"स्वच्छ भारत अभियानात घुसलेला थिल्लरपणा आणि जाहीरातबाजी"

Submitted by ऋग्वेद on 6 November, 2014 - 05:42

आजतक वृत्तवाहिनीच्या वेबसाईट्वर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने चालु केलेल्या स्वच्छता मोहिमेचा इतर लोकांनी काय अर्थ घेतला असेल ते माहीत नाही परंतु त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांनी मात्र नावाचा पुरता बट्ट्याबोळ करुन टाकला आहे.

http://aajtak.intoday.in/gallery/swachh-bharat-abhiyan-weep-india-weep-1...

वरील लिंक वरुन सभार

एनडीएमएसच्या बाहेर हा तमाशाचा अंक रंगला होता.
satish_up_shekhar_ya-1_110614021633.jpgसाफसुथर्या रस्त्यावर कचरा घेउन एक कर्मचारी आला.

satish_up_shekhar_ya-2_110614021634.jpgत्याने तो रस्त्यावर टाकला.

satish_up_shekhar_ya-3_110614021634.jpgखाली रस्त्यावर टाकुन पसरवण्यास सुरुवात केली

फोटोमधे कचरा खरा वाटावा म्हणुन झाडु ने व्यवस्थित इकडे तिकडे केला.

फोटो मधे कचरा व्यवस्थित पसरलेला दिसेल याची खात्री करुन घेतली.

स्वच्छता अभियानासाठी भारत सरकार ६२हजार करोड खर्च करणार आहे काही "कोरे करकरीत झाडु" मागवले गेले.

"लाईट कॅमेरा अ‍ॅक्शन" भाजपाचे स्वच्छता मोहिमेचे अभिनेते महानायक सतिश उपाध्यय, शाजिया एल्मी आणि इतर सदस्य हातात झाडु घेउन गांधींजींचे स्वप्न साकार करायला आले.

------------

तर भक्तगणो. स्वच्छता करण्याच्या तमाशाचा हा एक अंक संपला. अतिशय मेहनतीने वरील सदस्यांनी अभियानात प्रचंड काम केले घाम गाळला. स्वच्छ असलेला रस्ता मनासारखा लखलखता स्वच्छ केलेला नसल्याने तिथल्या कर्मचार्याला शब्द ऐकवुन परत झाडलेला कचरा होत तसाच टाकुन दे आणि बघ कशी साफसफाई करायची असा आदेश दिला मग सदस्यांनी साफ असलेला रस्ता परत झाडुन आरशासारखा लख्लखीत केला. अशीच स्वच्छता जर चालु असेल तर आपला भारत स्वच्छ झालाच समजा.

