सचिन फॅन क्लब

Submitted by फारएण्ड on 27 November, 2013 - 01:49

सचिन च्या मॅचेस, व्हिडीओ क्लिप्स, स्कोअरकार्ड्स चे संदर्भ देऊन त्याबद्दल फॅन-टॉक करण्यासाठी हा धागा उघडला आहे. बे एरियात आज ही चर्चा सुरू असताना इतरांनाही ती दिसावी व लिहीता यावे यासाठी. तुम्हीही लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< सचिन फॅन क्लब आहे हा, इथे सचिन संदर्भातले काहीच व्यर्थ नाही, सगळे वर्थ आहे. >> हर्पेनजी, तुम्हीं हें उपरोधाने म्हटलं नसलं तर टाळी , नाहीं तर निषेध ! कारण, मीं सचिन फॅनच नाहीं तर फॅनॅटीक आहे ! Wink

आज मेल मधून सॉफ्ट कॉपी आली पुस्तकाची Happy
जर मी ते पुर्ण वाचले तर ते माझ्या आयुष्यातील पहिले आत्मचरीत्र असेल.

तरी निवडक काय मस्तय याच्या वाचलेल्यांकडून टिप्स मिळतील का?

मी वाचतोय...सध्या तरी फार काही खास वाटत नाहीये. नुसतीच घटनांची जंत्री आहे. क्रिकेट कसा खेळायला लागलो, आचरेकर सर कसे कडक होते आणि भारताकडून कसा खेळलो आणि शतक कसे केले...याबद्दल आत्तापर्यंत प्रत्येक क्रिकेट पत्रकाराने लिहीले आहे.
अजूनतरी घटनांमागचा सचिन सापडलेला नाहीये. अपवाद फक्त अंजलीबद्दल
अर्थात तिच्याबद्दल त्यामानाने खूपच कमी लिहून आले आहे म्हणूनही असेल कदाचित...

>>सध्या तरी फार काही खास वाटत नाहीये. <<
ह्म्म... पुस्तक वाचताना "टेल मी समथिंग दॅट आय डोंट नो"; अशी अवस्था व्हायला नको... Happy

आबासाहेब, मी तुम्हाला संपर्क साधला आहे, त्याला रिप्लाय करा.. वा इथे मेल आयडी द्या .. किंवा इतर मार्ग सांगा, Happy

मीं सचिनचं हें पुस्तक अजून वाचलेलं नाही व सध्या माझ्या मनांत असलेल्या खालील शंकेचा मीं 'सचिन फॅन' आहे याच्याशीं कांहींही संबध नाही, हें प्रथमच स्पष्ट करतों.

मेनन यांच्या लेखात व इतरत्रही सचिनने मॅच-फिक्सींग, स्पॉट फिक्सींग इ.वर कांहींच निश्चित भाष्य केलेलं नाहीं, हा पुस्तकाचा अवगुण म्हणून सांगितला जातोय. या फिक्सींगवर मीं विचार करतों तेंव्हां मला जाणवतं कीं या अशुभ प्रकाराचा पाया हाच आहे कीं एखाद्याने झेल सोडला, फुलटॉस टाकला, एखादा फलंदाज आऊट झाला तर त्याने तें मुद्दाम तसं केलं हें सिद्ध करणं अशक्य असतं. म्हणूनच, गुप्तचर यंत्रणानाही आरोप सिद्ध करणं सोडाच पण संशयित कोण हें ठरवण्यासाठीही बुकींच्या मोबाईलमधलं संभाषण, मध्यस्थांबरोबर झालेल्या लंडन, दुबई ठीकाणच्या भेटी इ.इ.माहीतीवरच अवलंबून राहावं लागतं. अशा परिस्थितीत, सचिनच काय पण कोणताही खेळाडू केवळ तो मैदानावर हजर असतो म्हणून या प्रकारांवर लेखी असं निश्चित काय सांगू शकतो, ही खरंच माझी शंका आहे. त्यांतच, कोणताही खेळाडू जर असल्या प्रकारात सहभागी होण्याच्या मानसिकतेचाच नसेल, तर असा सहभाग असणारे त्याला याचा जराही सुगावा आपल्या बोलण्या वागण्यातून लागूं देणं अशक्यच.

