निसर्गाच्या गप्पा (भाग २३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 November, 2014 - 14:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.

हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..

तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.

या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...

आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्‍या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..

शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.

तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्‍या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.

(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चक्क पावसाळ्यासारखं अंधारलंय आत्ताही. पहाटे ४ वाजता सुरू झालाय तो अजून चालूये.
काल एक शेतकरीण बाई आल्या होत्या त्याम्हणाल्या हाच पाऊस आमच्या खेड्यात पाहिजे ज्वारी बाजरीसाठी पण नेमका त्यांच्या खेड्यात नाही पडला म्हणे काल.
पण हा आत्ताचा अगदी संपूर्ण जिल्ह्यात पडत असेलसं वाटतं.
हो अन्जू वाटतय .....पाऊस मेहेरबान!

यस्स्स..मानुषी... इथे ही रात्री आणी पहाटे खूप पाऊस पडला..
बेमौसम बरसात का राज क्या है Uhoh

ओह...वर्षू मग आमच्या त्या शेतकरणीच्या शेतातही पडला असेल काल रात्री....तुमच्या म्हमईपरेन्त पडला मंजी Proud
सांगलीलाही पाऊस आहे म्हणे..........वहिनीचा फोन आला होता.

आमच्याइथेही रात्री पाऊस आणि आता अंधारले आहे.
दोर्‍याला बांधलेले वरवंटे मस्तच.

ती ब्रहंमदंडी वेगळी होय.

वर्षा मस्त फोटो.

शांकली घारीचे फोटो टाक.

एखाद्यावेळी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असेल तर किनारी भागात पाऊस पडू शकतो, पण थेट नगर, सांगली म्हणजे ???

इथे पुण्यात पण पाऊस आहे... काल रात्रीपासून सुरू आहे. आज सकाळी सूर्यदर्शन नाही आणि अगदी पावसाळी वातावरण आहे.
जागू, घारीचा किंवा घरट्याचा फोटो बहुधा काढता येणार नाही, कारण झावळ्यांमधे बेमालूम करताहेत घरटं! पण तरी प्रयत्न करूच Happy त्यांनी अंडी घातलीएत असं वाटतंय. आज बराच वेळ झालाय एक घार तिथे बसून आहे. मी सध्या ज्या खिडकीत बसतेय तिथून थोडा अंदाज येतोय. पण झावळ्या इतक्या मधे मधे येतात ना! स्पष्ट काही दिसत नाही.

शांकलीला आपले घरटे नीट दिसू नये, एवढा धोरणी विचार घारीणबाई नक्कीच करतात !

वर्षा, कॉमन फुलपाखराचा अनकॉमनली सुंदर फोटो.

कढीलिंबावर एक लठ्ठ अळी ,पाने खाऊन सुस्तावली आहे.पुढे त्यातूनच फुलपाखरू येईल म्हणून कढीलिंब खाऊ देतेय.

कुंडी भरताना तळाशी आपण करवंटीचे, खापराचे तुकडे टाकतो. इथे माझ्याकडे दोन्ही नसते म्हणून मी आक्रोडाच्या साली वापरल्या. आधी रोपे नीट वाढली पण मग अचानकपणे मरून गेली.
नंतर एका पुस्तकात वाचले कि आक्रोडाच्या झाडात असे एक द्रव्य असते. त्यामूळे त्या झाडाखाली दुसरी झाडे वाढू शकत नाहीत.
मी एक धडा घेतला, तुम्ही पण घ्या.

नंतर एका पुस्तकात वाचले कि आक्रोडाच्या झाडात असे एक द्रव्य असते. त्यामूळे त्या झाडाखाली दुसरी झाडे वाढू शकत नाहीत.
>>
अओह!
हे किती महत्वाचे आहे.

मला असं वाटतं आपण निग चं रुपडं थोडंस बदलू शकतो का?
म्हणज हेडर मधे मनोगत आणि चित्रं असतं ना ते एकदम छोटेखानी... आणि इथे गप्पांमधुन जी माहीती मिळते ती संक्षिप्त रुपात हेडर मधे?

उदाहरण म्हणजे, ही वरची मह्त्वाची गोष्ट माझ्याने नक्की विसरली जाणार,
आक्रोड आणि झाडांबद्दल नि ग वर काही तरी वाचलेलं हे आठवणार पण कोणत्या भागात हे नाही आठवणार मग जुने धागे शोधणं इज टू वैताग (तिकडच्य अमाहीतीत गुंतायला होतं आणि मेन काम बाजुलाच Proud )

वा मस्त फोटो आलेत वर.
दा पुस्तकांची माहिती मस्त दिली आहेत.
ए ठाण्यात पण नाही पाऊस. पण झाडे मात्र दव पडल्यासारखी ओलसर झालेली परवा सकाळी. अगदीच दिसेल न दिसेल असा पडत होता पाऊस.

