हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.
जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.
नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.
https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit
(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):
अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.
स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.
वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.
(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :
विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).
बघा! म्हणुन मी म्हणत असतो
बघा! म्हणुन मी म्हणत असतो अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर. सश्रद्ध लोक तोटा होणार असेल तर श्रद्धा बिद्धा बाजूला ठेवतात. तेव्हा बरोब्बर चिकित्सक बनतात. तसेच अश्रद्ध लोक फायद्याच्यावेळी बरोब्बर आपण बी कसे सश्रद्ध आहोत असे दाखवतात. म्हणुन आपल्याला ओ माय गॉड लई आवडला.
सुरेख, नवीन कोर्या करकरीत
सुरेख, नवीन कोर्या करकरीत फ्लॅटमध्ये उन्दिर, पाली आणी झुरळे कशी येऊ शकतात. ते पण बिल्डिन्गही नवीन असताना? आणी खालच्या ( तळमजल्यावरच्या) दोन्ही फ्लॅटचे दरवाजे उघडे असताना, उन्दीर तिथे जात नाहीत पण उड्या मारुन दूधवाल्याच्या मागे येऊ कसे शकतात ह्याची मजा वाटली. घरात आणलेल्या सामानाचे पॅकिन्ग पूर्ण उघडलेले नसताना मोठी झुरळे एका एकी कशी घरात आली? अडगळ वा खरकटे नसतानाही बारके किटक हे कुठुन आले? हे प्रश्न का नाही पडणार? मी आधीच लिहीलेय की अन्धश्रद्धा समजू नका, पण मला कुतुहल मात्र नक्कीच आहे की हे एकदम असे का झाले?
नवीन घर आहे म्हणून आम्ही नुसता पाण्याने भरलेला कलश आणी देवाचा देव्हारा ठेवला होता. जवळ जवळ ७ वर्षानी आम्ही त्याची वास्तुशान्त घरातल्या घरात केली, कुणाला बोलावले नाही. गुरुजीना सुद्धा सुट्टी नसल्याने ( ते नोकरी करतात ) ते पूजा आटोपुन पळाले.
श्रद्धा आणी अन्धश्रद्धा मानण्यावर असते. मला अगोची पोस्ट आवडली. खूप मनापासुन आणी समर्पक लिहीली आहे. मी कुणीतरी वेगळीच आहे आणी काहीतरी जगा वेगळे करतेय असा शिष्ट अविर्भाव त्यात अजीबात दिसला नाही.
सातीने सुद्धा काळानुरुप ठाम आणी छान भूमिका घेतलीय. ज्याना काळाची पावले कळली ते पुढे गेलेत.
मी मात्र देवाचा व्यक्तीगत पातळीवर अतीशय मनोहारी अनूभव आल्याने सश्रद्धच आहे. माहेरी गणपती-गौरी नव्हते, कारण ते मोठ्या काकान्कडे आहेत. आम्ही तिथे जातो.( आता माझ्या सासरी असल्याने मी करते).
घरात शिवाशीव हा प्रकार नाही, जाती-धर्माचाही नाही आणी शारीरीक पण नाही.
माझ्या मते ज्याला देव मानायचे नाही त्याने मानु नये आणी ज्याला नाही मानायचे त्याने मानु नये. आणी एकमेकान्वर पण जबरदस्ती करु नये. जर एकमेकान्च्या भावना तुम्ही दुखावत असाल, तर मग ते वैयक्तीक कसे राहील?
आमच्या शेजारचे काका नास्तिक आहेत, पण काकु मात्र शेवटपर्यन्त पूजा करीत राहील्या. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न. कुणी माणसात देव बघतात तर कुणी मुर्तीत.
हो अल्पनाचे नाव राहीलेच. दोन
हो अल्पनाचे नाव राहीलेच. दोन कुटुम्बात पूल बनणे सोपे नसते, ते अल्पनाने छान साम्भाळलेय.
बी तुला खरच वाटत असेल तर मग शाकाहार- मान्साहार असा धागा काढ. ( मला वाटत अरुन्धतीने पूर्वी असा बाफ काढला आहे) माझ्या सारख्या शाकाहारी व्यक्तीला तिथे कीबोर्ड भरपूर बडवता येईल.:खोखो:
<<<<माझ्या मते ज्याला देव
<<<<माझ्या मते ज्याला देव मानायचे नाही त्याने मानु नये आणी ज्याला नाही मानायचे त्याने मानु नये. आणी एकमेकान्वर पण जबरदस्ती करु नये. जर एकमेकान्च्या भावना तुम्ही दुखावत असाल, तर मग ते वैयक्तीक कसे राहील? >>>>>>
याच्याशि मि १०० टक्के सहमत आहे.
