Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दादा माझा फेवरिट असला तरी
दादा माझा फेवरिट असला तरी धोनीही आवडतो. सध्याचे त्याचे कसोटीतील अपयश म्हणजे धोनी, कोच, व्यवस्थापन व बीसीसीआय यांच्या Institutional prioritization मधे गडबड असल्याने आहे. सध्या २०-२० इतके महत्त्व दुसर्या कशालाही दिले जाणार नाही खेळाडूंच्या दृष्टीने.
धोनीला टेस्ट कॅप्टन ठेवू नये. पण ते तो लायक नाही वगैरेंमुळे नव्हे (कौशल्य व टेंपरामेण्ट बघितले तर तो नक्कीच लायक आहे), पण त्याचे लक्ष त्यात दिसत नाही. त्याने म्हणे एक दोन वेळा असे दर्शवले आहे की तो कसोटी कप्तानपद फार काळ स्वतःकडे ठेवू इच्छित नाही.
नाहीतर २००८ पासून ते २०११ च्या वर्ल्ड कप च्या आधीच्या सिरीज पर्यंत धोनी जबरी होता कप्तान म्ह्णून.
लोकहो तुमचा त्रागा नक्कीच
लोकहो तुमचा त्रागा नक्कीच समजण्याजोगा आहे पण कमीत कमी आपण जे म्हणतोय ते किती practical आहे ह्याचा एकदा तरी विचार करून पाहा. दुसर्या टेस्टनंतर कोणीही असाच त्रागा का व्यक्त केला नाही ? आपण जे झाले त्या event ला तेव्हढ्यापुरते react होणार का ? तसे असेल तर प्लेयर्सनी पण त्यांच्या त्या क्षणीच्या priority ला मह्त्व दिले तर त्यांचे चुकले असे कसे म्हणायचे ? कमीत कमी ह्या बाबतीमधे BCCI ला follow करू नका.
१. खेळाडूंपेक्षा ह्या अपयशाचे धनी BCCI अधिक आहे असे मला वाटते. (कारणे पुढे वाचा) अर्थात ह्याचा अर्थ खेळाडूंची काहीच चूक नाही असा अर्थ होत नाही हे नमूद करून ठेवतो. फक्त आहे त्या framework, timeframe and constraints मधे ह्याहून अधिक त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे व्यर्थ वाटतेय.
२. ५ सामन्यांची मालिका करताना दोन सामन्यांमधे फक्त ४-५ दिवसांची गॅप ठेवणे कितपत श्रेयस्कर आहे ? आपल्या खेळाडूंचा एकंदर फिटनेस पाहता शेवटच्या टेस्टपर्यंत ते उभे राहतील असे वाटत होते का ? एकून आपण खेळाडू rotate करून विश्रांती वगैरे भानगडींवर विश्वास ठेवत नाही. BCCI planning committee हा प्रकार अस्तित्वात आहे का ? पुजारा किंवा कोहली कडे दोन सामन्यांमधे आपले technical दोष सुधारायला practically कितपत scope होता ? कुकचे technical fault नीट करायला आख्ही ashes series नि आपले दोन सामने लागले गूचला ( त्याच निमित्ताने श्रियुत गावस्कर जे तेंव्हा England मधे होते त्यांनी देशप्रेमाखातर काही मदत देउ केल होती का हे ऐकायला आवडेल
पाचव्या टेस्टनंतर त्यांनी खेळाडूंच्या देशप्रेमाला हात घातला होता - कोहली vaughen बरोबर लंच किंवा डिनरसाठी गेला होता बॅटींग strategy discuss करायला असे वाचले होते. गेला बाजार गूचबरोबर तरी जायचे)
३. इंग्लंडमधे swing नि seam हा प्रकार असणार हे open secret आहे. (पहिल्या दोन टेस्टमधे ते नव्ह्ते हे exception होते) मग सुरूवातीला तब्बल दोन दोन दिवसांचे दोन सरावा सामने ठेवण्याची जबरदस्त कल्पना ज्याच्या डोक्यातून आली त्याला मानले पाहिजे. एकही चार दिवसांचा सराव सामना असणे जरूरी वाटले नाही ? RSA च्या दौर्याअगोदर ह्याबाबत 'येह तो ऐसेही चलेगा' अशी खंत धोनीने व्यक्त केली होती. पण त्याला त्याचा clout अशा वेळी वापरता येत नसावा ? बर सामने ज्या संघांविरुद्ध होते त्यातला एक संघ काऊंटी मधला तळाचा संघ. seriously ?
