"स्वच्छ भारत अभियानात घुसलेला थिल्लरपणा आणि जाहीरातबाजी"

Submitted by ऋग्वेद on 6 November, 2014 - 05:42

आजतक वृत्तवाहिनीच्या वेबसाईट्वर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने चालु केलेल्या स्वच्छता मोहिमेचा इतर लोकांनी काय अर्थ घेतला असेल ते माहीत नाही परंतु त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांनी मात्र नावाचा पुरता बट्ट्याबोळ करुन टाकला आहे.

http://aajtak.intoday.in/gallery/swachh-bharat-abhiyan-weep-india-weep-1...

वरील लिंक वरुन सभार

एनडीएमएसच्या बाहेर हा तमाशाचा अंक रंगला होता.
satish_up_shekhar_ya-1_110614021633.jpgसाफसुथर्या रस्त्यावर कचरा घेउन एक कर्मचारी आला.

satish_up_shekhar_ya-2_110614021634.jpgत्याने तो रस्त्यावर टाकला.

satish_up_shekhar_ya-3_110614021634.jpgखाली रस्त्यावर टाकुन पसरवण्यास सुरुवात केली

फोटोमधे कचरा खरा वाटावा म्हणुन झाडु ने व्यवस्थित इकडे तिकडे केला.

फोटो मधे कचरा व्यवस्थित पसरलेला दिसेल याची खात्री करुन घेतली.

स्वच्छता अभियानासाठी भारत सरकार ६२हजार करोड खर्च करणार आहे काही "कोरे करकरीत झाडु" मागवले गेले.

"लाईट कॅमेरा अ‍ॅक्शन" भाजपाचे स्वच्छता मोहिमेचे अभिनेते महानायक सतिश उपाध्यय, शाजिया एल्मी आणि इतर सदस्य हातात झाडु घेउन गांधींजींचे स्वप्न साकार करायला आले.

------------

तर भक्तगणो. स्वच्छता करण्याच्या तमाशाचा हा एक अंक संपला. अतिशय मेहनतीने वरील सदस्यांनी अभियानात प्रचंड काम केले घाम गाळला. स्वच्छ असलेला रस्ता मनासारखा लखलखता स्वच्छ केलेला नसल्याने तिथल्या कर्मचार्याला शब्द ऐकवुन परत झाडलेला कचरा होत तसाच टाकुन दे आणि बघ कशी साफसफाई करायची असा आदेश दिला मग सदस्यांनी साफ असलेला रस्ता परत झाडुन आरशासारखा लख्लखीत केला. अशीच स्वच्छता जर चालु असेल तर आपला भारत स्वच्छ झालाच समजा.

कृपया भारत स्वच्छ ठेवा वरील प्रमाणे नाही परंतु भारत हा आपला आहे त्याला आपणच स्वच्छ ठेवायचा आहे. कचरा उचलणारे स्वच्छताकर्मी आहे आणि आपण कचरेवाले आहोत. देश स्वच्छ ठेवा ही साद पंतप्रधानांना आपल्याच निर्लज्जपणामुळे द्यावी लागली. याचा अभिमान नाही तर मनात लाज बाळगा. उठसुट पंतप्रधान लोकांना सुधारण्यासाठी साद द्यावी लागते हीच खर तर शरमेची बाब आहे. नालायक आपण इतके वय झाले आहे तरी रस्त्यावर पचापचा थुंकत असतो. रस्त्यावर उभे राहुन बघितल्यावर १००० पैकी ९९० लोक ५०० मीटर मधे १० वेळा थुंकतात. खाल्ल्यावर तिथेच कागद प्लॅस्टीक टाकत असतात. खिशात मोबाईल फोन तरी माणुस रेल्वेच्या रुळावर बसलेला असतो. आपली मुले हेच शिकणार आणि मोठी होउन हेच करत राहणार अरे बापाला नाही लाज तर मुलांमधे कुठुन उतरणार म्हणा. ? एक गांधी एक गाडगेबाबा एक मनमोहन एक मोदी असे सगळे एक एक होउन जातील परंतु आपल्या सारखे मात्र करोडोंमधे वाढत जाणार. कधी एक गांधींपासुन दुसरा गांधी निर्माण होणार नाही. शिवाजी जन्म घ्यावा मात्र दुसर्यांच्या घरामधे अश्या हलकट मानसिकतेचे आपण लोक कुठुन आपल्यामधुन गांधी, गाडगेबाबा, मोदी जन्माला येणार आहे ? काम करणार्‍यांचे देखील पाय ओढले जातात, मोठा गाडगेबाबाचा अवतारच आहेस का ? अशी शेलकी बोलणी आपणच देत असतो. आणि आपणच स्वप्न बघतो मुंबईचे शांघाई करायचे ? व्वा व्वा. म्हणजे कचरा आपण करायचा आणि सरकार ने तो उचलायलाच हवा. का तर कचरा करणे गलिच्छ राहणे हा आपला जन्मसिध्द हक्कच आहे. मात्र स्वच्छ करायचे कर्तव्य हे सरकारचेच आहे. हो तर. आपण निवडुन दिले आहे त्यांना . बरोबर ना? निवडुन दिले हेच करायला. मग ते सरकार भाजपाचे असो काँग्रेसचे असो या अन्य कुणाचे. त्यांचेच कर्तव्य आपण नागरीकांचे काही नाही नागरीकांना मुलभुत हक्क असतात मुलभुत कर्तव्य कुठे असतात ? काय म्हणतात असतात ? नागरिकशास्त्रात शिकवले आहे? मग हक्काचेच बरे लक्षात राहते कर्तव्यांचा विसर कसा पडतो ? टॅक्स भरला म्हणजे एकुन एक कर्तव्य पार पाडले असेच ना?