<<<<<सुरेख, नवीन कोर्या करकरीत फ्लॅटमध्ये उन्दिर, पाली आणी झुरळे कशी येऊ शकतात. ते पण बिल्डिन्गही नवीन असताना? आणी खालच्या ( तळमजल्यावरच्या) दोन्ही फ्लॅटचे दरवाजे उघडे असताना, उन्दीर तिथे जात नाहीत पण उड्या मारुन दूधवाल्याच्या मागे येऊ कसे शकतात ह्याची मजा वाटली. घरात आणलेल्या सामानाचे पॅकिन्ग पूर्ण उघडलेले नसताना मोठी झुरळे एका एकी कशी घरात आली? अडगळ वा खरकटे नसतानाही बारके किटक हे कुठुन आले? हे प्रश्न का नाही पडणार? मी आधीच लिहीलेय की अन्धश्रद्धा समजू नका, पण मला कुतुहल मात्र नक्कीच आहे की हे एकदम असे का झाले? >>>>>>
प्रश्न पडने आनि तर्काच्या आधारे, बुध्दिच्या आधारे ऊत्तरे शोधने हेच मला म्ह्नायचे होते आनि हेच अपेक्षित हि होते. सांगन्याचा मुद्दा हा होताकिअसाहि दूष्टिकोन असु शकतो.
तुमच्या या अनुभवा मुळे तुमचि मन्यता दृढ् होन्यास मदत झालि ति बदलायचि कि नाहि सर्वस्वि तुमचा निर्नय आहे.
अगो च्या पोस्ट्वर Aschig नि चांगलि प्रतिक्रिया दिलि आहे<<< पण जे काही वैयक्तिक लढे समोर येताहेत ते नक्कीच प्रशंसनीय आहेत. अगो, शुम्पी आणि इतर, लिहील्याबद्दल धन्यवाद - केवळ वाचणारे काहि लोक यातून प्रेरणा घेऊ शकतील.>>>>>>>
मलाहि असेच वाट्ते.
बी आधी ( म्हणजे सुरेख ची ही
बी आधी ( म्हणजे सुरेख ची ही पोस्ट वाचायच्या आधीच) पण मला असेच वाटले आणी पुन्हा वाटतेय की सुरेख ला ड्युप्लिकेट आय डी समजायची चूक करतोयस. मायबोलीवर बरेच जण असे आहेत की ज्यानी बर्याच आधी मेम्बरशिप घेतलेली आहे, पण यावेसे वाटले नसेल/ वेळ नसेल या मुळे नवीन पोस्टी बघीतल्या की इथले बरेच जण त्या लोकान्वर ड्यु आयडी चा शिक्का मारुन मोकळे होतात. काहीन्चे लिखाण आणी विचार सारखे असतात, त्यामुळे मुद्दे समान येतातच. मग ती व्यक्ती धुमकेतू सारखी उगवली म्हणून तिला ड्यु का समजायचे?
<<< > Aschig यावर तुमचं मत
<<<
> Aschig यावर तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल स्मित
माझं मत प्रमाण असायची किंवा मानायची अंधश्रद्धा नका ठेऊ स्मित
इथे एक सुंदर ग्रे स्केल दिसते आहे. दोन्ही टोकांचे, तारेवरची कसरत करणारे, कधीही कोणत्याही बाजूला पडतील असे वाटणारे तसंच या स्पेक्ट्रमशी आमचं काही देणं-घेणं नाही म्हणणारे.
पण जे काही वैयक्तिक लढे समोर येताहेत ते नक्कीच प्रशंसनीय आहेत. अगो, शुम्पी आणि इतर, लिहील्याबद्दल धन्यवाद - केवळ वाचणारे काहि लोक यातून प्रेरणा घेऊ शकतील.
टोकाची भुमिका घ्यायची असल्यास गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात मदत करणं हे त्यात बसत नाही. पण कंडीशनींग मुळे, त्यातील आनंदामुळे, स्वतःच्या आणि इतरांच्या, यामुळे तसं सहजच केलं जाऊ शकतं. व्हायला हवं का तो प्रश्न वेगळा. कदाचीत अशा चर्चेमूळे त्यांना मदतच होईल स्वतःचे विचार तपासून आवश्यकता पडल्यास बदलण्यासाठी. (वन वे ऑर द अदर). दूसरी एखादी व्यक्ती स्वतःचे विचार लादू पहात असेल तर कदाचीत तसं वागणं जास्त कठीण जाणार.
बी, पण तुम्ही हे प्रश्न विचारताय हे पाहून आश्चर्य वाटलं. नेहमीचा इनोसन्स इथे दिसत नाही.>>>
Aschig सर,
अंधश्रध्दा नक्कीच नाही पण तुमच्या पोस्ट्स पटत आहेत म्हणून तुमचं मत जाणून घ्यावसं वाटलं. ही पोस्टही मनापासून पटली. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
टोचा यांनी पुढाकार घेऊन
टोचा यांनी पुढाकार घेऊन होमिओपदी निर्मूलन समिती स्थापन करावी या ठरावाला माझे तहेदिलसे अनुमोदन.
टोचाजी आगे बढो!
हम तुम्हारे साथ है.
*
या सगळ्या गोलगोल चर्चेतून पुन्हा एकदा मी म्हणतोय तेच सिद्ध होते. अंध आणि श्रद्धा अशा दोन गोष्टी नाहीत.
