साडेसातीचा प्रवास

Submitted by नितीनचंद्र on 1 November, 2014 - 01:45

२ नोव्हेंबर २०१४ रात्री ८ वाजुन ५४ मिनिटांनी शनि निरयन वृश्चिक राशी प्रवेश करतो. गेले साडेसात वर्ष पिडलेल्या कन्या राशीची साडेसाती पासुन सुटका होईल.

याच बरोबर साडेबावीस वर्षांनी धनु राशीला साडेसाती सुरु होते.

तुळ राशीची साडेसातीतली शेवटची अडीच वर्षे सुरु होतात तर वृश्चिकेला पाच वर्ष साडेसाती बाकी आहे.

या कालावधी विषयक अनेक गोष्टी व कथा लोकांनी वाचल्या असतील. अनुभवही घेतले असतील. खास जाणवते ती मानसीक पीडा आणि त्यातुन बदलणारी मानसीकता.

साडेसाती तुळ, वृश्चिक आणि धनु राशीला काय परिणाम जाणवेल हे जाणुन घेऊ या.

तुळ राशीला शेवटची अडीचकी आहे. शेवटची अडीचकी काही चांगले घडवुन जाते. तुळ राशीला शनि राजयोग कारक असल्याने किंवा तुळ राशीत शनि उच्चीचा असल्यामुळे पहिली अडिचकी सोडली तर दुसर्‍या आणि तिसर्‍या अडीचकीत फारसा त्रास होत नाही.

शेवटच्या अडिचकीत कुटुंबस्थानातुन किंवा धन स्थानातुन होणारे शनिभ्रमण हळु हळु सांपत्तीक स्थितीत सुधारणाच करेल. याचा वेग मंद असला तरी स्लो बट स्टेडी अश्या प्रकारचा असेल.

कुटुंबात शनि हा वाढ करणारा ग्रह नसुन कितीही हवे असले तरी कुटुंबातील सदस्य संख्या एका आकड्याने किमान कमी होताना काहिंना दिसते. अत्यंत वृध्द असे आजी - आजोबा यांचा या अडिचकीत वियोग होण्याची शक्यता असते तेव्हा लवकरच त्यांच्या जिवंतपणी आशिर्वाद घेण्याचे मनात आणा. त्यांच्या बरोबर काही काळ व्यतित करा. त्यांच्या इच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करा.

शेवटी अमर कोणीच होत नसते. पण मोठ्यांचे कृपाछ्त्र मात्र कायम रहावे असे वाटत असते. अश्या वेळी रुख रुख राहु नये या दृष्टिने हे लिहले आहे.

वृश्चिक राशीला ही मधली अडिचकी. प्रत्यक्ष चंद्रावरुन शनिचे भ्रमण होताना होणारा मानसीक त्रास लक्षात राहिल असा असतो. तुमच्या राशीला अनुरुप बदला घ्यायचा स्वभाव जरा अजुनही लांब ठेवा . शांत पणे पहात रहा काय घडते आणि का घडते या कडे. अनुकुल काळ येईल तेव्हा तुम्हाला सव्याज उट्टे काढायची संधी येणारच आहे. पहिलीच साडेसाती असेल तर आत्मपरिक्षणाची सवय याच काळात लागेल.

शनिवारी तेलाने मालीश करुन गरम पाण्याने स्नान करावे हा उपाय साडेसातीत करायला जुने व जाणते ज्योतिषी सांगतात. मनाचे व्यापार वाढतात तेव्हा शरीरातले रक्ताभिसरण वाढवणे सुखद अनुभव देते असा काहिसा प्रकार यामागे असावा.

शनि हा शिक्षक आहे. जे नुकसान होते यातुन मोठा धडा मिळतो याकडे लक्ष द्या.

