"स्वच्छ भारत अभियानात घुसलेला थिल्लरपणा आणि जाहीरातबाजी"

Submitted by ऋग्वेद on 6 November, 2014 - 05:42

आजतक वृत्तवाहिनीच्या वेबसाईट्वर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने चालु केलेल्या स्वच्छता मोहिमेचा इतर लोकांनी काय अर्थ घेतला असेल ते माहीत नाही परंतु त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांनी मात्र नावाचा पुरता बट्ट्याबोळ करुन टाकला आहे.

http://aajtak.intoday.in/gallery/swachh-bharat-abhiyan-weep-india-weep-1...

वरील लिंक वरुन सभार

एनडीएमएसच्या बाहेर हा तमाशाचा अंक रंगला होता.
satish_up_shekhar_ya-1_110614021633.jpgसाफसुथर्या रस्त्यावर कचरा घेउन एक कर्मचारी आला.

satish_up_shekhar_ya-2_110614021634.jpgत्याने तो रस्त्यावर टाकला.

satish_up_shekhar_ya-3_110614021634.jpgखाली रस्त्यावर टाकुन पसरवण्यास सुरुवात केली

फोटोमधे कचरा खरा वाटावा म्हणुन झाडु ने व्यवस्थित इकडे तिकडे केला.

फोटो मधे कचरा व्यवस्थित पसरलेला दिसेल याची खात्री करुन घेतली.

स्वच्छता अभियानासाठी भारत सरकार ६२हजार करोड खर्च करणार आहे काही "कोरे करकरीत झाडु" मागवले गेले.

"लाईट कॅमेरा अ‍ॅक्शन" भाजपाचे स्वच्छता मोहिमेचे अभिनेते महानायक सतिश उपाध्यय, शाजिया एल्मी आणि इतर सदस्य हातात झाडु घेउन गांधींजींचे स्वप्न साकार करायला आले.

------------

तर भक्तगणो. स्वच्छता करण्याच्या तमाशाचा हा एक अंक संपला. अतिशय मेहनतीने वरील सदस्यांनी अभियानात प्रचंड काम केले घाम गाळला. स्वच्छ असलेला रस्ता मनासारखा लखलखता स्वच्छ केलेला नसल्याने तिथल्या कर्मचार्याला शब्द ऐकवुन परत झाडलेला कचरा होत तसाच टाकुन दे आणि बघ कशी साफसफाई करायची असा आदेश दिला मग सदस्यांनी साफ असलेला रस्ता परत झाडुन आरशासारखा लख्लखीत केला. अशीच स्वच्छता जर चालु असेल तर आपला भारत स्वच्छ झालाच समजा.