श्रद्धा कुठे-कशा/कुणावरही ठेवली, ती आंधळीच.
तुमची (देव/गणपती इ. वर)
तुमची (देव/गणपती इ. वर) श्रद्धा नाही ना? मग तुम्ही त्या निमित्ताने होणार्या गाणी, गप्पा गोष्टी, चित्र, पाकृ इ. स्पर्धेत भाग घेऊ नका, असे सांगणे ही देखिल निव्वळ अंधश्रद्धाच आहे.
आपल्याला आवडलेल्या सोशल इव्हेंटमधे सहभागी होणे यासाठी त्या इव्हेंटपाठच्या मूळ अथवा पर्सिव्ह्ड कारणाशी सहमत असायलाच हवे असे नाही. उलट, उघड्या डोळ्यांनी त्यात सहभागी झालो तर त्यातल्या कालबाह्य अथवा निगेटिव्ह गोष्टी दिसतात, अन श्रद्धेच्या नावाखाली त्या आक्षेपार्ह बाबी सहन करण्याऐवजी त्यावर सकारात्मक टीका करून चांगले बदल घडवून आणले जाऊ शकतात.
याच कारणासाठी देवाला देण्याच्या कोणत्याही बळीप्रथेचा निषेध केला जातो.
व्यक्तिशः मला नॉनव्हेज खायला आवडते. शेंडी/जाऊळ/गोंधळ/नवसाच्या वेळचे चुलीवर शिजवलेले मटन जसे 'लागते' तशी मस्त चव इतरत्र येणे मुश्किल असते. (लग्नाच्या जेवणातल्या वांग्याबटाट्याच्या भाजीची वा अळूच्या पातळभाजीची चवही अशीच युनिक असते) पण, या प्रकारे मेजवानी देण्यापाठी जो 'सक्ती' वा जबरदस्ती हा विचार आहे, त्याच्याशी मी सहमत नाही. मग ते निमित्त लग्नाचं असो, की नवस फेडण्याच्या बळीचं. त्यातल्या त्यात नवस म्हणजे देवाला लाच देवून मतलब साधण्यातला प्रकार, म्हणून त्याला जास्त विरोध.
ऐपतीबाहेर खर्च करुन असे जेवण देणार्याकडे मी शक्यतो जातच नाही. व्यक्ती माझे ऐकणार्यातला असेल, तर त्याला मी असे इव्हेंट शक्यतो करूच नकोस हे सांगतो. समोरासमोर असे सांगताना 'देवाला खुश करण्यासाठी जीव घेऊ नकोस, देवाने ज्याला जीव दिला, त्याचा जीव घेतल्याने तुझा देव खुश कसा होईल?' हे आर्गुमेंट तिथे वापरण्यात मला काही चूक वाटत नाही. तिथे व्यक्तिगत पातळीवर समोरासमोर बोलताना, मी समोरच्याला शक्यतो कमी दुखावत, अर्थात तो माझे ऐकणे थांबवेल अशी परिस्थिती निर्माण न करता, माझ्या दृष्टीने चुकीची असलेली प्रथा दुरुस्त करायचा, बदलायचा प्रयत्न करत असतो. तेव्हा 'तुझा देव' ऐवजी 'आपला देव' असाही शब्दप्रयोग करायला मला अजिबात वाईट/अपराधी/दांभिक वगैरे वाटत नाही.
आता याचा उपयोग होतो का? तर अनेकदा तो माणूस त्याच्यावर असलेल्या सोशल व पियर प्रेशरमुळे तो हा कार्यक्रम करण्यास बाध्य असतो. जसे, अशी जेवणावळ दिली नाही तर त्याची समाजातली पत कमी होते. घरातलेच लोक याला 'देवासाठी' इतकंही करायला परवडत नाही का? म्हणून टोचून बोलतात, वगैरे. अशावेळी किमान बळी देऊ नका हे सांगण्यातल्या अंनिस आर्ग्युमेंटपायी त्याला एक समाजमान्य पळवाट मिळते व खर्चिक नॉनव्हेजऐवजी छोटी व्हेज मेजवानी देऊन त्याची सुटका होते. हे अंनिसचं यश.
माझ्या सांगण्याने काही बदल झाला/होण्याची शक्यता असेल अशावेळी मात्र त्या सोशल इव्हेंटमधे सहभागी होणे, किमान तिथे हजर राहून सहभाग नोंदवणे मला गरजेचे असते. त्या सोशल इव्हेंटमधे सहभागी होणे म्हणजे दांभिकता वा माझ्या नास्तिकतेला मुरड असे मला अजिब्बात वाटत नाही.
गल्लीतल्या तरुण मुलांना नैसर्गिक रंगांनी, पाणी वाया न घालवता होळी खेळायला लावण्यासाठी तिथे जाऊन त्यांच्यासोबत रंगायला अन नाचायलाही मला वाईट वाटत नाही. तो दिवस मी एंजॉय करतो. माझ्यासोबत आजूबाजूच्या घरांतल्या समवयस्क लोकांनाही बाहेर काढतो. सगळे एकत्र असल्याने मजा जास्त येते, शिवाय तरुण मुलांच्या हूड वागण्याला पायबंद बसतो.