यामुळें,एखाद्या खेळाडूवर, बुकीवर संशय असला तरीही तसा लेखी किंवा पुस्तकातून आरोप करणं किंवा तसं सुचवणं कुणाही खेळाडूला खरंच शक्य आहे का ? आणि तसं कुणी केलंच, तर तो अब्रूनुकसानीच्या दाव्याची आफत नाही ओढवून घेणार ? मग मेननसारख्याना सचिनने किंवा इतर खेळाडूनीं या विषयावर नेमकं काय लिहावं असं अपेक्षित आहे, हें मला कळत नाही.

वर भास्कराचार्यानी म्हटलंय, ' टेक्निकल डिटेल्स अजून असते तर अधिक मजा आली असती', हें मीं सहज समजूं शकतों पण मेनन यांचा आक्षेप मात्र नाहीं. माझं कांहीं मूळातच चुकतंय का असं वाटण्यात, हें खरंच इथं समजून घ्यायला आवडेल मला ?

मला वाटत नाही इथे कुणी त्याच्याकडून नावे उघड करण्याची अपेक्षा करत असेल. तेही अजून प्रकरण न्यायालयात असताना. अपेक्षा ही होती की या सगळ्या काळात तो एक वरिष्ठ खेळाडू म्हणून भारतीय संघात होता. माजी कर्णधार होता आणि त्याने हे सगळे जवळून पाहिले, अनुभवले आहे. अशा परिस्थितीत त्याची मनोभूमिका काय होती, त्यावेळी त्याला काही स्टँड घ्यावासा वाटला का, नाही वाटला तर का नाही. यावर उहापोह आवश्यक होता. पण यातले त्याने काहीही केले नाही. मी वाचतोय ते पुस्तक आणि केवळ दोन चार वाक्यांच्यावर त्याने याबद्दल काहीही लिहीलेले नाही.

भाऊ, त्याने कुणाचीही नावे घेणे मलाही अपेक्षित नाही. < अशा परिस्थितीत, सचिनच काय पण कोणताही खेळाडू केवळ तो मैदानावर हजर असतो म्हणून या प्रकारांवर लेखी असं निश्चित काय सांगू शकतो, ही खरंच माझी शंका आहे. > हे अगदी १००% मान्य. क्रिकेट खेळाबद्दल फारशी माहिती नसणार्‍यांना तुमचे म्हणणे कदाचित कधीच कळणार नाही. परंतु जेव्हा जाहीररीत्या आरोप त्याच्या संघातील खेळाडूंवर केले गेले, तेव्हा त्याची प्रतिक्रीया काय होती, हे त्याने सांगायला हरकत नव्हती. It must have affected him. At some level or the other. कदाचित त्याने (तो जसा जवळपास नेहमीच करत आला आहे त्याप्रमाणे) हे सर्व shut out करायचा निर्णय घेतला असेल. परंतु आत्ता निवृत्त झाल्यावर त्याला ह्या निर्णयामागची कारणमीमांसा, त्यामागे असलेला घटनाक्रम हे सांगता आले असते असे मला वाटते. त्याच्या स्वतःच्या मनात काय चालू होते, हे definitive statement पुस्तकात असलेले आवडले असते. परंतु एक-दोन सर्वसाधारण वाक्यांशिवाय त्याने काहीच लिहीलेले नाही. त्याबद्दल थोडी नाराजी आहे. (परंतु सुरेश मेननच्या परीक्षणाशी मी पूर्णतः सहमत नाही हेही मी नमूद करू इच्छितो. In my opinion, he is too uncharitable to the humility and values on display.) वर॑ आशुचँप यांनीदेखील हेच म्हटले आहे असे वाटते.