वरील चित्रातली लोक कोणत्याही पक्षाची असो. ते असे करु शकतात. करतात देखील. पण हे आपल्यात असणार्या मानसिकतेमुळे होत आहे. आपणच करत नाही तर त्यांना कोण बोलणार. मोदी रस्त्यांवरचा कचरा झाडत होते तेव्हा पक्षराजकारण सोडुन केजरीवाल समर्थन देउन पंतप्रधान निवासाचे गटर साफ करत होते. पण आपण मात्र "बघा मतांसाठी केजरीवाल असे करत आहे" या अर्थाचे पोस्टर फेसबुक ट्विटर व्हॉट्सप वर फिरवण्यात धन्यता मानत होतो. त्या दोघांनी देशासाठी राजकारण विसरुन अभियान मधे योगदान दिले. आणि आपण त्यातुन योग्य अर्थ न घेता निर्लज्जपणे टिपिकल मानसिकतेचे प्रदर्शन केले.

अजुन ही वेळ गेली नाही. रस्ता झाडायची लाज वाटते तर किमान रस्त्यावर कचरा टाकण्याची देखील लाज वाटु द्या. कचरापेटीतच कचरा टाका. नेम धरुन लांबुन पिशवी फेकु नका. तुम्हाला मेडल मिळणार नाही. जरा जवळ गेलात तर बिघडत नाही. थुंकायची हौस असेल तर गळ्यात थुंकीपात्र घेउन फिरत जा. मग कळेल स्वच्छतेचे महत्व.
स्वतःत सुधारणा करा. पुढची पिढी स्वताहुन शिकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>हे फोटो प्रतिकात्मक असतात. अभियान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी.
यात अगदीच चूक आहे असे वाटत नाही.
वृक्षारोपण मंत्र्यांच्या हस्ते म्हणजे काही तो मंत्री रोजच वृक्षारोपण करत फिरेल असे नसते.

हो का ?

पण त्यासाठी वृक्ष उखडत नाही. इथे आधी कचरा टाकतात मग झाडण्याचे नाटक करतात.
जाहीरात एकदाच करायची सारखी सारखी नाही. म्हणे प्रतिकात्मक Lol

छे छे, वृक्ष उखडतात हो, म्हणजे काही ठिकाणी रोपे असतील तर ती एके ठिकाणाहून काढून कार्यक्रमाच्या जागी आणून लावतात आणि कार्यक्रम झाला की पुन्हा मुळ जागी नेऊन ठेवतात असेही ऐकले आहे.
आणि हो समजा टाकला कचरा आणि दाखवला करून साफ तरी ठीक आहे.
कारण यातुन लोकांनी कचरा असेल तर तो साफ करावा हा बोध घेणे महत्वाचे.
सैन्यात जेव्हा प्रशिक्षण देतात की एक सैनिक जखमी झाला आहे त्याला उचलून घेऊन जा,
तर त्यासाठी काही खरोखर एखाद्याला जखमी करत नाहीत काही. एकजण सोंग घेतो जखमी असल्याचे.

तुमचा मुळ मुद्दा चुकीचा नाहीये, असे खोटे खोटे दाखविण्यापेक्षा खरा कचरा साफ केला असता तर बरे.
पण तो प्रकार "नाईस टू हॅव" आहे, "मस्ट" नाहीये, जर खरा कचरा असलेली जागा अ‍ॅडजस्ट करता आली नसेल काही वेळा तर आयोजकांनी ही युक्ती केली असणार. आता हा सारा विचार करूनही जर कोणाला नावेच ठेवायची असतील तर ठेवा. Sad

परंतु प्रधानसेवकांना एकदा करुन दाखवल्यावर सारखे करुन दाखवण्यात अट्टाहस का ? एकदा योग्य संदेश गेलेला आहे. मग सारखे शोऑफ करुन दाखवण्यात काय हशील?? उगाच कचरा पसरवुन फोटो काढण्यापेक्षा साफ केलेल्या जागी परत कचरा जमा होउ नये यासाठी प्रयत्न करावे.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/clean-india-mi...

मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका मराठी डॉक्टरने तयार केलेल्या बायोटॉयलेटच्या मॉडेलची केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने देशपातळीवर ‌निवड केली आहे. केवळ ६० हजार रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या टॉयलेटमधील मैल्याचे रूपांतर स्वच्छ पाण्यात होते. 'स्वच्छ भारत योजने'अंतर्गत या मॉडेलची निवड झाली असून बिहार, राजस्थान व गोवा सरकारने या टॉयलेटची मागणीही नोंदवली आहे.

आमच्या ऑफिसमध्ये हे अभियान चालू असतं. पिरिऑडिकली रिपोर्ट्स जातात. आतापर्यंत कंपाउंडच्या आत काम चालू असे. आजच ऐकलं की आता दर शुक्रवारी एका एका डिपार्टमेंटला गेट पासून मेन रोड पर्यंतचा रस्ता झाडायची ड्युटी लागणार आहे २ तासाची. त्यातील दिड तास ऑफिस अवर्स नंतरचा असणार आहे. बघू काय आणि कसं होतंय ते.

BMC मधल्या मैत्रिणीकडून कळलं होतं की त्यांना हे अभियान सुरु झाल्यापासूनच दर शुक्रवारी थांबून स्वच्छतेचं काम करावं लागतं.

BMC मधल्या मैत्रिणीकडून कळलं होतं की त्यांना हे अभियान सुरु झाल्यापासूनच दर शुक्रवारी थांबून स्वच्छतेचं काम करावं लागतं. >> हे म्हणजे जरा अतीच झालंय. "स्वच्छ करा" अभियानाऐवजी खरंतर "स्वच्छ ठेवा" अभियानाची, त्यासाठी लागणारी मानसिकता तयार करायची आणि इन्फ्रास्ट्रक्चर द्यायची गरज आहे. शिवाय स्वच्छता कर्मचारी त्यांचे काम नीट करतात की नाही तेही बघितलं पाहिजे. ज्यांना ज्या कामासाठी घेतलं आहे त्यांनी ती कामं सोडून काही वेळ बाकिच्यांची कामंही जबरदस्तीनं करायची यात प्रॉडक्टव्हिटी लॉस किती आहे.

Manish, swachchata theva he bharatiyanna shikavane khup kathin ahe. Palthya ghadyavar paaNi ahe. Unfortunately Sad safaai kamgaranni roj pahaate raste zadale, clean-up valyanni roj kachara uchalala tari amhala vattel tithe kachara TaakaNach jamata na! Aaj HR/Training/MS deptt chya duty ne suruvaat zali.

Tari auto vale pavhkan thunktaat tevha mi badbadlyashivaay rahaat nahi.

मनीष, काल सर्क्युलर हातात पडलं तेव्हा कळलं की आमच्या ऑफिसतर्फे बाहेर रस्त्यांवर करायचे हे स्वच्छता अभियान वीकली बेसिसवर आहे आणि कर्मचार्‍यांना जबरदस्तीचे नाही. व्हॉलंटरीली हे अभियान राबवले जाईल. वर्षातून १०० तास द्यायचे आहेत. व्हॉलंटिअर्सची नावे नोंदवून घेतली जात आहेत आणि त्याप्रमाणे शेड्युल आखले जात आहे. त्यामुळे ज्यांना प्रकृतीच्या कारणाने भरपूर धुळीत, कचर्‍यात जाऊन झाडलोट करता येणार नाही त्यानी नाही केलं तरी चालेल. तसेच ज्यांना रस्त्यावर झाडू मारायची लाज वाटत असेल तेही जाणार नाहीत. ज्याचा त्याचा प्रश्न.

नाव नोंदवणार आहे. ज्या दिवशी ड्युटी लागेल त्या दिवशी बुद्रुक ड्रेस घालून येणार. ग्लव्ह्ज, मास्क आणि झाडू ऑफिस देइल.

ऑफिसअंतर्गत स्वच्छता तर नेहमीच चालू असते. ऑफिसचे सफाई कर्मचारी नीट काम करतच आले आहेत.

नाव नोंदवणार आहे. ज्या दिवशी ड्युटी लागेल त्या दिवशी बुद्रुक ड्रेस घालून येणार. ग्लव्ह्ज, मास्क आणि झाडू ऑफिस देइल. >>
अभिनंदन आणि शुभेच्छा अशु!

कर्मचार्‍यांना जबरदस्तीचे नाही. व्हॉलंटरीली हे अभियान राबवले जाईल >> नशीब..

पण वर्षातून १०० तास म्हणजे जरा जास्तच आहे. दर आठवड्याला २ तास झाले. एवढे करून लोकांमधे स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण झाली तर उपयोग आहे म्हणायचे. Happy

Pages