आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की
आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .
आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .
आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .
कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .
गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .
हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ?
त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?
लोकहो ,
आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया
खाली आणखी काही पॉईंट अॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया
आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.
कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू
रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .
१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही
२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे
जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण
त्यामुळे आता रोजचे गुण १०.
म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अॅड करत जाईन .
काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल
आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा .
31 August, 2014 - 12:59
१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०
१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल
४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस
लाँग विकेंड असल्याने बाहेर
लाँग विकेंड असल्याने बाहेर खाणं झालं .. कधी लंच तर कधी स्नॅक्स केलाच नाही .. पण चाललो खुपच ..
आता उद्यापासुन परत रुटीन सुरु ..
८/२९ - ९/१ : १५/३०
माझ पण सगळच गडबडलयं. व्यायाम
माझ पण सगळच गडबडलयं.
व्यायाम -४
फळ - १
प्रोटीन -१
रात्रीच जेवण ८ वाजता - १
बाहेरच खाण - ०
साखर - ०
बेकरी - १
असे मोजलेत तर ८ होतात पण मला वाटत माझे ६/१०
१ सप्टे बेक्कार
१ सप्टे
बेक्कार दिवस
३/१०
व्यायाम ०
फ्रूट १
प्रोटीन १
नो बेकरी १
नो hoteling ०
साखर ३ च ०
हलके व लवकर डिनर ०
१ सप्टे बेक्कार
१ सप्टे
बेक्कार दिवस
३/१०
व्यायाम ०
फ्रूट १
प्रोटीन १
नो बेकरी १
नो hoteling ०
साखर ३ च ०
हलके व लवकर डिनर ०
माझे ०१-०९-२०१४ चे
माझे ०१-०९-२०१४ चे ६/१०
व्यायाम - १
फळ - १
प्रोटीन -१
रात्रीच जेवण ८ वाजता ०
बाहेरच खाण -१
साखर १
बेकरी - १
साती: हो खुप काळजी घ्या. मी
साती: हो खुप काळजी घ्या. मी पण माहेरी आल्ये आणि २ महिन्याची योगासने फुकट जातायत अस वाटायला लागलय २ दिवसातच.
०१/०९/२०१४ अन्दाजाप्रमाणे,
०१/०९/२०१४
अन्दाजाप्रमाणे, गणेशोत्सवात आहारास सुरुन्ग लागला. त्यामुळे व्यायाम बर्यापैकी केला. एकूण गूण आतापर्यन्तः ९६/१३०.
आजचे गूण डिटेलमधे लिहिन.
माझे कालचे मार्क १/९/२०१३ =
माझे कालचे मार्क १/९/२०१३ = ९/१०
व्यायाम - ४
फळ - १
प्रोटीन -१
रात्रीच जेवण ८ वाजता ०
बाहेरच खाण -१
साखर १
बेकरी - १
आलं बाबा जरा गाडं रुळावर..
आता गौरीच्या दिवशी काय काय होतय बघु,,,
देवा मला वाचव...
०१-०९-१४ व्यायाम
०१-०९-१४
व्यायाम नाही-०
साखर२चमचे-१
फळ१-१/२
झोप इ. जेवण उशीरा झाले पण जेवणात आणि झोपण्यात दीड -दोन तासाचा फरक होता- १/२
बाहेरचे खाणे नाही-१
बेकरी नाही-१
चमचमीत+अर्धा मोदक-०
प्रोटिन -१
५/१०
पण चमचमीत खाण्याबद्दल अजून एक कमी-
सो ४/१०
आमचं गाडं रूळावर मग थोडं
आमचं गाडं रूळावर मग थोडं घरसून पुन्हा रूळावर येतंय.

व्यायाम नियमित सुरू आहे. वर्किंग डे ला ३ माईल्स आणि ऑफ्फ असेल त्या दिवशी ५ माईल्स.
उद्या गौरीचे जेवण जेवायला जायचं आहे. ५ भाज्या वगैरे. उद्या काही विचार करणार नाही.
>> व्यायाम नियमित सुरू आहे.
>> व्यायाम नियमित सुरू आहे. वर्किंग डे ला ३ माईल्स आणि ऑफ्फ असेल त्या दिवशी ५ माईल्स >>
हे तु कसं मोजतेस ग ?
आणि कसं करतेस ते पण सांग
अगं स्मिता माझ्याकडे व्हिडिओज
अगं स्मिता माझ्याकडे व्हिडिओज आहेत पॉवर वॉकचे. ते समोर सुरू ठेवून त्यात ते जसे व्यायाम प्रकार करतात तसे करत रहायचे.
तु ये एकदा माझ्याकडे पेन ड्राईव्ह घेऊन. तुला देईन मी.
ओक दक्षिणा नक्की....
ओक दक्षिणा नक्की....
गणेशोत्सवात भारतात होते...आणि
गणेशोत्सवात भारतात होते...आणि अपेक्षेप्रमाणेच सगळं बोंबललं!! (चांगला बहाणा आहे ना... ;))
तरिही चहा शक्यतो बिनसाखरेचाच घेतला. आणि कंपल्सरी रोज मोड आणलेले मुग खाल्ले, पण नो व्यायाम.
(घरात अचानक एक मेडिकल ईमर्जन्सी आली, मग बर्यापैकी धावपळ आणि टेन्शन होतं. जेवणा-खाण्याचा कोणाचाही मूड नव्हता. काल ईकडे परत आलेय पण मन अजूनही तिकडेच आहे.
