वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते बाय चान्स हिमालय फ्लॅट असताना तिथेच बसले असतील आणि एकदम त्यांच्यासकटच हिमालय वर वर जाऊ लागला असेल. तपश्च्चर्या पुर्ण होत असेल (हजारो वर्षं) तोपर्यंत तो एवढा मोठ्ठा आणि उंच झाला असेल. ट्रेकिंगची गरजच नाही कैच्याकै Uhoh Happy (हे उगाच टीपी म्हणून लिहिलंय कल्पनेच्या भरार्‍या मारत).

फिर उतरनेका कैसे? कि उसके लिये अलग तपश्च्चर्या है फ्लॅट करनेको. नहि तो फिर उतरताना ट्रेकिंग करावच लागेल. Wink

शी त्यांची श्रद्धा आहे. तिला धक्का द्यावा की नाही? हिमालयाची निर्मिती भूकंपामुळे झाली असली तरीही साधनेसाठी झाली नाही असा होत नाही ना.

मी हे उपरोधाने लिहीत नाहीए. वादे वादे जायते....., तसं श्रद्धेला धक्का लावू नये हे प्रिन्सिपल कुठवर टिकवता येईल ते तपासून पाहण्याचा प्रयत्न करतोय. >>

जरूर माहिती द्यावी. त्यासाठी भांडण करायची गरज नाही. अज्ञान जिथे दुर करता येते तिथे करताच येते नाही का? भुकंपामूळे हिमालय निर्मिला गेला हे १०० पैकी ९५ सश्रद्ध लोकांना एकदा सांगीतल्यावर पटतेच. तुम्ही त्या ९५ वर कॉन्स्ट्रेट करा ना. त्यासाठीच लिहिले वर की 'शहाणे करून सोडावे, सकळ जण" पासून निदान मी दुर राहतो.

मराठीत म्हण आहेच ना, की घोड्याला पाण्याजवळ नेता येते, तर तिथपर्यंत नेणे हे ज्ञानी (हा शब्द चूक आहे) लोकांचे कर्तव्यच आहे. हिमालय का निर्माण झाला हे इथे लिहिले, ते सांगणे माझे कर्तव्य होते (एकदा) पण त्यानंतरही तो मान्य करत नसेल तर निदान माझ्यासाठी दॅटस ओके ! ती त्याची माहिती १०० टक्के बरोबरच असायला हवी का? आज नाही उद्या त्याला हिमालयाबाबत ज्ञान प्राप्त होईल आणि चूक कळेल, अशी माझी धारणा असेल.

तसेही हिमालय भुकंपामुळे निर्माण झाला हे सांगून श्रद्धेला थोडाफार धक्का बसला, अगदी सौम्य असेल तो पण इतके सध्यासाठी पुरे. त्यात मला तू मूर्ख, तू वेडा असे म्हणायची गरज वाटत नाही.

निवांतराव, हौडी?

नास्तिक माणसाने सत्यनारायण अरेंज करु नये हे पटत नाही.

डायबेटिस असलेला माणुस मिठाईचे दुकान काढु शकतो.

शास्त्रीय संगीत समजत / आवडत नसलेला इतरांसाठी मैफिल अरेंज करु शकतो की

नास्तिक माणसाने सत्यनारायण अरेंज करु नये हे पटत नाही. >> Lol

मग झाले तर ! सश्रद्ध माणसाने सत्यनारायण अ‍ॅरेंज केल्यावर शिव्या देऊ नयेत !

निवांत, ह्म्म. वो प्रश्न हैच.

पण खरंच नेहमी आश्चर्य वाटतं की तिथे ऋषीमुनी कसे राहिले असतील? स्वेटर्स वगैरेही नसावेत तेव्हा. वल्कलं किंवा उत्तरीय किंवा असंच काहितरी हाताने विणलेलं घालत असतील. योगाभ्यासामुळे ही ताकद येत असेल का भौतिक अ‍ॅड्व्हर्सिटीजशी जुळवून घ्यायची? बाकी हिमालयातच तपश्चर्येसाठी जात असतील कारण तिथेच मनुष्य वस्ती अत्यंत कमी असेल आणि तपश्चर्येसाठी आवश्यक असलेली एकाग्रता, शांतता तिथेच मिळत असेल.

हौडी केदार Wink

डायबेटिस असलेला माणुस मिठाईचे दुकान काढु शकतो.>> हे लै भारी. म्हनजे एखाद्या नास्तिकाने मस्त मोठे देऊळ बांधले, नवसाचे म्हणुन प्रसिध्दिस आनले, आणि एकदम मस्त पैकि धंदा सुरु केला (कारण नास्तिकच तो, आस्तिक असता तर असा धंदा केला अस्ता का सुरु, पाप पुण्याला घाबरुन असे नस्ते केले काहि.) . काय चुकिचे काय त्यात. बिझनेस इज बिझनेस.

वर लिहलेल्या वाक्यांशी खर्‍या जगात कुनाचा काही साधर्म्य असेल असे वाटत असेल तर तो त्याच्या बुदो समजावा.

