आजतक वृत्तवाहिनीच्या वेबसाईट्वर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने चालु केलेल्या स्वच्छता मोहिमेचा इतर लोकांनी काय अर्थ घेतला असेल ते माहीत नाही परंतु त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांनी मात्र नावाचा पुरता बट्ट्याबोळ करुन टाकला आहे.
http://aajtak.intoday.in/gallery/swachh-bharat-abhiyan-weep-india-weep-1...
वरील लिंक वरुन सभार
एनडीएमएसच्या बाहेर हा तमाशाचा अंक रंगला होता. साफसुथर्या रस्त्यावर कचरा घेउन एक कर्मचारी आला.
त्याने तो रस्त्यावर टाकला.
खाली रस्त्यावर टाकुन पसरवण्यास सुरुवात केली
फोटोमधे कचरा खरा वाटावा म्हणुन झाडु ने व्यवस्थित इकडे तिकडे केला.
फोटो मधे कचरा व्यवस्थित पसरलेला दिसेल याची खात्री करुन घेतली.
स्वच्छता अभियानासाठी भारत सरकार ६२हजार करोड खर्च करणार आहे काही "कोरे करकरीत झाडु" मागवले गेले.
"लाईट कॅमेरा अॅक्शन" भाजपाचे स्वच्छता मोहिमेचे अभिनेते महानायक सतिश उपाध्यय, शाजिया एल्मी आणि इतर सदस्य हातात झाडु घेउन गांधींजींचे स्वप्न साकार करायला आले.
------------
तर भक्तगणो. स्वच्छता करण्याच्या तमाशाचा हा एक अंक संपला. अतिशय मेहनतीने वरील सदस्यांनी अभियानात प्रचंड काम केले घाम गाळला. स्वच्छ असलेला रस्ता मनासारखा लखलखता स्वच्छ केलेला नसल्याने तिथल्या कर्मचार्याला शब्द ऐकवुन परत झाडलेला कचरा होत तसाच टाकुन दे आणि बघ कशी साफसफाई करायची असा आदेश दिला मग सदस्यांनी साफ असलेला रस्ता परत झाडुन आरशासारखा लख्लखीत केला. अशीच स्वच्छता जर चालु असेल तर आपला भारत स्वच्छ झालाच समजा.
कृपया भारत स्वच्छ ठेवा वरील प्रमाणे नाही परंतु भारत हा आपला आहे त्याला आपणच स्वच्छ ठेवायचा आहे. कचरा उचलणारे स्वच्छताकर्मी आहे आणि आपण कचरेवाले आहोत. देश स्वच्छ ठेवा ही साद पंतप्रधानांना आपल्याच निर्लज्जपणामुळे द्यावी लागली. याचा अभिमान नाही तर मनात लाज बाळगा. उठसुट पंतप्रधान लोकांना सुधारण्यासाठी साद द्यावी लागते हीच खर तर शरमेची बाब आहे. नालायक आपण इतके वय झाले आहे तरी रस्त्यावर पचापचा थुंकत असतो. रस्त्यावर उभे राहुन बघितल्यावर १००० पैकी ९९० लोक ५०० मीटर मधे १० वेळा थुंकतात. खाल्ल्यावर तिथेच कागद प्लॅस्टीक टाकत असतात. खिशात मोबाईल फोन तरी माणुस रेल्वेच्या रुळावर बसलेला असतो. आपली मुले हेच शिकणार आणि मोठी होउन हेच करत राहणार अरे बापाला नाही लाज तर मुलांमधे कुठुन उतरणार म्हणा. ? एक गांधी एक गाडगेबाबा एक मनमोहन एक मोदी असे सगळे एक एक होउन जातील परंतु आपल्या सारखे मात्र करोडोंमधे वाढत जाणार. कधी एक गांधींपासुन दुसरा गांधी निर्माण होणार नाही. शिवाजी जन्म घ्यावा मात्र दुसर्यांच्या घरामधे अश्या हलकट मानसिकतेचे आपण लोक कुठुन आपल्यामधुन गांधी, गाडगेबाबा, मोदी जन्माला येणार आहे ? काम करणार्यांचे देखील पाय ओढले जातात, मोठा गाडगेबाबाचा अवतारच आहेस का ? अशी शेलकी बोलणी आपणच देत असतो. आणि आपणच स्वप्न बघतो मुंबईचे शांघाई करायचे ? व्वा व्वा. म्हणजे कचरा आपण करायचा आणि सरकार ने तो उचलायलाच हवा. का तर कचरा करणे गलिच्छ राहणे हा आपला जन्मसिध्द हक्कच आहे. मात्र स्वच्छ करायचे कर्तव्य हे सरकारचेच आहे. हो तर. आपण निवडुन दिले आहे त्यांना . बरोबर ना? निवडुन दिले हेच करायला. मग ते सरकार भाजपाचे असो काँग्रेसचे असो या अन्य कुणाचे. त्यांचेच कर्तव्य आपण नागरीकांचे काही नाही नागरीकांना मुलभुत हक्क असतात मुलभुत कर्तव्य कुठे असतात ? काय म्हणतात असतात ? नागरिकशास्त्रात शिकवले आहे? मग हक्काचेच बरे लक्षात राहते कर्तव्यांचा विसर कसा पडतो ? टॅक्स भरला म्हणजे एकुन एक कर्तव्य पार पाडले असेच ना?