कृपया भारत स्वच्छ ठेवा वरील प्रमाणे नाही परंतु भारत हा आपला आहे त्याला आपणच स्वच्छ ठेवायचा आहे. कचरा उचलणारे स्वच्छताकर्मी आहे आणि आपण कचरेवाले आहोत. देश स्वच्छ ठेवा ही साद पंतप्रधानांना आपल्याच निर्लज्जपणामुळे द्यावी लागली. याचा अभिमान नाही तर मनात लाज बाळगा. उठसुट पंतप्रधान लोकांना सुधारण्यासाठी साद द्यावी लागते हीच खर तर शरमेची बाब आहे. नालायक आपण इतके वय झाले आहे तरी रस्त्यावर पचापचा थुंकत असतो. रस्त्यावर उभे राहुन बघितल्यावर १००० पैकी ९९० लोक ५०० मीटर मधे १० वेळा थुंकतात. खाल्ल्यावर तिथेच कागद प्लॅस्टीक टाकत असतात. खिशात मोबाईल फोन तरी माणुस रेल्वेच्या रुळावर बसलेला असतो. आपली मुले हेच शिकणार आणि मोठी होउन हेच करत राहणार अरे बापाला नाही लाज तर मुलांमधे कुठुन उतरणार म्हणा. ? एक गांधी एक गाडगेबाबा एक मनमोहन एक मोदी असे सगळे एक एक होउन जातील परंतु आपल्या सारखे मात्र करोडोंमधे वाढत जाणार. कधी एक गांधींपासुन दुसरा गांधी निर्माण होणार नाही. शिवाजी जन्म घ्यावा मात्र दुसर्यांच्या घरामधे अश्या हलकट मानसिकतेचे आपण लोक कुठुन आपल्यामधुन गांधी, गाडगेबाबा, मोदी जन्माला येणार आहे ? काम करणार्‍यांचे देखील पाय ओढले जातात, मोठा गाडगेबाबाचा अवतारच आहेस का ? अशी शेलकी बोलणी आपणच देत असतो. आणि आपणच स्वप्न बघतो मुंबईचे शांघाई करायचे ? व्वा व्वा. म्हणजे कचरा आपण करायचा आणि सरकार ने तो उचलायलाच हवा. का तर कचरा करणे गलिच्छ राहणे हा आपला जन्मसिध्द हक्कच आहे. मात्र स्वच्छ करायचे कर्तव्य हे सरकारचेच आहे. हो तर. आपण निवडुन दिले आहे त्यांना . बरोबर ना? निवडुन दिले हेच करायला. मग ते सरकार भाजपाचे असो काँग्रेसचे असो या अन्य कुणाचे. त्यांचेच कर्तव्य आपण नागरीकांचे काही नाही नागरीकांना मुलभुत हक्क असतात मुलभुत कर्तव्य कुठे असतात ? काय म्हणतात असतात ? नागरिकशास्त्रात शिकवले आहे? मग हक्काचेच बरे लक्षात राहते कर्तव्यांचा विसर कसा पडतो ? टॅक्स भरला म्हणजे एकुन एक कर्तव्य पार पाडले असेच ना?

वरील चित्रातली लोक कोणत्याही पक्षाची असो. ते असे करु शकतात. करतात देखील. पण हे आपल्यात असणार्या मानसिकतेमुळे होत आहे. आपणच करत नाही तर त्यांना कोण बोलणार. मोदी रस्त्यांवरचा कचरा झाडत होते तेव्हा पक्षराजकारण सोडुन केजरीवाल समर्थन देउन पंतप्रधान निवासाचे गटर साफ करत होते. पण आपण मात्र "बघा मतांसाठी केजरीवाल असे करत आहे" या अर्थाचे पोस्टर फेसबुक ट्विटर व्हॉट्सप वर फिरवण्यात धन्यता मानत होतो. त्या दोघांनी देशासाठी राजकारण विसरुन अभियान मधे योगदान दिले. आणि आपण त्यातुन योग्य अर्थ न घेता निर्लज्जपणे टिपिकल मानसिकतेचे प्रदर्शन केले.

अजुन ही वेळ गेली नाही. रस्ता झाडायची लाज वाटते तर किमान रस्त्यावर कचरा टाकण्याची देखील लाज वाटु द्या. कचरापेटीतच कचरा टाका. नेम धरुन लांबुन पिशवी फेकु नका. तुम्हाला मेडल मिळणार नाही. जरा जवळ गेलात तर बिघडत नाही. थुंकायची हौस असेल तर गळ्यात थुंकीपात्र घेउन फिरत जा. मग कळेल स्वच्छतेचे महत्व.
स्वतःत सुधारणा करा. पुढची पिढी स्वताहुन शिकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुरखा तराटरा फाटल्यावर भक्तांची जी अवस्था झालेली आहे ती बघण्यालायकीची आहे. Biggrin
बाकी भक्तगण बाकीचा लेख वाचण्याची तसदी मात्र घेत नाही. फक्त फोटो बघुनच तळपायाची आग मस्तकात जात आहे.
मस्त

बातमी आणी वरील फोटो बघुन लाज वाटली की असे लोक आपल्या भारतात आहेत. या लोकाना ना जनाची न मनाची.:अरेरे:

लेख चान्गला आहे, कळकळ पोहोचली. हे नाही सुधारले पण निदान आपण तरी काळजी घेऊया.

