सचिन फॅन क्लब

Submitted by फारएण्ड on 27 November, 2013 - 01:49

सचिन च्या मॅचेस, व्हिडीओ क्लिप्स, स्कोअरकार्ड्स चे संदर्भ देऊन त्याबद्दल फॅन-टॉक करण्यासाठी हा धागा उघडला आहे. बे एरियात आज ही चर्चा सुरू असताना इतरांनाही ती दिसावी व लिहीता यावे यासाठी. तुम्हीही लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिन तेंडुलकर च्या आत्मचरित्रातही फारसं वादग्रस्त नसणार सचिनचा स्वभावच नाही तो.कालच्या प्रकाशनाच्या सोहळ्यातही नेहमीसारखाच निरागस लहान मुलासारखा दिसत होता. सारापण मस्त दिसत होती . पुस्तक वाचल्यावरच समजेल नक्की काय लिहिलय ते. हा बघा फोटो कालच्या समारंभात काढलेला. Happy

sachin-book-launch.jpg

चॅपेलचा भाग प्रकाशित करण्यामागे मार्केटींग गिमिक असावे. परदेशी व्यक्तीवर टिका करणे तसे सेफ आहे. BCCI किंवा इतर वादास्पद गोष्टींवर सचिन रोखठोक भाष्य करेल असे वाटत नाही. अर्थात सचिन फॅन साठी हे पुस्तक पर्वणी आहे म्हणा.

<< चॅपेलचा भाग प्रकाशित करण्यामागे मार्केटींग गिमिक असावे.>> हल्ली ही सर्वसाधारण 'गिमिक' झाली असली तरीही चॅपेल बंधूंच्या बाबतींत मात्र सचिनने स्वतःच्या व सर्वच भारतीय खेळाडूंच्या खदखदत्या भावनेला तोंड फोडण्यासाठीच हा उल्लेख मुद्दाम केला असावा असं वाटतं; शिवाय, सचिनच्या आत्मचरित्राचं मार्केटींग करण्यासाठी कोणत्याही असल्या 'गिमिक'ची आवश्यकता नसावी, असंही वाटतं.

सचिनच्या आत्मचरित्राचं मार्केटींग करण्यासाठी कोणत्याही असल्या 'गिमिक'ची आवश्यकता नसावी, असंही वाटतं. >> +१. सिर्फ नामही काफी है Happy

कॅस्पोरिविक्झ वर एव्हढा वैतागलेला का असायचा ह्याचे पण कुतूहल आहे.

सचिनच्या आत्मचरित्राचं मार्केटींग करण्यासाठी कोणत्याही असल्या 'गिमिक'ची आवश्यकता नसावी >>> या भावना झाल्या, पण पुस्तकाचा खप अपेक्षित आहे त्यापेक्षा वाढवायला या गोष्टींची चर्चा घडवणे हे आलेच. तसेच वर मून यांनी म्हटल्याप्रमाणे परदेशी व्यक्तीला टारगेट करणे सेफ, त्याचबरोबर एक देशभावना सुद्धा सहज जागृत होते.

मॅचफिक्सिंग म्हणाल तर खूप मोठी धेंडे त्यात गुंतली आहेत, गुन्हेगारी जगताचा सुद्धा संबंध आहेच, त्यामुळे त्यासंदर्भात काही अलौकिक वाचायला मिळेल हि अपेक्षाच फोल. किंबहुना मला तेव्हाही वाटायचे की सचिनसारख्याची त्या वातावरणात फार घुसमट होत असणार, जे बिचार्‍याला याविरुद्ध काही करताही येत नसणार, मॅचफिक्सिंग प्रकरणात काही जणांची हकालपट्टी झाली, ती किड बरेपैकी आटोक्यात आली आणि आपला दादा कर्णधार झाला, अन्यथा (सचिनची बँटींग वगळता) माझाही क्रिकेट बघण्यातील ईंटरेस्ट तेव्हाच खल्लास झाला असता.

>>किंबहुना मला तेव्हाही वाटायचे की सचिनसारख्याची त्या वातावरणात फार घुसमट होत असणार, जे बिचार्‍याला याविरुद्ध काही करताही येत नसणार, <<

या विषयावर कपिल देवची रोचक (थँक्स टु आनगापै) टिप्पणी वाचल्याचं आठवतंय - सचिन, गांगुली शुड हॅव अ‍ॅक्टेड लाइक मेन इन ड्रेसिंग रुम्स... Happy

सचिन कितीही महान असला तरी त्याची लोकप्रियता शेवटच्या काही वर्षात ओहोटीला लागली होती याची कल्पना तो रिटायर कधी होणार या विषयावरच्या असंख्य लेख/चर्चा वरुन करता येईल. मराठी म्हणून आपल्या मनात अधिक सॉफ्ट कॉर्नर असू शकतो पण इतर भारतीयांची भावना तीच नसेल असा अंदाज काही चर्चांमधून आणि इतर ठिकाणी वाचलेल्या लेख/चर्चा इ. वरुन करावासा वाटतो. शिवाय हे पुस्तक इन्ग्लिश मध्येच उपलब्ध असेल तर वाचक वर्ग देखील थोडा लिमिटेडच होतो.