गणपती उत्सवात भेसूर आवाजात डीजे लावून दारू-पत्ते करणार्या "कार्यकर्त्यांना" नुसते सांगून अथवा माबोवर त्याबद्दल लिहून उपयोग नसतो. तिथे स्वतः उपस्थित राहून, कॉलनीच्या उत्सवात सर्वांना सहन होईल इतपतच्या छोट्या आवाजातला स्पीकरसेट लावणे, उत्सवानिमित्त आजूबाजूच्या मुलांना गाणी, खेळाच्या स्पर्धा घ्यायला लावणे, या गोष्टी करता येतात. यासाठी मी स्वत: बक्षिसे ठेवतो, मदत करतो, वेळात वेळ काढून हजेरी लावतो. यामुळेही माझ्या नास्तिकतेला मुरड बसत नाही.
उत्सवात सहभागी असला, तरी डॉक्टरला आरती बिरतीला बोलावून उपयोग नसतो, कारण ऐनवेळी नेमका इमर्जन्सी पेशंट येतो, असे सगळ्यांना, अन मी नास्तीक आहे, पूजा/आरती करणार नाही, हे कोअर कार्यकर्त्यांना ठाऊक असते.
हे सगळे करण्याला लढा म्हणा की अजून काही. पण हे मी करत आलो आहे अन करणार.
आता प्रत्यक्ष जीवनात करताना माईल्ड बोलता-वागता येतं, मग इथे असं तटकतोड 'समोरच्याला मूर्खात काढून शहाणपण शिकवल्यासारखं' का लिहितो? अन लिहून वर ते डिफेंड का करतो?
तर वाचताना, वाचणारा अन लिहिणारा, यांच्यात एकास-एक संवाद होत असतो, जो इतर व्यक्तिगत काँटेक्स्टच्या पलिकडचा असतो. माझे पटले नाही तर मला शिव्या हासडायला वाचक मुक्त असतो, त्याच वेळी मनाविरुद्ध असूनही मी लिहिलेले पटले, तर मनोमन मान्य करायला कोणतेही व्यक्तिगत वा सामाजिक संदर्भ आडवे येत नाहीत.
रॅडिकल विचार डोक्यावर आदळले, तर पचनी पडून आत उतरेपर्यंत प्रत्येकाच्या ग्रहणशक्ती, स्वभाव व इच्छेनुसार डायल्यूट होऊन योग्य तितके माईल्ड होतातच
अगो, साती, अल्पना नि शुम्पीतै
अगो, साती, अल्पना नि शुम्पीतै .. सगळ्यांच्या पोस्टस आवडल्या!
इब्लिसकाका .. वरची पोस्ट मस्तच!
<<तर वाचताना, वाचणारा अन
<<तर वाचताना, वाचणारा अन लिहिणारा, यांच्यात एकास-एक संवाद होत असतो, जो इतर व्यक्तिगत काँटेक्स्टच्या पलिकडचा असतो. माझे पटले नाही तर मला शिव्या हासडायला वाचक मुक्त असतो, त्याच वेळी मनाविरुद्ध असूनही मी लिहिलेले पटले, तर मनोमन मान्य करायला कोणतेही व्यक्तिगत वा सामाजिक संदर्भ आडवे येत नाहीत.
रॅडिकल विचार डोक्यावर आदळले, तर पचनी पडून आत उतरेपर्यंत प्रत्येकाच्या ग्रहणशक्ती, स्वभाव व इच्छेनुसार डायल्यूट होऊन योग्य तितके माईल्ड होतातच>>>
मणापासुन पटले
गल्ली चुकली
गल्ली चुकली
>>रॅडिकल विचार डोक्यावर
>>रॅडिकल विचार डोक्यावर आदळले, तर पचनी पडून आत उतरेपर्यंत प्रत्येकाच्या ग्रहणशक्ती, स्वभाव व इच्छेनुसार डायल्यूट होऊन योग्य तितके माईल्ड होतातच<<
इब्लिस अगदी सहमत आहे. एकूण प्रतिक्रियेशीच सहमत आहे
खर तर मला वाटल होत की अंधश्रद्धा व मेंदुविज्ञान या वर एका प्रतिक्रियेत दिलेल्या लिंकवर काही चर्चा होईल.१९८७ च्या आसपास डॉ दाभोलकर व स्वामी विज्ञानानंद यांच्या लोकसत्ता मधील वाद प्रतिवादात इंजेक्शनने स्वभाव बदलता येतो का? असा विषय होता. तपशीलवार आठवत नाही.
इब्लिसांचे वरील पोस्ट आवडले.
इब्लिसांचे वरील पोस्ट आवडले.