वरील चित्रातली लोक कोणत्याही पक्षाची असो. ते असे करु शकतात. करतात देखील. पण हे आपल्यात असणार्या मानसिकतेमुळे होत आहे. आपणच करत नाही तर त्यांना कोण बोलणार. मोदी रस्त्यांवरचा कचरा झाडत होते तेव्हा पक्षराजकारण सोडुन केजरीवाल समर्थन देउन पंतप्रधान निवासाचे गटर साफ करत होते. पण आपण मात्र "बघा मतांसाठी केजरीवाल असे करत आहे" या अर्थाचे पोस्टर फेसबुक ट्विटर व्हॉट्सप वर फिरवण्यात धन्यता मानत होतो. त्या दोघांनी देशासाठी राजकारण विसरुन अभियान मधे योगदान दिले. आणि आपण त्यातुन योग्य अर्थ न घेता निर्लज्जपणे टिपिकल मानसिकतेचे प्रदर्शन केले.
अजुन ही वेळ गेली नाही. रस्ता झाडायची लाज वाटते तर किमान रस्त्यावर कचरा टाकण्याची देखील लाज वाटु द्या. कचरापेटीतच कचरा टाका. नेम धरुन लांबुन पिशवी फेकु नका. तुम्हाला मेडल मिळणार नाही. जरा जवळ गेलात तर बिघडत नाही. थुंकायची हौस असेल तर गळ्यात थुंकीपात्र घेउन फिरत जा. मग कळेल स्वच्छतेचे महत्व.
स्वतःत सुधारणा करा. पुढची पिढी स्वताहुन शिकेल.
पण भाजपच्या कार्यकर्त्यांची
पण भाजपच्या कार्यकर्त्यांची एक फळी अजून कार्यरत आहे हे नक्की > हो ते दिसुन येतच आहे.
व्हिडीओ द्या पुरावे द्या लिंका द्या इत्यादी मागणी ती फळी सातत्याने करत आहेत
जबरदस्त ! लिहीले आहे काल
जबरदस्त ! लिहीले आहे
काल टीव्हीवर उपाध्याय यांची प्रतिक्रिया समजली नाही !
ऋग्वेद, काल धागा पाहिला होता.
ऋग्वेद, काल धागा पाहिला होता. रात्री टीव्हीवर बातमी पाहुन खात्री झाली. आदरणीय पंतप्रधानाच्या पुढाकाराने सुरु झालेल्या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत आहेच , पण अशा प्रसिद्धीलोलुप कार्यकर्त्यांमुळे हा उपक्रम चेष्टेचा विषय होऊ नये.
उपाध्याय, शाजिया यांनी 'तिथे आम्हाला फक्त पाहुणे म्हणुन बोलाविले होते, या नाटकाशी आमचा काही संबंध नाही' असे स्पष्टीकरण दिले.
पंतप्रधानाच्या पुढाकाराने
पंतप्रधानाच्या पुढाकाराने सुरु झालेल्या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत आहेच , पण अशा प्रसिद्धीलोलुप कार्यकर्त्यांमुळे हा उपक्रम चेष्टेचा विषय होऊ नये. > हेच वर लेखात लिहिले आहे पण भक्तगण समजतील तर लेखात काय लिहिले आहे त्याकडे लक्षच नाही
मग धाग्याचे शीर्षक "स्वच्छ
मग धाग्याचे शीर्षक "स्वच्छ भारत अभियानचे रहस्य" असे generalize केलेलेच का? त्याने सगळे अभियानच खोटे आहे असे ध्वनित करण्याचा तुमचा प्रयत्न आहे अशी समजूत झाल्यास चूक काय?
त्याच्या ऐवजी "स्वच्छ भारत अभियानात घुसलेला थिल्लरपणा आणि जाहीरातबाजी"
असे असायला हवे होते. किंवा तत्सम.
