सचिन फॅन क्लब

Submitted by फारएण्ड on 27 November, 2013 - 01:49

सचिन च्या मॅचेस, व्हिडीओ क्लिप्स, स्कोअरकार्ड्स चे संदर्भ देऊन त्याबद्दल फॅन-टॉक करण्यासाठी हा धागा उघडला आहे. बे एरियात आज ही चर्चा सुरू असताना इतरांनाही ती दिसावी व लिहीता यावे यासाठी. तुम्हीही लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीयु, त्या लोक व झेंड्याची थोडी हिस्टरी आहे. सुरूवातीला तो लोगो वरती व झेंडा खाली असे त्याच्या हेल्मेट वर होते. मग माझ्या आठवणीत 'सकाळ' मधे तो फोटो आला व त्यावरची कॉमेण्ट आली होती. त्यानंतर ते बदलले त्याने. बाकी ठाम माहिती मिळाली की येथे देतो. काही वर्षांपूर्वीच्या मॅचेस च्या हायलाईट्स, फोटोज मधे ते दिसेल सहज.

सचिन म्हणे संघाला गरज असताना खेळत नाही. परदेशात खेळत नाही. आता यावर प्राचीन काळातील उत्खनन करून काढलेली ९२ किंवा ९३ सालची एखादी इनिंग घेण्यापेक्षा हीच घेउ - त्याचे ५१ वे शतक कसोटीतले, त्याच्या कसोटी करीयर मधले शेवटचे.
http://www.youtube.com/watch?v=p9IZLLLGqg0

द. आफ्रिकेतील सिरीज मधली तिसरी कसोटी. पहिल्या दोन कसोटीत १-२ बरोबरी झाल्यावर तिसर्‍यात आफ्रिकेने पहिल्या डावात ३६२ केल्या, व भारत उत्तर देताना २८-२! स्टेन व मॉर्केलची तिखट बोलिंग, टाईट फिल्डिंग आणि आफ्रिकन कण्डिशन्स. आणखी किती "संघाला गरज" पाहिजे?- येथे आदर्श कसोटी खेळी कशी प्लॅन करून खेळायची याचे प्रात्यक्षिक मिळेल सचिनचा डाव पाहिलात तर. या क्लिप मधे सगळे दिसत नाही, म्हणून त्याबद्दल सचिनच्याच एका मुलाखतीचा संदर्भही दिला आहे.
http://www.espncricinfo.com/awards2011/content/story/554492.html

काही ओव्हर्स चिवटपणे खेळून काढल्यावर एकेक करून सगळे फटके दिसू लागले. २-३ सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह्ज, एखाद दुसरा कव्हर्स मधून. अंगावर आलेला बाउन्सर थोडा डावीकडे आल्यावर एक बोलरचा कचरा करणारा पुल, तर नंतरचा थोडा उजवीकडे आल्यावर आयत्या वेळेला मनगट वळवून स्लिप्स च्या डोक्यावरून ऑफ साईड ला. ४ स्लिप्स लावा, नाहीतर बोलर्स सोडून सगळे उभे राहा तेथे. बॉल वरून जाताना ते फक्त हताशपणे बघतानाच दिसणार :). वरती उल्लेख केलेल्यापैंकी एक पॅडल स्विप आहे, एक कन्व्हेन्शनल स्वीपदेखील आहे.

आणि हे जगातल्या सर्वात भारी फास्ट बोलिंग विरूद्ध त्यांच्याच घरी.

