वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<जी व्यक्ती स्वत: मास खाते त्या व्यक्तीला बकरीच्या बळी जाण्या विरुद्धा बोलायचा कणभरही हक्क नाही.>> या logic ने जी व्यक्ती श्रीखंड-पुरी खाते तिला परवडत नसताना श्री.पु. ची पार्टी उकळणाऱ्याविरुद्ध बोलण्याचा तसूभरही अधिकार नाही.
बळीचा बकरा/ (अष्टसात्विक) गावजेवण जे अंधविश्वासातून, बळजबरीने केलं जातं त्यात मला काहीही फरक दिसतं नाही.

अमितव, अगदी मान्य आहे. बळजबरीने, अंधविश्वासातून, फववणूकीने केलेली कृत्य मला मुळीच मान्य नाहीत. माझा विरोध कुठल्याही वाईट कृत्याला आहे. जर कुणी बकरा बळी देत असेल तर त्याला विरोध आणि जर कुणी मनुष्य पोटासाठी शाकाहार उपलब्द्ध असताना मासाहार करीत असेल त्यालाही तेवढाच विरोध आहे, होता आणि राहील.

जर बळी देणारा देवाचे समर्थन करत असेल तर त्याला माझा विरोध आहे. आणि जर मास खाणारा अन्नसाखळी आणि जिवो जिवोस्य जीवनम, झाडांना काय जीव नसतो.. अशाप्रकारे आपले समर्थन करीत असेल तर त्यालाही माझा विरोध आहे.

मी मनबुद्धीभावना-प्रामाण्यवादी आहे. असो. हा माझा वैयक्तिक अति अति अति अति किरकोळ नगण्य असा लढा आहे पण आहे.

शाकाहार उपलब्द्ध असताना मासाहार करीत असेल त्यालाही तेवढाच विरोध आहे, होता आणि राहील.
>>>>>>>

एक्झॅक्टली,
हा खूप महत्वाचा पॉईंट आहे.
आणि म्हणून मी स्वतः सुद्धा मांसाहार सारखे अमानुष कृत्य करत असूनही मला कुठलीही खंत वा कमीपणा वाटत नाही,
कारण मी मांसाहार नाईलाज म्हणून करतो.
शाकाहारात बटाट्याची भाजी आणि काळा वाटाणा वा मटार सारखे एखाददुसरे कडधान्य वगळता मला कुठलीच भाजी आवडत नाही Sad
तसे चीज आणि पनीर सारखे दुग्धजन्य पदार्थ आवडतात, पण ते रोज खाणे परवडत नाही Sad

'न हि वेरेन वेरानि, सम्मन्तीध कुदाचनं।अवेरेन च सम्मन्ति, एस धम्मो सनन्तनो' म्हणजे वैर वैराने शमत नाही ते अवैरानेच संपते. या अवैराच्या विचारातून सर्वांबद्दल प्रेम, मैत्री आणि सद्भाव वाढू लागतो. यातूनच करुणेचा उदय होतो. ही मैत्री करुणाच सामाजिक स्वास्थ्य वाढविते. —

अमितव, अगदी मान्य आहे. बळजबरीने, अंधविश्वासातून, फववणूकीने केलेली कृत्य मला मुळीच मान्य नाहीत. माझा विरोध कुठल्याही वाईट कृत्याला आहे. जर कुणी बकरा बळी देत असेल तर त्याला विरोध आणि जर कुणी मनुष्य पोटासाठी शाकाहार उपलब्द्ध असताना मासाहार करीत असेल त्यालाही तेवढाच विरोध आहे, होता आणि राहील.

जर बळी देणारा देवाचे समर्थन करत असेल तर त्याला माझा विरोध आहे. आणि जर मास खाणारा अन्नसाखळी आणि जिवो जिवोस्य जीवनम, झाडांना काय जीव नसतो.. अशाप्रकारे आपले समर्थन करीत असेल तर त्यालाही माझा विरोध आहे. >> थोडक्यात म्हणजे मला वाटते त्यापेक्षा अजून कोणाला काहि वेगळे वाटत असेल तर त्याला माझा विरोध आहे. बाकीचेही तेच म्हणताहेत.

बी | 29 September, 2014 - 12:09

माझ्यामते 'लढा' हा काहीतरी वेगळाचं असतो. त्याचे स्वरुप खूप ज्वलंत असते. जसे की सतीची चाल बंद करण्यासाठी राजाराय मोहनराय ह्यांनी लढा दिला. आणि ज्या स्त्रिया सति गेल्यात तो प्रकार केवढा भयानक असेल. तो लढा आठवून ह्या पानावरील लढे एकदम अति अति अति.. किरकोळ वाटतात.
<<
मी मनबुद्धीभावना-प्रामाण्यवादी आहे. असो. हा माझा वैयक्तिक लढा आहे.
<<
अति अति अति.. किरकोळ?