कृपया भारत स्वच्छ ठेवा वरील प्रमाणे नाही परंतु भारत हा आपला आहे त्याला आपणच स्वच्छ ठेवायचा आहे. कचरा उचलणारे स्वच्छताकर्मी आहे आणि आपण कचरेवाले आहोत. देश स्वच्छ ठेवा ही साद पंतप्रधानांना आपल्याच निर्लज्जपणामुळे द्यावी लागली. याचा अभिमान नाही तर मनात लाज बाळगा. उठसुट पंतप्रधान लोकांना सुधारण्यासाठी साद द्यावी लागते हीच खर तर शरमेची बाब आहे. नालायक आपण इतके वय झाले आहे तरी रस्त्यावर पचापचा थुंकत असतो. रस्त्यावर उभे राहुन बघितल्यावर १००० पैकी ९९० लोक ५०० मीटर मधे १० वेळा थुंकतात. खाल्ल्यावर तिथेच कागद प्लॅस्टीक टाकत असतात. खिशात मोबाईल फोन तरी माणुस रेल्वेच्या रुळावर बसलेला असतो. आपली मुले हेच शिकणार आणि मोठी होउन हेच करत राहणार अरे बापाला नाही लाज तर मुलांमधे कुठुन उतरणार म्हणा. ? एक गांधी एक गाडगेबाबा एक मनमोहन एक मोदी असे सगळे एक एक होउन जातील परंतु आपल्या सारखे मात्र करोडोंमधे वाढत जाणार. कधी एक गांधींपासुन दुसरा गांधी निर्माण होणार नाही. शिवाजी जन्म घ्यावा मात्र दुसर्यांच्या घरामधे अश्या हलकट मानसिकतेचे आपण लोक कुठुन आपल्यामधुन गांधी, गाडगेबाबा, मोदी जन्माला येणार आहे ? काम करणार्‍यांचे देखील पाय ओढले जातात, मोठा गाडगेबाबाचा अवतारच आहेस का ? अशी शेलकी बोलणी आपणच देत असतो. आणि आपणच स्वप्न बघतो मुंबईचे शांघाई करायचे ? व्वा व्वा. म्हणजे कचरा आपण करायचा आणि सरकार ने तो उचलायलाच हवा. का तर कचरा करणे गलिच्छ राहणे हा आपला जन्मसिध्द हक्कच आहे. मात्र स्वच्छ करायचे कर्तव्य हे सरकारचेच आहे. हो तर. आपण निवडुन दिले आहे त्यांना . बरोबर ना? निवडुन दिले हेच करायला. मग ते सरकार भाजपाचे असो काँग्रेसचे असो या अन्य कुणाचे. त्यांचेच कर्तव्य आपण नागरीकांचे काही नाही नागरीकांना मुलभुत हक्क असतात मुलभुत कर्तव्य कुठे असतात ? काय म्हणतात असतात ? नागरिकशास्त्रात शिकवले आहे? मग हक्काचेच बरे लक्षात राहते कर्तव्यांचा विसर कसा पडतो ? टॅक्स भरला म्हणजे एकुन एक कर्तव्य पार पाडले असेच ना?

वरील चित्रातली लोक कोणत्याही पक्षाची असो. ते असे करु शकतात. करतात देखील. पण हे आपल्यात असणार्या मानसिकतेमुळे होत आहे. आपणच करत नाही तर त्यांना कोण बोलणार. मोदी रस्त्यांवरचा कचरा झाडत होते तेव्हा पक्षराजकारण सोडुन केजरीवाल समर्थन देउन पंतप्रधान निवासाचे गटर साफ करत होते. पण आपण मात्र "बघा मतांसाठी केजरीवाल असे करत आहे" या अर्थाचे पोस्टर फेसबुक ट्विटर व्हॉट्सप वर फिरवण्यात धन्यता मानत होतो. त्या दोघांनी देशासाठी राजकारण विसरुन अभियान मधे योगदान दिले. आणि आपण त्यातुन योग्य अर्थ न घेता निर्लज्जपणे टिपिकल मानसिकतेचे प्रदर्शन केले.

अजुन ही वेळ गेली नाही. रस्ता झाडायची लाज वाटते तर किमान रस्त्यावर कचरा टाकण्याची देखील लाज वाटु द्या. कचरापेटीतच कचरा टाका. नेम धरुन लांबुन पिशवी फेकु नका. तुम्हाला मेडल मिळणार नाही. जरा जवळ गेलात तर बिघडत नाही. थुंकायची हौस असेल तर गळ्यात थुंकीपात्र घेउन फिरत जा. मग कळेल स्वच्छतेचे महत्व.
स्वतःत सुधारणा करा. पुढची पिढी स्वताहुन शिकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय हा भंपकपणा!

बाकी लेख एकदम परखड लिहिला आहे.

रस्ता झाडायची लाज वाटते तर किमान रस्त्यावर कचरा टाकण्याची देखील लाज वाटु द्या. कचरापेटीतच कचरा टाका. नेम धरुन लांबुन पिशवी फेकु नका. तुम्हाला मेडल मिळणार नाही. जरा जवळ गेलात तर बिघडत नाही. थुंकायची हौस असेल तर गळ्यात थुंकीपात्र घेउन फिरत जा. मग कळेल स्वच्छतेचे महत्व.
स्वतःत सुधारणा करा. पुढची पिढी स्वताहुन शिकेल. >>>> + १.