)
वजन करुन पाहीले तर काहिही वाढ नाहीये. टेन्शनचा असाही परिणाम असतो का?
असो...माझे गूण गेल्या ८ दिवसांचे ...भला मोठ्ठा भोपळा...
ज्याची भीती होती तेच झालं..
ज्याची भीती होती तेच झालं.. गणपतीत सासरी गेल्यावर सगळंच बोंबललं.. व्यायाम नाही, गणपतीच्या मेन्युतलं भाताचं वर्चस्व, गुळाचे नैवेद्याचे पदार्थ, भरपूर काम पण जेवणाच्या वेळांची ऐशीतैशी.. अजून अनंताची पूजा बाकी आहे ती पुढच्या आठवड्यात.. तेव्हाही दोन-तीन दिवस हेच.. पण अगदी वाट बघत्येय मी परत इथे यायची.. काल वजन बघितलं.. एवढं सगळं असून ते आहे तेवढंच आहे हे नशीब !
सातीसारखंच मलाही जुने पण आवडते कपडे घालू शकण्याचा आनंद घ्यायचा आहे..
साती, दक्षिणा, केदार, वर्षूनील, तुमची प्रगती पाहून छान वाटत आहे.. माझ्या आशेला जागा आहे
jillian michaels आहे का
jillian michaels
आहे का कुणाकडे?
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=1Pc-NizMgg8
यू ट्यूब वर आहे ना jillian michaels
माझे अपडेट १०/१० मोदकांच ताट
माझे अपडेट
१०/१०
मोदकांच ताट समोर दिसत असूनही फक्त १ तुकडा घेतला , जमतय
जिथे शक्य आहे तिथे नाही
जिथे शक्य आहे तिथे नाही म्हणायला शिका
स्वतःवर कंट्रोल तर आपल्यालाच ठेवायचा आहे . जिथे आपली माणस आहेत तिथ हक्कान सांगा .
जिथ सांगण अवघड आहे तिथे किमान पोर्शन कंट्रोल करा
>>मोदकांच ताट समोर दिसत
>>मोदकांच ताट समोर दिसत असूनही फक्त १ तुकडा घेतला >>
केदार तुम्ही खरच ग्रेट आहात.....हे मला खरच नाही जमणार
मला जमलंय स्मिता. सकाळी
मला जमलंय स्मिता. सकाळी शेजारणीने दोन मोदक दिले होते. मी एकही खाल्ला नाही. आणि तिला सांगितलं.
5/10
5/10
.
.
२/९/१४ १)व्यायाम :
२/९/१४
१)व्यायाम : ४
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १/२
७)साखर ३ चमचे इ. : १..... .....९.५ /१०
१३१ / १६०
शाब्बास केदार आणी दक्षु
शाब्बास केदार आणी दक्षु
आज दिवसभर खादाडी होणार हे
आज दिवसभर खादाडी होणार हे ओळखून दिडपट व्यायाम केला.
फळ- अर्धं.
बाहेरचे खाण्यात आलुभात, एक जिलेबी हे गणपतीविसर्जनाचे म्ह्॑णून; एक ग्लास थम्सअप,एक समोसा आणि मोठासा केक वाढदिवसाच्या पार्टीत.
काल स्वतः केलेल्या मोदकातलासुद्धा फक्त चाखून पाहिला होता. मग आजचे हे खाण्याचे प्रकार पाहिल्यावर एका शिळ्या मोदकाचाही समाचार घेतला.
तसं मला गोड आवडत नाही पण ही गोडाची जबरदस्तीच झाली. (मला चॉईस मिळाला तर मी भात एक्स्ट्रा खाईन)
अजून घरी गेले नाहीये. म्हणजे रात्री कधी जेवणार कधी झोपणार माहित नाही.
29/08-10/10 सगळे जमले. 30/08-
29/08-10/10 सगळे जमले.
30/08- 3/10 व्यायामाला दांडी, गणपती निम्मित बाहेर जेवण, २ मोदक त्यामुळे सगळे minus मध्ये
31/08- 8/10 २ मोदकाचे आणि आम्रखंडाचे -२ व्यायाम ६० मिनिटे
01/09- 10/10 ४ मैल चालण्याचा व्यायाम आणि बाकी सगळे जमले.
02/09- 6/10 कामामुळे व्यायामाला सुट्टी..पण उद्या भरपाई करणार
मलाही वजन कमी झाले नसले तरी शरीरावरची चरबी कमी झाल्याचे जाणवत आहे. त्याने उत्साह वाढलाय.
सगळे किती छान follow करत आहेत
सगळे किती छान follow करत आहेत .दक्षिणा ,वर्षु तै, thanks for video link.
मी पण ठरवले आहे आता व्यायाम करायचा आणि डायेट पण पाळायचे ..
रोज १ मैल चालणे होते.
माझे कालचे मार्क्स (२/९/२०१४)
माझे कालचे मार्क्स (२/९/२०१४) ७/१०
तब्येत थोडी बरी नसल्यान फक्त १५ मिनिट वॉक केला ...सो ३ मार्क्स कट ...
उद्या पासुन परत नियमीत सुरुवात
२ / ९ ७/१० १)व्यायाम :
२ / ९
७/१०
१)व्यायाम : ३
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे : ०
७)साखर ३ चमचे . : ०
Pages