निसर्गाच्या गप्पा (भाग २३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 November, 2014 - 14:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.

हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..

तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.

या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...

आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्‍या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..

शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.

तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्‍या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.

(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा मस्तच जागू. अभिनंदन.

सायली खुपच सुंदर वर्णन आणि फोटोही. ____/\____.

नवीन टवटवीत धाग्यासाठी , अभिनंदन.
या आधीचे बरेच मीस केले .फोटोंसाठी अजुनही पाहते जुने धागे .मलाही घ्या तुमच्या निसर्गमय धाग्यात .मग मलाही फोटो टाकता येतील इथे. Happy
इथे थंडी तशी फार पडत नाही पण पडली की त्यासारखा आनंद दुसरा नसतो.
सायली यांचा फोटो आणि लेखन सुंदर आहे त्यांच्या रांगोळ्यांप्रमाणेच. Happy

सायली, फोटो छान!
नवीन धाग्याचे स्वागत!

Dapoli 7.5.11 087.jpg

(दापोलीजवळील कुडावळ्याच्या 'वळजाई' देवराईतील ओर्किड.)

सुप्रभात...

२३ व्या भागाबद्द्ल माझ्या सकट सगळ्यांचे अभिनंदन.. Happy

pink.jpg

मनोगत आणि प्र.चि आवडल्या बद्द्ल सगळ्याचे मनपुर्वक आभार..
जागु चे विशेष आभार...
या धाग्यावर विशेष रमायला होत. वेगवेगळी माहिती, तर्‍ह- तर्‍हेचे फुलं, झाड फळ सारे काही अनोखेच वाटते..

pink1.jpg

आज सकाळ पासुन हा ही दरवळतोय...:)

sc_2.jpgsc1.jpg

आदिजो, मस्त फोटो. एकदम फ्रेश..

दिनेश दा, आभार..

अदिजो ऑर्किड मस्तय. सायली चाफ्याचा सुगंध पोचलाच! अग्दी माहेरी नेऊन सोडलंस
हा गुर्जींना झब्बू...........

हे दोघे मला उटीला भेटले होते.( फोटो क्वालिटी प्लीजच इग्नोर करणे!)

मनुषी ताई धन्यवाद.

जिप्सी पहिल्या प्र.ची मधले माय- लेकराचे भाव खुपच करुण आहेत..

जागु मेल चेक करशील का प्लीज,,

निवडुंगाच्या जातीचं?? वेगळंच आहे अगदी. रंग खूपच सुंदर! कुठे मिळालं हे? >>>> आमच्या ओळखीचे एकजण ठाण्याला रहातात - त्यांच्या सोसायटीत एकाने हे रोप आणून लावले आहे. त्यांनी कुठून आणले हे नाही माहिती !! पण रंग खूपच सुंदर असल्याने इथे टाकले. हे झाड बरेच औषधी आहे असा शोध गुगलताना लागला ... Happy

20141111_142457[1].jpg

हाय निग कर्स ... बर्याच दिवसांनी आले ... नविन भागच्या शुभेच्च्छा...
हि बुचाची फुले काल गोळा केली होती आणि पाण्यात ठेवली होती ... अजुन तेवढीच फ्रेश आहेत ... ऑफिस डेस्क वर ठेवल्यामुले मस्त फ्रेश वाटत आहे काम करायला

१ ते ८ नोव्हेंबर दरम्यान अमरावतीला जाऊन आले. तिथे घराजवळच्या मैदानात बुचाची ७-८ झाडं आहेत. मी मनसोक्त फुलं गोळा करत होते आणि रोज फुलांच्या वेण्या करुन देवाला वाहात होते. खुप वर्षांनंतर वेण्या करण्या इतकी फुल मिळाली त्याचा विशेष आनंद झाला Happy

जागू, सायली नवीन भागाबद्दल अभिनंदन.
सायली वर्णन छान.
अदिजो,देवराईतील orchid भारीच.
निवडुंगाच्या जातीचे फूल छान पण त्याची पाने इतकी वेगळी?

Pages