ह्म्म. राजकिय पक्षांचे असे बरेच दिखावे चालू असतात. जून/जुलैमध्ये रेल्वे भाववाढी विरोधात ठाणे स्टेशनवर असंच लुटुपुटूचं रेलरोको पाहिलं होतं एका राजकिय पक्षाचं. अगदी प्लॅटफॉर्म्स, रेल्वे ब्रीज माणसांनी तुडुंब भरलेले असताना आणि सगळेजण ते नाटक पाहात असतानाही त्यांनी तो शो पार पाडला. पोझ देऊन क्लिकक्लिकाट झाल्यावर नेपथ्य आवरलं गेलं, कलाकार विंगेत म्हणजे प्लॅटफॉर्मवर परतले, मेक-अप पुसला गेला. जनतेला हसावं की रडावं कळत नव्हतं. ते पाहात असतानाच एका माबोकरणीला न राहवून फोन करुन काय चाललंय ते सांगितलं होतं.

असो, चालायचंच.

समहाऊ, ठाणे सिव्हिलचा रजिस्ट्रेशन हॉल चकचकीत स्वच्छ असतो हल्ली. पुर्वी २-३ दिवसांत केर काढला नसल्याचं जाणवायचं.

बाकी लेख पटला Happy

छान लेख आहे.

पण एखाद्या उपक्रमाची जाहीरात करायला असे व्हिडीओ तयार केले जात असतातच. त्यात काही गैर नाही.

एक शंका:
>>>"लाईट कॅमेरा अ‍ॅक्शन" भाजपाचे स्वच्छता मोहिमेचे अभिनेते महानायक सतिश उपाध्यय, शाजिया एल्मी आणि इतर सदस्य हातात झाडु घेउन गांधींजींचे स्वप्न साकार करायला आले.

शाजिया इल्मी भाजप मधे कधी गेल्या? Proud
त्या आपच्या सदस्य होत्या ना.

पण एखाद्या उपक्रमाची जाहीरात करायला असे व्हिडीओ तयार केले जात असतातच. त्यात काही गैर नाही.
>>>

खरंय, आजकाल जाहीरातीच चालतात.

उपक्रमाची जाहिरात तेवढीच करायची असते. खरंखुरं काम कुठे करायचं असतं? आणि हे सगळं गांधींच्या नावाखाली? Uhoh

ही आणखी एक बातमी : http://www.thehindu.com/news/cities/Delhi/workers-litter-for-minister-to...

त्यात निर्लज्जपणा काय? प्रसिद्धीसाठी जाहिरात करायचीच नाही का? टिव्हीवर नाही का हेमा मालिनी वॉशिंग मशीनची जाहीरात करताना दिसते. तसेच हे ही आहे. उपक्रम असला की त्याची जाहीरात हवीच.
(तिच्या घरी इतके नोकर असतील की आयुष्यात वॉशिंग मशीनचे तोंडदेखील बघितले असेल का तिने? तरी करतातच ना जाहीरातीत काम? बनवतातच ना जाहिराती)

पण एखाद्या उपक्रमाची जाहीरात करायला असे व्हिडीओ तयार केले जात असतातच. त्यात काही गैर नाही.

खरंच धन्य आहे याचे समर्थन करणाऱ्यांची....
व्हिडीयो तयार करायचाच होता तर मग खरोखरचा रस्ता साफ करायचा ना...आधी स्वच्छ रस्त्यावर कचरा ओतून तो पुन्हा साफ करायाचा द्रविडी प्राणायम कशासाठी...

यामुळे जे सेलिब्रिटी खरोखर मनापासून यात भाग घेत असतील त्यांच्या व्हिडीयोबद्दलही साशंकता निर्माण होत आहे...

बाकी ऋग्वेद यांच्या लिखाणाला जोरदार अनुमोदन...मस्त लिहीले आहे.

बाकी या लेखातले फोटो बघितले तर उलट्या क्रमाने लावलेले आहेत अशी शंका घ्यायला वाव आहे. याचा व्हिडीओ असेल तर शेअर करावा.

हां या गोष्टीवर मात्र फोकस स्वतःवर हवा की मी नाही टाकणार/करणार रस्त्यावर कचरा.

