साडेसातीचा प्रवास

Submitted by नितीनचंद्र on 1 November, 2014 - 01:45

२ नोव्हेंबर २०१४ रात्री ८ वाजुन ५४ मिनिटांनी शनि निरयन वृश्चिक राशी प्रवेश करतो. गेले साडेसात वर्ष पिडलेल्या कन्या राशीची साडेसाती पासुन सुटका होईल.

याच बरोबर साडेबावीस वर्षांनी धनु राशीला साडेसाती सुरु होते.

तुळ राशीची साडेसातीतली शेवटची अडीच वर्षे सुरु होतात तर वृश्चिकेला पाच वर्ष साडेसाती बाकी आहे.

या कालावधी विषयक अनेक गोष्टी व कथा लोकांनी वाचल्या असतील. अनुभवही घेतले असतील. खास जाणवते ती मानसीक पीडा आणि त्यातुन बदलणारी मानसीकता.

साडेसाती तुळ, वृश्चिक आणि धनु राशीला काय परिणाम जाणवेल हे जाणुन घेऊ या.

तुळ राशीला शेवटची अडीचकी आहे. शेवटची अडीचकी काही चांगले घडवुन जाते. तुळ राशीला शनि राजयोग कारक असल्याने किंवा तुळ राशीत शनि उच्चीचा असल्यामुळे पहिली अडिचकी सोडली तर दुसर्‍या आणि तिसर्‍या अडीचकीत फारसा त्रास होत नाही.

शेवटच्या अडिचकीत कुटुंबस्थानातुन किंवा धन स्थानातुन होणारे शनिभ्रमण हळु हळु सांपत्तीक स्थितीत सुधारणाच करेल. याचा वेग मंद असला तरी स्लो बट स्टेडी अश्या प्रकारचा असेल.

कुटुंबात शनि हा वाढ करणारा ग्रह नसुन कितीही हवे असले तरी कुटुंबातील सदस्य संख्या एका आकड्याने किमान कमी होताना काहिंना दिसते. अत्यंत वृध्द असे आजी - आजोबा यांचा या अडिचकीत वियोग होण्याची शक्यता असते तेव्हा लवकरच त्यांच्या जिवंतपणी आशिर्वाद घेण्याचे मनात आणा. त्यांच्या बरोबर काही काळ व्यतित करा. त्यांच्या इच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करा.

शेवटी अमर कोणीच होत नसते. पण मोठ्यांचे कृपाछ्त्र मात्र कायम रहावे असे वाटत असते. अश्या वेळी रुख रुख राहु नये या दृष्टिने हे लिहले आहे.

वृश्चिक राशीला ही मधली अडिचकी. प्रत्यक्ष चंद्रावरुन शनिचे भ्रमण होताना होणारा मानसीक त्रास लक्षात राहिल असा असतो. तुमच्या राशीला अनुरुप बदला घ्यायचा स्वभाव जरा अजुनही लांब ठेवा . शांत पणे पहात रहा काय घडते आणि का घडते या कडे. अनुकुल काळ येईल तेव्हा तुम्हाला सव्याज उट्टे काढायची संधी येणारच आहे. पहिलीच साडेसाती असेल तर आत्मपरिक्षणाची सवय याच काळात लागेल.

शनिवारी तेलाने मालीश करुन गरम पाण्याने स्नान करावे हा उपाय साडेसातीत करायला जुने व जाणते ज्योतिषी सांगतात. मनाचे व्यापार वाढतात तेव्हा शरीरातले रक्ताभिसरण वाढवणे सुखद अनुभव देते असा काहिसा प्रकार यामागे असावा.

शनि हा शिक्षक आहे. जे नुकसान होते यातुन मोठा धडा मिळतो याकडे लक्ष द्या.

धनु राशीला पहिलीच अडीचकी आहे. व्यावसायीक महात्वाकांक्षांना आवर घालुन लो रिस्क असलेले करार मदार करणे क्रमप्राप्त ठरेल. धनु राशीला धन स्थानाचा मालक असलेला शनिच व्ययस्थानात या अडिचकीत असल्यामुळे स्थावर / रोकड यांचा क्षय होताना दिसणार आहे. तो थांबविण्यासाठी अतिरिक्त कामाचा ताण आणि मानसीक ताण जाणवणे अपरिहार्य आहे.

