' स्वच्छतेच्या बैलाला...!! ' संदर्भाने..

Submitted by नीधप on 4 November, 2008 - 10:31

दिवाळी अंकातल्या माझ्या लेखाच्या विषयासंदर्भाने अनेकांना आपलं म्हणणं मांडायचं आहे. साहजिक आहे कारण प्रॉब्लेम सगळ्याच आयाबायांचा आहे.
हा धागा तुमचं म्हणणं मांडण्यासाठी सुरू करतेय.
मी लेख लिहिला तेव्हा निश्चितच माझ्या डोळ्यासमोर पुढची कृती नव्हती. पण एकुणात मिळालेला प्रतिसाद बघता आपण काही करू शकतो का याबद्दल असा विचार सुरू होतोय.
माझा लेख इतर अनेक ठिकाणी देण्याबद्दल मला अनेकांनी विनंती केलीये पण एकदा इथे प्रसिद्ध झाल्यावर परत इतर ठिकाणी कोणी घेतील की नाही याची मला कल्पना नाही. कुणाला माहित असेल तर जरूर कळवावे.
माझ्याकडून होण्यासारख्या या तीन गोष्टी आहेत. ज्या माझ्या आवाक्यातल्या आहेत आणि मी त्या यशस्वीरित्या करू शकेन.
१. एका कव्हर लेटरसहीत या लेखाची प्रत मुंबईच्या महापौर शुभा राउळ यांना पाठवणे आणि त्यांना ह्या समस्येत लक्ष घालायला लावणे.
२. या विषयावर अजून अभ्यास करून मग अर्धा तासाचा एक माहितीपट तयार करणे. जो अनेक ठिकाणी लोकांवर आदळवणे (हॅमर चे भाषांतर..)
३. हाच विषय घेऊन किंवा या लेखातून २५-३० मिनिटाचा प्लॅटफॉर्म परफॉर्मन्स तयार करणे जो वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यक्रमांच्या वेळी त्या त्या ठिकाणी जाउन सादर करणे. जेणेकरून कुठल्यातरी स्त्री समस्यांशी संबंधित कामे करणार्‍या संस्थेला ह्याचा पाठपुरावा करण्याची इच्छा व्हावी.

प्रशासकीय पातळीवर करायचे प्रयत्न करण्याची माझी ताकद वा अनुभव नाही. पण हे वरचं मी नक्की करू शकते. यात कुणाला माझ्याबरोबर यायचं असेल, मला मदत करायची असेल तर तुमचं स्वागतच आहे.

तुम्ही स्वतःहून या संदर्भात काही उपक्रम हाती घेत असाल तर तेही इथे मांडा म्हणजे कोण काय करतंय याची माहिती आणि चर्चा दोन्ही घडेल.

तसेच कुणाला काही सूचना करायच्या असतील या संदर्भात तर त्याही जरूर कराव्यात.

या सगळ्या संदर्भात अजून काही माहीती असेल कुणाला. तर तीही कृपया इथे द्यावी.

सत्यजित याने काही शोधाशोध करून माहिती मिळवली आहे ती त्यानेच इथे टाकावी अशी मी त्याला विनंती करते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालची ताजी बातमी
तुळशीबागेत कुठेशीक तरी "सुलभ सन्कुल" बान्धलय!
(अन अर्थातच स्थानिक बीजेपी नगरसेवकान्च्या फण्डातून).

मोहन धारीयांच्या लोक्सत्तमधल्या लेखमालेत त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात असताना "water less toilets" चा चांगला अनुभव लिहिला होता तो इथे माझ्या शब्दात लिहिते.
एक मोठा खोल खड्डा ,त्यावर लाकडी फळी पाय ठेवण्यासाठी, आणि विधी उरकल्यावर लगेचच वरुन टाकायला २ तांबे माती. बास इतकेच. एक खड्डा भरल्यावर महिन्याभराने उत्तम सोनखत ज्याचा मुळीच वास येत नाही ,त्या लोकानी स्वतःच्या हातानी तुरुंगातल्या भाज्या पिकवण्यासाठी वापरले होते. महाराष्ट्रारख्या राज्यात जिथे पिण्याच्या पाण्याचीही बोंब आहे तिथे असे प्रयोग का होत नाहीत? ह्याचे तिहेरी फायदे आहेत
१.पाणी लागत नाही.
२.सोन खत मिळते.
३.उघड्यावर हागिणदारी हा प्रकार बंद होतो कारण माती टाकली जाते. आणि रोगराईचे प्रमान कमी होते.