पण आपल्याला काय कळते? विंडीज, बांग्लादेश विरूद्ध सिरीज आयोजित केल्या कारण सचिनला आफ्रिकेविरूद्ध खेळता येत नसावे बहुधा Proud

Happy माझे नशीब बलवत्तर होते म्हणून मला हा डाव प्रत्यक्ष पाहायला मिळाला. खरे तर ह्या मॅचेस रात्रीच्या वेळी सुरू होत्या इथे, पण झोप येत नव्हती आणि आदल्या दिवशीच्या डावात सचिनला अर्धशतकाच्या जवळ जाताना पाहिले होते म्हणून मॅच लावून बसलो आणि खेळ सुरू झाल्यानंतर झोप सगळी उडून गेली. लंचला पण थांबून राहिलो आणि स्टेनचा लंचनंतरचा स्पेल पाहिला. It was highly rewarding too!

This was a battle for the ages! पहिल्या ओव्हरमध्ये सुरवातीला सचिन चकला पण ५ व्या बॉलवर टप्प्याशी जाऊन अप्रतिम कव्हर ड्राईव्ह खेळून प्रत्युत्तर दिले. बॉल्स jag away होत होते, पण सचिनला ऑफस्टंप कुठे आहे ह्याची खूप जाणीव होती. त्यामुळे त्याची बॅट इनसाईड लाईन असायची. सचिन आणि राहुल हे दोघेच मला इतक्या प्रकर्षाने अशी जाणीव असलेले माहीत आहेत. सुरवातीला तो काही वेळा चकला सुद्धा, पण त्याचा चिवटपणा बघण्यासारखा होता. स्टेन सचिनला उकसवत देखील होता पण सचिन ढळायचे नाव घेईना. Away movement counter करून त्याचे एक-दोन डिफेन्सिव्ह शॉट्स देखील बघण्यासारखे आहेत. वर फारएण्डनी म्हटल्याप्रमाणे मग एकेक करून सगळे फटके दिसू लागले. पहिल्या तासाभरातील पहिली सिंगल घेतली गेली. मंत्रमुग्ध करणारी झुंज होती ही. तो पुल शॉट पण फार आवडला. विशेषतः कारण सचिन पुल आजकाल फार खेळत नसे.

वरच्या मॅचविनिंगच्या मुद्द्यात अजून भर घालायची म्हणजे स्टेनच्या सकाळच्या आणी लंचनंतरच्या स्पेलमधल्या मिळून ६० चेंडूंपैकी ४८ चेंडू सचिनने खेळून काढले. (हेतूपूर्वक नाही तरीदेखील हे महत्वाचे आहे.) उरलेल्या १२ मध्ये त्याने पुजारा आणि धोनीला उडवला आणि हरभजनला जवळजवळ काढला पण बेल पडली नाही. तसेच सचिन आणि गंभीरमधील १७६ धावांची भागीदारी ही तिसर्‍या विकेटसाठी आफ्रिकेमधील सर्वोच्च भागीदारी झाली.

terrific inning होती ती सचिनची. मी फक्त highlights बघितले होते. आता परत बघीतली.

मला एका नविनच विषयावर लिहायचं आहे ते म्हणजे बकीच्या टीम्स नी सचिन विरुद्ध शोधुन वापरलेल्या काही विशेष रणनिती आणि सचिन चे प्रत्युत्तर. 90s मधे सचिन हाच आपल्या फलंदाजीचा अधारस्तंभ होता हे वादातीत आहेच. त्यामूळे Australia,SA यांच्या त्याला बाद करण्यासाठी रणनिती असयचीच.
अगदी off the field सुध्दा. आणि on the field तर असायचीच असायची.
मला exact VDOs नाही मिळालेत पण आठ्वणींच्य आधारे लिहीतो आहे. त्यामूळे चूभूदेघे.

१. 97/98 च्या series मधे शेन वॉर्न भाउंनी सचिन च्या लेग स्टंप वर मारा करायचा आणि तिथुन बॉल off कडे वळवायचा अशी कहीशी strategy ठेवली होती. मार्क टेलर ने fielding पण त्यानूसारच लावली होती.
या strategy वर सचिन ने खूप विचारपूर्वक त्याचा stance लेग स्टंप च्या कींचित बाहेर असा ठेवला आणि चेन्नई ला विथ द स्पिन वॉर्न ला कसा धुतला याचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच कंठगत आहे.
लिंक्स पण वर आहेतच.