इब्लिस तुम्ही दांभीक
इब्लिस तुम्ही दांभीक
प्रत्येकनि आपआपलि वैयक्तिक
प्रत्येकनि आपआपलि वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा सांगितला आहे मि पन थ्योड्क्यात सांगते
मि कुठ्लाच सणवार पुजापाठ देवसंप्रदाय मानत नाहि कि ऊपास तापास कर्मकांड करत नाहि अशाकुठ्ल्याच कार्यक्रमांना मि जात हि नाहि.
याचे कारन असे कि कुठ्ल्याहि सनावाराच्या पौरानिक कथा माझ्या बुध्दिला पट्ल्या नाहित प्रत्येक कथा तर्काच्या कसौटि वर तपासुन पाहिलि या काळात तरि त्या माझ्यासाठि मला निरुपयोगि वाट्ल्या/वाटतात
मग आम्हि सणा वारात करतो तरि काय?
लांब कुठेतरि फिरायला जातो कुठेतरि ध्यानाच्या शिबिरात जाते किंवा घरिबसुन वाचन, टि व्हि पाह्ने रोजचि रुटीन चि काम करते
मग माझा, माझ्या मुलांच सामाजिकजिवन {सोशल नेटवर्क} काय आनि कसे?
सुरवातिला खुप अवघड गेले आपन प्रवाहाविरुध्द पोह्तोय असे वाटायचे कधितरि निराश पन वाटायचे मग मि
शास्त्रिय कारने शोधायचि दिवाळि तर हिवाळ्याच्या सुरवातिला येनारा सण थंडित शरिराला फॅटचि गरज असते
गोड् धोड खायला काय हरकत किंवा मुलांचा खाउ म्ह्नुन करायला काय हरकतआहे पन पुढे पुढे मला हेहि पटेना
झाले
असे वाटायला लागले आपन पळवाटा शोधतोय.मग ठरवल आत्ता बस्स॥ नाहि करायचे म्ह्न्जे नाहि समाज गेला तेल लावत मला नाहि पटत तर नाहि करनार शांत वाटल लिहताना पन शांत वाटतय
दिवाळीत शेजारि पाजारि फराळाचे ताट देतात{ देऊनये अशि ईच्छ असते} मि ते घेते आवडेल तेखाऊन ऊरलेल बाईला देतो.ताट परत करताना फळ घालुन देतो कुनि विचारले दिवा का नाहि लावला?
{दिवाळि नंतर फरशांनवरतेलाचे डाग खुप घान दिसतात} तुम्हि सण का नाहि साजरे करत तर हसुन त्याना समजेल असे त्यांच्याच भाषेत सांगते आम्हाला कुठ्लेच सन धार्जिन नाहित काय करनार देवाचि ईच्छा
गोड धोड करुन खाऊ वाटेल तेंव्हा खातो कॅन्ड्ल नाइट डिनर पन करतो दिवे बघायला छान वाट्तात आनि ताज्या
फुंलानि फ्लॉवर पॅट पन सजवते मनाला प्रसन्न वाट्ते
दुसर्याला बदलावायचा कधि प्रयत्न केलानाहि आम्हाला बघुन बद्लनारे पाहिले आहेत ऊगाच कुनाचे कंडिशनिंग करन्यात अनावश्यक ऊर्जा का खर्च करा?
कामवालि झाडुवालि वॅचमन सगळ्याना दिवाळिचे बक्षिस देतो आमच्या मित्रपरिवारामधे आमचे विचार सगळ्याना माहित आहेत तना तनि होइल अशि चर्चा आम्हि कधि करत नाहि ज्याच्यावर दोघांचि सहमति असते असे विषय बोलायचे बाकिचे सोडुन द्यायचे असे धोरन असते
वाचनार्याराना वाटत असेल आमचे जिवन खुपच निरस आनि बेचव असेल पन तसे नाहि
कसे ते नंतर सांगते.
मित्रहो, सुंदर चर्चा चालू
मित्रहो, सुंदर चर्चा चालू आहे. समाजात बहुसंख्य लोक आस्तिक असल्याने नास्तिकांना खुली चर्चाही करणे शक्य होत नाही. यासारख्या व्यासपीठावरून आपण हवे तसे व्यक्त होउ शकतो ही आनंदाची गोष्ट आहे. माझा एका वै. अन्धश्रद्धा व त्यावरचा लढा नमूद करतो.
पूर्वापार बरेच जण सकाळी उठल्यावर सूर्याला नमस्कार करतात. काही काळ मीही क रत होतो. तेव्हा मी 'सूर्यदेव' असा विचार न करता असा विचार केला की केवळ सूर्य आहे म्हणून आपण सारे सजीव जिवंत आहोत. तेव्हा त्याला नम स्कार म्हणजे एक मानवंदना आहे. ... कालांतराने मी असा बदल केला. रात्रभर आपल्या खोलीत १५ W चा रात्रदिवा जळत असतो. सकाळी सूर्योदय झाल्यावर सुद्धा आपण आळसाने काही काळ पलंगावर पडून राहतो तेव्हा तो दिवा जळत असतो. आता हे नक्कीच चूक आहे कारण व्रुथा दीपो दिवापिच..