3. साऊथ आफ्रिकेच्या दौर्याआधी A team तिथे जाऊन आली होती त्याचा फायदा जाणवला होता मग तेच ५ टेस्ट च्या सिरीजआधी करावे असे BCCI मधल्या एकाही महाभागाला वाटू नये ?
४. डंकन फ्लेचर चे contract एकदा बघायला आवडेल. त्यात असा काय clause आहे कि mighty BCCI सुद्धा त्याला एव्हढे घाबरून असते कि त्याला अशी immunity बहाल केलेली आहे कि त्याने स्व:तः राजीनामा देऊन जावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
५. IPL : IPL नसताना आपण असे लाजीरवाणे हरलो नाहित असे नाहिये. मधे द्रविड, सचिन जोशात असताना ही slide थांबवली गेली होती पण त्या आधी Aus, SA मधे swing नि seam पुढे दाणादाण उडालेली मला नीट आठवते. (९३-९४ मधे Aus मधे ५ ची मालिका ४-० ने हरलो होतो. एक मॅच draw झाली ती सचिन नि शास्त्रीच्या क्रुपेने.) IPL खेळाडूंसाठी distraction होत असेल तर त्याचा दोष खेळाडूंपेक्षा BCCI कडे जातो असे कोणालाच वाटत नाही ? जर १०-१२ वर्षांच्या कारकिर्दीमधे त्यांना आयुष्यभराची बेगमी करण्याची संधी मिळत असेल तर त्यांनी का सोडावी ? आपण त्यांच्या जागी असता तर सोडली असती का ? त्यातही जो आकडा बोली साठी लावलेला दिसतो तेव्हढी रक्कम खेळाडूला मिळत नाही तर त्याचा काही भागच मिळतो नि उरलेला BCCI कडे जातो हे विसरू नका. IPL scheduling करताना पुढे मागे जर जागा सोडली तर त्याचा फायदा होउ शकेल हे उघड आहे पण त्या ऐवजी ५ सामन्यांची मालिका push का केली गेली ?
६. BCCI चा ह्या प्रकारावर शोधलेला जबरदस्त उपाय काय तर शास्त्रीला ODI series साठी टीम director म्हणून नेमणे (नि पुजाराला काऊंटी मधे खेळण्याची परवानगी देणे. मालिका संपल्यावर ?) तो नेमके काय करणार हे स्पष्ट केलेले नाही. फ्लेचर नि तो ह्यात कोणाचे काम काय हे उघड नाही. ते त्या दोघांनी ठरवावे म्हणे. तो खेळाडूंना re-energize करणार आहे. म्हणजे त्यांना sports drinks नेऊन देणार ? मसाज करणार ? कि प्लग ईन करून चार्ज वगैरे करणार हे संजय पटेल नि शास्त्रीच जाणे. २०-२० चा कामगिरीच्या जोरावर टेस्ट टिम निवडण्यापेक्षा हा प्रकार अधिक करमणूकप्रधान आहे.
अवांतर १: धोनी टेस्ट कॅप्टन नसावा ह्यावर सर्वांचे एकमत आहे (BCCI सोडून) पण त्याला alternative कोण आहे नक्की ? कोहली, पुजारा त्यांच्या form वर आज test team मधे नसले पाहिजेत. विजय नेहमीच टांगत्या तलवारीखाली असतो. राहाणेची तीच गत आहे. धवन तर असाही बाहेर बसवला जातो. अश्विन चीही तीच कथा. जाडेजा परत लवकर टेस्ट खेळेल असे वाटत नाही. भुवी आधीच बॅटीम्ग, बॉलींग करून दमलेला आहे. Take your pick
कोहली किंवा पुजारा हे दोनच options आहेत पण आपण त्यांना बॅटस्मन म्हणून फेल व्हायला देण्यास तयार आहोत का कॅप्टन झाल्यावर ? are we tolerant enough about this ?
अवांतर २ : Former cricketer च्या comments वाचणे हा एक अशक्य विनोदी प्रकार आहे.