जाहिरात करण्यात खरेच गैर काही नाही.
पण हि स्वच्छता अभियानची कमी आणि स्वतःची जाहीरात जास्त वाटतेय. Wink

तसेच खोट्या कचर्‍या ऐवजी खरा कचरा साफ केला असता तर तेवढाच एक रस्ता स्वच्छ झाला असता,

असो,
पण आता हे ढोंग पकडले गेल्यावर या जाहिरातीचा उल्टा परीणाम नाही का होणार? निगेटीव्ह इम्पॅक्ट ! म्हणजे लोक आता विचार करणार की स्वच्छता अभियानाच्या बाता मारणारेसुद्धा असेच ढोंग करताहेत तर आपल्याला काय पडलीय स्वच्छता स्वच्छता ..

आशुचँप +१.
जाहिरातीसाठी व्हिडियोच करायचा असेल तर एखादी मुळात अस्वच्छ असलेली जागा मिळणे अगदी अशक्य होते की काय?

असं काही नाही. उलट लोकं असंही म्हणू शकतील की यांनी खोटी सफाई केली पण आपण खरी करु Happy

मुळात अशा अभियानाची सुरवात झाली हे महत्वाचं. आणि केली ती आपल्या आदरणीय वंदनीय पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदीजींनी.

आणि सगळ्यात महत्वाचे. शेवटी आपला सहभाग हा महत्वाचा. बाकीचे जाहीरात करोत, ढोंग करोत, नाही तर खरे खोटे आणखी काही करोत. आपण कचरा नको करुया.

बाकी या लेखातले फोटो बघितले तर उलट्या क्रमाने लावलेले आहेत अशी शंका घ्यायला वाव आहे

होय नक्कीच, पहिल्या तीन फोटोत तर स्पष्ट जाणवतयं...
तो एक बुटका माणूस वळून जाताना घेतलाय....त्याचा क्रम बरोबर उलटा झालाय...
आता असा उलटा वळून कोणी येऊन उभा राहत असेल तर त्याला दंडवत

चित्र उलट्या क्रमात लावली असेल तरी यांनी हातात झाडुच घेतलेला आहे.
बाकी आजतकच्या वेबसाईटवरची लिंक दिलेली आहे. तिथे जाउन व्हिडीओ बद्दल विचारावे.
राहिले मोदीने सुरुवात केल्याचे ते दिसुन येते किती गंभीरपणे त्यांच्याच पक्षाने घेतलेले आहे.

देशातल्या जनतेचा देशभक्ती आणि राष्ट्रीय कर्तव्याचा quotient अचानक वाढलेला दिसतोय.

गेल्या आठवड्यात एक व्हॉट्सॅप फॉरवर्ड आला होता. आदरणीय मोदींनी सांगितलंय की सग्गळ्या भारतीयांनी एक दिवस जरी मॅक्डोनल्ड्स, डॉमिनोज, कोक सारख्या विदेशी उत्पादनांऐवजी भारतीय उत्पादने वापरली तरी रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढेल. बाकी मोदींचा टारगेट ऑडियन्स हा कायम मॅक, डॉम आणि कोक कन्झुम करणारा दिसतो.

आणखी एक. कृपया गैरसमज करुन घेऊ नका. वरच्या लेखातले फोटो प्रताधिकारमुक्त नाहीत. ते आजतकच्या संकेतस्थळावरुन घेतलेले आहेत. या कारणास्तव मायबोली कायदेशीर अडचणीत अडकू नये याची काळजी घ्यावी.

सार्वजनिक आहेत फोटो आणि हो आक्षेप असेल तर अ‍ॅडमिन स्वतहुन काढतील त्याची काळजी नसावी. त्यासाठी माझ्या परवाणगीची ही गरज नाही / नसेल.

बाकी फोटो बघुन आपली तडफड होत आहे दिसुन येत आहे Happy

स्वच्छता मोहीम ही खरंच चांगली आणि अत्यावश्यक आहे. पण राजकिय पक्षांचे असे दिखावे म्हणजे अगदी चीड आणणारी गोष्ट आहे. आणि सगळे एकत्र उभे राहून कुठल्या दिशेपासून कुठे झाडणार म्हणे हे ?

सार्वजनिक आहेत फोटो>> तसं तिथे काही लिहीलेलं सापडलं नाही.