तपश्चर्येसाठी आवश्यक असलेली एकाग्रता, शांतता तिथेच मिळत असेल.>>> अहो घरात पण मिळतेच कि. खोली बंद करायची , बेल , मोबाइल , लँडलाइन, घड्याळ सगळ बंद ठेवायचं.... हाकानाका. आणि हो कानात इंडसट्रीअल इअर प्लग घालायचे.

इथे केदारचे अनेक भक्त आहेत. तो जे जे लिहिले त्याला +१ मिळत जाईल. ही पण एक अंधश्रद्धाच आहे बुद्धीमान लोकांची.

जय केदारेश्वर महाराज, कृपाप्रसाद मिळावा हि नम्र विनंती.

:आपला अंधश्रध्द भक्त निवांतः

नाही बी,

इब्लिसांचा सत्यनारायणवाला प्रतिसाद वाचल्यानंतरच मी माझे मत बदलले आहे. फक्त तो वाचायचा राहून गेला आहे हे मला केदार ह्यांच्या प्रतिसादामुळे समजले.

अजूनही :

'मी माझ्या दृष्टिकोनानुसार वागतो व दुसर्‍याला एनलाईटन करायला जात नाही' ही बाब मला प्रत्यक्ष आयुष्यात योग्य पण फोरमवरील खास त्याच विषयावरच्या चर्चेत मुद्दा म्हणून मांडल्यास एक भोंगळच मत वाटते.

निवांत, ते आत्ताचं. आत्ता खोली बंद करुन हे सगळं बंद ठेवलं तरी डोक्यातले विचार जाणार नाहीत कारण सगळंच धकाधकीचं. १ महिना घरात तपश्चर्या (? Wink ) करायची म्हटली तरी १ महिन्याने हापिसात जायचंय आणि साठलेलं काम उरकायचंय हे डोक्यात येईलच. आणि अजून म्हणजे बाकीच्या लोकांना वाटेल डिप्रेशन आलंय आणि कोंडून घेतलंय Lol

बी, केदार नास्तिक असला तरी तो आस्तिकांना हिडिस फिडिस करत नाहिये. समजून घेतोय. म्हणून +१. कुणीच कुणाला मुर्खात काढू नये हे पटतंय का तुला? Happy मी स्वतः आस्तिकच आहे की. पण त्यातही मतं वेगळी असू शकतातच की.

बाकीच्या लोकांना वाटेल>>> चिडु नका पण याचा विचार करणार्‍यांनी ह्या गोष्तीच्या नादी न लागलेलच बरं... Happy

आणि डोक्यातले विचार जाणार नाहीत >>> जे लोकांना या गोष्टींच्या नादी लागायच असत ते अगदे डॉल्बीसमोर पण साधकच असत्तात.

हि अंधश्रध्दा कशी वाटतेय Happy

चिडु नका पण याचा विचार करणार्‍यांनी ह्या गोष्तीच्या नादी न लागलेलच बरं...>>> हॅ! हे असलं कधी करायला जाणार नाही आणि जमणारही नाही.

इथे केदारचे अनेक भक्त आहेत. तो जे जे लिहिले त्याला +१ मिळत जाईल. ही पण एक अंधश्रद्धाच आहे बुद्धीमान लोकांची >>

तुझी श्रद्धा आहे की मला इथे भक्त आहे. असे काही नाही. कुणी कुणाचे भक्त नसते. मी पण अनेकांना +१ दिला म्हणजे मी त्याचा भक्त का? ते ते त्या त्या वाक्यांपुरते असते.

हे का लिहिले तर तुला ज्ञान मार्गी करावे म्हणून.

प्रत्यक्ष आयुष्यात योग्य पण फोरमवरील खास त्याच विषयावरच्या चर्चेत मुद्दा म्हणून मांडल्यास एक भोंगळच मत वाटते. >>

फोरम वर अनेक मत वाचून अश्विनी नास्तिक होईल का?
फोरम वर हिमालय भुकंपामुळे निर्माण झाला हे वाचून बी त्याचे मत बदलेल का?
त्या तिकडं पलिकडं रोज अनके लोकं एकमेकांना भांडतात, त्यांची मत भाजपा आणि काँग्रेसबद्दल बदलली का? उलट गेले चार पाच महिने तीच ती भांडणं रोज वाहत्या बाफवर होतात.

अश्या फोरम्सचे महत्व बरेचदा थोड्या चर्चे, थोड्या विरंगुळ्यापेक्षा आणि स्वतःचे मत हिरिरीने मांडण्यापेक्षा पुढे काही नाही, अस्तित्वातील आयुष्य जास्त महत्वाचे असे मला आताशा जास्त वाटत चालले आहे. (पूर्वीही वाटायचेच, पण आता जास्त)

अर्थात काही लोकं आपल्या जाणिवा तपासून पाहतात, त्यांच्यासाठी मात्र तुम्ही जे म्हणता ते योग्य आहे. अशी संख्या फार नगण्य.