तृतीयेश शनि तुमच्या व्ययात असल्यामुळे सहोदरांची खास करुन मोठ्या भावा - बहिणीची चिंता सतावेल.

आपली मानसीकता अध्यात्मीक आणि परमेश्वराला मानणारी असल्यामुळे या कालखंडातुन आपण पार जाणारच आहात.

शनिवारी शनिमहाराजांना तेल आणि काळे उडीद याच बरोबर रुईपत्रांची माला अर्पण करा. मारुतीचे दर्शन घ्या. हा उपाय पुढील साडेसात वर्षे न चुकता करा. सोबत शनिस्तुती आणि हनुमान चालिसाचा पाठ सुरु ठेवा.

सर्वांसाठीच शनिचा नवग्रहपिडाहर स्त्रोत्रातला मंत्र रोज जपावा असा आहे.

सुर्यपुत्र दिर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया:|
मंद्चार प्रस्सनात्मा पीड़ा हरतु में शनि ||

हा मंत्र रोज किमान ११ वेळा रोज म्हणावा म्हणजे साडेसाती सुखकर होते

|शुभंभवतु |

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या आजपर्यन्तच्या अनूभवानुसार तरी मी हेच म्हणेन की साडेसाती सोडा. पण पैशाचे नियोजन व्यवस्थीत करा, आणी माणसे जोडा. साडेसाती काय, कुठलाच ग्रह वा स्थिती आपले मग वाकडे करु शकत नाही. देव पाठिशी रहातोच.

धन्यवाद.या बाबत थोडे अधीक स्पषटिकरण मिळुशकेलका?. किंवा या संदर्भात माहिती मीळु शकेल असे कोणते पुस्तक आहे का?

धन्यवाद.या बाबत थोडे अधीक स्पषटिकरण मिळुशकेलका?. किंवा या संदर्भात माहिती मीळु शकेल असे कोणते पुस्तक आहे का?

वर तुम्ही जे लिहिलय त्याप्रमाणे>>>>शनि हा शिक्षक आहे. जे नुकसान होते यातुन मोठा धडा मिळतो याकडे लक्ष द्या.>>>> हा साडेसातीचा फायदाच धरला तर जास्त त्रास होत नाही. हाच कालावधी बहुतेकांना आयुष्यात टफ बनवतो.

आम्ही दोघही वृश्चिक राशीचे.... लग्नानंतर लगेच साडेसाती सुरु झाली. दीड वर्षांनी एक गोंडस पिल्लू घरात आलं.
मी लवकरच नोकरीत पर्मनंट होतेय.... नवर्याला प्रमोशन मिळालं.. (बरेच वर्ष रखड्लेलं) आणि आमचं स्वत:च घर सुद्धा होईलच १-१.५ वर्षात..... Happy

मानसिक त्रासाची एकच गोष्ट म्हणजे हउसेने सजव्लेलं स्वतःच घर पिल्लाची चाहूल लागल्यावर वर्षाच्या आत सोडुन यावं लागलं... आता ते घर काढुन पिल्लाच्या संगोपनासाठी आईच्या घराजवळ परत घर शोधतोय....

माझी धनु रास आहे. वॉट्सअप वरच्या एका ढकल संदेशात खालच्या मंत्राचा उल्लेख आहे:-

निलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्
छायामार्तंडसंभूतं तं नमामि शनैश्चरम्

जाणकारांनी थोडे मार्गदर्शन करावे. परदेशात असल्याने मारूती आणि शनि दोन्ही देवळांत शनिवारी जाण्याची सोयच नाही. काही उपाय ? Uhoh

देवळातच कशाला जायला हवे? घरी शक्य असेल तर मारुतीचा फोटो लावा. मनापासुन देवाचे करा, देव पाठिशी असतोच.

शनीचा मन्त्र जरुर म्हणा. मन्त्र बरोबर आहे. शनीचे स्तोत्र रोज वाचले तरी चालेल. छोट्से आहे. सुरुवात कोणस्थो पिन्गलो अशी आहे. मायबोलीवर धार्मिक विभागात स्तोत्रे या सदरात ( अश्विनीने सुरु केलेल्या ) नक्कीच मिळेल.

निलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्
छायामार्तंडसंभूतं तं नमामि शनैश्चरम्

ह्या ओळी शेवटच्या दोन ओळी आहेत.

पुर्ण मंत्र आहे माझ्याकडे Happy मी रोज म्हणतो.