२. सचिन vs SA 96/97. याबाबतीत मात्र थोडसं शल्य मनात आहेच की सचिन ला म्हणावं तसं प्रत्युत्तर देता आलं नाही. Fanie De Villiers विरुध्द विशेषतः Titan cup मधे.
SA ची ही रणनिती आपल्याला आठवत असेल ती अशी... पहील्या पंधरा overs मधे जेव्हा मर्यादा असतात तेव्हा short midwicket (ही पोझिशन खास सचिन साठी आणि सचिन मूळे अस्तित्वात आली असं वाटतं)
ला एक fielder ठेवायचा. Fanie De Villiers ने सचिनला tight spell ने बांधुन ठेवायचं. मारा विशेष करुन middle stump वर आणि good length. Fanie De Villiers /donald यांचे spells पण खुपच tight असायचेत. कडक fielding मूळे सिंगल्स पण सहजि नाही मिळायचे. आणि मग Fanie De Villiers च्या middle stump वर पड्लेल्या एका नाजूक हळुवार स्लोवर डेलिवरी वर मिड विकेट कडे flick करयच्या नादात साहेब तो शॉट miss time करायचे आणि short midwicket वर कॅच देउन मोकळे व्हायचे.
असं दोन्-तीन दा झालेलं नक्की आठ्वतय. Sad Sad
सचिन ने ज्या दोन bowlers ला मनसोक्त झोड्पून काढावं असं खूप म्हणजे खूपच वाटायचं ते म्हणजे Fanie De Villiers आणि Allen Donald. Fanie De Villiers ला मनसोक्त तुडव तुडव तुडवलाय असं झालच नाही.Donald ला पण सचिन ने मानहानिकारक तुडवावं असं खूप वाटायचं पण somehow ते जमलं नाही.कदाचित माझं काही चुकलं असेल तर प्लीज correct करा.

३. ही रणनिती विशेषतः SA नी 97 च्या tour वर वापरली होती. back foot point वर जोन्टी र्होड्स.. १ स्लिप,off side च्या इतर पोझीशन वर असेच तोलामोलाचे fieldrs आणि Donald. Fanie De Villiers,pollock यांचा off stump वर अचूक मारा. इतकी tight offside field असूनही राज्यांनी
मारलेले काही backfoot drives आणि cover drives, काढलेल्या गॅप्स निव्वळ अविशसनिय आणि outof the world Happy
पण यातून एखादा मधूनच थोडा short of length आणि किंचित wide of the off stump बॉल.
सचिन या वर on the rise cut करायचा आणि back foot point वर जोन्टी तितक्याच चपळाईने हवेत सुर मारुन तो पकडयचा. यात सचिन एक दोन दा व्यवस्थित अडकलेला आहे. पण बरयाच वेळेला तो तुफान ताकतिने आणि तितक्याच अप्रतिम timing ने मारलेला बॉल जोन्टी ला पन गावला नाय... Happy Happy Happy

४. बांग्लादेश च्या independence cup च्या दरम्यान सक्लेन मुश्ताक चि खूपच हवा होती. काय तर सॅकी नी
स्लोवर ओफ स्पिन वर सचिन ला एक दोन दा स्वस्तात पकडलं होतं.
पण साहेबांनी पाकिस्तान वि. च्या फायनल मॅच मधे (३१४ वाली मॅच.) साहेबांनी सक्लेन च्या पहील्याच ओव्हर मधे त्याच्या बॉलींग ची पीसं काढ्लीत. त्यानंतर सक्लेन मुश्ताक चा माहोलच कमी झाला.
http://www.espncricinfo.com/ci/engine/current/match/66136.html
सचिन चे quick fire 41 in 26.
youtube वर लिंक आहे. नंतर डकवतो.