*मी ३-० किंवा ४-० असे धरलेले होतेतेंव्हा खर तर एक विजय नि एक draw हा माझ्यापुरता तरी complain न करण्याचा विषय असला पाहिजे
नाहीतर २००८ पासून ते २०११
नाहीतर २००८ पासून ते २०११ च्या वर्ल्ड कप च्या आधीच्या सिरीज पर्यंत धोनी जबरी होता कप्तान म्ह्णून. >> +१
बीसी सी आय ला फक्त पैसे
बीसी सी आय ला फक्त पैसे दिसतात,ईतर काही दिसत नाही. कुमार दमला तर दुसरा कुणि येईल. जिंकल्यावर जास्त पैसे मिळतात का? किती?
खेळाडू काय, कुणीहि असला तरी लोक पैसे देतातच!
असामी, बहुतांश सहमत. इशांत
असामी, बहुतांश सहमत.
इशांत शर्मा, झहीर, आर पी सिंग, श्रीशांत (मायनस करप्शन) व आता भुवनेश्वर कुमार ई खरे म्हणजे रेस चे घोडे. त्यांना आयपीएल च्या वरातीत नाचवायची गरज नाही (सॉरी, येथे जरा संझगिरी मोड झालाय :)), नाहीतरी तेथे त्यांना फारसा वाव नसतोच. आय पी एल न खेळल्याने जे त्यांचे आर्थिक नुकसान होईल त्याची भरपाई करून (and then some) त्यांना म्हणावे इंग्लंड, आफ्रिका, ऑस्ट्रेलियात जाऊन खेळायचे तेवढे खेळा. आणि टेस्ट, वन डे वर्ल्ड कप मधे तुमची बेस्ट बोलिंग, बेस्ट फिटनेस दाखवा. या लोकांना चॉईस दिला तर ते आय पी एल च खेळतील, आणि त्यांचे चूक नाही. ही बीसीसीआय ची जबाबदारी आहे.
मला वाटतं की कसोटी खेळाडूंना
मला वाटतं की कसोटी खेळाडूंना आयप्येलात खेळायची बंदी असावी. आयप्येलच्या प्रत्येक तिकिटावर कसोटी वाटा (टेस्ट सेस) बसवावा. यातून कसोटी खेळाडूंना मानधन मिळावे.
-गा.पै.
केवळ आयपीएलमधे खेळण्यामुळे
केवळ आयपीएलमधे खेळण्यामुळे कसोटीतली कामगिरी निराशाजनक होतेय कीं कसोटी सामन्यांबाबतच्या खेळाडूंच्या 'अॅटीट्यूड'मुळे, हा खरा प्रश्न असावा. आयपीएलमधे पैसे मिळतात पण त्याचबरोबर १] जागतिक दर्जाच्या खेळाडूंसह/विरुद्ध खेळण्याचा, त्यांच्याकडून शिकण्याचा दुर्मिळ अनुभव मिळतो व २] स्वतःचा फिटनेस ,टेंपरॅमेंट व क्षेत्ररक्षण सुधारण्याची संधी मिळते ३] गोलंदाजाना नेमकी गोलंदाजी करण्याची, हुकमी यॉर्कर टाकण्याची संवय होऊं शकते व ४] फलंदाजाना निदान आक्रमक फटकेबाजीसाठींचं तरी 'फूटवर्क' सुधारतां येतं इ.इ. असे अनेक फायदेही आहेत. पण कसोटी क्रिकेट हेंच स्वतःला सिद्ध करण्याचं खरं क्षेत्र आहे अशी ठाम धारणा असेल तरच आयपीएलचे हे फायदे खेळाडूना दिसतील व निश्चित उपयोगीही पडतील. पण अशी धारणाच नसेल तर आपल्या खेळाडूना काऊंटी क्रिकेट खेळायला पाठवलं [ आज इंग्लंडच्या मायकेल वॉर्नने सुचवल्याप्रमाणे] तरीही त्याचा पुरेपूर लाभ ते उठवतील का, हा प्रश्न राहीलच.
आयपीएल - मध्ये खेळू नका असे
आयपीएल - मध्ये खेळू नका असे काही ठराविक खेळाडूंना सांगणे प्रॅक्टीकल वाटत नाही. किंबहुना आर्थिक भरपाई करून देणेही प्रॅक्टीकल वाटत नाही. आयपीएलमुळे नुसता पैसाच नाही तर फेम, प्रसिद्धी सुद्धा मिळते त्याला कोणीतरी संतसन्यासीच नकार देऊ शकतो.