रश्मी धन्यवाद. मी कर्क तर माझ्या मुलीची रास वृश्चिक आहे, त्यामुळे आम्ही दोघीही शनीमंदिराच्या फे-या मारतो दर शनवारी न चुकता. Happy शनीचा मंत्रही मी म्हणत असते जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा. सो, कृपादृष्टी राहावी हीच प्रार्थना.

बी, साडेसाती किंबा इतर काही इतके मनावर घ्याय्चे नाही. जे व्हायचे ते होणारच. आपण आप्ले निर्णय शक्य तितके थंड डोक्याने, भावनेच्या आहारी न जाता घ्याय्चे. बाकी कर्ता करविता तो आहे आणि आपले कर्म आहे. जे होईल ते होईल. घाबरायचे नाही. आणि ज्योतिषाच्या बाब्तीत तर मी म्हणेन की हा विषय प्रचंड गहन आहे. उगीच थोडासा अभ्यास करुन आपले आपण निष्कर्ष काढुन मग त्याप्रमाणे आपले आयुष्य चालवणे हे खुप चुकिचे आहे. तेव्हा उगीच भलता विचार न करता सगळे चांगलेच होईल हा विश्वास ठेऊन पुढे चाला. साडेसातीचे म्हणाल तर रिलायंस एम्पायर उभे राहिले ते धिरुभाईच्या साडेसातीतच.

भाव तेथे देव अशी म्हण आहे. घरात फोटो ही न लावता मंत्र म्हणुन मानस पुजा करुन तीच फळे मिळवता येतात. भाव मात्र हवा. श्रध्दा हवी.

मिल, तुम्ही घरीच प्रतिमा आणून पूजा करू शकता. मी एक मातीचा सूर्यासारखा प्लेट आणला होता व मीच घरी रंगविला अ‍ॅक्रिलिक पेंट ने. तो एका भिंतीवर लावला होता. आईच्या हातून पुढे तो फुटला म्हणून मग मेटलचा असाच आणला होता. तो पुजेत आहे.

शनीची दृष्टी नेहमी तिरकी असावी तीच सहन करता येते. तुमच्या पैकी कोणी शनीमहात्म्य वाचते का?
मी दर शनिवारी वाचत असे. काही धार्मिक उद्बोधन झाले नाही तरीही एक कॉशनरी टेल म्हणून वाचावे. जसे प्रलोभनांपासून दूर राहणे, चुकीच्या मार्गे न जाणे इत्यादि.

माझ्यासोबत जे काही घडले त्यामुळे मी गीता वाचायला घेतली कारण काही प्रश्नांची उत्तरे मला मिळत नव्हता. गीताप्रेसची गीता वाचून मला खूप फायदा झाला. कारण, जे प्रश्न मला सातावित होते तेच प्रश्न अर्जुनाला पडले होते. कृष्णाने त्या प्रश्नाची उत्तरे सखोल दिली आहेत.

हा विचार कुणी करत नाही की आपले खरे शत्रु हे आपले षडरिपु आहेत.

गीतेमधील उत्तरे ही वर वर दिलेली उत्तरे नाही आहेत. तर ती खोलवर बघते. खूप आधीच गीता वाचली असती तर कदाचित माझ्यवरची संकटे टळली असती Sad

गीतेचे सार बाबुजींच्या या एकाच गीतात आहे असे वाटते. Happy

विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था

शस्‍त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला
कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला
घे शस्‍त्रा ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था

कर्तव्याच्या पुण्य पथावर मोहांच्या फूलबागा
मोही फसता मुकशील वीरा मुक्‍तीच्या मार्गा
इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकवील माथा

कुणी आप्‍त ना कुणी सखा ना जगती जिवांचा
क्षणभंगुर ही संसृति आहे खेळ ईश्वराचा
भाग्य चालते कर्मपदांनी जाण खर्‍या वेदार्था

रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो
कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणूत भरलो
मीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था

कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा
सर्व धर्म परि त्यजुनी येई शरण मला भारता
कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था

माझी रास कर्क आहे. मध्यंतरीचा काही (म्हणजे बराच काळ) भयंकर खडतर गेला. साडेसाती आयुष्यात अनेकदा येते का? Uhoh

साधना तू मागे लिहीले होतेस की धोन्डोपन्त आपटेन्कडे जाऊन आली आहेस म्हणून. आज शनीच्या उल्लेखामुळे मला ती आठवण आली.:स्मित: साधना, मारुती उपासना करता आली तर बघ. फक्त उपासना, उपास नाही करायचा.