आशुचँपजी, 'जवळून बघणं' याने काय फरक पडतो, हीच माझी शंका आहे. आपण सर्वच 'क्लोज अपस' 'रिप्ले' बघत असतोच. पण सगळं फिक्सींग शिजलेलं असतं दूर कुठे तरी व गुप्ततेत. आपणही फक्त शंकाच घेवूं शकतो किंवा आरोपही करूं शकतों, पण फक्त तोंडी व खाजगीत. आणि स्टँड घ्यायचा म्हटलं तर नियामक मंडळाला या प्रकारांबाबत गंभीरपणे बघायला व कडक धोरण घ्यायला सांगण्यापलिकडे खरंच खेळाडू काय स्टँड घेवूं शकतात असल्या घाणेरड्या प्रकारात ?
कृपया मीं वादासाठी वाद घालतोय असं समजूं नका. मला बरीच वर्षं सतावणार्‍या शंकेचं निरसन या निमित्ताने होईल अशी मला आशा आहे.

भाऊ मला वाटते वर लोकांना असे म्हणायचेय कि त्याने त्याला काय वाटले किंवा त्याची भूमिका काय होती ह्याबद्दल काहीतरी लिआहयला हवे होते. नावे न घेताही हे ढोबळपणे लिहीता आले असते.

भाऊ आपण पाहणे आणि त्याने एक खेळाडू म्हणून पाहणे यात जमिनआस्मानाचा फरक आहे...
आपण उद्या मरूंदे सगळे खेळाडू चोर आहेत. सगळेच पैसे घेतात आणि हा सगळाच पैशाचा खेळ आहे म्हणून मोकळे होऊ. काही जण क्रिकेट बघणे कमी करतील. त्याला यातले काहीच शक्य नाही. कितीही म्हणले तरी ज्या खेळावर आरोप झाले तो खेळ त्याच्या आयुष्याचा एक अविभाज्य अंंग आहे. कितीही अलिप्त राहतो म्हणला तरी मला खात्री आहे त्याला हे सगळे माहीती असणार. आणि त्याला पटवण्यासाठी बुकींनी त्याला संपर्क साधला नसेलच, गडगंज रक्कम ऑफर झालेली नसणारच असे आपण खात्रीनी सांगू नाही शकत. त्याने ते फेटाळली असेलच असे एक सचिनभक्त म्हणून वाटतेच पण म्हणून हे सगळे केवळ वरवरचे पाहणे होत नाही ना. त्यालाच काय मला वाटते की जवळपास सगळ्याच खेळाडूंना बरेच काही माहीती होते. पण उघड बोलणे कुणालाच शक्य नाही. कारण जो बोलेल त्याचे करियर उध्वस्त होणार याची खात्री.

मॅचफिक्सींगबद्द्ल आणि त्यात गुंतलेल्या बुकींबद्दल स्वतः निष्कलंक असला तरीही सचिनला माहीती असण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु हॅन्सी क्रोनीएच्या उदाहरणानंतर कोणीही जाहीररित्या कोणाचं नाव घेईल असं वाटत नाही. क्रोनीएचा मृत्यू विमान अपघात म्हणून दडपला गेला असला तरी तो अपघात घडवला असल्याची शक्यता आजही व्यक्तं केली जाते. खेळाडू असले तरी आपल्या जीवाची भिती प्रत्येकाला असतेच.

स्पार्टाकस,

अगदी चोख उदाहरण दिलंत हॅन्सी क्रोनियेचं तुम्ही. त्याच्या मृत्यूनंतर ५ वर्षं सगळे गप्प होते. मात्र २००७ ला ऐन वर्ल्डकपाच्या मध्यातच जमेकात बॉब वूल्मरचा मृत्यू झाला. तो अतिशय संशयास्पद मानला जातो. समझनेवालोंको इशारा काफी होता है.

आ.न.,
-गा.पै.