दुर्दैवी प्रकार आहे सगळा. फोटो उलटया क्रमाने आहेत की काय ही शंका मलाही आली. जर तसं असेल तर भाजपच्या अतिशय अ‍ॅक्टिव्ह असलेल्या मिडिया टीमने ताबडतोब आजतकशी बोलून स्पष्टीकरण देणारे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर फिरवू लागणे.
पण जर फोटो सरळ क्रमानेच असतील तरीही जे हा प्रकार जस्टिफाय करतील त्यांना कोपरापासून नमस्कार.

बाय दे वे, निवडणुकीच्या काळात धर्मांध वगैरे असलेली शाजिया एल्मी आता भाजपला 'चालसे'? त्यांना तर भ्रष्टवादीवाले काका पण आता 'चालसे'! उदया या रेटने ते सोनिया गांधीना सुध्दा पक्षात घेतील किंवा युती करतील काँग्रेसबरोबर आणि मग सोनियाजी आदर्श भारतीय नारी आहेत असे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर फिरवतील Happy

राष्ट्रवादीने दिलेला पाठिंबा स्वीकारला तर पेपरातच पत्र लिहिणार आहे भाजपला उद्देशून!>>

बापरे, देवेंद्रदादाला घाबरवताय हां!
घाबरेल ना बिच्चारा .

बुरखा तराटरा फाटल्यावर भक्तांची जी अवस्था झालेली आहे ती बघण्यालायकीची आहे.
<<
<<
याचा अर्थ स्पष्ट आहे की, हा धागा काढण्याचा उद्देश स्वच्छते विषयी तळमळ नसुन, भक्तांचा बुरखा टराटरा फाडण्याचा आहे.

Very sarcastic! Some people are always finding loop holes and not even mention the work that done regarding swach bharat abhiyan. I am not sure about the authenticity of the article written by Rugved. But why don't you watch the following link. Don't make this as political issue. At least appreciate for creating awareness.

Sachin Tendulkar
http://www.youtube.com/watch?v=lm28H_zRyws

Anil Ambani
http://www.youtube.com/watch?v=lm28H_zRyws

Salman Khan
http://www.youtube.com/watch?v=KnV3OeW-bu4

Ram
http://www.youtube.com/watch?v=Pwab9xjspYk

Sania Mirza
http://www.youtube.com/watch?v=0eR4lkhAhv8

Mary Kom
http://www.youtube.com/watch?v=Aj7kQLP9l_A

Shashi Tharoor
http://www.youtube.com/watch?v=s5ERoLxl0ZY

Nagarjun
http://www.youtube.com/watch?v=PD4JbX1wv6Y

St Mary's College student
http://www.youtube.com/watch?v=2nPTvlUBljo

Arvind Kejariwal
http://www.youtube.com/watch?v=h96zqQq5cNo

Baba Ramdev
http://www.youtube.com/watch?v=5PnAzi0wZPc

Army Chief Dalbir Suhag (jawans taking oaths)
http://www.youtube.com/watch?v=vPXqiKfNZWQ

CADD Centre
http://www.youtube.com/watch?v=UcO_Y_-U-1w

SOCIAL IMPACT
http://www.youtube.com/watch?v=jwS1B5ZW_Wo

, भक्तांचा बुरखा टराटरा फाडण्याचा आहे. > धन्यवाद शेवटी मान्य केले की बुरखा "टराटराच" फाटला आहे Wink

श्रीराम बाकिच्यांनी नक्कीच मन लावुन काम केले आहेत . मोदींनी देखील त्यादिवशी जे काम केले आहे ते खरोखर स्वतः केले आहे. त्याबद्दल काहीच आक्षेप नाही आणि कुणाचा नसावा देखील. बुरखा फक्त अश्या आळशीवृत्ती चमकोगिरी करणार्यांचा फाटला गेला आहे.

खरे काम करणार्यांना काहीच भिती नसते नाही का Happy

राष्ट्रवादीने दिलेला पाठिंबा स्वीकारला तर पेपरातच पत्र लिहिणार आहे भाजपला उद्देशून! > आयडीया मे थोडा चेंज
पत्र भाजपाला नाही अमित शहा यांना लिहा.