बाकी ज्याना धोन्डोपन्त माहीत नाहीत त्यानी खालची लिन्क बघा. नुसते वाचायला काय हरकत आहे? ज्योतिष्य म्हणून वाचु नका तर एक अनूभव आणी माहिती म्हणून वाचा.

http://dhondopant.blogspot.in/

http://dhondopant.blogspot.in/2010/06/blog-post_12.html

शनी हा कायद्याचा कारक असल्याने त्याला प्रामाणीकपणाची अपेक्षा असते. साडेसाती आली की ती आयुष्याचे योग्य ते शिक्षण देते, त्यामुळे साडेसातीला वाईट आणी भयानक समजू नका. आपण कसे वागतो त्यावरच हे अवलम्बुन असते. आणी ज्याना शक्य आहे ( म्हणजे जे भारतात आहेत, त्यानी शनीबरोबर मारुतीची उपासना सुरु करा. मारुती चिरन्जिवी आहे आणी त्वरीत पावणारा आहे. माझ्या मामेभावाने त्याचा अनूभव घेतलाय. त्तो दर शनीवारी मारुतीला जायचा ( जेव्हा उपासना सान्गीतली होती तेव्हापासुन, त्या गोष्टीला आता २५ वर्षे झालीत) आणी उपास करायचा. अजूनही करतोच. ज्याना उपास शक्य नाही त्यानी अजीबात त्या फन्दात पडु नका. पण मारुती स्तोत्र म्हणा. मन खम्बीर होऊन सन्कटाला ( आले तर ) तोन्ड देता येते. उगाच होम-हवनाच्या पण फन्दात पडु नका.

कर्मबंधनात अडकवणारा शनि हा एकमेव ग्रह आहे. साडेसातीत दत्तात्रयांची उपासना परिणामकारक असते. मन शांत राहते. आपोआपच चुका कमी होतात.

ओम नमो भगवते आंजनेयाय |
बहाबलाय|
ओम फट घे घे घे|
घे घे घे स्वाहा||
असा एक मारुतीचा मंत्र आहे. तो साडेसातीत म्हणावा असे मंत्र तंत्राच्या एका पुस्तकात लिहिल्याचे आठवते. मजेशीर वाटल्याने लक्षात राहिला. लक्षा बेर्डे च्या पिच्चर मधे असे मंत्र असतात.
अवांतर सूचना- श्रद्धा अंधश्रद्धा च्या घोळात जर साडेसातीत अडकला तर सरळ समुपदेशकाचा सल्ला घ्या.

मारुती उपासना अगदी मस्ट . मी शनी महात्म्याच्या आधी भीमरूपी महारुद्रा वाचायचे, मग कृष्णाचे स्तोत्र
मग शनि महात्म्य. असा क्रम होता. तुमचा विश्वास बसणार नाही पण नवी कार घेउन लगेचच अ‍ॅक्सिडेट झाला होता ते व्हा कार सुरू करताना मी जय बजरंग बली म्ह्टले होते. कारचे नुकसान झाले पन आम्हाला काही झाले नाही.

तसेच दारुड्या वाहनचालकाबरोबर आई व मुलगीला विमान तळावर नेताना अगदी जीव मुठीत धरून बसलो होतो. मुलीला फोनवरील साई वंदना ऐकायला दिली. आई म्हातारी! तिला विमानाने जायचीच उत्सुकता होती. व प्रसंगाचे गांभीर्य कळलेच नाही. तेव्हा देखील चालक जागा रहावा म्हणून एफ एम लावले होते तर अगदी विमानतळाशी पोहोचल्यावर मारुतीचे स्तोत्र रेडिओवर लागले. मला रडू कोसळायचेच बाकी होते. बोर्डिंग पास घेतल्यावर आई व मुलीचे चेहरे बघूनच मला भरून आले.

मारुती उपासनेत एक प्रकारची सकारत्मकता आहे. ती आपल्यात येते.

अमा खरे आहे हे. तुमची काळजी हे वाचतानाच आतुन जाणवली. म्हणत रहा. देव कसा पाठिशी असतो हे मी एक नाही तर १०० पेक्षा जास्त वेळा अनूभवले आहे. नशीबाने आई-वडिलान्बरोबरच सासु-सासरे देखील चान्गले आणी अध्यात्मीक मिळाले आहेत.