धनु राशीला पहिलीच अडीचकी आहे. व्यावसायीक महात्वाकांक्षांना आवर घालुन लो रिस्क असलेले करार मदार करणे क्रमप्राप्त ठरेल. धनु राशीला धन स्थानाचा मालक असलेला शनिच व्ययस्थानात या अडिचकीत असल्यामुळे स्थावर / रोकड यांचा क्षय होताना दिसणार आहे. तो थांबविण्यासाठी अतिरिक्त कामाचा ताण आणि मानसीक ताण जाणवणे अपरिहार्य आहे.

तृतीयेश शनि तुमच्या व्ययात असल्यामुळे सहोदरांची खास करुन मोठ्या भावा - बहिणीची चिंता सतावेल.

आपली मानसीकता अध्यात्मीक आणि परमेश्वराला मानणारी असल्यामुळे या कालखंडातुन आपण पार जाणारच आहात.

शनिवारी शनिमहाराजांना तेल आणि काळे उडीद याच बरोबर रुईपत्रांची माला अर्पण करा. मारुतीचे दर्शन घ्या. हा उपाय पुढील साडेसात वर्षे न चुकता करा. सोबत शनिस्तुती आणि हनुमान चालिसाचा पाठ सुरु ठेवा.

सर्वांसाठीच शनिचा नवग्रहपिडाहर स्त्रोत्रातला मंत्र रोज जपावा असा आहे.

सुर्यपुत्र दिर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया:|
मंद्चार प्रस्सनात्मा पीड़ा हरतु में शनि ||

हा मंत्र रोज किमान ११ वेळा रोज म्हणावा म्हणजे साडेसाती सुखकर होते

|शुभंभवतु |

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा!!
कालच ज्योतिष बीबी वर विचारलं आणि आज लेख आला.
छान. Happy

आमचा घाट सुरु होणार.
आजवर देवाची कृपा होतीच ह्यापुढेही राहीलच अशी आशा आहे.

माझी वृश्चिक रास आहे....

सुर्यपुत्र दिर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया:|
मंद्चार प्रस्सनात्मा पीड़ा हरतु में शनि ||

हा मंत्र रोज किमान ११ वेळा रोज म्हणावा म्हणजे साडेसाती सुखकर होते>>>

ह्या मंत्राचा अर्थ समजावुन सांगू शकाल का प्लीज...

सुर्यपुत्र दिर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया:|
मंद्चार प्रस्सनात्मा पीड़ा हरतु में शनि ||

सुर्यपुत्र - सुर्याचा पुत्र
दिर्हदेहो- मोठ्ठा देह ( शरीरयष्टी ) असणारा,
विशालक्ष - मोठे डोळे असलेला
शिवप्रियः शंकराला प्रिय असलेला

मंदाचार - हळु हळु भ्रमण करणारा ( हर्शल नेपच्युन आणि प्लुटो ) या ग्रहांना जेव्हा ज्योतिषात स्थान नव्हत तेव्हा सर्वात स्लो मुव्हींग प्लॅनेट शनि आहे.

प्रसनात्मा - प्रसन्न आत्मा असलेला

पीडा हरतु मे शनि - माझी पिडा ( त्रास ) हरण कर.

वेदोक्त आणि पुराणोक्त नवग्रह मंत्रात ग्रहांना प्रसन्न करणार्‍या मंत्रापेक्षा पीडा असताना पीडा हरण करणारे मंत्र जास्त प्रभावी असतात.

नवग्रह पीडाहर स्तोत्र हे सर्वच ग्रहांना पीडा हरणाचे आवाहन करणारे स्तोत्र आहे.

||नवग्रहपीडाहरस्तोत्र||

श्री गणेशाय नमः|

ग्रहाणामादिरादित्यो लोकरक्षणकारक: |
विषमस्थानसम्भूतां पीडां हरतु मे रवि: ||

रोहिणीशः सुधामूर्ति: सुधागत्रः सुधाशनः |
विषमस्थानसंभूतां पीडां हरतु मे विधु: ||

भूमिपुत्रो महातेजां जगतां भयकृत सदा |
वृष्टिकृदृष्टीहर्ता च पीडां हरतु मे कुज: ||