एकदा पुस्तक प्रकाशित करायचे ठरवल्यावर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल या करता त्याबद्दल कुतूहल निर्माण करण्यात गैर काय आहे? जे पुस्तकातच नाही त्याचे मार्केटिंग केले तर समजू शकतो Happy

परदेशी व्यक्तीवर टीका सेफ वगैरे खरेही असेल, पण त्याच्या करियरशी जास्त संबंधित असल्याने त्याबद्दल लिहीले असेल. नाहीतर सचिन सहसा कोणालाही जाहीररीत्या दुखावत नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेट एस्टॅब्लिशमेण्टशीही त्याचे घनिष्ट संबंध आहेत (डॉन ब्रॅडमन हॉल ऑफ फेम वगैरे), तेथील प्रेक्षकांतही तो लोकप्रिय आहे. असे असताना उगाचच तो असे काही करणार नाही.

फिक्सिंग बद्दल बोलायला हवे होते हे खरे आहे. पण तो स्वतः पुरावे देऊ शकत नसेल तर त्याने कोणाचे नाव घेणे बेजबाबदारपणाचे होईल. कारण उद्या सचिनने एखाद्याचे नाव घेतले तर तो दोषीच आहे असे सगळेच गृहीत धरतील. त्यात त्या प्रकरणात कारवाई होउन किमान खेळाडूंना शिक्षा झालेली आहे.

बाकी सचिनची लोकप्रियता "शेवटच्या काही वर्षात" ओहोटीला लागली होती वगैरे बद्दल काय म्हणायचे? २००७-२०११ हा त्याच्या कारकीर्दीतील माझ्या मते सर्वात यशस्वी काळ होता. २०११ चा वर्ल्ड कप विजय हे सचिनच्याही लोकप्रियतेचे शिखर होते. आणि त्यानंतरही तो काही महिने चांगलाच खेळत होता. फक्त शेवटचे ४-५ महिने त्याच्यातील "ड्राइव्ह" संपल्यासारखे दिसायचे.

आणि मराठी सॉफ्ट कॉर्नर वगैरेशी सहमत नाही. त्याचे फॅन्स आणि टीकाकार दोन्ही सगळीकडे सारखेच आहेत. उलट मराठीपणाचा कधीच संबंध नव्हता सचिनच्या बाबतीत.

>> मराठीपणाचा कधीच संबंध नव्हता सचिनच्या बाबतीत

मी सहमत नाही .. कुठेतरी आहेच ना संबंध त्याच्याबद्दल एक काकणभर जास्त अभिमान वाटण्यात .. प्रेम, आदर ज्या काय सर्व भावभावना आहेत त्याच्यासाठी त्या सगळ्या तो मराठी असण्यामुळे थोड्या जास्त बोल्ड होतात असं नाही का वाटत? (लता मंगेशकर बद्दलही ना?)

सशल आपल्याकरता त्या होतही असतील. मला म्हणायचे आहे की त्याची लोकप्रियता भारतभर सारखीच आहे (आणि जेव्हा लोकांनी टीका केली तीही सगळीकडे सारखीच होती). त्यानेही कटाक्षाने स्वतःची इमेज 'मराठी' म्हणून फारशी केलेली नाही. त्याच्या मराठीतून मुलाखती क्वचितच आहेत. शिवसेना की मनसे कोणाचातरी रागही ओढवून घेतला होता त्याने मध्यंतरी.

>> मला म्हणायचे आहे की त्याची लोकप्रियता भारतभर सारखीच आहे (आणि जेव्हा लोकांनी टीका केली तीही सगळीकडे सारखीच होती)

ओके Happy .. मला आधी नीट कळलं नाही ..