व्यस्त शेड्यूल - या बाबत बीसीसीआयला जबाबदार धरले जातेय, पण त्याच वेळी इंग्लंड सुद्धा त्याच व्यस्त शेड्युलवर खेळत होते ना. भले देशात खेळत का असेना, शारीरीक दमछाक तर तेवढीच. म्हणजे बीसीसीआयने ईसीबी वर आपले शेड्युल लादून उलट त्यांच्यावरच अन्याय केला. बाकी आयपीएल, चँपिय्न ट्रॉफी, इतर २०-२० चे सामने आणि भरमसाठ एकदिवसीय सामने खेळून वर्षाला ठराविक कसोटी सामनेही खेळायचे आहेत तर हे असेच व्यस्त शेड्यूल बननार. जर खेळाडूला स्वताला फिट नसेल वाटत तर त्याने तसे कळवावे. बाकी कोहली किंवा पुजारा हे खरेच दमल्याने फ्लॉप गेले का? व्यस्त शेड्यूलमध्येही गर्लफ्रेंडला मात्र न चुकता परदेशवारीला नेले. (हि त्याची वैयक्तिक बाब नसावी)
एकंदरीत याबाबत गावस्करची टिका मला तरी योग्यच वाटते. ज्यांना कसोटी खेळण्यात रस नाही त्यांनी स्वताहून दूर व्हावे. कारण या पराभवात निव्वळ लॅक ऑफ टेकनिकच नाही तर लॅक ऑफ अॅटीट्यूड देखील दिसला.
ज्यांना कसोटी खेळण्यात रस
ज्यांना कसोटी खेळण्यात रस नाही त्यांनी स्वताहून दूर व्हावे. कारण या पराभवात निव्वळ लॅक ऑफ टेकनिकच नाही तर लॅक ऑफ अॅटीट्यूड देखील दिसला. >> तू नक्की कोणाबद्दल बोलतो आहेस ते स्पष्ट सांग तू, नीट कळत नाहिये.
मला वाटतं की कसोटी खेळाडूंना
मला वाटतं की कसोटी खेळाडूंना आयप्येलात खेळायची बंदी असावी. आयप्येलच्या प्रत्येक तिकिटावर कसोटी वाटा (टेस्ट सेस) बसवावा. यातून कसोटी खेळाडूंना मानधन मिळावे.
>>.
खास पैलवानी सल्ला ...
आयपेलात खेळायला बंदी करणार असाल तर आज आता ताबडतोब कसोटीतून निवृत्ती जाहीर कर्तो बघा ! कशाला हवी ती पाच दिवसाची झंझट साली? कसोटी म्हनजे आयपेलाचा सीझन नसताना करायचे दुष्काळी काम आहे ते ....
असाम्या हे गावसकरचे
असाम्या हे गावसकरचे स्टेटमेन्ट आहे ऋन्मेष चे नव्हे !
असाम्या हे गावसकरचे
असाम्या हे गावसकरचे स्टेटमेन्ट आहे ऋन्मेष चे नव्हे ! >> अच्छा म्हणजे गावस्कर जसा आयपील पासून "दूर" राहतो तसे इतरांनी करावे असे सुचवतोय हो तो.
गावस्करवर का एवढा
गावस्करवर का एवढा राग?
उदाहरणच द्यायचे तर रविंद्र जडेजा कोणत्या दृष्टिने टेस्ट मटेरियल आहे? मग त्याने दूर व्हायला काय हरकत आहे? हवे तर भारतीय विकेटवरचा टेस्ट प्लेअर असे स्टेटस देऊन इथे घ्या. बाहेर तो काय करतो?
तो सध्या धोणी मुळे आहे हे सर्वांना माहित आहे. त्याची बॅटिंग चालत नाही आणि बॉलिंग के क्या कहने !
आणि आपल्या बॅटसमनचे स्विंग बॉलिंग वर न चालणे एकवेळ ठिक पण मोईन अली पण कणा मोडतो ह्याचे उत्तर काय आहे?