The event covered in the aaj tak news is being discussed on ndtv right now. > कोकणस्थ साहेब असाल तिथुन चॅनल बदला. तुमच्याने बघवणार नाही. अतिशय भयंकर व्हिडीओ / फोटो आहेत ते Wink

श्रीराम बाकिच्यांनी नक्कीच मन लावुन काम केले आहेत .>>>>>>>>

Then please change the title 'स्वच्छ भारत अभियानचे रहस्य'. You can't judge whole abhiyan based on one or two incidents.

You can't judge whole abhiyan based on one or two incidents. > पक्ष त्यांचाच ना Wink आणि इथे तर सुतावर स्वर्ग गाठणारी माणसे आहेत त्यांच्यासाठी आहे हे.
आपण नविन दिसतात.
आणि हो. इंग्रजी मधे लिहु नका. काहींच्या मते इंग्रजीतुन लिहिल्यावर भारी मानण्याचा जमाना विरला आहे Happy

छानच लेख आणि काही प्रतिसाद सुद्धा! .

The Ugly Indian बद्दल कुणितरी लिहल पाहिजे. आम नागरिकांचे गट, The Ugly India या नावाखाली एकत्र येत आहेत. शहरात असलेले घाणीचे कोपरे, न बोलता आणि वैयक्तिक प्रसिद्धी न घेता, स्व्च्छ आणि चकचकीत करत आहेत. खर तर मिडियाने यांना प्रसिद्धी दिली पाहिजे.

हि तर नुसती वगाला सुरवात झालीय . खरा तमाशा अजून देशाला पाहायचाय. एक म्हण आठवली 'काम कमी सोंग फार'..

राष्ट्रवादीने दिलेला पाठिंबा स्वीकारला तर पेपरातच पत्र लिहिणार आहे भाजपला उद्देशून!
>>>>>>>>

पाठींबा स्विकारायचा विचार करत आहेत वा अजून ठामपणे नाकारला नाही इथेच खरे तर भाजपची तत्वे समजतात. यापुढे राष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारून शिवसेनेबरोबर सत्ता स्थापली तरी ते सोयीचे गणित म्हणूनच असेल. अचानक साक्षात्त्कार होत डोळे उघडले आणि तत्वाला जागले म्हणून नसेल. या नेते मंडळींची आणि (सर्वच) राजकीय पक्षांची तथाकथित नैतिकता आतापावेतो उघड पडली आहे.

असो, हा धाग्याचा विषय नाही Happy

यात गैर काय आहे रुग्वेदा?? भाजपचे लोक चालचरित्र आणि प्रखर राष्ट्रनिष्ठेचा डमरु रोज वाजवत असतात ,कधी संस्कृतप्रचुर हिंदीतून तर कधी तर्खडकरी इंग्रजीतून. इथे तर यांची प्रखर राष्ट्रनिष्ठाच अधोरेखित झाली आहे..
जशी मांजरी आपल्या पिलांना शिकार करणे शिकता यावे यासाठी अर्धमेला उंदीर त्यांच्यासमोर टाकते त्याच ममत्व भावाने मोदींजीनी या देशाला वळण लागावे यासाठी हा कचरारुपी उंदीर टाकण्याचे कष्ट भाजप नेत्यांना घ्यायला सांगितले असावेत. यावरुन मोदींचा ममत्व भाव स्पष्ट होतो.
(सेनापती बापट यांच्या मुलीचा लग्न समारोह चालू असताना काही पाहुण्यांना सेनापती हे कार्यालयातले संडास साफ करत असल्याचे निदर्शनास आले, त्यावर 'पाहुण्यांसाठी स्वच्छता राखली पाहिजे ' असे सहज उत्तर त्यांनी दिले. कुठे बापटांचा स्वच्छसहजभाव आणि कुठे या सांप्रत चालचरित्रवाल्यांचा ढोंगीपणा!!!!)