>>आणि हे जगातल्या सर्वात भारी फास्ट बोलिंग विरूद्ध त्यांच्याच घरी.

पण आपल्याला काय कळते? विंडीज, बांग्लादेश विरूद्ध सिरीज आयोजित केल्या कारण सचिनला आफ्रिकेविरूद्ध खेळता येत नसावे बहुधा फिदीफिदी

याला म्हणतात हातोडा शॉट! Happy लगे रहो दोस्त... हा बाफ आपल्या सारख्या सर्व सचिन पंख्यांसाठी मक्काच आहे. (बरे झाले हा वेगळा बाफ काढला.) ज्यांना 'ताप' झालाय ते फिरकणार नाहीत अशी आशा करुयात.. Happy

योग, उदयन Happy

श्रीयू - १ व ३ आठवले. २ लक्षात नाही. डिविलियर्स ला मारलेला मला फक्त एकदाच आठवतो, मोहिंदर अमरनाथ बेनेफिट मॅच (ऑफिशियल वन डे होती) मुंबईत झाली होती डिसेंबर ९६ मधे तेव्हा. बाकी लिहीतो जसा वेळ मिळेल तसा.

फारएण्डः
टायटन कप de-villiers चं series stats: भारता वि. बहुतेक सगळ्या मॅचेस मधे economy बघ फक्त २.२ च्या आसपास आहे. या series मधे सचिन ने de-villiers ला म्हणावा तसा तुडवला नव्हता असं आठ्वतय.
http://www.espncricinfo.com/ci/engine/series/60991.html
मोहिंदर अमरनाथ बेनेफिट मॅच मधे सचिन ची सेंचुरी होती. Happy

त्या सिरीजमध्ये कॅप्टन होता म्हणून जरा सावध खेळत असेल कदाचित ... ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि फायनल मध्ये मात्र महत्वाची खेळी करून कप जिंकण्यात महत्वाचा हातभार लावला होता. Happy {'मॅचविनिंग नाही' म्हणण्याला अजून एक फटका Proud } मलाही फार माहीत नाही / आठवत नाही ह्या स्ट्रॅटेजीविषयी. (२ किंवा ३) फारएण्डने लिहिलेले वाचू. Happy

http://www.youtube.com/watch?v=1lVQVsU4pwU

Wisden ह्या मॅचमध्ये त्याच्या कप्तानीची सुद्धा प्रशंसा करते. - http://www.espncricinfo.com/wisdenalmanack/content/story/151353.html

मस्त बाफ फारेंडा.. सचिनच्या क्रिकेटींग स्किल्स बद्दल मी काय बोलावं! त्याचा बॅलन्स, शॉट सिलेक्शन, बॅटची ग्रिप, माईंड गेम हाताळायची हातोटी सगळं बघताना भान हरखून जातं.

विषय निघालाच आहे तर -

सचिन टीम प्लेयर म्हणून काय ते मागे एक्दा १९९९-२००० मध्ये पाहिलेलं आठवतय, [अवांतर : वानखेडे वर ९८ च्या एवरेज ने खेळलाय तो (मुंबई किती भाग्यवान!) ] ४८५ चं ओझं खांद्यावर घेऊन सच्च्या खेळला, जबरदस्त एकाग्रता, फोकस! मुंबईने ४९० करुन पहिल्या डावात घेतलेली आघाडी निर्णायक ठरली त्यात सचिनच्या तब्बल २३३ ते ही नाबाद! नवव्या गड्यापर्यंत सगळ्यांना बरोबर घेऊन हा बाजीप्रभू लढला एक एक धाव घेत आणि तेव्हा तो १० वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुरला होता. ती मॅच जिंकल्यावर अक्षरशः नाचला तो मैदानावर सगळ्यांबरोबर.. डोळ्यासमोर आहेत हे सगळे क्षण..
ह्या अविस्मरणीय मॅचचे डिटेल्स http://cricketarchive.com/Archive/Scorecards/69/69565.html