तेव्हा तो दिवा सूर्योदय झाल्याझाल्या लवकर बंद करणे हीच खरी सूर्याला दिलेली मानवंदना आहे. आता मी जाग आल्याआल्या प्रथम ते करतो, मग हवे तर लोळतो. आता नमस्काराची मला गरज वाटत नाही व वीज बचत केल्याचेही समाधान आहे.
निसर्गाचे रक्षण हीच खरी ''पूजा'' आहे असे मला वाटते व म्हणून कर्मकांडे अनावश्यक वाटतात.
माझी वाद घालायची खुमखुमी
माझी वाद घालायची खुमखुमी सध्या कमी झालिय. पण संधी मिळताच मी आवर्जून सगळ्यांना मी नास्तिक असल्याचे सांगतो. डॉकिन्सचा हा मुद्दा मला पूर्ण पटतो कि अश्रद्ध नास्तिक लोकांनी सुद्धा त्यांचा अश्रद्धपणा उघडपणे उजळ माथ्याने मिरवायला हवा.
कुमार - १, तुम्ही एक चांगले
कुमार - १, तुम्ही एक चांगले उदाहरण दिले आहे. खूपदा आस्तिक आणि नास्तिक ह्यांची कृती/उद्देश एकच असते/असतो पण विचार मात्र वेगळा असतो. जसे की: मासिक पाळीमधे एकीकडे शिवाशिव तर दुसरीकडे आराम. एकीकडे देवीला बकरा कापणे तर दुसरीकडे जिवो जिवस्य जीवनम समजणे, एकीकडे गणेशाची पुजा करणे तर दुसरीकडे गणशोत्सवात नेटवर्कींग करणे, एकीकडे पहाटे सुर्याचे नमन करुन गायत्रि मंत्र जपणे तर दुसरीकडे त्याच्यामुळे वीज वाचते म्हणून त्याला मानवंदना देणे.
देवाधर्माच्या नावाखाली चालू
देवाधर्माच्या नावाखाली चालू केलेल्या अनिष्ट प्रथांना 'शास्त्रीय' कारणे चिकटवणे, त्यांची भलावण करणे ही अजून एक तिरस्करणीय अंधश्रद्दा.
"देव" ही संकल्पनाच मुळात कमकुवत मनांना आधार देण्यासाठी निर्माण केली गेलेली असल्याने, असल्या श्रद्धांच्या बेड्या तोडून समाजमन मजबूत करण्याऐवजी बी देताहेत तसे युक्तिवाद वापरून उभारी न धरलेलीच बरी, असा समज लोकांच्या मनात निर्माण केला जातो.
या समजाच्या आधाराने मग श्रद्धाळू पब्लिकला गंडविणारे फक्त मांत्रिक तांत्रिकच नसतात, तर आसारामासारखे पॉप्प्युलर गुरू लोकही असतात. बुवाबाजीसारखा ल्युक्रेटिव्ह धंदा दुसरा नाही!
अनेक लेव्हलला आपण फसत जातो. suffer होतो.
मग ते शनिवारी दगडावर ओतून खराब केलेलं वाया जाणारं खाद्यतेल असो, रिसायकल होऊन आपल्यालाच परत मिळणार आहे, हे ठाऊक असूनही देवळाबाहेर बाजारभावाच्या ५ पट किमतीत विकत घेतलेला खण-नारळ असो, तुम्हाला अमुक ग्रहदशा आली आहे, त्याची शांती करावी लागेल म्हणून तुमच्याकडून पैसे उपटणारा प्रतिष्ठित 'ज्योतिर्विद' असो, किंवा, 'वर' गेलेल्या तुमच्या तीर्थरूपांना डायरेक्ट स्वर्गात जाण्याची सोय हवी असेल, तर मला सोन्याची शिडी दान करा असे सांगणारा भिक्षुक असो, की नवी सून घरात आल्यानंतर सासर्याला डायबेटीस डायग्नोज झाला, म्हणजे ही माझ्या नवर्याच्या मुळावर आली असे म्हणत तिचा छळ करणारी सासू असो.
(नेहेमीच अंध असलेल्या) श्रद्धा कुठे अन किती वाईट रूप घेतील याचा नेम नसतो...
वर प्रतिसाद लिहिणारे कुमार हे
वर प्रतिसाद लिहिणारे कुमार हे 'बॉर्डरलाईन' श्रद्धाळू आहेत.
सूर्याला 'देव' म्हणण्यापासून ती दिव्यासारखी एक वस्तू असावी, इतके म्हणण्यापर्यंत त्यांच्या 'एनलायटनमेंट'ची प्रगती झालेली दिसते आहे. तो त्यांचा लढा आहे असे ते म्हणत आहेत.
>>
माझा एका वै. अन्धश्रद्धा व त्यावरचा लढा नमूद करतो.