कठिण आहे! हे देखाव्यासाठीच असेल अस वाटतय ..व्हिडियो बघितला तर कळुन येतेय.. त्यातही एवढासा १० बाय १० चा रस्त्याचा भाग झाडायला ७-८ जणाची गर्दी तेही मोठे मोठे झाडु हातात घेवुन.. सगळ शॉ-ऑफ साठी!

पण हा झाला एक मुद्दा!

एका गटाच्या (अक्ष्यम )चुकिमुळे पुर्ण अभियानचा हेतु सन्श्यास्पद ठरवणे अतिशय चुकिचे ठरेल...एका चान्गल्या अभियानाला भाजप-मोदि द्वेशामुळे मोडित काढु नये!

हा निव्वळ ढोन्गीपणा असेल तर ते अगदीच चुकीचे आहे. ढोन्गीपणा करण्याची प्रवृत्ती निषेधार्य आहे.

स्वच्छ भारत अभियानाचे मला दर्षनी फायदे पण दिसत आहेत... माझे भुसावळ येथे १९८३ पासुन वास्तव्य (आता दर १-२ वर्षात एक चक्कर) आहे. अनेक ठिकाणी ताम्बडे- लाल थुन्कलेले कोपरे दृष्टीस पडणे हे नित्याचे आहे. सरकारी कार्यालयात कामानिमीत्ताने अनेक चकरा होतात. एका कार्यालयाच्या आतमधे गेल्यावर एका ठराविक कोपर्‍यातुन जाताना डोळे बन्द करुन आणि नाकावर रुमाल ठेवतच जावे लागायचे. या वेळी (२०१४) प्रथमच त्या ताम्बड्या - लाल कोपर्‍याची स्वच्छता होताना दिसली. साफ करणार्‍या कर्मचार्‍याला मी एक क्षण थाम्बुन धन्यवाद दिलेत. जे मला तिस वर्षात कधिही बघायला मिळाले नाही ते ऑक्टोबर २०१४ दिसले आहे.

यावेळी भुसावळ रेल्वे स्टेशन (७०-८० लाम्ब पल्ल्याच्या गाड्या दर दिवशी थाम्बतात) तुलनेने स्वच्छ दिसले. सबन्ध स्टेशनवर कुठेही कचरा, घाण दिसत नव्हती.

आता होत असलेल्या स्वच्छतेला टिकवणे आणि तसे प्रयत्न करणे याचे जबाबदारी प्रत्येकाचीच आहे. अशाच प्रकारची स्वच्छता काम करण्यात आणि आर्थिक व्यावहारात कधी येणार ? तेथे अजुनही ४००० रु खरेदी केल्यावरही कच्चे पाढर्‍या कागदावर लिहुन मिळालेली पावती मला मिळते - मग पक्क्या पावतीसाठी थोडे वाद घालावे लागतात, पाठपुरावा केल्यावर मिळते पण चोर- मानसिकतेची चिड येते.

clean india 2.jpg
"Interestingly the station backyard was already cleaned early in the night - ready for the "cleanliness drive" - claimed a railway official who did not want to be named.
.
.
.
The cleaning exercise (involving Mr. Shah and Ms. Mahajan)
lasted less than three minutes."

clea india 3.png
"Officials during the clean- up drive at MDL (Left); a worker removes garbage later on Thursday."

राष्ट्रवादीने दिलेला पाठिंबा स्वीकारला तर पेपरातच पत्र लिहिणार आहे भाजपला उद्देशून!>>>>

@बेफी - दुसरा ऑप्शन तुम्हाला दिसतो आहे का?
एकतर मतदानाच्या वेळी एकदा गैर हजर राहील्यावर नंतर ६ महीने तरी सारखी मतदान होत नाहीत.
तेंव्हा सहा महीने वाट बघा, हे सरकार जर चांगले काम करत असेल तर कोणाचा पाठींबा आहे त्यानी काय फरक पडतो.

तसाही पाठींबा बाहेरुन आहे, पण शिवसेनेचा घेतला की त्यांची १० लोक मंत्री होउन धुडगुस घालतील.

