सचिन फॅन क्लब

Submitted by फारएण्ड on 27 November, 2013 - 01:49

सचिन च्या मॅचेस, व्हिडीओ क्लिप्स, स्कोअरकार्ड्स चे संदर्भ देऊन त्याबद्दल फॅन-टॉक करण्यासाठी हा धागा उघडला आहे. बे एरियात आज ही चर्चा सुरू असताना इतरांनाही ती दिसावी व लिहीता यावे यासाठी. तुम्हीही लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिनच्या बाबतींत फरक
इतकाच कीं तो अशा प्रकारांची खोल
कुठेतरी नोंद घेवून ठेवत असे व
स्वतःच्या सोईनुसार बॅटनेच हिशोब
चुकता करत असे !!>>>>> भाऊकाका यु सेड ईट

भाऊ, गमतीची गोष्ट अशी, की त्या क्लिपमध्ये कॉमेंटरी करणारा बहुधा टोनी ग्रेगच आहे. Happy

फारएण्ड, Happy तो फॉर्मात होताच तेव्हा. त्या इनिंगमध्ये सगळीच टॉप ऑर्डर खेळली होती ऑलमोस्ट. मजा आली होती.

सचिनच्या शांतपणानंतर त्याच्या धावांच्या आणि विजयाच्या भुकेची साक्ष देणारी ही एक क्लिप (डेझर्ट स्टॉर्मच्या क्वालिफायिंगची मॅच) - https://www.youtube.com/watch?v=vsquhZf_YSc

<< गमतीची गोष्ट अशी, की त्या क्लिपमध्ये कॉमेंटरी करणारा बहुधा टोनी ग्रेगच आहे. >> खरंय. म्हणूनच मला त्याच्यासंदर्भातला गावसकरचा किस्सा पटकन आठवला .
सचिनची धांवांची भूक न शमणारी असली तरीही त्याच्याविरुद्ध पंचानीं दिलेला निर्णय कितीही चूकीचा असला तरी त्याने कधींही अकांडतांडव केल्याचं आठवत नाही. त्यामुळे, केवळ धांव घेतली नाही म्हणून इतका वैतागणारा सचिन नव्हताच; म्हणूनच, लक्ष्मणबरोबरची क्लीप सचिनच्या अगदीं अपवादात्मक वागणूकीची असावी; क्लिपमधल्या त्याच्या नंतरच्या हंसण्यातून त्याची याबद्दल दिलगीरी व्यक्त होतेच !

हो, सचिनची ती अपवादात्मक वागणूक आहे हे मलाही मान्य आहे. किंबहुना म्हणूनच तो दुवा दिलेला आहे. त्या शांत चेहर्‍याच्या आड किती खोल जिद्द आहे हे असे कसोटीच्या क्षणी दिसते. Happy खुद्द लक्ष्मणचा असा एक किस्सा आहे २०१० मोहाली कसोटीच्या शेवटच्या दिवशी प्रग्यान ओझावर ओरडतानाचा. तोसुद्धा असाच.

सचिनचे आत्मचरित्र लौकरच येत आहे. अ‍ॅमेझॉन वर प्री-ऑर्डर ही करता येत आहे सध्या.

त्याच्या आगामी पुस्तकातील काही भाग रीडिफ मधे गेले ३-४ दिवस येत आहे. तो ही इंटरेस्टिंग आहे. आजच ग्रेग चॅपेल बद्दल एकदम थेट टीका असलेल्या भागाची माहिती आली आहे. इतके फ्रॅन्क इतर भागही असतील तर मजा येइल वाचायला पुस्तक. सचिन जोपर्यंत खेळत होता तोपर्यंत अत्यंत डिप्लोमॅटिक्/पॉलिटिकली करेक्ट बोलत असे, कोणालाही न दुखावणे वगैरे. आता सडेतोड लिहीले असेल तर मस्त.
http://www.rediff.com/cricket/report/chappell-suggested-i-should-take-ov...

२००७ वर्ल्ड कप मधल्या दयनीय कामगिरीची कारणे सहज सापडतील या मुलाखतीत Happy

फा, मी तुला विचारायलाच माबोवर आलो की प्री-ऑर्डर केलेस की नाही पुस्तक Happy
सडेतोड लिहिले असेल तर हा महत्त्वाचा दस्तावेज असेल.. २० वर्षे खेळलेल्या फार थोड्या खेळाडूंपैकी तो एक आहे. त्याच्या कारकिर्दीत मॅच फिक्सिंग झाले, एक दिवसीय सामन्यांची लोकप्रियता शिखराला पोचली तसेच ट्वेंटी-ट्वेंटीने एक दिवसीय क्रिकेट संपवतदेखील आणले. त्याच्या कारकिर्दीत भारताने तळापासून एक नंबरची टीम असाही प्रवास केला. चार फॉरेन कोच त्याने बघितले.

