बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शूम्पी Happy
सुतरफेणी दुधात भिजवून खातात. (काहीजण वरून सायही घालतात.) जर गोड सुतरफेणी असेल तर वेगळी साखर घालावी लागत नाही. (तरी माझे काही आप्त साखर घालतातच!) जर अगोड सुतरफेणी असेल तर दुधाच्या जोडीने साखर घालावी लागते. दुधात भिजलेली सुतरफेणी जीभेवर पाहता पाहता विरघळते. Happy
नुसती सुतरफेणी (दुधात न भिजवलेली) खायलाही काहीजणांना आवडते.
सुतरफेणीच्या ब्रँडबद्दल मात्र मला माहित नाही.

कोमट / गरम दुधात सुतरफेणी चटकन विरघळते, पण गार दुधात वेळ लागतो विरघळायला. तरी माझे मत गार दुधाला.

१५ तारखेला लहान मुलांचा डान्स कार्यक्रम आहे घरी. १०-१५ मुलं आणि तेवढ्याच आया. तर मला तिरंगा थिमचे काही स्नॅक्स सुचवाल का?
शक्यतो सकाळिच करून ठेवायचे आहे. कारण नंतर डेकोरेशन साठि वेळ जाईल.

मुलाच्या ६ व्या वाढदिवसाच्या पार्टी साठी मेनू ठरवायला कृपया मदत कर।
साधारण १७ मोठे आणि ८ लहान आहेत। … सगळ घरीच करायचे आहे।
२ भाज्या, जीरा राईस , दाल तडका , स्टार्टर मध्ये समोसा चाट चांगले वाटेल का?
गोडात गुलाबजामून आहेत।

तिरंगी इडली फिक्स! ढोकळ्यासाठी मोठी ताटली नाही म्हणुन Happy
आणि क्युटिज, मार्शमेलो, किवी किंवा कँटेलूप चे तिरंगी फ्रूट प्लेट!

लहान मुलं असतिल तर फ्रुट प्लेट पेक्षा स्युअर्स कर - विथ मार्शमेलोज्/चीज, ऑरेंज साठी कॅंटेलोप/ पपया आणि ग्रीन साठी किवी किंवा हनी मेलन...

ग्रिल्ड टिक्का - पनीर + ग्रीन कॅप्सिकम + रेड कॅप्सिकम किंवा तंदुरी चिकन पण ऑरेंज साठी वापरता येइल.

तिरंगी केक, बर्फी करता येइल.

वेजी चिप्स मिळतात त्यात ऑरेंज आणि ग्रीन असतोच.. व्हईट साठी साबुदाणा चिप्स वापरायच्या.

बॉबी टाईप्स तळणाचे ग्रीन्/ऑरेंज, व्हाईट शेप्स मिळतात इंग्रो मधे ते ठेवता येतिल.

हो धन्स लाजो स्क्युअर किंवा टुथपीक वर लावू का? म्हणजे लहान टुथपिक उचलून खायला बरे!
हां फ्रायम्स म्हणतेयस का तू इंग्रो मधले?

गौरीच्या हळदी- कुंकू कार्यक्रमासाठी हा बेत कसा वाटतोय?
चिवडा
बेसन लाडू
इडली सांभर चटणी?

पोटभरीचे होईन ना? दरवेळेस जेवण देत असते पण ह्यावेळेस थोडा शॉर्टकट.
साधारण ६० बेसन लाडू साठी किती बेसन आणि साखर लागेल?

शुम्पी इं.ग्रो.मधल्या जाड सुतरफेणीला डेझर्ट म्हणून चांगल्या मेन्युची वाट लावू नकोस. तुझी श्रीखंडाची आयडिया चांगली आहे. हवं तर् addition sweet सुतरफेणी ठेवून बघ आणि नेक्स्ट टाइम तो रिझल्ट वापर Proud

Sad वेका, चांगली लागेल ग सुतरफेणी. जरा नेहमीपेक्षा वेगळ. अर्थात सूचना बरोबर आहे. फार जाड-बीड मिळत असेल तर नको. आधी टेस्ट करून बघा. सुतरफेणी आणि तिळाचे लाडू फार जेनुईन गुजराती वाटतात मला. गुजराती मेन्यू मध्ये शोभेल.

