निसर्गाच्या गप्पा (भाग २३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 November, 2014 - 14:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.

हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..

तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.

या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...

आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्‍या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..

शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.

तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्‍या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.

(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा सरीवा फुल सुंदर आणि तुझ्या फोटोच्या क्लिकने बिचार्‍याची झोपमोड झाली असेल ग Lol

सकाळ पेपर कोणाकडे येत असेल तर त्याच्या पुरवणीमध्ये प्रकाश दुधाळकर म्हणून लेखक रोज एक एक झाडाची माहीती देतात.

आणि तुझ्या फोटोच्या क्लिकने बिचार्‍याची झोपमोड झाली असेल ग >>> अगं झोपमोड होऊ नये म्हणुन एकचं फोटो काढला. तरी बेट्याने हळूच डोळा उघडून माझा निषेध नोंदवलाच Lol

जागू धन्यवाद. नक्की त्यावेळी ऋतु कुठला असेल? हिवाळाच असेल ना? मी नक्की त्याप्रमाणे लिहायला सुरवात करतो Happy

स्निग्धा, सही आहेत फोटो. मला एकदा बघायचे आहे आनंद सागर.

दापोडी सीएमई, केव्ही शाळेच्या च्या आधी एकतर्फे जकात नाक्यापासून पुढे बुचाची झाडे रांगेने नुसती बहरली आहेत. (किमान पंधरा तरी झाडे रांगेने असावीत) अप्रतिम दृश्य आहे.

धन्यवाद बी. आणखीनही काही फोटो आहेत, जमेल तसतसे टाकेनच Happy आनंद सागर आणि मंदिर दोन्ही ठिकाणी अवश्य जा. आधी कधी गेला असाल तर आता गेल्यावर खुप फरक जाणवेल. दोन्ही कडची स्वच्छता विशेष उल्लेख करण्यासारखी आहे.

मी दोन वेळा गेले आहे आनंदसागरला.
तो वरचा फोटो घायपात चा आहे.

बी १००० पोस्ट झाल्या की तुम्ही मला मेल करा.

जागु, मी दरवर्षी जायचे शेगांवला पण यावेळेस मात्र ५ वर्षांनंतर जाण झालं.

ही वडाच्या झाडाची फळं, मी पहिल्यांदाच पाहिली.
Wad 1.jpg

बी, मला माहीत आहे, मी मुळची अमरावतीची आहे. माझे काही नातेवाईक अकोल्याला आहेत.

पहिल्यांदा ही फळ पाहिलीस!!

ही फळ लगडून आणखी लाल होतात आणि पोपटाचे थवे त्या बिलगतात ते दृश्य पण तुला बघायला मिळो.

जागू धन्यवाद. नक्की त्यावेळी ऋतु कुठला असेल? हिवाळाच असेल ना? मी नक्की त्याप्रमाणे लिहायला सुरवात करतो

हिवाळा असला तर हिवाळ्याबद्दल लिहा, जर संपला असेल तर त्या लेखात वर्तमानकाळी क्रियापदे भुतकाळात ढकला आणि थोडे वर्तमानकाळाबद्दल शेवटी लिहा.. हाकानाका.

तसेही ह्या धाग्यावर धडाधड पोस्टी टाकुन लगेच १००० प्रतिसाद गाठायचे कामही करु शक्ता.

पण म्हणुन् कुठल्याही पोस्टी अजिबात चालणार नाही हा.. खुप माहितीपुर्ण, तुमच्या भागातल्या निसर्गची माहिती देणा-या (अकोला, सिंगापुर आणि पुणे तिनही) पोस्टी आणि सोबत भरपुर फोटो टाका.... हाकानाका.

आम्ही ज्या देशात नोकरीसाठी राहतो त्या देशातली प्रेक्षणीय ठिकाणे बघायची राहूनच जातात.
सिंगापूरच्या ऑर्किड गार्डनमधेच मी शेकड्याने फोटो काढले असते. ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी डिजीटल कॅमेरे नव्हते, आता जातो ते केवळ ट्रांझीट मधेच असतो.

दिनेश इथे ऑर्किड कुठेही आढळतात. मुळात हा देश ऑर्चिड साठी प्रसिद्ध आहे. झाडावर सुद्धा उगवतात. पण गंध नसतो. फक्त रुपडे असते.

स्निग्धा, वर्षा मस्त फोटो !
या घायपाताच्या तुर्‍यात थेट घायपाताची रोपेच ( पिल्ले) येतात. ती खाली पडली कि तिथेच रुजतात.
घायपाताचा धागा आपल्याला माहीत आहेच. वाळवंटात ही झाडे माती ( रेती) धरून ठेवायचे काम करतात.
एका प्रकारच्या निळसर घायपातापासून गोड द्रव तयार करतात तर त्याच्या बुंध्यापासून मादक पेयही तयार करतात.

धन्यवाद दा. तिथेच एका झाडाला दुधीभोपळ्याच्या आकाराची आणि चिंचेच्या (पिकलेल्या) टरफलाच्या रंगाची फळं दिसली. फळाची देठ एखाद्या वेली सारखी लांबलचक होती. तिथल्याच एका माणसाने ती गोरखचिंच आहे अस सांगितल. जमल की फोटो टाकते तुम्ही सांगालच Happy

स्निग्धा, कुणी सांगितले असेल तर ती गोरखचिंचच असणार ( ब्रम्हदंडाची फळे पण तशीच दिसतात. ) गोरखचिंच म्हणजे आफ्रिकेतला बाओबाब. इथे तो पवित्र मानतात. फळांचा गर, कोवळी पाने खाता येतात. झाडाच्या खोडापासून
गरज पडल्यास पाणी मिळवता येते. त्याच्या विशाल बुंध्यात घरही बांधतात. खोडापासून जाळीदार कापडही बनते, थोडक्यात अन्न, वस्त्र आणि निवारा पुरवणारा तो कल्पवृक्ष आहे.

तसा याचा चिंचेशी काही संबंध नाही. ( चिंचही मूळ आफ्रिकेतलीच ) गोरखऋषींनी या झाडाखाली तप केले म्हणून हे नाव.
याचा गर पिठूळ, आंबटसर असतो. नुसता खाता येतो. सारही करता येते. इथे त्याचे पेय लोकप्रिय आहे.

बी, सिंगापूरचे राष्ट्रीय फूलही ऑर्किडच आहे ना ? विमानतळावरही खुप आहेत. उष्ण आणि दमट हवामानातच छान फुलतात ती.

Pages