भारतातून का मागवतो आहेस? इथे मिळतय की. >> देशात स्वस्त मिळत असेल असे वाटतेय.

मी pre order केलं. मागू नका, मिळणार नाही Wink

सचिनचं आत्मचरित्र वाचणं याला पर्यायच नाहीं. भारतीय क्रिकेटमधल्या अनेक गूढ गोष्टीची उकल तर होईलच पण केवळ बॅटनेच बोलणार्‍या सचिनचं खरं मनोगत, मानसिकता जाणणं ही एक अनुभूतीच असावी !
चॅपेल प्रकरणावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. असल्या अनेक क्रिकेटेतर गोष्टींचा प्रचंड मानसिक दबाव असूनही एकाग्रतेने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्रिकेटमधली कामगिरी सतत उंचावणार्‍या सर्वच खेळाडूंचं खरंच कौतुकच करायला हवं.
[ ज्या राहुलने मनापासून चॅपेलना गुरूस्थानीं मानलं, त्या राहुलसारख्या आदर्शवत खेळाडूशीं असलं घाणेरडं कटकारस्थान करणार्‍या चॅपेलची घृणा वाटते ! Sad ]

मला हे पुस्तक नवर्‍यासाठी गिफ्ट म्हणून मागवायचंय. इंडिया अमेझॉनवर फक्त हार्डकव्हर दिसतंय आणि अमेरिकन अमेझॉनवर पेपरबॅक व हार्डकव्हर दोन्ही आहेत. पेपरबॅक फक्त अमेरिकेसाठी वेगळी एडिशन काढली आहे का?

माझ्या pre order ला असे सांगतोय
Delivery estimate: We need a little more time to provide you with a good estimate. We'll notify you via e-mail as soon as we have an estimated delivery date.

>>यू. स. अमेझोन वर उपलब्ध नाहीये आता.. अरेरे<<
गुड गोइंग, ग्लींप्स आॅफ चॅपल काॅंट्रावर्सी पेड आॅफ... Wink

काल पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बर्‍याच न्युज चॅनेल्सवर लाइव्ह होता.विदाउट एनी अ‍ॅड ब्रेक. किमान दोन तास. मी पाहायला सुरुवात केली तेव्हा गावसकर, वेंगसरकर, शास्त्री, वासू परांजपे यांच्या गप्पा चालल्या होत्या. आधीचं काय आणि किती हुकलं माहीत नाही. मग द्रविड, गांगुली, लक्ष्मणसोबत सचिन.
त्यानंतर अजित तेंडुलकर आणि अंजली. या सगळ्यांत सर्वाधिक फटकेबाजी अंजलीने केली.

त्यानंतर पुस्तकाचे प्रकाशन. हे होताच काही चॅनेल्सना घाईचा अ‍ॅडब्रेक लागला. तरीही एका चॅनेलने धीर धरला होता. पुस्तकाची दुसरी प्रत सचिन, गुरुवर्य रमाकांत आचरेकरांना अर्पण करतानाचे चित्र दिसले.

नंतर, मॅच फिक्सिंग (सचिनच्या कर्णधारपदाच्या काळातले आणि आता आयपीएलमधले) बद्दल काही लिहिलेले नसणे हा चर्चेचा विषय होता.

<< काल पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बर्‍याच न्युज चॅनेल्सवर लाइव्ह होता >>
द्रविड, सौरव, लक्ष्मण व सचिन ह्या आपल्याला अपार आनंद दिलेल्या चौकडीला एकाचवेळीं मैदानाबाहेर एकत्र येवून एकमेकांची फिरकी घेताना पहाणं हा एक दुर्मीळ आनंद;
गावसकरचा विक्रम मोडण्याच्या अगदीं बेतात सचिन असतानाच नेमका कॉमेंट्री बॉक्समधे गावसकरच्या हातात मुद्दाम माईक देणं व त्यावेळची गावसकरची व इतरांची मानसिक अवस्था गावसकरच्याच तोंडून ऐकणंही खूप भावलं;
आचरेकरांची थकलेली अवस्था पाहून खूप वाईट वाटलं व त्याचबरोबर त्यांच्या दुसर्‍या लाडक्या शिष्याची व सचिनच्या शाळेपासूनच्या भागीदाराची स्टेजवरची अनुपस्थितीही जाणवली;
व सचिनला इतक्या खेळीमेळीच्या वातावरणात इतका वेळ हंसत,मजेत असलेला पहाणं हा एक दुर्मिळ, निखळ आनंद होताच.

गाळलेला नाही बहुतेक. नावं घेणं टाळलंय. सामन्याचा अचानक बदलणारा कल, स्कोरबोर्डवरचे आकडे सगळं काही सांगतात असं काही लिहिल्याचं ऐकलं.

<< गाळलेला नाही बहुतेक.>> काल कदाचित त्याचा उल्लेख टाळला असावा; मला वाटतं आत्मचरित्र वाचल्यावरच हें कळेल.

Pages