मी नेटवर पहिले तेव्हा लक्षात आले बांगलादेशमधे अश्या toilets चा खुप ठिकाणी वापर केला जातोय.

"हिन्दुस्थानची लक्तरे देशाबाहेर टान्गण्याचा" >> हा आरोप ख्ररतर होउच नये.
आपण काहि केले नाहि तरि परदेषी photographer हे काम करतातच. त्यांना prizes पण मीळ्तात.
Slumdog मधला तो special scene बघुन जग धन्य झाले असेल !
आता इथे प्रश्न विचारण्यांची तोंड कशी बंद करणार?

"हिन्दुस्थानची लक्तरे देशाबाहेर टान्गण्याचा" <<
हे कुठे आहे या बाफवर? मी वाचले नाही. इच्छाही नाही.
परंतु कृपया ह्या बाफवर ते दळण उगाळू नये.
हिंदुस्थानाची लक्तरे इत्यादी अलंकारीक शब्दांच्या बुडबुड्यापेक्षा आम्हाला आमचे आरोग्य नक्कीच महत्वाचे वाटते. आणि इथे केवळ त्या संदर्भानेच विषय मांडणे गरजेचे आहे. ही विनंती.

नीरजा, पेज नम्बर चार वर रॉबिनहूडच्या पोस्टला उत्तर देताना २३ डिसेम्बर, २००९ रोजीच्या माझ्या पोस्ट मधे.....

>>>>>"बर नि म्हणते तसे डॉक्युमेन्टरी केली तरी "हिन्दुस्थानची लक्तरे देशाबाहेर टान्गण्याचा" दोषारोप आहेच उरावर!

रॉबिन, सॉरी म्यान, पण सरकारी खाती खरच धोबी घाटावर जशी आपटुन आपटन् धुतात तशी धुण्याची वेळ आली आहे! (यालाच तर नक्षलवाद म्हणत नसावेत न? ;प)" <<<<<<

हा उल्लेख आहे!
आता त्यात मी "नि म्हणते" अस म्हणलय खरं, पण मग तो सन्दर्भ तूच शोधुन काढ! त्यातुनही तुझी १५ नोव्हेम्बर, २००९ ची पोस्ट बघ

बायदिवे, हा सर्व धागा तुझ्या "रन्गिबेरन्गी" वर तर नाहीये ना? Proud तस असेल, तर आधीचे माझे लिखाण मला सेव्ह करुन ठेवायला हव, हो ना, हल्ली काय सान्गता येत नाही! Wink
त्यातुन आम्ही काय लिवले की ते "अलन्कारीक शब्दान्चे बुडबुडे", कुणी(ही) येऊन फोडून पुसुन टाकले तर काय घ्या! Proud

दुस्रा एक मुद्दा असा सिद्ध होतोय की माझी २३ डिसेम्बर २००९ ची पोस्ट गेल्या तब्बल "चार महिने २० दिवसात" तुझ्या वाचनात आलीच नाही! हा हन्त हन्त.... Lol

याच बाफवर हे वाचले म्हणुन लिहिले.
तुम्ही म्हणता ते खर आहे आणि या विषयावर बोलण्याची लाज वा भिती वाटु नये हिच माझीसुद्धा इच्छा आहे.