उत्पातरुपो जगतां चन्द्रपुत्रो महाद्युति: |
सूर्यप्रियकरो विद्वान पीडां हरतु मे बुधः||

देवमन्त्री विशालाक्षः सदा लोकहिते रतः |
अनेकशिष्येसम्पूर्णः पीडां हरतु मे गुरु: ||

दैत्यमन्त्री गुरुस्तेषां प्राणदश्च महामति: |
प्रभुस्ताराग्रहाणांश्च पीडां हरतु मे भृगु: ||

सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्षः शिवप्रियः |
मन्दचारः प्रसन्नात्मा, पीडां हरतु मे शनि: ||

महाशिरा महावक्रो दीर्घदंष्ट्रो महाबलः |
अतनुश्चोर्ध्वकेशश्च पीडां हरतु मे शिखी: ||

अनेकरुपवर्णैश्च शतशोSथ सहस्त्रशः |
उत्पातरुपो जगतां पीडां हरतु मे तमः ||

इतिश्री ब्रह्मांड पुराणोक्त नवग्रहपीडाहर स्तोत्रं संपुर्णम ||

शिवप्रियः की शिवप्रिया: ?

अरे हो,

सुर्यपुत्र दिर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया:|
मंद्चार प्रस्सनात्मा पीड़ा हरतु में शनि

या पूर्ण मंत्रात बर्याच शब्दांत चुका झाल्यात.
र्हस्व दीर्घं चुकलं ना की मंत्रं म्हणताना खूप चुका होतात.

अधून मधून पीडा असलेली बर असतयं! माणुस जमीनीवर रहायला मदत होते. अस आम्ही साडेसातीच्या धाग्यावर म्ह्टले आहेच. असो. बायकोची धनु रास आहे तिला साडेसाती चालू होणार आहे.

कॉपी आणि टाईप करताना कधीकधी चुका होतात म्हणुन

स्तोत्रे, श्लोक - प्रार्थना या धाग्यावरचे http://www.maayboli.com/node/13468?page=5 स्तोत्र कॉपी - पेस्ट केले आहे.

सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्षः शिवप्रियः |
मन्दचारः प्रसन्नात्मा, पीडां हरतु मे शनि: ||

हे तुम्ही प्रतिसादात दिलेले एकदम बरोबर वाटतेय.
वरच्या लेखात कॉपीपेस्ट करून संपादन करून टाका.

सिंह राशीची अडिचकी सुरु होते आहे बहुतेक
>>>
हो का माझे भयानक खर्च झालेत २ महीन्यात एक मोठे आजारपन्,गाडी,मोबाईल सगळ्यांनीच काम काढलेय...

अरे सिन्व्हेची साडेसाती सम्पलीय रे बाबा. आता त्याना शनी गोचरीने ( म्हणजे एका राशीतुन दुसर्‍या राशीत फिरणारा) ४ था येईल.

सीमा, शनी जेव्हा कर्क राशीत होता तेव्हा तुला साडेसाती सुरु झाली आणी जेव्हा तो तुळ राशीत पोहोचला तेव्हा ती सम्पली.

सीमा, शनी जेव्हा कर्क राशीत होता तेव्हा तुला साडेसाती सुरु झाली आणी जेव्हा तो तुळ राशीत पोहोचला तेव्हा ती सम्पली.
>>>
हम्म मग दुसरा काहितरी विचार करायला हवा...

माझी वृश्चिक रास आहे.... >>> +१

पहिलीच साडेसाती असेल तर आत्मपरिक्षणाची सवय याच काळात लागेल. >>>> मला कसं कळेल ही पहिलीच आहे का दुसरी ते ???