ऋग्वेद, तुमचा लेख
ऋग्वेद, तुमचा लेख पटला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान ही एक सुंदर संकल्पना मांडली. त्यामागचा उद्देश महत्वाचा आहे, प्रत्येक भारतीय नागरिकाने स्वच्छता राखुन जगात अस्वच्छ भारत ही जगात भारताची निर्माण झालेली प्रतिमा पुसुन टाकावी ही त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. स्वच्छतेचे अजुनही फायदे आहेत जसे रोगराई, संसर्गजन्य आजार इत्यादींना अटकाव करता येतो. प्रत्येक भारतीय नागरिकाने यात योगदान द्यावे असे त्यांनी त्यासाठीच आवाहन केले आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मागे फेसबुकवर वाचलेले एक भाषण आठवले जे त्यांनी भारतातील एका विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर केले होते. ज्यात त्यांनी एक उदाहरण दिले होते, जेव्हा एखादा भारतीय माणुस सिंगापुरमधील विमानतळाबाहेर पडतो तेव्हा तो हातातील सिगारेटचे थोटुक रस्त्यावर टाकुन देत नाही, पण तोच जेव्हा भारतात येतो तेव्हा मात्र तो ते बेदरकारपणे भिरकावतो. असे का? माणुस तोच असतो तो जर दुसर्या देशात जाऊन कचरा करत नाही तो स्वत:च्या देशात असे का वागतो. बहुतेक लोक म्हणतात की इथे काहीच बदलणार नाही, पण जर तुम्ही स्वतःच बदलात नाही तर इतरांना दोष देऊन काय उपयोग असा काहीसा त्या भाषणाचा आशय होता.
त्या भाषणाची लिंक
http://www.youthconnectmag.com/2013/09/21/greatest-speeches-dr-apj-abdul...
प्रत्येकानी स्वच्छतेची सुरूवात स्वतःपासुन केली आणि माझा देश स्वच्छ राहिला पाहिजे ही भावना जर प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजली तर नक्कीच स्वच्छ भारताचे स्वप्न साकार होईल.
बाकी वर जे तुम्ही फोटो शेअर केले आहेत आणि तो जो काही फार्स घडवुन आणला आहे तो निषेधार्य आहेच पण अशा काही भंपक, प्रसिध्दीलोलपु व्यक्तींमुळे एका चांगल्या अभियानाबद्दल लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये असे मनापासुन वाटते.
त्याच्या ऐवजी "स्वच्छ भारत
त्याच्या ऐवजी "स्वच्छ भारत अभियानात घुसलेला थिल्लरपणा आणि जाहीरातबाजी"
असे असायला हवे होते. किंवा तत्सम. >
हे आधी बोलायला हवे होते. तर नक्कीच सकारात्मक प्रतिसाद सर्वांकडुन मिळाला असता परंतु फोटो उलट्या क्रमाने व्हिडीओ वगैरे म्हणुन नकारात्मक छबी निर्माण केल्याने पुढील महाभारत घडले. असो लेखाचे नाव बदलण्यात काहीही कमीपणा वाटणार नाही. लेखात देखील मोदींची स्तुतीच केलेली आहे. ज्यांनी वरील थिल्लरपणा केला त्यांच्यावरच आसुड उठवला आहे.
Dhanyavad
Dhanyavad
अवांतर : लोकहो, एनडीएमएस ही
अवांतर :
लोकहो,
एनडीएमएस ही कोणती संस्था आहे? तिच्या दारावर फलक उर्दूत का लिहिला आहे? प्रचिमध्ये दिसलं म्हणून विचारतोय. दुसऱ्या कवाडावर हिंदीत फलक असेलही कदाचित.
आ.न.,
-गा.पै.
Indian Islamic Centre या
Indian Islamic Centre या ठिकाणी हे सर्व घडले.
http://www.dnaindia.com/india/report-at-swachh-bharat-event-delhi-bjp-ch...
ओह अच्छा अच्छा
ओह अच्छा अच्छा
धन्यवाद भ्रमर! आ.न., -गा.पै.
धन्यवाद भ्रमर!
आ.न.,
-गा.पै.
लेखाचे नाव बदलले - धन्यवाद
लेखाचे नाव बदलले - धन्यवाद !
>>ज्यांनी वरील थिल्लरपणा केला त्यांच्यावरच आसुड उठवला आहे. +१०१ - अनुमोदन !
शीर्षक बदल आवडला.
शीर्षक बदल आवडला.