<<
तरीही, या लढ्याला "श्रद्धाळू" वळण लावत, "दिवा लावतोस ना? लाव बाबा! पण सूर्य ना? देवच अस्तो बरं! नस्तिक बिस्तिक असं काऽही नसतं. तू वेग्ळी का होईना, श्रद्धा ठेवच हो!" असं सुचवणारा (अवतरणात त्यांच्याच स्टाईलने एकेरीवर लिहिले आहे) बी यांचा प्रतिसाद पाहून राहवलं नाही.
बी जे लिहितोय त्यावरून तो
बी जे लिहितोय त्यावरून तो कुणा नास्तिकाच्या पोस्टी वाचत आहे असे वाटतच नाही. त्यांची पोस्टे वाचताना डोळे मिटून आणि कानात बोटे घालून ला ला ला म्हणत आहे असे दृष्य माझ्या डोळ्यापुढे येत आहे!!
(No subject)
अगोने एकदम मस्त लिहिले
अगोने एकदम मस्त लिहिले आहे.
मी गेल्या १० / १२ वर्षात स्वतःहून कोणतेच सण साजरे केलेले नाहीत. करायचे नाही असे ठरवून वगैरे नाही. पण लक्षातच आले नाही सहसा. पण समजा एखाद्यावर्षी हाताशी वेळ असेल, वेळीच लक्षात आले तर काही करेनही. सण साजरे करणे आणि देवाधर्मावर विश्वास असणे याचा थेट संबंध असण्याची गरज नाही. सण, उत्सव मुख्यत्वे सामाजिक, सांस्कृतिक घटना असते. टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला तो सामाजिक, वैचारिक अभिसरणासाठी. गणपती देव पावला की स्वातंत्र्य मिळेल असे खचितच त्यांना वाटत नसणार. त्यांच्यापुढे उदाहरण म्हणून ख्रिश्चन धर्माच्या झेंड्याखाली दर रविवारी एकत्र येणारे पाश्चिमात्य असणार असे वाटते.
देवाधर्माच्या नावाखाली चालू
देवाधर्माच्या नावाखाली चालू केलेल्या अनिष्ट प्रथांना 'शास्त्रीय' कारणे चिकटवणे, त्यांची भलावण करणे ही अजून एक तिरस्करणीय अंधश्रद्दा.><< इतके दिवस या बाफवर लिहिले नव्हते. पण हा माझ्या अतिशय डोक्यात जाणारा प्रकार आहे. त्यातही ते टणाटणवाले टक्केवारी काढून आकडे लावत असतात ते तर अज्जिबात आवडत नाही. तो अतिशय किळस्वाणा प्रकार असतो. (आणि हा प्रकार सर्वच धर्मात सापडतो)
च्यापुढे उदाहरण म्हणून ख्रिश्चन धर्माच्या झेंड्याखाली दर रविवारी एकत्र येणारे पाश्चिमात्य असणार असे वाटते.>>> टिळकांसमोर दुर्गापुजेचे उदाहरण होते असे वाचले आहे.
एकदा का अंधश्रद्धामुक्त समाज
एकदा का अंधश्रद्धामुक्त समाज निर्माण झाला ना की समाजात काही प्रॊब्लेम्सच राहणार नाही.सगळ्या प्रॊब्लेम्सचं मूळ या अंधश्रद्धांमधे आहे. सर्वेपि सुखिन: संतु सर्वे संतु निरामय: एकदम आदर्श समाज निर्माण होणार. साले हे अंधश्रद्धाळू लोक ना हेच एक प्रगतीतील मोठा अडसर आहेत.
अंधश्रद्धाळू लोकांचे बकरे मग
अंधश्रद्धाळू लोकांचे बकरे मग बुद्धीवादी जीवांना मिळतील. बकरीचे मास खाऊन खाऊन बुद्धी तल्लख होऊन मग सगळ्या गोष्टींची शास्त्रिय कारणे चुटकीसरशी मिळतील. माणसाला मन उरणार नाही. जेवढे मन होते तेवढी बुद्धी वाढेल. जर कुणी विचारले की बकरी बिचारी तडफडून मरते आहे. तिच्या पोटात बाळ आहे ते तरी वाचवा. तर हे म्हणतील "अहो, जिवो जीवस्य जीवनम". मग विचारणारी व्यक्ती सुद्धा मांस खायला सुरवात करेन आणि होता नव्हता सर्व समाज १०० टक्के बुद्धीप्रामाण्यवादी होईल.
बी, दसर्याच्या शुभेच्छा.
बी, दसर्याच्या शुभेच्छा. सोनं घ्या सोन्यासारखं र्हावा.
आणि आता काय सांगु.
सोन नको आहे निवांत पाटील. बस
सोन नको आहे निवांत पाटील. बस एक निवांत जीवन हवे आहे
तुम्हालाही दसर्याच्या शुभेच्छा.