तूच सांग ना उत्तर काय आहे ते
तूच सांग ना उत्तर काय आहे ते ? गावस्कर म्हणतोय कि देशप्रेम नाहि खेळाडूंमधे हे कारण आहे. तुला पटते हे ? गावस्कर संघात असताना विंडीजने भारतात येऊन ८३-८४ मधे भारतात स्पिन ला धार्जीण्या पिचेस वर ३-० हरवले होते. (२ draw झाल्या होत्या - २ इन्निंग डिफीट्स होते) म्हणजे गावस्कर नि कपिलचे देशप्रेम हरवले होते तेंव्हा असे धरायचे का ? माझा राग ह्या अशा शेंडाबुडखा नसलेल्या विधानांवर आहे. आणि ती गाव्स्कर सारख्या इथल्या सिस्टिमला नीट ओळखून त्यातूनही आपल्याला हवे ते साध्य करण्याची एकमेवाद्वितीय हातोटी असलेल्या कुशल नि खरच टिमला मदत करू शकेल अशा खेळाडूंने करावीत ह्याचा आहे.
उदाहरणच द्यायचे तर रविंद्र जडेजा कोणत्या दृष्टिने टेस्ट मटेरियल आहे? मग त्याने दूर व्हायला काय हरकत आहे? >> असे जाडेजाला (नि धोनीला) वाटत नसेल तर ? अमक्या प्लेयरने दूर व्हावे ह्या वाक्यांना खरच काहि अर्थ आहे का ? गाव्स्कर ने हे सुचवलय तेंव्हा त्याचेच उदाहरण घेऊया का ? ७९ किंवा ७५ च्या वर्ल्ड कपमधे पूर्ण ६० ओव्हरस्मधे पन्नास धावा काढणारा खेळाडू कोण होता नक्की ? जर त्या सामन्या आधीच त्याने दूर व्हायचे ठरवले असते तर ? नंतर ५-६ वर्ष खेळून शेवटि आपण लिमिटेड क्रिकेटमधे शतक काढलेच ना त्याने. He ended up with pretty respectable ODI career at the end. मग जाडेजाला वाटत असेल कि "बाबा माझ्यात पोटेंशीयल आहे, बाकीचे जग गेले चुलीत" तर त्याचे काय चुकले ? वगळणे/न वगळणे हे काम निवड समितीचे आहे राजा. खुद्द गावस्कर acting CEO (किंवा तत्सम) काहितरी होता ना BCCI चा जेंव्हा इंग्लंडची टिम जाहीर झाली तेंव्हा. मग त्याने का नाहि मधे interfere केले. श्रिनिवासने पायंडा तर पाडूनच दिला आहे कि तसा. (जाडेजाचा domestic record कधी बघितलायस का ? 5855 at the rate of 46 and 189 wickets at the average of 27. नुसत्या ह्या आकड्यांवर तो संघात येऊ शकला असता भाउ. ) परत तो संघात टेस्ट प्लेयर म्हणुन असावा कि नाही हा मुद्दा अलाहिदा आहे. मुद्दा हा आहे कि हा निर्णय प्लेयरचा आहे का ? नि अमका प्लेयर संघात असताना त्याच्यात देश्प्रेम नाही म्हणून तो नीट खेळत नाही आणि म्हणुन आपण हरतो ह्या कारण मीमांसेचा आहे. हेच जर आपले post-martem असेल तर ५-० नाही हा विजय मानायला हवा.
परत एकदा : गाव्स्कर प्लेयर वर माझा अजिबात राग नाही. He was one of the best player India has ever produced and probably technically best every player produced by India, possibly by World Cricket असे मला वाटते. पण त्याचे जे BCCI शी हिशेब चुकवणे सुरू असते नि त्यासाठी तो भारतीय क्रिकेट ज्या तर्हेने वापरतो ते डोक्यात जाते राव. (ह्याबद्दल प्रेम पन्नीकर चा एक लेख होता. सापडला तर लिंक देतो नंतर)
निवड समितीत मध्ये सध्या तरी
निवड समितीत मध्ये सध्या तरी धोणी इन्फ्लुंएस जास्त आहे असे माझे मत आहे. त्यामुळे निवड समितीने त्याला काढावे हे बरोबर असले तरी, ते तसेच होत नाही. हे तुला सांगावे का राव?
प्रश्न एकदोन सिरिज हारण्याचा नाही, तर सलग बाहेर हारण्याचा आहे. न्युझिलंड तर आपल्याला देशात मात देऊन गेले. प्रश्न गेल्या चार- पाच वर्षाचा आहे. १९६० मधील उदाहरणं मी देखील देऊ शकेन पण तेंव्हा कॅपॅबिलिटीच नव्हती, आता आहे, म्हणून रडगाणे.