विषयांतरा साठी माफ करा १०
विषयांतरा साठी माफ करा
१० दिवसांपुर्वी २८ तारखेला पंढरपुर ला होते, मंदीरात रांगेत उभे राहताना खुपच वाईट वाटले मंदीराची दुरावस्था पाहुन. झाडलोट तरी रोजच्या रोज होत असेल असे वाटले नाही. अगदी रांगेत उभे राहीलो तरी जिथे जिथे बसायची सोय केलेली तिथेही बर्याच ठीकाणी लहान मुलांनी लघुशंका केलेली. उभेही रहावेसे वाटत नव्हते, ३ तासांनी जेव्हा विठ्ठलाची मुर्ती समोर आली तेव्हा कुठे मनाला शांतता मिळाली नाहीतर इतक्या लांब आणि इतक्या हौसेने मी का आले असेच वाटत होते मला ३ तास.
बीजेपी के स्वच्छता अभियान की
बीजेपी के स्वच्छता अभियान की 10 मज़ेदार फोटो
http://teekhimirchi.in/2014/11/bjp-clean-india-campaign/
हे घ्या, आवडले फोटो तर हि लिंक पण टाका धाग्यात
. मध्यप्रदेशातही तेच. तेही
. मध्यप्रदेशातही तेच. तेही सुशासन दिनी
हे फोटो प्रतिकात्मक असतात.
हे फोटो प्रतिकात्मक असतात. अभियान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. काँग्रेसने का नाही चालवलं असं अभियान ? निर्मल ग्राम की काय होतं त्याचं काय झालं ते लोकांना कधीही कळालं नाही. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत तर त्यांचा फज्जा उडतो आणि त्यावरचा खर्च वाया जातो. थोडेसे पैसे मार्केटिंगसाठी वापरले आणि प्रभावी व्यक्तींनी जाहीरात केली तर कमीत कमी उद्देश आणि योजना लोकांपर्यंत पोहोचतात.
पंप्र सारख्या पदावरच्या लोकांनी रोजच्या रोज आपल्याकडे झाडू मारला पाहीजे अशी अपेक्षा करायला जनता खुळी नाही हे निवडणुकांचे निकाल सांगताहेत. कुणाला आक्षेप घ्यावासा वाटत असेल तर कोण अडवणार ?
हाय तंबोर्या!
हाय तंबोर्या!
हाय इब्लीस वहीनी
हाय इब्लीस वहीनी
इब्लीस वहीनी माझं तुमच्याशी
इब्लीस वहीनी
माझं तुमच्याशी भांडण नाही. मी इथे कोण काय आहे हे शोधत बसलेले नाही. आपन एकमेकांना ओळखत नसताना तुम्ही ज्या त-हेने अपशब्द वापरताहेत, हीन पातळीला जाताय त्यावरून तुम्हाला प्रतिसाद देऊ नये या मताला मी आलेले आहे. हे सुद्धा तुम्हाला सांगण्याची गरज नव्हती, पण नेटवर एखादा आयडी स्त्री आहे की पुरूष याची कल्पना नसताना तिला पुरूष समजून असभ्य प्रतिसाद देणं हे सभ्यतेत बसत नाही. ( पुरूष आयडीला तरी असे घाणेरडे प्रतिसाद का द्यावेत भांडण नसताना ?)
तुम्हाला सांगून किती उपयोग होईल याची मला कल्पना नाही. पण कर्तव्य पार पाडलं. यापुढे आपण माझ्याशी संवाद साधू नये ही अपेक्षा आहे.
हे फोटो प्रतिकात्मक असतात.
हे फोटो प्रतिकात्मक असतात.
......
सगळे अभियानच. प्रतिकात्मक आहे
सरकारच प्रतिकात्मक आहे
सरकारच प्रतिकात्मक आहे
नावाला दिल्ली राजधानी आहे
हेच लिहिणार होतो मीही
हेच लिहिणार होतो मीही
वीणा सुरू | 25 December, 2014
वीणा सुरू | 25 December, 2014 - 22:25 नवीन
इब्लीस वहीनी
माझं तुमच्याशी भांडण नाही. मी इथे कोण काय आहे हे शोधत बसलेले नाही. आपन एकमेकांना ओळखत नसताना तुम्ही ज्या त-हेने अपशब्द वापरताहेत, हीन पातळीला जाताय त्यावरून तुम्हाला प्रतिसाद देऊ नये या मताला मी आलेले आहे. हे सुद्धा तुम्हाला सांगण्याची गरज नव्हती, पण नेटवर एखादा आयडी स्त्री आहे की पुरूष याची कल्पना नसताना तिला पुरूष समजून असभ्य प्रतिसाद देणं हे सभ्यतेत बसत नाही. ( पुरूष आयडीला तरी असे घाणेरडे प्रतिसाद का द्यावेत भांडण नसताना ?)