तुम्हाला शिवसेना राष्ट्रवादी पेक्षा बरी आहे असे म्हणायचे आहे का? भुजबळ , राणे आणि राठा ही शिवसेनेचीच अपत्ये आहेत हे लक्षात ठेवा.

वर सरकार मधे राहुन शिवसेना सामना मधे शिव्या घालणार सरकारला. शिवसेना अजिबातच नको सरकार मधे.

नै सिंचन घोटाळ्यावर गळे काढणारे राष्ट्रवादीचा पाठिंबा चालेल म्हणतात, कमाल नै!
याला नैतिक व्यभिचार म्हणतात, शिवसेनेला कोंडीत पकडायचे ,राष्ट्रवादीची मदत घ्यायची व परत 'त्येच पाठिंबा देत आहेत, आमी नै मागितला !!' असा दुधखुळा युक्तीवाद करायचा.
इतक्या दिवस दाताच्या कण्या करुन फडणवीस सिँचन घोटाळा टोल वगैरेवर अभ्यासु विरोध करत होते, पण सत्ता येताच टोलमुक्त महाराष्ट्राच्या घोषणेवरुन युटर्न घेऊन अजित पवारचीच व्यक्तव्य अभ्यासु(?) नेता सांगत आहे , संस्कृतप्रचुर मराठी व तर्खडकरी इंग्रजीतुन काहीही सांगा लोकांमध्ये ते खपते असा यांचा गैरसमज झाला आहे भाजप्यांचा.

शो ऑफ साठीची चित्रे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद , अशा प्रकारांचा जाहिर निषेध व्हायलाच हवा.
आपल्या प्रत्येक धाग्याला कॉग्रेस विरुद्ध भाजप किंवा सेना विरुद्ध भाजप असे वळण का लागते काही कळत नाही.
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत माझ्या घराजवळ काही तरुण आणि जेष्ठ आले आणि साफसफाई करुन गेले त्यात आम्हीही त्यांना साथ दिली त्यानंतर आम्हीच स्वच्चतेबाबत काळजी घेऊ लागलो आहोत. आता हे फक्त भाजपमुळे होते आहे असे आहे का ? ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या स्विकारल्याच हव्या. मोदी आणि त्यांचे अनुयायी यांच्यापर्येंतच भारताचे भवितव्य अवलंबून आहे का ?
ज्या गोष्टी स्थानिक पातळीवर व्हायला हव्यात त्याची राष्ट्रीय पातळीवर चर्चा होते आणि स्थानिक नेते गमज्या मारत बोंबलत हिंडतात ही वस्तूस्थिती आहे. पण भाजपच्या कार्यकर्त्यांची एक फळी अजून कार्यरत आहे हे नक्की.

शो ऑफ साठीची चित्रे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद , अशा प्रकारांचा जाहिर निषेध व्हायलाच हवा.
आपल्या प्रत्येक धाग्याला कॉग्रेस विरुद्ध भाजप किंवा सेना विरुद्ध भाजप असे वळण का लागते काही कळत नाही.
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत माझ्या घराजवळ काही तरुण आणि जेष्ठ आले आणि साफसफाई करुन गेले त्यात आम्हीही त्यांना साथ दिली त्यानंतर आम्हीच स्वच्छ्तेबाबत काळजी घेऊ लागलो आहोत. आता हे फक्त भाजपमुळे होते आहे असे आहे का ? ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या स्विकारल्याच हव्या. मोदी आणि त्यांचे अनुयायी यांच्यापर्येंतच भारताचे भवितव्य अवलंबून आहे का ?
ज्या गोष्टी स्थानिक पातळीवर व्हायला हव्यात त्याची राष्ट्रीय पातळीवर चर्चा होते आणि स्थानिक नेते गमज्या मारत बोंबलत हिंडतात ही वस्तूस्थिती आहे. पण भाजपच्या कार्यकर्त्यांची एक फळी अजून कार्यरत आहे हे नक्की.

Pages