निवड समितीत मध्ये सध्या तरी
निवड समितीत मध्ये सध्या तरी धोणी इन्फ्लुंएस जास्त आहे असे माझे मत आहे. त्यामुळे निवड समितीने त्याला काढावे हे बरोबर असले तरी, ते तसेच होत नाही. हे तुला सांगावे का राव? >> परत तेव्हढेच pointless observation and suggestion. शब्दांचा राग मानू नकोस. तो कप्तान आहे तेंव्हा हे साहजिकच नाही का ? आणिते योग्यच नाही का ? हरल्यावर आपण म्हणतो ना कि त्याच्यामूळे हरलो. बाकी तोच कप्तान का वगैरे साठी माझ्या कालच्या भल्या मोठ्या पोस्टमधला धोनीचा मुद्दा वाचच प्लीज. परत परत तेच तेच लिहायला कंटाळा येतो. नि क्रोमसारख्या ट्रांस्लिटरेशनसाठी भिक्कार ब्राऊसर मधे तर फारच.
. न्युझिलंड तर आपल्याला देशात मात देऊन गेले. प्रश्न गेल्या चार- पाच वर्षाचा आहे > >तुला इंग्लंड म्हणायचे असावे. माझी उदाहरणे त्या context मधेच वाच. नुसती तेव्हढीच बाहेर काढली तर त्यांना काहि अर्थ नाही.
भाऊ आयपीलच्या फायद्याबद्दल
भाऊ आयपीलच्या फायद्याबद्दल पूर्ण अनुमोदन.
केवळ आयपीएलमधे खेळण्यामुळे कसोटीतली कामगिरी निराशाजनक होतेय कीं कसोटी सामन्यांबाबतच्या खेळाडूंच्या 'अॅटीट्यूड'मुळे, हा खरा प्रश्न असावा. />> ही अॅटीट्यूड' का निर्माण होते आहे ह्याचे मूळ कारण शेवटी BCCI कडे बोट दाखवणार ह्यात शंकाच नाही. जर governing body टेस्ट बद्दल निरुत्साह दाखवत असेल तर खेळाडूंनी तेच केले तर त्यांचे फारसे चुकले असे म्हणता येणार नाही. If everyone agrees that IPL is necessary beast, lets give it it's due and accommodate it in a way that it does not impact other equally important parts. तेही नीट करता येईल, प्रश्न इच्छाशक्तीचा आहे. अगदी हेच डीबेट बिग बॅशच्या निमित्ताने Down Under सुरू आहे असे आमच्या ऑफिसमधल्या तिथल्या कलिगच्या बोलण्यात आले.
असाम्या हे गावसकरचे
असाम्या हे गावसकरचे स्टेटमेन्ट आहे ऋन्मेष चे नव्हे !
>>>>
स्टेटमेंट गावस्करचे असले तरी मला ते पटले म्हणून मी इथे दिले आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी घेऊ शकतो.
तसेच पुढची ओळ - "कारण या पराभवात निव्वळ लॅक ऑफ टेकनिकच नाही तर लॅक ऑफ अॅटीट्यूड देखील दिसला." - हे मी माझे स्वताचे अॅडले. गावस्करने देखील हे शब्द वापरले असतील तर तो योगायोग.
त्या सर जडेजा बद्दल तर बोलूच नका. तो ईंग्लिश कंडीशनमध्ये स्विंग गोलंदाजांना नवीन चेंडूवर पुढे येऊन भिरकाऊन द्यायला बघतो तो स्वताला कसोटी फलंदाज म्हणवत असेल तर त्याची त्यालाच लाज वाटायला हवी. रोहित शर्माने स्पिनर मोईन अलीला दोन आत्मघातकी फटके मारून बाद झाल्यावर त्याला एकच कसोटी खेळवून बसवले. तेच जडेजाला काहीही फटके खेळायचे लायसन दिले होते वाटते. याउपर तो संघात फिरकी गोलंदाज म्हणून जागा राखून होता तर हे देखील फुटकळ समर्थन होईल.
कोहलीचे तर पार भिजलेले बदक करून ठेवले या दौर्याने, चांगलेय, गरज होतीच या डोसची.
