याची चुक काहीच नाही, पण तरीही मृत्युस निमित्तमात्र तो.

साधना, बरोबर. हे आर्टीचोक आहेत. त्याबाजूला 'बेल्जिअम एनडोव्ह' आहेत. ते कोबीसारखे पण उभट असतात.

शांकली मी तामणीचे बोंड पाहिले नाहीत कधी. इथे आहे पण तिला बोंड येत नाहीत.

गदे काय माहिती नाही. गदा माहिती आहे. हो आकार भीमाच्या गदासारखा आहे आचो चा Happy

Pages