नीधप,
तुम्ही म्हणता ते खर आहे ,अजुनही पुण्यासारख्या शहरातल्या काही भागात,शहराबाहेर
स्त्रियांसाठी तर सोडाच पण पुरुषांसाठी देखिल मनपाचे स्वच्छ्ताग्रुह खुप कमी आहेत्,असले तरी लवकर न सापडणारे,अगदी कमीत कमी जागेत्,अडचणीत ,कारण हे बांधुन खुप पैसा खायला मिळत नाही हे ही एक कारण आहे,ते फुकटही आहे,
गेल्या आठवड्यात मी चिंचवड स्टेशन जवळच्या ए.एस्.एम. कोलेजला आय्.ई.ई.ई. ची प्रवेश परिक्षा साठी गेलो होतो,तिथे जवळपास एका वेळी १०००-१२०० मुले-मुली आणि त्यांचे पालक आलेले होते,बहुतेक सर्वजण सांगली,कोल्हापुर्,सातारा,सोलापुर आणि पुणे इथुन आले होते,त्यामुळे ३ तास थांबण आलच,तर त्या कोलेज ने परिक्षा हाल बाहेरचे असलेले १-२ स्वच्छता ग्रुहे बंद आणि पानी कुठे ही नव्हतं मी कारण विचारलं तर लोक घाण करतात म्हणुन हे केलं,ही अवस्था पूण्यासारख्या शहरात असेल तर ...

नीधप धन्यवाद!... एका नाजुक नी गम्भीर विषयाला हा घातल्याबद्दल! भार्ताने चान्द्र्यान मोहिमेसाथी कीती खर्च केला देव जाने, मला त्या बद्द्ल नक्कीच अभिमान आहे... त्यावेली मि माझ्या पत्रकार मित्राला लिहिल होत... अरे बाबा आम्ही चान्द तारे नहि मागत अहोत ... साध्या बेसिक सोयी नाही का अम्हाला मिलु शकत?

स्वछ्ता ग्रुह, पानी, रस्ते...
आपन हा विषय सोनिया गान्धी, प्र्तिभाताइ पातील ह्याना मेल करुन / प्र् त्यक्श कुनि भेतन शक्य असेल/ पत्र लिहुयाका? त्याना नक्कीच दखल घ्यावी लागेल! त्या हि स्त्रीया आहेत... त्यानाही हा अनुभव नक्कीच आला असनार.

स्वछ्ता ग्रुहाना लअगनार पानी rain harvesting करुन वापरन सहज शक्य आहे.
हा प्रश्न खरच ऐरनीवर येन खूप आवश्यक आहे!

ह्या संदर्भात सकाळ मधे आलेल्या बातम्या.
http://www.esakal.com/esakal/20110407/5595698701585524030.htm
http://www.esakal.com/esakal/20110407/5112743892819640381.htm
ह्याच विषयावर शोभा डे यांनी ही बॉगवरुन त्यांची मते मांडली आहेत. (सकाळच्या बातमीत त्याचा उल्लेख आहे)
http://shobhaade.blogspot.com/2011/03/loo-and-beholdhappy-international....

स्वच्छतेच्या बैलाला...!! <<< हा दिवाळी अंक माझ्याकडून वाचला गेला नव्हता Sad
आजच हा लेख पाहिला आणि संपुर्ण वाचून काढला,
सुंदर लेख लिहिला आहेस, आणि अतिशय महत्वाचा विषय मांडला आहे

परवाच वाचले की या निवडणुकीत पुण्यात महिला नगरसेविका संखेने नगरसेवकांपेक्षा जास्त आहेत. म्हणजे एका अर्थाने बहुमतात आहेत. या प्रश्नाला महापालिकेकडून प्रतिसाद मिळण्याची चांगली संधी आहे.

रेल्वेलाईनच्या कडेला बसणार्‍यांवर हसताना आणि सोबतीला त्यांच्या नाईलाजावर हळहळही व्यक्त करताना वर लेखात उल्लेखलेले त्रास आपल्या आसपासच्या स्त्रियांनाही भोगावे लागत असतील असा कधी विचारही केला नव्हता. ती जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद.

हा लेख आणि या लेखातील विचार प्रत्येक पुरुषापर्यंत पोहोचले पाहिजे.

आजच बालगंधर्वला या विषयावरचा ओजस सु. वि. दिद्गर्शित 'ओ वूमनिया' चा प्रयोग पाहिला.
आजुबाजूला मधेमधे हशा येत होता, मला काही हसावेसे वाटले नाही.
अगदी थेट आणि वास्तवदर्शी.