पुजारा हा एकदिवसीय संघात नसल्याने त्याने या काळात कौटी खेळायची इच्छा प्रदर्शित केली आहे. चांगलेय. तंत्रातील दोष स्विकारून सुधारणा करायची तयारी दाखवतोय. अर्थात त्याला ते गरजेचेच आहे. कारण त्या बिचार्याला कोहली-धवन सारखे पाटा खेळपट्ट्यांवरील मर्यादीत षटकांच्या सामन्यात चमकून आपले पाप धुवायची संधी नाहीये. त्याला उच्च दर्जाच्या कसोटी क्रिकेटमध्येच गेलेली इज्जत परत मिळवावी लागणार.
pointless observation and
pointless observation and suggestion >> हं. जडेजा एवढा चांगला आहे? असेल असेल. मला तरी त्याच्यामुळे मॅच जिंकणे कमी आणि हातातल्या मॅचेस हारलेल्याच जास्त दिसतात.
आय डोन्ट नो तुला काय म्हणायचे आहे ते. BCCI पोस्ट चांगली आहे, पण त्यातून रिझल्टस काय अभिप्रेत आहेत?
हे सगळे गेले केराच्या
हे सगळे गेले केराच्या टोपलीत
मला एक सांगा पहिले दोन कसोटी खेळणारा संघ अचानक ३र्या कसोटी वरुन ढेपाळला का ? या आधीचे सामने देखील इंग्लंड मधेच होते.. कंडीशन देखील सारखीच... फक्त ३ र्या कसोटीपासुन आपण जेव्हा पण फलंदाजीला यायचो तेव्हा आधी पाउस पडुन गेलेला असायचा.... मग घोडे अडले कुठे
<< ही अॅटीट्यूड' का निर्माण
<< ही अॅटीट्यूड' का निर्माण होते आहे ह्याचे मूळ कारण शेवटी BCCI कडे बोट दाखवणार ह्यात शंकाच नाही. >> कसोटी, एक-दिवसीय, टी-२०, आयपीएल हीं सर्वच बीसीसीआयचींच बाळं आहेत; लोक जर आयपीएलचंच अधिक कोडकौतुक करत असतील, तर दोष सर्वस्वीं बीसीसीआयकडे खरंच जाईल का ? जोपर्यंत खेळाडू आपलं सर्वस्व पणाला लावून कसोटी क्षेत्रात आपलं नांव व्हावं ही जिद्द बाळगून कामगिरी करत नाहीत[ हरणं, जिंकणं दुय्यम ], तोपर्यंत लोकाना तरी कसोटी क्रिकेटचं आकर्षण, जाण व आवड निर्माण होईल अशी अपेक्षा करतां येईल का? कसोटी क्रिकेटचा दैदिप्यमान इतिहास खेळाडूनीं रचला आहे, खेळाच्या नियंत्रण बोर्डानी नाहीं व म्हणूनच त्याचं भविष्यही खेळाडूंच्याच कसोटी क्रिकेटबद्दलच्या 'अॅटीट्यूड'वर बव्हंशी अवलंबून राहील, असं मला तीव्रतेने वाटतं. खेळाडूच जर कसोटी मालिकांकडे निव्वळ एक औपचारिकता म्हणून पहात असले, तर कितीही प्रगल्भ असलेला नियंत्रण बोर्डही कसोटी क्रिकेटला प्राधान्य व उज्वल भविष्य देवूं शकणार नाहीं.
pointless observation and
pointless observation and suggestion >> हं. जडेजा एवढा चांगला आहे? असेल असेल. मला तरी त्याच्यामुळे मॅच जिंकणे कमी आणि हातातल्या मॅचेस हारलेल्याच जास्त दिसतात.
आय डोन्ट नो तुला काय म्हणायचे आहे ते. >>
), माझी गावस्करबद्दलची पोस्ट ऋन्मेऽऽष च्या पोस्तमधल्या गावस्करच्या कॉमेंटसंदर्भात आहे. त्यातले प्लेयर कोण असे विचारल्यावर तू जाडेजाचे नाव घेतलेस. ह्यातून जाडेजाने स्वतःहून टेस्ट खेळू नये असे तुला अभिप्रेत आहे असे मी धरलो. हि जबाबदारी त्याची नसून निवड समितीची आहे असे मी सुचवले. त्यावर निवड समिती वर धोनीचा प्रभाव आहे असे तू म्हणालास त्यावर मी धोनि कप्तान असल्यामूळे त्यात गैर काय असे मी विचारतोय. जाडेजाची निवड धोनी च्या प्रभावाने झाली आहे तर त्याचे श्रेय (दुसर्या सामन्यातला त्याचा खेळ) नि अपश्रेय (पुढच्या सामन्यातला खेळ) हे धोनीची अंशतः जबाबदारी आहे. (जाडेजाने aggressive inning खेळावी हा टिम डावेप्चांचा भाग होता हे धोनीने स्वतः सांगितले आहे), का ते तू गूगल करू शकतोस) त्याचे नि एकंदर हरण्यामागच्या गोष्टींचे खापर धोनीच्या डोक्यावर असले हे मान्य असले तरी सध्या धोनीला पर्याय काय हे कळत नाही (हे माझ्यामोठ्यापोस्टच्या संदर्भामधे). तेंव्हा "त्यातून रिझल्टस काय अभिप्रेत आहेत?" ह्याचे उत्तर त्याच पोस्ट च्या प्रस्तावनेमधे आहेत. I think it is moot to iterate that whatever is being said here has zero impact on what happens with Indian cricket but still it lets you vent out. ह्यापलीकडे काही नाही.