माझी कसली तडफड. लोकांनी ढोंग करुदेत नाहीतर आणखी काही. तुम्ही "आपण काय करु शकतो" याबद्दल धागा काढण्याऐवजी आणि त्या धाग्याद्वारे स्वच्छतेच्या कल्पनांबद्दल चर्चा घडवून आणण्याऐवजी ऐवजी तुम्ही इतकी जुनी/शिळी बातमी (!!!!) आज टाकलीत. खोडसाळपणा करायला हा धागा काढला आहे हे उघड आहे. तुम्हाला सांगायचे काम केले. फोटो उडवणे किंवा तसेच राहू देणे तुमची मर्जी.

आजतककडे चौकशी करुन बघतो त्यांचे फोटो कुठेही वापरायला परवानगी आहे का.

बाकी चालुद्या "ऋ" वरुन धागे काढणे Happy

बाकी आजतक कडे जात असल तर त्यांना व्हिडीओ बद्दल देखील विचारा. आणि तुमची उलट्या चित्रांची शंका देखील विचारायला विसरु नका. Wink

बहुतेक खाली लिहिलेला लेख वाचलेला दिसत नाही तुम्ही. आणि हो भाजपाचा ढोंगीपणा उघडकिस आणण्यासाठीच धागा काढला आणि लोकांना सांगितले या ढोंगी माणसांवर विश्वास ठेवु नका स्वतःचा भारत स्वतःच स्वच्छ करा Biggrin

बापरे ! काय हां भंपकपणा . ऋग्वेद , वस्तुस्थिति निदर्शनास आणल्याबद्दल आभार . लेख पूर्णपणे पटला .

रस्ता झाडायची लाज वाटते तर किमान रस्त्यावर कचरा टाकण्याची देखील
लाज वाटु द्या. कचरापेटीतचकचरा टाका. नेम धरुन लांबुन पिशवी फेकु नका.तुम्हाला मेडल मिळणार नाही. जरा जवळ गेलात तर बिघडत नाही. थुंकायची हौस असेल तर
गळ्यात थुंकीपात्र घेउन फिरत जा. मग कळेल स्वच्छतेचे महत्व. स्वतःत सुधारणा करा.पुढची पिढी स्वताहुन शिकेल. >>>> + १.

अच्छा म्हणजे स्वच्छता अभियान ही संकल्पना निर्माण करून मोदी शब्दाला जागले नाहीत असे म्हणायचे आहे तर! ते आणि त्यांचे अनुयायी स्वस्त प्रसिद्धीसाठी मुद्दाम कचरा निर्माण करून तो साफ करतात असा आरोप पुराव्यांनिशी करण्यात आला आहे तर! म्हणजे मोदी सरकारचे काहीच चांगले नाही तर! त्यांनी अनेक नागरिकांना कचरा ह्या समस्येबाबत किंचित अधिक जागरूक बनवले हेही दिसत नाही आहे तर! आजवर हा विषयही कोणा राजकीय नेत्याला सुचला नव्हता किंवा सुचला असल्यास इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याची दखल घेतली गेलेली नव्हती ह्याकडे डोळेझाक करायची आहे तर! टीव्हीवर वारंवार दिसणार्‍या स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिरातींनी त्या संकल्पनेचा गावोगावी, अशिक्षित, असंस्कृत वर्गात मोठा प्रसार होणे ही एक किमान चांगली बाब आहे हेसुद्धा मान्य करायचा मोठेपणा उरलेला नाही आहे तर! फोटो पाहून काही आय डीं ची तडफड होत आहे ह्याचा आनंदाने उल्लेख करताना आपल्या आवडत्या पक्षाचे नेते कचर्‍यावर मूग गिळून बसले होते हे आठवून आतल्याआत होत असलेली जळजळ विस्मरणात गेली आहे तर! वानखेडेवर आजवर झालेल्या क्रिकेटच्या सामन्यांनंतर सगळे स्टेडियम अगदी चकाचक धुतल्यासारखे असायचे तर! वानखेडेवर शपथविधी सोहळा झाला तेव्हासुद्धा मोदींनी प्रत्येक खुर्ची तपासून कोणी कचरा तर केलेला नाही ना हे पाहिले नाही ही मोदींची घोडचूक झाली तर!

व्वा!

Pages