हेल्लो? Wink

बी, मांसाहारी लोकांचं कदाचीत चूकतही असेल
पण ते श्रद्धेपोटी खात नसल्यानी तु आपलं लढाऊ सैन्य ७११० वर नेणार का?

इथे गाडी पुन्हा रुळावर आणु या.

>>मास खाणे चालते तर बळी देणे का चालू नये. दोन्हीमधे कुणाची तरी हत्या होते आहे. <<
मलातरी बीचं हे अ‍ॅपगॉजिक आर्ग्युमेंट वॅलीड वाटतंय. देवपूजा असो वा पोटपूजा, जिवंत प्राण्याचा बळी देत असाल तर एकाला मान्यता आणि दुसर्‍याला विरोध म्हणजे शुद्ध दांभिकपणा झाला. मला वाटतंय कि बी हेच पटवुन द्यायचा प्रयत्न करतोय.... Happy

चर्चा करणारे व्यक्ती हे :

१. लालसी, २. द्वेषी, ३. भ्रमिष्ट, ४. गर्विष्ट, ५. लोभी, ६. आळशी, ७. एकच कल्पना धरुन ठेवणारा हट्टी आणि मुर्ख नसावेत......

कारण :

एका ज्ञानि पुरुषाने म्हटले आहे,

रत्तो दुट्ठो च मूळहो च मानी लुद्धो तथा' लसो ! एक चिंती च बालो च एते अत्थविनासका' ति!!

लालसी व्यक्ती लालसेमुळे, दुष्ट व्यक्ती दुष्टपणामुळे, भ्रमिष्ट व्यक्ती भ्रामक कल्पनामुळे, गर्विष्ट व्यक्ती गर्वाभिमानाने, लोभी व्यक्ती लोभामुळे, आळशी व्यक्ती आळसपणामुळे, एकच कल्पना धरुन ठेवणारा हट्टी मनुष्य संकुचितपणाने आणि मुर्ख व्यक्ती मुर्खपणामुळे अर्थाचा विचका करुन टाकतो ... .

वैयक्तिक 'लढा' ऐवजी मला वै.'सुधारणा' हा शब्द बरा वाटतो.
कालच्या दसर्‍याचे दिवशी केलेली एक सुधारणा:
आपट्याची पाने अजिबात आणली नाहीत. ती घेणे व देणे म्हणजे निसर्ग ओरबाडणे हे मनोमन पटलेले आहे.

नास्तिक+ मांसाहारी लोकांसाठी.........

तुमच्यातले किती जण बीफ खातात? जर तुमच्या समोर जर पुढे मागे गायीचे मांस आले तर खाता का/ खाल का? माहित नसताना खाल्ले तर तुम्हाला अपराधी वाटेल का?

कारण माझ्यामते तरी गायीचे मांस न खाणे हे धर्माशी संबंधीत आहे. आणि मांसाहार करणारे बहुसंख्य भारतीय हिंदू बीफ खात नाहीत. मग जर मांसाहार चालतो तर बीफ का नाही? सश्रद्ध/आस्तिक्/धार्मिक लोकांचे उत्तर सरळ आहे कि ते गायीला देव मानतात म्हणून खात नाहीत.
नास्तिकांचे मत जाणून घ्यायला आवडेल

नास्तिक+ मांसाहारी लोकांसाठी......<<< हा आस्तिक + मांसाहारींसाठी प्रश्न विचारला असता तर मी उत्तर द्यायला क्वालिफाय झाले असते Proud

नंदिनी,

सश्रद्ध/आस्तिक्/धार्मिक लोकांचे उत्तर सरळ आहे कि ते गायीला देव मानतात म्हणून खात नाहीत.
असे मला वाटते. म्हणून नास्तिक लोकांसाठी विचारले. तुम्ही उत्तर दिले तरी चालेल की. Happy
खाता का/खाल का ?

या धाग्यावर या विषयि आधिच खुप चर्चा झाल्यामुळे हा विषय ईथे नको वाटतोय .
दुसरिकडे कुठेहा विषय मांडला तर ऊत्तर देन्याचा प्रयत्न करेन.

<<वैयक्तिक 'लढा' ऐवजी मला वै.'सुधारणा' हा शब्द बरा वाटतो.
कालच्या दसर्‍याचे दिवशी केलेली एक सुधारणा:
आपट्याची पाने अजिबात आणली नाहीत. ती घेणे व देणे म्हणजे निसर्ग ओरबाडणे हे मनोमन पटलेले आहे.>>>

+१

४ पानांच्या फरकाने मनुष्य शुद्ध लिहायला लागतो.

ज्याला ल आणी ळ लिहीता येतो त्याला न आणी ण लिहीता येवु नये हे पटत नाही (हं मुद्दाम कोणी 'ण' ला 'न' च लिहीत असेल तर कथा वेगळी) पण तेही लिहीताना त्यांच्या लक्षात रहात नाही कि मागच्या पोस्ट्वर मी काय लिहीलेय.