अरे गुजराती मेन्यूला सूट होणारं आयतं डेझर्ट हवं असेल तर हल्दीरामची सोनपापडी पण किती मस्त मिळते! चॉकलेट सोनपापडी, संत्रासोनपापडी आणि इतर अनेक फ्लेवर्स.

ज़िवतीची सवाशीण म्हणुन मैत्रिणिला बोलवलय या शुक्रवारी. तिच्याबरोबर तिचा नवरा आणि ६ महिन्यची मुलगी आहे.
सन्ध्याकळी बोलवलय मी त्यांना.
आणि माझा मुलगा साडे ३ महिन्यचा आहे. त्याला साम्भाळुन ज़मेल असा मेनु सुचवा. तसा माझा नवरा बघेल त्याच्याकडे. सोप्पा मेनु सान्गा. ऊद्याचा एकच दिवस आहे

पुरणपोळ्या ऑर्डर देऊन / विकतच्या मिळत असतील तर बेस्ट.

किंवा सरळ विकतचे आम्रखंड, पोळ्या, बटाट्याची सुकी भाजी, मटकीची उसळ, चटणी / लोणचे, पापड, वरण / तडका दाल, साधा भात / जिरा राईस, टोमॅटो-गाजर / टोमॅटो-काकडीची कोशिंबीर किंवा बुंदी रायता, विकतची अळूवडी / कोथिंबीरवडी/ सुरळीची वडी.
आंब्याचा पल्प घालून शिराही करता येईल स्वीट म्हणून.
पुरणपोळीसोबतही (आम्रखंड गाळून) हा मेनू चालेल.

मटकीच्या उसळीची व चटणीची तयारी अगोदर करून ठेवता येईल. वरण-भाताचा कुकर अगोदर लावून आयत्यावेळी गरम करता येईल. कोशिंबीरीसाठी लागणारे जिन्नस अगोदर चिरून आयत्यावेळी मिक्स करता येतील. पोळ्या अगोदर करून ठेवता येतील किंवा ऑर्डर देऊन / विकतच्या आणता येतील. पापड तळणार असाल तर पापड तळून डबाबंद करून ठेवता येतील. किंवा तयार तळलेले चिंटू बटाटा पापड मिळतात तसे आणायचे.

१.प्रत्येक घरची पद्धत वेगळी पण सामान्यपणे जिवतीच्या पूजेला पुरण लागत. तेव्हा पुरणपोळी किंवा कडबू (करंजी) ते जमेल तर बर - विकतच.
२.बाकी भात वरण, एक कोशिंबीर, बटाटा रस्सा. (कोशिंबीर आणि रस्सा फारतर एक तासात होतो, भात वरण तर कुकर मध्ये).
३.लोणचे, पापड, ताक ह्याला काही श्रम नाही. पण पान कस भरून जाईल.
४.शेवटी पान विडे मागवून ठेव.

सगळी तयारी २-३ तासात अगदी चांगली होईल. साधी पोळी आणि सुकी भाजी हवीच असली नाठाळ सवाष्ण नको बोलवू Wink

उद्यासाठी फायनल केलेला बेत... पुरणपोळ्या विकतच्या; वरण भात; आमटी; बटाटा भाजी; मोडवलेले मूग परतुन कोरडी भाजी; नारळाची चटणी; कोथिंबीर वडी (नाही जमली तर पापड तळून); दही आहेच.
नवर्‍याला पान आणायला सांगणार आहे.
ती मैत्रीण आधी नाठाळ होती पण सवाष्ण झाल्यापसूम नाठाळपणा कमी ज़ालाय. आई झाल्यावर तर खूपच कमी.