आबासाहेब वयानुसार कळते ते. कधी कधी लहान वयात म्हणजे अगदी पहिल्या वर्षापासुन साडेसाती असते. उलगडुन सान्गायच झाल की समजा आज चन्द्र गोचरीने ( चन्द्र दर दोन दिवसानी रास बदलतो, म्हणून त्याला मनाचा कारक/ कर्ता म्हणतात) जर वृश्चिक राशीत असेल ( प्रत्येक कॅलेन्डर विशेषतः काल निर्णय किन्वा महालक्ष्मी मध्ये प्रत्येक दिवसाची रास लिहीलेली असतेच ) आणी समजा आजच शनी वृश्चिक राशीत आला की दोघेही एका ठिकाणी आले म्हणून ज्या बाळाचा आज वृश्चिकेत जन्म झालाय त्याला साडेसाती असते. त्याला जन्मतः साडेसाती म्हणतात.

काही लोकाना ती वयाच्या ७- ८ व्या वर्षापासुन पण सुरु होते. तर काहीना ती वयाच्या २० नन्तर येते.

तसेही शनी उद्या रात्री वृश्चिकेत प्रवेश करतोय. म्हणजे उद्या रात्रीपासुन धनु राशीला साडेसाती सुरु होईल. धनु राशीला शनी बारावा येईल. तुळ राशीला शेवटची अडिच वर्षे सुरु होतील.

माझी कन्या रास आहे...आणि साडेसाती सुरु झाल्यानंतर मारूती उपासना, शनीमहात्म्य वाचणे ई. सुरु केले होते. मी तसा अजिबात देवभोळा नाही, पण घरच्यांच्या आग्रहास्तव नित्यनेमाने या गोष्टी पाळत आलो.
त्यामुळे असावे किंवा इतरही कारणे असावीत पण सुदैवाने साडेसाती फार खडतर वगैरे अशी काय गेली नाही. उलट पुत्रप्राप्ती, नोकरीत बढती, आर्थिक स्थैर्य, चारचाकी वाहन हे सर्व लाभ झाले.
अर्थात नातेवाईकांचा वियोग, आजारपण, अपघात आणि मनस्ताप याही गोष्टी अनुभवल्या. त्यामुळे सगळ्याचे संतुलन साधले गेले असे वाटले.
साडेसातीचा सर्वात फायदा झाला म्हणजे थोडीफार अध्यात्माची गोडी निर्माण झाली. पुजा, उपासतपास, नवस वगैरे अजिबात करत नाही पण ध्यानधारणा आणि नामस्मरण करताना चांगले वाटले.
त्यामुळे साडेसाती संपली असली तरी या गोष्टी चालूच ठेवेन.

माझी वॄश्चिक रास आहे ,माझ्या पत्रिकेत वॄश्चिक रास षष्ठ स्थानी आहे.

षष्ठ स्थान हे आजारांचे स्थान आहे ना ??
तब्येतीच्या दृष्टीने हा कालावधी खराब आहे का ???
.

काही व्यक्तींच्या जीवनात आयुष्यभर संकटच संकट चालू असतात एक संपल कि पुढच संकट. अक्षरशः उभा जन्म उन्हात .. याला काय म्हणायचं? जन्म साती ?

जर आपल्या पत्रिकेत बाराव्या घरात शनी असेल तर त्याचा अर्थ जन्मभर साडेसाती असा होतो का? नक्कीच नाही. १२ वे घर लग्नापासुन असल्याने सातत्याने मनाला त्रास होईल असे नाही.

भावेशा नुसार फळे वर्णन करता येतात.

नितीनचंद्र ,

मेषेला या २ तारखेपासुन शनी अष्टमस्थानी आलाय आणि ३ तारखेपासुन शनीला ग्रहण लागत आहे आणि त्यात गुरु ४ स्थानात. या स्थितीचा मेषेवर काय परिणाम होणार आहे.

>>२ नोव्हेंबर २०१४ रात्री ८ वाजुन ५४ मिनिटांनी शनि निरयन वृश्चिक राशी प्रवेश करतो

ही वेळ कोणती प्रमाण वेळ असते ? भारतात सर्वत्र एकच वेळ मानली जाते तीच ना ?

Pages