रिया हा प्रयोग आधी करुन झालाय Happy सतत माहिती अपडेट करणे कठिण आहे गं गृहिणी कम नोकरीवाल्या जागुबाईला.

नैतर तु असे का नाही करत? तु एक पान संपले की आधीच्या पानावरच्या चर्चेबद्दल एका ओळीत लिहुन जागुला कळव म्हणजे ती करेल अपडेट. बघ तुला वेळ मिळत असेल तर कर.

दिनेश, पुस्तक मागवलेय. माझ्या घराचे हेवी रिनोवेशन सुरु करतेय लवकरच. बाहेरुन प्लॅस्टर खुप खराब झालेय. ते नीट करायचेय. माझ्या समोरच्या गच्चीतुन खालच्या घरात आता खुपच गळायला लागलेय त्यामुळे खालच्या बाईने गच्चीवर छत घालाच म्हणुन हेका चालवलाय. माझा आधीचा अनुभव लक्षात घेऊन ती आधीच मीच खर्च करतेय हेही वर सांगतेय. सोसायटीनेही मला छप्पर घालायचे बघा म्हटलेय. त्यामुळे मला आता माझ्या झाडांची चिंता लागलीय. तसे उन येईल दिवसभर तिरपे. तरीही उघड्या उन्हातली झाडे आणि छपराखालची झाडे यात फरक आहेच. माझ्या बाजुच्यानेही पुर्ण गच्चीवर छत घातलेय तरी त्याची झाडे बहरलीत. त्यामुळे मला तशी फार चिंता नको करायला. तरीही कुठेतरी माझ्या गच्चीचा लुक जातोय ही भावना आहे. Sad पण काय करणार? घरात गळती हे प्रकरण सगळीकडे आहे.

सुदुपार...
बाप्परे ४ दिवसात केवढया पोष्टी..........सगळ्यांच्या गप्पा, प्र.ची माहिती मस्तच.
आमच्या कडे गुलबाक्षीला कळ्या येऊ लागल्यात :).....

gulbaxi.jpggulbaxi 1.jpg

मला ट्रीज ऑफ वर्ल्ड असे एक छान पुस्तक ( लेखिका अमिना गरीब फकीम ) मॉरिशियसला मिळाले. सुंदर माहीती आहे त्यात. त्यातच हे वाचले.

रीया.. हा पूर्ण धागा माहितीचा खजिना झालाय. शोध घेऊनच सापडतात. पण एक नक्की, परत विचारले तर आम्ही कुणीही न वैतागता उत्तरे देतो.

साधना गच्ची सभोवताल लोखंडी ग्र्रील बसवुन घेता येईल का? म्हणजे छप्पर लागले तरी झाडांसाठी उन्हाचा प्रश्न मीटेल..

हो दिनेशदा, म्हणूनच तर इथे मेंबर्स वाढत अहेत Happy

नैतर तु असे का नाही करत? तु एक पान संपले की आधीच्या पानावरच्या चर्चेबद्दल एका ओळीत लिहुन जागुला कळव म्हणजे ती करेल अपडेट. बघ तुला वेळ मिळत असेल तर कर.
>>
चालेल ना असं? मी ट्राय करून पहाते मला जमतंय का ते Happy

फ्लॉवर कितीही चांगला दिसू दे, पण या जन्मी तरी मी फ्लॉवर खाणे शक्य नाही. Happy

रच्याकने, हेमाताई (मनीमोहर) सध्या दिसत नाहीत?

गच्चीला लोखंडी ग्रिलच आहे, त्यामुळे प्रकाश येईल Happy

इथे फोटो टाकायचा मोह होतोय माझ्या गच्चीचा. आता बिफोर चा फोटो टाकेन, नंतर आफ्टर.

खरेतर माझ्या गच्चीचा मी सदुपयोग करुन घेतला नाही ही खंत आहे. मी प्रयत्न खुप केले पण नीट फॉलोअप केला नाही. खुप वेळ आणि पैसा फुकट घालवला. आता डोळे उघडलेत मात्र Happy सध्या एक तोंडलीचा रोप आहे ज्याच्यातुन एका वेळेसचा पुलाव होतो इतकी तोंडली येतात. आता काम झाले की अजुन दोन - चार फुटवे मागुन आणेन आणि एका वेळॅच्या भाजीची सोय करेन Happy

फ्लॉवर छानेय. एकदा तंदुर फ्लॉवर करुन पाहाय्चाय. तशीच ब्रोकोली तंदुर होईल काय हो दिनेश??

Pages