आवडत नाही.

ससा चांगला लागतो परंतु इथे सगळेच ससे खाणारे नसतात वटवाघुळ देखील चविष्ट असते पण भारतात खाण्याचा रिवाज नाही . चीनी लोक साप उंदीर देखील खातात. उद्या कोंबडी खातात तर उंदीर देखील खा म्हणुन काहीही बोलायचे म्हणुन बोलतील.

शाकाहारी लोक तुम्ही भाज्या खातात मग रस्त्यावरचे गवत का खात नाही. ( हे देखील शाकाहारी )
कडुलिंबाच्या पानांची भाजी करुन का खात नाहीत. ( ते सुध्दा शाकाहारी मधे येते ना )
पिंपळाच्या झाडाची पाने देखील उकळुन खावीत. ( हे देखील शाकाहारी )
आंबे चविष्ट असल्यामुळे आंब्याची पाने देखील चविष्ट असतीलच.

शाकाहारी लोकांपैकी किती जण वरील गोष्टींचा आपल्या आहारात समाविष्ट करतात ? सांगा पाहु

दिवाकर,
आवडत नाही म्हणून न खाणे हा पण एक ऑप्शन आहे.

लोक ऊंदिर न खाण्यामागे काय कारण असु शकेल? या प्राण्यांची किळस येणे ? (सोशल कंडिशनिंग?). आणि बहुतेक भारतीय कदाचित याच कारणा मूळे खात नसावे कदाचित. पण हिंदू गायीचे मांस न खाण्यामागे गायीला देव मानणे हे कारण असावे. किळस नाही. असा माझा कयास.

दिवाकर..
१) दुर्वा हे गवतच आहे आणि ते औषध म्हणून पोटात घेतात. नागरमोथा, वाळा, औषधी चहा, बांबू आणि उस हेदेखील गवताचेच प्रकार आहेत. सर्वच खाल्ले जातात.
२) कडूनिंबाची पाने देखील गुढीपाडव्याला खातात. एरवीसुद्धा औषध म्हणून खाता येतात.
३) पिंपळाच्या कोवळ्या पानांची चटणी करतात. छान लागते.
४) आंब्याची पाने छान तुरट चवीची असतात. तोंडाला चव आणण्यासाठी चावून खातात. ती ताकाला वाटून लावून कढी करतात.

सुरेख आपण अनिता पाटील ब्लॊगचे ब्लॊगवरचे विचार पटताहेत म्हणुन प्रमोशन करता आहात काय? जातीय विद्वेष पसरवणारे ब्लॊग मायबोली पासून दूर ठेवा. मी हे विशिष्ट लेखाबद्दल बोलत नाही एकूण ब्लॊगचा रागरंग पाहून बोलतो आहे.

उस हेदेखील गवताचेच प्रकार आहेत > रस्त्यावरचे गवत का खात नाही प्रश्न असा आहे दिनेशजी.
कडुलिंबाची पाने फक्त १% लोक खात असतील ती देखील औषध म्हणुन आहारात समावेश नाही करणार
पिंपळाच्या पानाची चटनी मी पहिल्यांदाच ऐकली पण ते देखील सर्रास प्रकारात नाही येत

जसे वर मांस खातात तर गायीचे का नाही या धर्तीवरच गवत खातात तर रस्त्यावरचे का खात नाहीत हा प्रश्न आहे

वैदिकांचे वेळि यज्ञात बळी दिल्या जाणारया पशुंत गाय हा प्रमुख पशु होता. त्याचे कारण गायींची उपलब्धता हेच होते.
यज्ञसंस्थेतून प्राणिहत्येची हकालपट्टी करावी असे म्हणणारा गौतम बुद्ध हे ह्या श्रमण-संस्कृतीचे प्रमुख म्हणून बौद्ध व बौद्ध व जैन ग्रंथांतून दाखविलेले आहेत."गोमांस भक्षक वैदिक ब्राह्मण!
या नाच्चकिचा विरोध म्ह्नुन स्व्;ताला ते गाय भक्त व गायीला देव मानायला लागले .
कारन अशा यज्ञसंस्थेला बौद्ध व जैनानि खुप विरोध केला होता

ओ, ते भारतातल्या रात्री ऑनलाईन येतात त्या आस्तिक वा नास्तिक नॉनव्हेजिटेरियन लोकांना ष्टेकबद्दल विचारा. उग्गं दगड खाता का? माकड खाता का? हे अंधश्रद्धांच्या धाग्यावर काय लावलंय मघाचपास्नं? तिकडे व्हेज नॉनव्हेजवर न्या पाहू तुमचं खाद्यप्रकरण. आता, आस्तिक असाल तर नॉनव्हेजही खाऊ नका असलं काही नवीन नाटक काढलंय की काय?

Pages