मॅचफिक्सींगबद्द्ल आणि त्यात गुंतलेल्या बुकींबद्दल स्वतः निष्कलंक असला तरीही सचिनला माहीती असण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु हॅन्सी क्रोनीएच्या उदाहरणानंतर कोणीही जाहीररित्या कोणाचं नाव घेईल असं वाटत नाही. क्रोनीएचा मृत्यू विमान अपघात म्हणून दडपला गेला असला तरी तो अपघात घडवला असल्याची शक्यता आजही व्यक्तं केली जाते. खेळाडू असले तरी आपल्या जीवाची भिती प्रत्येकाला असतेच.>> तेच म्हणायचे होते. माहिती नाही असे शक्यच नाही. पण व्यक्त केलेली नाही.

<< तरीही सचिनला माहीती असण्याची शक्यता नाकारता येत नाही,>> स्पार्टाकसजी,याऐवजीं, ' सचिनचा अंदाज आपल्यापेक्षां अधिक भक्कम असण्याची शक्यता जास्त ' असं म्हणणं योग्य नाहीं होणार ? क्रिडा समीक्षक, क्रिडा पत्रकार यांचा क्रिडाक्षेत्रातला संपर्क, माहितीचे स्त्रोत खेळाडूंपेक्षां अधिक असूनही त्यानीही याबाबत स्पष्ट लिहीण्याचं टाळलं, हेंही लक्षांत घेणं महत्वाचं. यामागें,वर उल्लेखिलेला ' भिती' हा घटक असूं शकतो तसाच ज्याचा पुरावा आपल्याकडे नाही त्याबाबत निश्चित लिहीणं अनुचित हा विचारही असूं शकतो.

<< In my opinion, he is too uncharitable to the humility and values on display.>> आणखीही एका ठीकाणीं मेनन यानी सचिनवर अन्याय केला आहे असं मला जाणवलं. ते म्हणतात,"..... Tendulkar, Dravid, Kumble, Ganguly, Prasad, Srinath, Laxman - men of integrity, who ensured that Indian cricket would survive its biggest threat? We will have to wait till one of the others writes an insider's autobiography ". मला तरी यांत तिरकसपणे सचिनमधे नाही तो प्रामाणिकपणा व हिम्मत या 'इतरांत' आहे, असं सुचवल्यासारखं वाटतं.[तसं नसेल, तर मात्र तो 'सचिन फॅन' म्हणून माझा दोष असावा !] पण द्रविड, सौरव व कुंबळे हे निवृत्त झाल्यानंतरच्या त्यांच्या प्रदीर्घ मुलाखती मीं ऐकल्या/ पाहिल्या आहेत; त्यानीही 'फिक्सींग'वर निश्चित असं कांहीं बोलणं टाळलंच होतं व आत्मचरित्र लिहील्यास ते तसं लिहीतील याला कांहींच आधार नाहीं. त्यानी तसं न लिहील्यास त्यांच्या 'इंटीग्रीटी'वर प्रश्नचिन्ह येतं असंही मला नाही वाटत !

असो, माझ्या शंकेचं निरसन करण्यासाठी घेतलेल्या तसदीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

भाऊ, खरे आहे तुमचे. परंतु त्या बाबतीत "let's hope" की त्या लोकांनी लिहिल्यावर तरी कळेल असा काहीसा सूर आहे, अशा इंटरप्रीटेशनला जागा आहे. परंतु एकंदरीतच सुरेश मेननने स्वतःच्या मनात काही हायपोथेसिस फिट्ट करून घेतल्या आहेत ज्याला उघड पुरावा दिसत नाही पण तो आडून आडून ते सुचवत राहतो असे वाटते हे खरे.

<त्यानी तसं न लिहील्यास त्यांच्या 'इंटीग्रीटी'वर प्रश्नचिन्ह येतं असंही मला नाही वाटत !> ह्यासाठी +१. ते त्यांचे काम होते, असे मला वाटत नाही. त्यांनी ज्या पॅशनने खेळाला पुन्हा मानाचे स्थान मिळवून दिले, ते महत्वाचे आहे. २०००-२०१० च्या दशकात भारतीय संघ एकत्र येऊन ज्या जिद्दीने खेळला, तशी जिद्द फार वेळा भारतीय संघाकडून फार बघायला मिळालेली नाही. भारतीय फॅन म्हणून मजा येते ती अशा वेळेस!