आता रणजी मॅचला कुणी किती महत्त्व द्यायचे हा वेगळा प्रश्न पण सचिन मुंबई साठी जीव ओतून खेळायचा कधीही आणि कितीही दमला असला तरीही, पैशासाठी तर नक्कीच नाही! त्याच्या दुसर्‍या कुठल्याही खेळीपेक्षा (शारजाच्याही) वैयक्तिकरीत्या मला त्याची ही खेळी मोठी वाटते. स्वतः बघितली असल्यामुळे असेल पण इतकी कमिटमेंट आणि इतक्या खोलवर इन्व्हॉल्व्हमेंट मी तरी अजून कुणाची पाहिली नाही ते ही स्थानिक मॅचेससाठी.

मस्त माहिती उपास. वाचतो.

श्रीयू, हो ही ती अमरनाथ बेनिफिट मॅच. ती अधिकृत वन डे असणार होती हे ही आधीपासूनच ठरलेले होते बहुतेक.
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64533.html

डीविलियर्स ५ ओव्हर्स मधे २४ रन दिल्यावर बोलिंग पुढे केलेली नाही असे स्कोअरकार्डवरून दिसते. मला मॅच पाहताना आठवते त्याप्रमाणे हाणला होता डिविलियर्सला या मॅच मधे.

पण एकूण डोनाल्ड व डीविलियर्सला जोरदार कधी मारलेला नाही हे खरे असावे (पण कधी फार बकराही झाला नाही. किंबहुना सचिन कोणत्याच बोलरचा बकरा नव्हता). डोनाल्ड ला फारसे न मारणे - एकच अपवाद असू शकतो - ती १९९६-९७ च्या दौर्‍यातील अझर बरोबर केलेली मोठी भागीदारी, ज्यात दोघांनीही शतके ठोकली होती आणि ५८/५ वरून २००+ ची भागीदारी. सचिन चे शतक बघायला मी ऑफिसमधून लौकर घरी निघालो. घरी पोहोचेपर्यंत अझरचेही झाले होते Happy
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/63737.html

केप टाउन ची ती इनिंग पण एक मास्टर पीस होती. या इनिंग मधे डोनाल्ड आणि क्लुसनर ला मारलेले on drives निव्वळ अप्रतिम होते. त्याचा अजुन एक शॉट आठ्वतोय तो म्हणजे mcmillan ला मारलेला pull shot. हा शॉट मारताना साहेबांनी पुर्ण गिरकी मारली होती. त्या वेळेस highlights मधे नेहेमी दाखवायचे तो शॉट.
http://www.youtube.com/watch?v=sJ40mTqVtcg

आचार्यांनि म्हंटल्या प्रमाणे कॅप्टन होता म्हणून जरा सावध खेळत असेल कदाचित हे ही खरंच.

>>
http://www.youtube.com/watch?v=sJ40mTqVtcg

still remember that series very well.... या वरच्या सामन्यात तर ऑन ड्राईव्ह, स्क्वेयर ड्राईव्ह ची अक्षरशः प्रात्यक्षिके दिली होती साहेबांनी. साहेबांना बाद करणारा 'तो' झेलही अक्षरशः चमत्कारच होता, अन्यथा..
साहेबांच्या समोर नॉन स्ट्रा. ला निव्वळ ऊभे राहणे हे देखिल एक प्रशीक्षणच असावे ईतर फलंदाजांसाठी.

साहेबांची पहीली टेस्ट सेंचूरी. . अतीशय कठीण परिस्थितीत under pressure खेळून match वाचवलिये.
टीमचे कमी रन्स आणि दोन विकेट्स पडलेल्या अशा कठीण परिस्थितीत साहेबांना नेहेमीच खेळावं लागलय.

http://www.youtube.com/watch?v=bRTKJZy8Bbw

रवी शास्त्री मागे एकदा New Zealand टूर च्या वेळेस म्हणाला होता:

"No matter what conditions are, against who India are playing, Sachin Tendulkar will always play at 22/2 "

अरे काय हे? शतक वीराचा धागा आणि जेमतेम ५० गाठत नाहीये अजुन?
कुठे गेले सगळे लोक्स?? अजून येउ द्या लिंक्स..