शेवटची सरळ रेघ : पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यापासून संसदेत बोलण्यापेक्षा बाहेरच जास्त बोलू लागलेत. मग ते भूमीपूजन वा उद्घाटनाचे कार्यक्रम असोत की परदेशदौरे असोत; त्यांची वन मॅन आर्मी सर्वत्र संचार करत 'लोकसहभाग' वाढवायचं आवाहन करतेय. नियोजन आयोगासाठीही त्यांनी जनतेला सूचना पाठवायला सांगितल्यात. आपल्या अमोघ वक्तृत्वाने, धक्कातंत्राने मुरली-ड्रमवादनापासून मुलांमध्ये चाचा मोदी होण्यापर्यंत त्यांनी मजल मारलीय. यात एकच धोका जाणवतो- या सतत 'लोकांकडे' जाण्याच्या शैलीचा केजरीवाल निर्मित स्टॅण्डअप् कॉमेडीत शेवट होऊ नये!
>>>> सर्व परामर्श घेतलेल्या पहिल्या लेखात हि वाकडि रेघ मारायच काय कारण आहे ते कळल नाही!!

Tumchya informationsathi पुण्यात जागोजागी स्वच्छ टॉयलेट्स उपलब्ध आहेत. म्हणजे डेक्कन जिमखाना स्वारगेट धायरी कोथरुडचे.

बस स्टँडला एक हिरकणी कक्ष असतो. आतापर्यत एकदाही त्याची चावी उघडून कोणाला वापरायला दिली हे बघण्यात नाही आलं. विचारलं तर दार दुसरीकडुन उघडं आहे तिकडनं जा असं सांगतात. प्रत्येक बाबतीत हीच बोंब आहे.

हिरकणी कक्ष काय भानगड आहे.?
अ‍ॅपवर फार तर माहिती मिळेल पण जर ते टॉयलेट वापरण्यायोग्य नसेल/ कुलूप असेल तर ते उपलब्ध नसण्यासारखेच आहे. तसेच मुतारी वेगळी व टॉयलेट वेगळे. काही ठिकाणी फक्त मुतारीच जेमतेम सोय असते. टॉयलेटची नसते. ते अ‍ॅपवर कसे कळणार?

Mutari charges for female at Theur-s.jpg

नुकताच दोनेक आठवड्यांपूर्वी अष्टविनायकांपैकी एक असलेल्या "थेऊरला" गेलो होतो.
सोबत नात्यातील दोन/चार स्त्रीया होत्याच.
थेऊरमधे गाड्या पार्किंग करण्यासाठी देवस्थान/स्था.स्व.संस्थेची पार्किंगच्या जागा आहेत.
तिथेच एक शौचालय कम मुतारी आहे.
पुरुषांना मुतारीत जाण्यात/वापरण्यास काहीही रक्कम द्यावी लागत नाही.
स्त्रीयांना मात्र लघवी करता जाण्यासही तब्बल पाच रुपये दरडोई आकारले जातात.
ते वसुल करण्यास एक खवट म्हातारा माणुस (पुरुषांचे मुतारीचे प्रवेशद्वारापाशी) खुर्ची टाकुन बसलेला अस्तो.
व येणार्‍या प्रत्येक स्त्रीला अगदी लांबुनच आरडाओरडा करीत शब्दशः लाज आणित आधी पैसे देण्यास फर्मावित असतो.
मी २०१६ मधे रहातोय, एका देवस्थानाच्या गावात रहातोय, याचाही क्षणभर मला विसर पडला.
मंदिरा अलिकडेच मंडई भरते, तिथे अनेक स्त्री विक्रेत्या दिसत होत्या, मात्र त्या कुठे जातात, वगैरे सर्व्हे करणे शक्य झाले नाही, पण नक्कीच त्या इथे "पाच रुपये" देऊन जात नाहीत हे उघड दिसत होते.
पर्यटनस्थळ दिसले, की अगदी मुतारी पासुन लुबाडण्यास सुरुवात करायची अशाने "भारत महान" होणार आहे का?
बर ही लुबाडणू़क फक्त स्त्रीयांचेच बाबतीत का? स्त्रीचे मुत्र व पुरुषाचे मुत्र वेगवेगळे अस्ते का की जेणेकरुन संरक्षितरित्या मुतण्यास स्त्रीयांना पाच रुपये द्यावे लागावे व पुरुषांना फुकट???
"स्वच्छ भारत" वगैरे अभियानाचे हे धिंदवडे आहेतच, पण आपण भारतीय सर्वपातळीवर अजुनही स्त्रीयांचे बाबतीत किती कुजकट/मागास/घाणेरड्या मनःस्थितीत आहोत याचे जितेजागते उदाहरण आहे.