<< या भावना झाल्या, पण पुस्तकाचा खप अपेक्षित आहे त्यापेक्षा वाढवायला या गोष्टींची चर्चा घडवणे हे आलेच.>> एखादा खेळाडू मला खूप आवडतो याचा अर्थ त्याच्या कोणत्याही बाबतीत वस्तुनिष्ठ दृष्टीकोन घेणे मला अशक्यच आहे, असाच होतो का ? इतकीं वर्षं एखाद्या खेळाडूची वर्तणूक व मानसिकता पाहिल्यावर 'तो असं करणं शक्य आहे का? ', याचा तर्कशुद्ध अंदाज घेता येतोच ना ? तो १००% बरोबर असेलच असं नसलं, तरीही अशा अंदाजाला भावनेचा रंग फांसायलाच हवा का ? मॅथ्यू हेडनने किंवा इतर कुणी आपल्या पुस्तकात ' गिमिक' म्हणून अचरटासारखं कांहीं लिहीलं म्हणून सचिनने लिहीलेलं कांहीं हेंही 'गिमिक'च समजणं, म्हणजेच निखळ बुद्धीनिष्ठ दृष्टिकोन होतो का ? कुणाला हें 'गिमिक' वाटणं यांत कांहीच गैर नाहीं पण कुणाला तसं नाहीं वाटलं तर तें भावनिकच असतं, हें मात्र अजिबात स्विकारार्ह नाहीं.

तो समारंभ छान झाला. मी पण घेणार आहे ते पुस्तक. मला तो एक माणूस. बाबा, पति. एक डिसिजन मेकर म्हणून खूप आवडतो आणी कर्तुत्व वादातीत आहे माझ्यामते.

<शिवाय हे पुस्तक इन्ग्लिश मध्येच उपलब्ध असेल तर वाचक वर्ग देखील थोडा लिमिटेडच होतो.>

प्रि-ऑर्डर्सचे रेकॉर्ड मोडलेत. अनुवाद येतीलच की.

शिवसेना की मनसे कोणाचातरी रागही ओढवून घेतला होता त्याने मध्यंतरी.
>>>
शिवसेना
जेव्हा त्याने म्हटलेले मुंबई सर्वांची आहे. शिवसेनेचा तेव्हा परप्रांतीय मुद्दा जोरात होता. तेव्हा खुद्द बाळासाहेबांनी सुनावले होते की बाबा तू क्रिकेटच खेळ या वादात पडू नकोस. अर्थात माझ्यामते दोघे तेव्हा आपल्या जागी योग्य होते.
असो, सचिनची लोकप्रियता तर जगभरात काय पाकिस्तानातही होतीच. याचे कारण तो नुसता सर्वश्रेष्ठ फलंदाज होता एवढेच नसून एक सच्चा खेळाडू होता आणि याउपर एक माणूस म्हणूनही कोणालाही आवडेल असाच होता. तो मराठी होता म्हणून आवडण्यापेक्षा तो मराठी असल्याचा आपल्याला अभिमान वाटायचा असे म्हणने उचित राहील

एखादा खेळाडू मला खूप आवडतो याचा अर्थ त्याच्या कोणत्याही बाबतीत वस्तुनिष्ठ दृष्टीकोन घेणे मला अशक्यच आहे, असाच होतो का ? इतकीं वर्षं एखाद्या खेळाडूची वर्तणूक व मानसिकता पाहिल्यावर 'तो असं करणं शक्य आहे का? ', याचा तर्कशुद्ध अंदाज घेता येतोच ना ? तो १००% बरोबर असेलच असं नसलं, तरीही अशा अंदाजाला भावनेचा रंग फांसायलाच हवा का ? मॅथ्यू हेडनने किंवा इतर कुणी आपल्या पुस्तकात ' गिमिक' म्हणून अचरटासारखं कांहीं लिहीलं म्हणून सचिनने लिहीलेलं कांहीं हेंही 'गिमिक'च समजणं, म्हणजेच निखळ बुद्धीनिष्ठ दृष्टिकोन होतो का ? कुणाला हें 'गिमिक' वाटणं यांत कांहीच गैर नाहीं पण कुणाला तसं नाहीं वाटलं तर तें भावनिकच असतं, हें मात्र अजिबात स्विकारार्ह नाहीं.

>>
+१

सगळे बुद्धीनिष्ठ तेवढे बुद्धीनिष्ठ नसतात भाऊ Happy हा फरक नाही कळणार.

माझे पुस्तक आज थोड्यावेळात येतेय. प्लिपकार्टने तर कोण, किती वाजताच्या आत आणून देणार, त्याचे नाव, मोबाईल नंबर वगैरे पण दिला आहे.

मॅथ्यू हेडनने किंवा इतर कुणी आपल्या पुस्तकात ' गिमिक' म्हणून अचरटासारखं कांहीं लिहीलं म्हणून सचिनने लिहीलेलं कांहीं हेंही 'गिमिक'च समजणं,
>>>>>
भाऊ, अर्थ काढण्यात गल्लत होतेय.
स्टंट करण्यासाठी म्हणून एखादे वादग्रस्त प्रकरण सचिनने मुद्दाम आपल्या पुस्तकात घुसवलेय असे नसून जर पुस्तकात एखादे वादग्रस्त (ईंटरेस्टींग म्हणा हवे तर) प्रकरण असेल तर त्याचा मार्केटींगसाठी वापर केला जाणारच.