श्रीयू - अजून बरेच लिहायचे आहे. मध्यंतरी मी जेथे राहात होतो त्या हॉटेल चे नेट जेमतेमच होते. म्हणून जमले नाही. लौकरच मी तरी अजून टाकेन. तुम्ही/इतरांनीही लिहा Happy

Currently-

Sachin Tendulkar
200 Tests
51 Centuries
15921 Runs

Michael Clarke + Alastair Cook
200 Tests
51 Centuries
15919 Runs

सचिनच्या "बॉक्सिंग डे" च्या अनेक आठवणींपैकी ही एक. शेवटच्या काही बहारदार इनिंग्सपैकी एक. मेलबोर्न २०११.
http://www.youtube.com/watch?v=dPd8M6PCgkI

खच्चून भरलेल्या स्टेडियम मधे एखाद्या हीरोप्रमाणे स्वागत. तेव्हा 'टी' ला थोडा वेळच शिल्लक असल्यामुळे केवळ तोवर टिकण्याकरता खेळणारा तेंडुलकर नेहमीप्रमाणे चाचपडतो. आपणही श्वास रोखून बघत राहतो. मग मात्र टी नंतर आल्यावर पहिलाच बॉल त्या नवीन आवडत्या शॉट ने मारून फोर आणि मग एकसो एक विंटेज तेंडुलकर ड्राइव्ह्ज! पाच मजले भरलेल्या स्टेडियम मधे भारतीय व ऑसी प्रेक्षकांनी जे स्वागत केले त्याला योग्य अशी इनिंग होती ही.

हा डाव मी मोठ्या स्क्रीन वर एच डी वर लाइव्ह पाहिला होता. सुंदर ग्राउंड, टेस्ट क्रिकेट सर्वात सुंदर स्वरूपात दिसले या डावात.

बर्‍याच दिवसांनी चेन्नई टेस्टची आठवण झाली. त्यावेळची मॅग्राच्या सचिनला स्लेज करण्याच्या प्रयत्नाची ही एक क्लिप - https://www.youtube.com/watch?v=VGNcOKEispk

<< त्यावेळची मॅग्राच्या सचिनला स्लेज करण्याच्या प्रयत्नाची ही एक क्लिप >> बाउन्सर हूक केल्याने होणार नाही एवढं गोलंदाजाचं खच्चीकरण त्याच्या स्लेजींगला मिळालेल्या अशा निर्विकार प्रत्यूत्तराने होत असावं. इंग्लंडमधे टोनी ग्रेग गावसकरलाही स्लीपमधून सतत कॉमेंट्स करून अशीच त्याची एकाग्रता भंग करायचा प्रयत्न करत असे पण हवं तेंव्हां कान बंद ठेवण्याच्या गावसकरच्या क्षमतेपुढे हतबल होत असे. सचिनच्या बाबतींत फरक इतकाच कीं तो अशा प्रकारांची खोल कुठेतरी नोंद घेवून ठेवत असे व स्वतःच्या सोईनुसार बॅटनेच हिशोब चुकता करत असे !!

हो या दिवसाचा खेळे येथून रात्री जागून पूर्ण पाहिला होता. हे स्लेजिंग आठवते. आणि त्याने मारलेले शतकही :). त्यांचा कोच नंतर म्हंटला होता की पहिल्या दोन टेस्ट मधे सचिनने शतक न मारल्याने यावेळेस तो मारणार हे गृहीत धरूनच त्यांनी प्लॅनिंग केले होते (तरी हरले हे आहेच Happy )

Pages