श्री स्वामी समर्थ आणी आई अम्बाबाई ( महालक्ष्मी ) च्या कृपेने तरुन जातोय हे पुष्कळ आहे माझ्या साठी.

घाटपान्डे सर मी अन्धश्रद्धा आणी बुवाबाजीवर विश्वास ठेवत नाही, पण परमेश्वरावर नक्कीच विश्वास ठेवते. जो ठेवतो, तो अनुभवतो हे खरे.:स्मित:

माझी कन्या रास आहे. माझ्या माहितीप्रमाणे नोव्हेंबर २००६ पासून मला साडेसाती लागलेली होती तर मग ती मे २०१४ लाच संपायला हवी होती ना ?

सुप्रिया, साडेसाती रविवारी रात्रीच सम्पली. जेव्हा शनीने धनु राशीत प्रवेश केला, तेव्हाच कन्येची साडेसाती सम्पली.

साडेसाती सर्वांनाच येते असे नाही. तुमचा जर देवगण असेल तर तुम्हाला त्या जन्मात साडेसाती येत नाही. नितिनजी खरे आहे ना? मनुष्यगण आणि राक्षसगण ह्या दोन गणात जर आपण असेल तर सासा येते. देवगण मिळणे खूप दुर्मिळ गोष्ट आहे.

साडेसाती दरम्यान आपले खूपच खच्चीकरण होते. म्हणजे एकाएकी आपण नियतीच्या जाळ्यात फसतो. खूपच अलर्ट आणि शांत राहणे हे सासाचे उत्तम लक्षण आहे. साडेसातीमधे प्राणायाम अवश्य करायला हवा. अनुलोम विलोन, कपालभाती, सुर्यनमस्कार ह्यानी अपार शांतता लाभते.

साडेसातीमधे घर होणे, मुलबाळ होणे, प्रमोशन होणे हे सगळे वरवरचे फायदे आहेत. माझे पण साडेसातीमधेच पुण्यात घर झाले पण माझा जो इतर लॉस झाला तो त्या घरापुढे नगण्य आहे. मला अमेरिकेला जायला मिळाले. माझेसुध्दा प्रमोशन आणि मला पगारवाढ झाली. पण तरीसुद्धा मी जी पिडा सोसतो आहे. जी यातायात मला सगळे काही असूनसुद्धा भोगावी लागते आहे ती खरी साडेसातीची करामत आहे. एकाएकी आपले शरीर गात्र थकायला लागते. माणसे विलग होतात. मित्रदोस्त शी थू करतात. आर्थिक खर्च अमाप होतो. कुणीतरी सोडून जात. कुटुंब दुभंगत हे सर्व साडेसातीमधे घडताना दिसत. इतकच काय बहुतेकाचे जगाला निरोप देणे हे देखील सासामधेच होते. Sad

मला अजून ५ वर्ष साडेसाती आहे आणि मला इतकी भिती वाटते आहे ना. मी अगदी लहानपणापासून गॉड फीअरींग परसन आहे. देवाधर्माचे मी मनानी करतो. माझ्यावर अनेक जण अवलंबून आहेत. म्हणून मला जास्त भिती वाटते Sad

मी रोज न विसरता शनी चालिसा वाचतो. शनि मत्राचे रोज पठण करतो. रात्री अथर्वशीर्ष एकदा म्हणतो. आता शनी माहात्म्य सुरु करतो.

दर शनिवारी मारोतीला काळे तिळ जव उडीद डाळ वहावी का?

एकाएकी आपले शरीर गात्र थकायला लागते. माणसे विलग होतात. मित्रदोस्त शी थू करतात. आर्थिक खर्च अमाप होतो. कुणीतरी सोडून जात. कुटुंब दुभंगत हे सर्व साडेसातीमधे घडताना दिसत. इतकच काय बहुतेकाचे जगाला निरोप देणे हे देखील सासामधेच होते.>> तुम्हाला डिप्रे शनचा त्रास होतो आहे का? चेक करून घ्या. तुमची इनर
स्ट्रेंग्थ कमी होते आहे का? असे व्हिटामिन डेफिशिअन्सी मुळे पण होते. व्यवस्थित उपाय केले तर हे त्रास दूर होतात. चिअर अप.

Pages