पाहुण्यांची फर्माईश म्हणून ताकातली भेंडी करणार आहे. त्यासोबत काय चांगले लागते? माझा बेत पुलाव, सांडग्याची कोरडी भाजी, ताकातली भेंडी, पोळी, शिरा असा आहे. बाकी शेवटी आईसक्रीम, सुरूवातीला सूप वगैरे असेलच.

Happy मुग्धा केदार - मस्त मेन्यू - ३ फोडण्या करायला वेळ नाही लागणार. चटणी मिक्सरवर पटकन होईल. कोथिंबीर वडीच त्यातल्या त्यात वेळखाऊ आहे पण वो भी क्या याद करेगी!

ताकातली भेंडी थोडीफार आंबट असते म्हणून आधीचे सूप tomato soup नको, स्वीट कोर्न नाहीतर मिनेस्त्रोन असल काहीतरी वेगळ्या चवीच. बाकी मेनू फक्कड!!

ताकातली भेंडी थोडीफार आंबट असते म्हणून आधीचे सूप tomato soup नको, स्वीट कोर्न नाहीतर मिनेस्त्रोन असल काहीतरी वेगळ्या चवीच. बाकी मेनू फक्कड!! >>>> हो. स्वीट कॉर्न सूप केले होते.

थोडीशी गम्मत झाली या बेताची, तेव्हा 'माझं काय चुकलं' वर चक्कर मारते.

गणपतीच्या पूजेला दोन दिवस रोज ३०-३५ लोक प्रसादाला येणार आहेत. दोन्ही दिवसांसाठी अल्पोपहाराचा मेन्यू सुचवेल का कोणी? मीच करेन शक्यतो- तेव्हा वेळखाऊ नको नाहीतर संध्याकाळी मी थकून जाईन पार. आधी करून ठेवता येईल असे असले तर बरे. फक्त चिवडा लाडू नकोय.

आगाऊ धन्यवाद.

साबुदाणा खिचडी, दही काकडी, पन्हं, बर्फी
इडली, चटणी, कॉफी, बर्फी
सामोसे चाट/रगडा पॅटिस(हॅश ब्राउअन पॅटी वापरून), मिल्कशेक

धन्स शूम्पी. साखि चांगली आयडिया आहे. फक्त ३५ लोकांचा अंदाज चुकेल याची जरा भीती वाटतेय. नवरा म्हणतोय की अल्पोपहार असला तरी पोटभर हवा.

समोसे खरंतर चांगले मिळतात इथे- पण गणपतीला बरे वाटतील का? आय मीन लोकांना ?

लोकांना कसं का वाटेना..त्याची फिकिर काशाला आपण करायची? चवील मस्त मिळतात आणि तुला सोयीचे पडतील तेवढच बघायचं Happy

तेही खरंच ग शूम्पी. पण आमच्याकडे गणपतीला मराठी मेन्यूचीच मागणी असते- माझ्याच घरातून Happy

मेधा, शिर्‍याची आयडिया छान आहे. डी जे चा आंब्याचा शिरा मूद पाडून दिला तर?
सुरळीची वडी माझ्या पाककौशल्यापुढे बाद. कोथिंबीर वडीचा विचार करते.

मोडाच्या मुगाची उसळ-जरा मसालेदार नि वरती फरसाण, शेव, कांदा- सोबत मोदक्/शिरा आणि जोडीला मसाला ताक कसं वाटेल? मटकीची नकोय कारण इथल्या इं ग्रो मधल्या मटकीत बरेचसे दाणे भिजत नाहीत कधीकधी.

सुमॉ, गणपतीच्या प्रसादाला लोकं येणार असतील तर शक्यतो कांदा नको. बाकी मेन्यू छान आहे. आमच्या इथे एकजणांकडे मराठी पद्धतीचा तिखट शिरा, भाज्या घालून आणि जिलेबी असा मेन्यू होता. जोडीला मोदकाच्या साच्यातले पेढे.

Pages