सर्वश्री आशुचँप, असामी, भास्कराचार्य. गा.पै, स्पार्टाकस व अमा,
माझी शंका अगदीं रास्तच नसली तरीही अगदींच हास्यास्पदही नाही याचा दिलासा दिल्याबद्दल धन्यवाद. आतां सचिनचं पुस्तक वाचायला घेत आहे.

मी पुस्तक वाचलं नाही अजुन ,पण मला खात्री आहे हा प्रसंग त्यात नक्की असणार.आणि हा माझा सर्वात आवडता व अभिमानाचा क्षण आहे.

196332_1963118917035_1214700487_2310016_4334159_n.jpg

२०११ विश्वचषक जिंकलेला क्षण. Happy Happy Happy Happy

व्हॉट्सअ‍ॅपवर आणि ईमेलमधून पुस्तकाची सॉफ्ट कॉपी फिरते आहे. हा प्रताधिकार कायद्याचा भंग आहे. त्या लिंकवरून ते पुस्तक डाऊनलोड करू नका कृपया.

त्या आधीच त्या पुस्तकाचा खप झालाय. तसेच ज्यांना स्वताकडे या पुस्तकाची प्रत हवी आहे ते विकत घेतीलच. पण ज्या सचिनच्या चाहत्यांना वाचायची खूप इच्छा आहे पण पैश्याचा प्रॉब्लेम असल्याने पुस्तक नाही घेऊ शकत, अश्यांना ती सॉफ्ट कॉपी मिळाली तर चांगली गोष्ट आहे असे मनापासून वाटते. कित्येक चित्रपटही आपण असे पायरेटेड बघतोच की (मी नाही बघत). बाकी हे बेकायदेशीर आहे हे कबूल. याउपर ज्याला वाचनाची आवड नाही तो ते फुकटातले पुस्तक डाऊनलोड करून पण वाचायला आळसच करणार.

<< ... अश्यांना ती सॉफ्ट कॉपी मिळाली तर चांगली गोष्ट आहे >> मुद्दा समजण्यासारखाच आहे. [' पॉकेट मनी' अभावीं, वर्गणी काढून आणलेलं सिगरेटचं पाकीट गेटवरच्या माणसाला देवून स्टेडियममधे मॅच बघण्याचा उपदव्याप लहानपणीं अगदीं न कळत्या वयात आमच्या कंपूनंही केलाय.] पण सॉफ्ट कॉपी अशी प्रसारित करणं म्हणजे भुकेल्या गरिबानं एखादा पाव चोरणं नसून बेकरीच फोडून सर्वानाच ती लुटण्याच्या मोहात पाडणंच झालं !! Wink

तसेच ज्यांना स्वताकडे या पुस्तकाची प्रत हवी आहे ते विकत घेतीलच. पण ज्या सचिनच्या चाहत्यांना वाचायची खूप इच्छा आहे पण पैश्याचा प्रॉब्लेम असल्याने पुस्तक नाही घेऊ शकत, अश्यांना ती सॉफ्ट कॉपी मिळाली तर चांगली गोष्ट आहे असे मनापासून वाटते.>>>
अरेरे! हा विचार आणि एकूणच पूर्ण समर्थन अतिशय निंदनीय आहे.

अरेरे! हा विचार आणि एकूणच पूर्ण समर्थन अतिशय निंदनीय आहे.
>>>
मला नाही वाटत, या केसमध्ये तरी .. पण हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे. नुसता सचिनपुरताच नाही तर व्यापक विषय आहे. आणि हा धागा सचिनचाच असल्याने तुर्तास थांबतो, पण कधीतरी कुठेतरी हा विषय नक्की घेऊया चर्चेला Happy

अरेरे! हा विचार आणि एकूणच पूर्ण समर्थन अतिशय निंदनीय आहे.
>>>
मला नाही वाटत, या केसमध्ये तरी .. >> कुठल्याही केसमध्ये ते निंदनीयच आहे..

Pages