तुम्हाला सांगून किती उपयोग होईल याची मला कल्पना नाही. पण कर्तव्य पार पाडलं. यापुढे आपण माझ्याशी संवाद साधू नये ही अपेक्षा आहे.
<<
माझ्या डुप्लिकेट नारदाच्या तंबोरा महोदया,
जरा सुधरायचं पहा.
कुणा मृत व्यक्तीचे फोटो शोधून प्रोफाईलला लावून ओरिजिनल आयडी असल्याचा आभास निर्माण करण्याच्या प्रयत्नात तोंडघशी पडल्यानंतर असल्या फडतूस पोस्टि पाहून फक्त करमणूक होते.
पुन्हा एकदा,
जरा सुधरायचं पहा, अन जमलं तर इथून गायब व्हा. इथून = मायबोलीवरून.
बाऽयऽ
फोटो प्रतिकात्मक आहेत
फोटो प्रतिकात्मक आहेत म्हणे.
म्हणजे पंतप्रधान , भाजपी नेते व सेलेब्रिटी यांनी प्रतिकात्मक खोटी खोटी स्वच्छता करायची.
अणि आम जनतेने मात्र खराखुरा कचरा काढायचा !
किती निर्लजपणा हा !
(No subject)
इब्लीस ही मात्र हद्द
इब्लीस
ही मात्र हद्द झाली.
माझा तुम्हाला काहीही त्रास नाही. तुम्ही प्रत्येक ठिकाणी असे घाणेरडे प्रतिसाद देत आहात.
तुम्ही स्वतः कोण आहात हे कधीही कुणालाही कळू दिलेले नाही. स्वतः अशा प्रकारे भेकडासारखा वावर ठेवून प्रत्येक आयडीबद्दल तो कोण आहे हे तुम्ही लिहीत असता हे जे तुमच्याबद्दल ऐकलंय त्याचा प्रत्यक्षच अनुभव घेतेय.
असो
People who don't know how to keep themselves healthy ought to have the decency to get themselves buried, and not waste time about it.
Henrik Ibsen
सभ्यता म्हणजे काय हे एखाद्याला समजावून सांगता येत नाही हे जितकं खरं तितकंच चिखलात दगड टाकला काय आणि कुणी आपल्यावर चिखल टाकला काय एकच. चिखलापासून दूरच राहीलेलं बरं.
तुम्ही आता कितीही प्रयत्न केले तरी तुमच्या पातळीवर उतरून उत्तर देता येत नसल्याने क्षमस्व ! बाकी माझ्या पोस्टला उत्तर देता येत नसल्याने तुमचा भाषेचा तोल गेला आहे (कधी असतो कुणास ठाऊक) हे माझ्या लक्षात आलं आहे.
हो काऊ या लोकांनी कचरा काढावा
हो काऊ
या लोकांनी कचरा काढावा अशी अपेक्षा आहे का ? अशाने मग प्रशासन घरी बसवून सगळी कामे यांनाच करावी लागतील. नागरीकांनी नियम पाळावेत म्हणून प्रतिकात्मक कृती करून अभियानाची सुरुवात करतात तसंच आहे हे.
लोकांना स्वच्छता पाळा हे सांगावं कशाला लागतंय ? माफ करा अनेकांनी इथं हा प्रश्न विचारला आहे त्याला लॉजिकल उत्तर मिळत नाहीये. लोकांना चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून सरकार स्वतःहून पुढाकार घेतंय हे सकारात्मक नाही का वाटत ?
या लोकांनी कचरा काढावा अशी
या लोकांनी कचरा काढावा अशी अपेक्षा आहे का ?
.......
मग आम जनतेने तरी कचरा का काढायचा ? सफाइ कामगार नेमलेले नाहीत का ?
असे आम्दोलन. रोज करायचे नसते. आपल्या सवडीनुसार. रोज /आआठवड्यात्न त / १५. दिवसातुन / मह्न्यात्न कधीही करावे. पण जे.करायचे अहे ते नीट करावे.
आमचा हॉस्पिट्ल जवळच्या गल्ल्या दोन सनिवारी स्टाफ दोन ता स खर्च करुन झाडतो. त्यात हॉस्पिटलचे डायरेक्टरही भाग गेतात.
सेलेब्रिटीनी फक्त फोटो सेशन करायचे. त्यालाही दोन तीन तास लागतीलच ना ? मग त्या काळात त्यानी खरे काम करुन दाखवावे की.
Pages