बी, शांत हो. नास्तिक लोकांना
बी, शांत हो. नास्तिक लोकांना मन नसतं असं नाही. ते देवाचं अस्तित्व मानत नाहीत म्हणजे ते निर्दय असतात असा अर्थ काढू नको. फक्त ते ह्या जगाकडे वेगळ्या दृष्टीने बघतात एवढंच. आस्तिक लोकं हे जग म्हणजे देवाची निर्मिती आहे आणि त्याचा प्रत्येक अविष्कार म्हणजे देवाच स्थापत्य आहे असं मानतात इतकंच. जो पर्यंत दोन्ही दृष्टीकोनांचा तोल ढळत नाही तोपर्यंत हा विरोधाभास मला तरी कुतुहलाचा विषय वाटतो.
हे बकरे कापाकापीचा आस्तिक/नास्तिक असण्या नसण्याशी संबंध नाही. स्वतः खाण्यासाठी बकरा कापला तर ते त्यांचे अन्न म्हणून ठिकच आहे ना. पण ज्याला तुम्ही चराचरात व्यापलेला म्हणता अश्या देवाला तुम्ही एखाद्या जिवाचा बळी देणं हे देवाला तरी मान्य होईल का? 'बळी' हे षड्रिपूंच्या नायनाटाचे प्रतिक आहे. खरा बळी आपल्या षड्रिपूंचा द्यायला हवा. हे षड्रिपू देखिल योग्य प्रकारे वापरले तर शत्रू नसून मित्र असतात. त्या भावनांच्या प्रकटीकरणात तारतम्य नसेल तर ते रिपु बनतात. असो...
तुला आणि इथल्या सर्वांनाच विजयादशमीच्या शुभेच्छा
जाता जाता: पोटात पिल्लु
जाता जाता: पोटात पिल्लु असलेली बकरी खाण्यासाठी कापत नाहित पण नवसासाठी नक्किच कापत असतील.
आणि मांसाहारी लोकांना प्लिज लिव्ह अलोन. नाहितर शाकाहार करणार्या लोकांना पोटभर जेवायला पण मिळणार नाही.
हल्ली हल्लीच एका अतिशय विद्वानाशी धडक झाली. तो कट्टर शाकाहारी (एक्सेप्ट मासे ) असुन त्याने बरेच डोके खाल्ले. तर आम्ही जेवताना खाणार्या दह्याबद्दल त्याला राग होता. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ हे त्या त्या जनावरांच्या पिल्लांच्या तोंडचा घास काढुन आम्ही खातोय हा त्याचा दावा होता. त्याने सांगितले कि आम्ही सगळेजण खुप नशिबवान आहोत कि तो आम्हाला भेटला. त्याचे कारण असे कि दर ५० लाख लोकांपैकी एका माणसाला गीता समजते आणि तो "तो" एक आहे. आणि आम्ही नशिबवान कारण आम्ही त्याला भेटलो. स्वतःच्या आई - वडीलांना शिव्या देणारा माणुस पहिल्यांदाच बघितला. पहिल्या दिवशी त्याला समजावण्याचा (?) बराच प्रयत्न केला कि बाबा प्रत्येकाचा आचार-विचार वेगळा. दुसर्या दिवशी ही तेच. अगदी तुम्ही सगळे XXXX आहात इत्यादी इत्यादी. मग सगळ्यांनीच दुर्लक्ष केले. तिसर्या दिवशी जरा वेगळीच शंका आली आणि ती खरीच होती. महाशय अगदीच कोणाच्या तरी आहारी गेले होते. पॅरानॉईड कंडीशन. त्याला वाटते तेच इतर लोकांनी करावे इत्यादी इत्यादी. अंगावर सगळीकडे फंगल इन्फेक्शन्च्या जखमा, त्यातुन येणारे रक्त. पहिल्या दोन दिवसात ही गोष्टच दिसली नव्हती. अगदी याक्क प्रकार. औषधे घेत नाही कारण त्याचे साईड इफेक्टस असतात. अगोदर कोणतेतरी आयुर्वेदीक औषध घेतले होते त्यात आर्सेनिक / मर्क्युरी आणि गंधक होते म्हणे आणि त्यामुळे आता त्याच्या अंगातली सगळी घाण अशी निघुन जात होती.
सगलेच असे विचित्र. अगोदर चेन्नईला नोकरी करत असत्ताना अश्याच कोणत्यातरी गृहस्थाच्या संपर्कात आल्याने, पुर्ण मेंदुचे फॉरमॅटींग झाले होते. आणि हा आता अगदी घरच्यांनाही ताप झाला आहे.
त्याने पहिल्या दिवशीच मला प्रश्न विचारला होता. आप भगवान मानते हो क्या? त्याला मजेत म्हटले, हाँ. मैं खुद भगवान हुँ. त्याने लगेच सांगितले कि मैं भी भगवानही हुँ. अॅक्चुअली त्याच वेळी समजायला हवे होते पण दिवा २ दिवस लेट पेट्ला. आपल्या इथे कोणी सायकॅट्रीक असतील तर अश्या प्रकारचे कंडीशनिंग चे अनेक उदाहरणे वाचायला मिळतील.
:इति अंधश्रध्दाय नुकसानकारक उदाहरण समाप्त :
Pages