[जाताजाता: त्या शनिशिंगणापुरच्या शनिमंदिराच्या चौथर्‍यावर चढण्याची स्त्रीयांकरता निश्चितच बिनगरजेची आंदोलने करण्यापेक्षा "स्त्रीयांच्या खरोखर गरजेच्या मलमूत्रविसर्जनाच्या सार्वजनिक सोईच्या" प्रश्नावर स्त्रीयांकडून आंदोलने का होत नाहित?
स्त्रीयांना त्यांच्या यश्चकिंतितही गरजेच्या नसलेल्या शनिशिंगणापुर वगैरे प्रश्नांवर भडकावुन त्यांचेकडुन तशी आंदोलने करुन घेणारे बिनडोक अस्तात की त्या भडकलेल्या(?) स्त्रीया बिनडोक अस्तात? ]

बायकांना पैसे पडतात यासंदर्भात मला एक कारण ऐकायला मिळाले होते जे सयुक्तिक की नाही हे मलाही अजून समजत नाही.
बायकांसाठी मुतारी व संडास वेगळे नसतात. पुरूषांसाठी वेगळे असतात. पुरूषांच्या संडासात शुल्क असते म्हणे.

तरीही पाच रूपये हे शुल्क अती आहे. त्याच्या कारणांमधे बघितलत तर... (पुढील माहिती खात्रीशीर नाहीये)
एस्टी स्टॅण्ड वा तत्सम ठिकाणची बरीचशी सार्वजनिक स्वच्छतागृहे ही खाजगी कंत्राटदारांना चालवायला दिलेली आहेत. त्यांच्यावर स्वच्छता राखणे, शुल्काची कमाल मर्यादा असले कुठलेही वचक नाहीत. ते मन मानेल ते शुल्क घेऊ शकतात. Angry

शनिशिंगणापूर प्रश्न वैयक्तिकरित्या माझ्यासाठी बिनगरजेचा आहे. समाजासाठी बिनगरजेचा आहेच असे मी समजत नाही. पण तो विषय इथे नको.

राइट टू पी संघटना या संदर्भाने काम करते आहे. त्यांच्यापैकी एकीची मुलाखत गेल्या एक दोन वर्षातल्या ऐसी अक्षरे च्या दिवाळी अंकात होती. तिथेही लोकांनी मुद्दा सोडून हिंदू मुस्लिम गोंधळ घालायचा प्रयत्न केलाच आहे. असो.
राईट टू पी संघटनेला फार कमी दाद मिळतेय कारण हा विषय, ही समस्या हाताळणे, त्याबद्दल खरोखरच काही करणे हे कुठल्याही राजकीय पक्षासाठी गैरसोयीचे आहे. त्यामुळे एकही राजकीय पक्ष हा मुद्दा अजेंड्यावर घेऊन हाताळायला तयार नाही.
घोषणा सगळेच करतात फक्त.

>>>> कारण हा विषय, ही समस्या हाताळणे, त्याबद्दल खरोखरच काही करणे हे कुठल्याही राजकीय पक्षासाठी गैरसोयीचे आहे. <<<<
गैरसोयीचे म्हणण्यापेक्षा "मतांची बेगमी करण्यास" निरुपयोगी आहे म्हणून दुर्लक्ष असे म्हणता येईल .
अन्यथा, पंढरपूरच्या यात्रेमधेही स्त्रीपुरुषांकरता स्वच्छता गृहाच्या तात्पपुरत्या सोई, शेवटी न्यायालयाने बडगा उचलल्यावरच करण्याचे सुचले नसते. (त्यातुन पंढरपूरची यात्रा म्हणजे हिंदुंची, त्यांना विचारतय कोण, अन त्यांन्ना स्वच्छतागृहे देऊन मतांची बेगमी-धृवीकरण होणार नाही याचि खात्री - मग कशाला काही करा तिकडे? ).

Pages