जय केदारेश्वर महाराज, कृपाप्रसाद मिळावा हि नम्र विनंती. >> पाटील तुम्हाला प्रसाद हवा असेल तर तुमची बुलेट क्लासिक घेऊन माझ्यासोबत हिमालयात यावे लागेल. मग प्रसाद नक्की. Happy

माणसाची सश्रद्द वा अश्रद्ध असणे ही अवस्था एका जैविक प्रक्रियेचा भाग आहे असे मला वाटतेच. अंधश्रद्धा हा भाग केवळ अज्ञान व अगतिकता यातून आला नसुन तो एक मानवी मेंदुच्या उत्क्रांतीतील अवशेषात्मक भाग आहे हे मी वर नमूद केले आहेच. इब्लिस ने म्हटले आहे की हे जावडेकरांचे इंटप्रिटेशन आहे. पण जावडेकरांनी यासाठी संदर्भ दिला आहे
http://www.newscientist.com/article/dn14694-superstitions-evolved-to-hel...
दुसरी गोष्ट अशी की अंधश्रद्धांच्या उत्पत्तीबाबत भाष्य करताना डॉ दाभोलकर देखील आदिमानवाचे उदाहरण देतात.
अश्रद्धतेचा वा सश्रद्धतेचा अतिरेक हा मला मनोविकाराचाच भाग वाटतो. अतिरेक शब्दाची व्याप्ती सापेक्ष आहे हे मान्यच आहे
बर्‍याच लोकांमधे आत्मविश्वासाचे रुपांतर सुपिरिअ‍ॅरिटी कॉम्प्लेक्स मधे व पुढे त्याचे रुपांतर मॅनियाक पर्सनॅलिटी मधे होते. त्यासाठी श्रद्धेची वा अश्रद्धेची अट नाही. या लोकांची वैचारिक लवचिकता नष्ट झालेली असते हे लोक स्वतःच्याच प्रतिमांमधे अडकत जातात. .
बाकी मते मी http://www.maayboli.com/node/49918?page=1#comment-3189597 इथे मांडलेली आहेतच. त्याचा फार तर पुनरुच्चार करतो

हे का लिहिले तर तुला ज्ञान मार्गी करावे म्हणून.>>> ह्युम्म्म्म्म म्हणजे बी ला पण पध्दतशीर पणे भक्त बनवायची कोशीश .... जय केदारेश्वर महाराज.

पण बी असा सहजरित्या नाही फसणार तुमच्या भुलवणीला Wink त्याची श्रध्द्दा अतुट आणि निश्चल (त्या जाहिरातीतील सिमेंट प्रमाणे) आहे.

अस्तित्वातील आयुष्य जास्त महत्वाचे असे मला आताशा जास्त वाटत चालले आहे.>>> हेच खरं आहे. ह्याच आयुष्यातील घटना, निरिक्षणं आपल्या आस्तिक्य किंवा नास्तिक्य बुद्ध्या (बुद्धीचं अनेकवचन Happy ) आपल्याही नकळत तपासायला लावतात आणि त्याप्रमाणे आपण बनतो, बदलतो, अजून ठाम होतो. आणि कुणा एकाचं आयुष्य हे दुसर्‍यासारखं नसतंच. प्रत्येकाची रांगच वेगळी.

आमची बुलेट क्लासिक तुमच्या चरणांवर अर्पण. >>>> निवांत केदारच्या पायावर बुलेट घालणार. काय जमाना आहे! Light 1

सत्यनारायणवाल प्रतिसाद, Wink ही स्मायली वापरून केदार यांना 'उचकवण्यासाठी' लिहिलेला आहे.

तसेच, त्यात सश्रद्धांकडून असल्या प्रथा का व कश्या वापरल्या जातात त्याची खिल्ली उडवण्याचा हेतू आहे.

बाकी नंतर लिवतो. सध्या नो टाईम.

बी, तुम्ही हिमालयाबद्दल जे लिहिलेत ते वाचुन मी थक्कच झाले. कमाल आहे तुमची. आणि वर तुम्ही केदारला इथे भक्त आहेत म्हणुन ते +१ लिहिताहेत असे म्हणताय....

मला आता वुडहाऊस आणि त्याची बर्टी, बीफी, फ्रेडी इत्यादी मंडळी उगीचच आठवताहेत... Happy

साधनाजी , काय राव तुम्ही. अहो ते वाक्य चक्क तुमच्यासाठी होतं..... मुळात हिमालयाची निर्मिती ही साधनेसाठी झाली आहे. मला वाटलं तुम्ही त्यांच्या पिंडदानाचा प्रश्न सोडवलात म्हणुन हे रिटर्न गिफ्ट आहे. Wink

मोठी मोठी लोक इथे बरंच काय काय लिहिताहेत.
वाचायला पण वेळ नाही.
अस्तित्वातले पेशंट जास्त महत्वाचे.

पण सध्या मला केदारची मते पटतायत.

Pages