फ्लिपकार्टने कळविले पुस्तक आज (दि.७ नोव्हेम्बर) घरी पोच होईल....वाट पाहतोय.

गंमत म्हणजे मूळ किंमत ६१७/- अशी कळविली होती....आज सूचना आली आहे ५९९/- रुपये कुरिअरवाल्याकडे देणे. किंमत कमी का झाली ? इतरांनाही याच रकमेत पुस्तक आले आहे का ?

हो ऋग्वेद....पाहिली मी अ‍मॅझोन जाहिरात....५८४/- असा आकडा दिसतोय. पण मी पूर्वीपासून फ्लिपकार्टवर खरेदी करत असल्याने; त्यांचेच सचिन पुस्तकाबाबत मेल आल्यावर लागलीच बुक केले होते. डिलिव्हरी सर्व्हिस अगत्यशीर असते...पॅकिंगही तसेच, त्यामुळे फ्लिपकार्टची अगदी सवय झाली आहे.

अशोक., फ्लिपकार्ट डिलीव्हरी देणारे दुकानदार तुमच्या पिनकोडनुसार बदलतात. वस्तुच्या किंमतीत त्या त्या डिलरप्रमाणे बदल होतो.

फ्लिपकार्टवर वाट बघणे नको म्हणून पहिल्याच दिवशी क्रॉसवर्डला गेलो. पण तिथे किंमत ८९९ पाहून मोह आवरला. आता वाट पाहतो आहे फ्लिपकार्टकडून यायची.

अ‍ॅमेझॉन ची डिलिव्हरी अप टु डेट असते. पेपरबॅक आवृत्ती आली नाही अजुन बाजारात. बहुतेक ती अजुन स्वस्त असेल

हो मंजू.....तोही विचार करायला हवाच....आमचे कोल्हापूर शहर त्यांच्या यादीवर आहे का ? याची ते पिन कोड मागवून चौकशी करतात, हे मी नोंदविले आहे....शहरानुसार योग्य तो दर लावत असतील....सीओडीची सोय सरसकट आहे त्यांच्याकडून म्हणून तिथून घेतो मी प्राधान्याने. आपली बुकगंगा सीओडी फक्त मुंबई आणि पुणे याच शहरात देते अशी सेवा...फ्लिपकार्टला तशी काही अडचण नाही. व्यवस्थित येतात सारी पुस्तके. मला तर एच.पी. चा प्रिंटरही त्यानी सीओडीने अतिशय सुरेख पॅकिंग करून पाठविला होता.

>>एखादा खेळाडू मला खूप आवडतो याचा अर्थ त्याच्या कोणत्याही बाबतीत वस्तुनिष्ठ दृष्टीकोन घेणे मला अशक्यच आहे, असाच होतो का ? इतकीं वर्षं एखाद्या खेळाडूची वर्तणूक व मानसिकता पाहिल्यावर 'तो असं करणं शक्य आहे का? ', याचा तर्कशुद्ध अंदाज घेता येतोच ना ? तो १००% बरोबर असेलच असं नसलं, तरीही अशा अंदाजाला भावनेचा रंग फांसायलाच हवा का ? <<

मूळ प्रॉब्लेम हा आहे कि, सचिनला तो नाहि नाहि म्हणत असताना देखील त्याच्या भक्तांनी देवपण बहाल केलं आहे. वेळोवेळी (करात सुट, राखीव भुभाग इ.) त्याचेहि पाय मातीचेच आहेत हे त्याने दाख्वुन दिलेलं आहे. पण भक्तांच्या डोक्यात प्रकाश पडायला हवा ना???

माझ्यामते, सचिनचं क्रिकेटवरील वर्चस्व वादातीत आहे, दुर्दैवाने मैदानाबाहेर त्याला चांगला मेंटॉर मिळाला नाहि (मार्क मस्कॅरेन्हस नंतर). मैदानात सुनील गावस्करचा आदर्श त्याने ठेवला, मैदानाबाहेरहि ठेवला तर उत्तम... Happy

, दुर्दैवाने मैदानाबाहेर त्याला चांगला मेंटॉर मिळाला नाहि (मार्क मस्कॅरेन्हस नंतर).

होते की त्याचे गुरु मैदानाबाहेर. सत्यसाईबाबा (तेच ते हवेतून rolex घडयाळं काढणारे) Happy
ते गेल्यावर तो रडला होता खूप असं टीव्हीवर बघितलं होतं.

Pages