For your benefit (Not that you have to give damn about it
गावसकरच्या शेंडा बुडखा नसलेल्या पोस्टबद्दल मी आधीच लिहिलय. एखाद्याच्या patriotism ( किंवा commitment) बद्दल अशी मॅचच्या निकालांवरून शंका घेणे मला श्रेयस्कर वाटत नाही. ( हे मॅच फिक्सिंगच्या संदर्भात नाहि आहे) इतरांना वाटू शकते हे उघड आहे. Those things are much bigger than series results.
मला एक सांगा पहिले दोन कसोटी खेळणारा संघ अचानक ३र्या कसोटी वरुन ढेपाळला का ? >> पहिल्या दोन सामन्यांमधे पिचेस पूर्ण सीमिंग नव्हती. इंग्लंडची बॉलिंग especially length फारशी योग्य नव्हती. त्यांनी अतिशय basic mistakes केल्या. तिसर्या मॅचपासून त्यांनी त्या पूर्णपणे टाळल्या. (ह्या संदर्भात अँडरसन ची मुलाखत अवश्य वाच). कुकचा कॅच सोडणे हा turn point होता. त्याच वेळी आपण फक्त लीड टिकवावा अशा मेंटलिटीमधे खेळायला सुरूवात केली. And it went all downhill from that point. (As per Gavaskar, players lost their patriotic cause and commitment to the game - काय माहित त्यात पाकिस्तानचा हात असेल
)
पुजारा हा एकदिवसीय संघात नसल्याने त्याने या काळात कौटी खेळायची इच्छा प्रदर्शित केली आहे. चांगलेय. तंत्रातील दोष स्विकारून सुधारणा करायची तयारी दाखवतोय. अर्थात त्याला ते गरजेचेच आहे. कारण त्या बिचार्याला कोहली-धवन सारखे पाटा खेळपट्ट्यांवरील मर्यादीत षटकांच्या सामन्यात चमकून आपले पाप धुवायची संधी नाहीये. त्याला उच्च दर्जाच्या कसोटी क्रिकेटमध्येच गेलेली इज्जत परत मिळवावी लागणार. >> आत्ता असे बघ, ते जर मर्यादित षटकांच्या सामन्यांमधे खेळले नाहित नि आपण हरलो तर उद्या परत कोणी तरी म्हणेल कि "ह्यांचे देशप्रेम कुठे गेले ? स्वतःच्या फॉर्म परत मिळवायला त्यांनी देशासाठी ODI खेळणे नाकारले. किती स्वार्थी व्रुत्ती ही ? Why do they have such a selfish attitude that they are putting themselves above Country ? " I certainly do not want to be in their shoes
schedule च्या मुद्द्यामधे तू पुजारा नि कोहलीचे तंत्र better scheduling मूळे सुधारले असते का ? असा प्रश्न विचारला आहेस. समजा असे धरू त्यांचे तंत्र खराब होते (Though one can successfully argue that they handled ballers of equal caliber and similar conditions in RSA and NZ one year back with apolomb - Lets not go into discussing if Styen etc are better than Anderson or not. Lets leave that to Aliaster Cook
) मग जर हे सर्व ज्ञात होते तर त्यावर उपाय काय होता ? त्यांना॑ england सारख्या condition ची सवय करता येईल असा सोयी उपलब्ध करुन देणे ? maybe extended preparation period before series ? Maybe ensuring Mrs Gavaskar can work with them before the series ? हे सर्व कोणी करायचे ? हि फक्त player ची जबाबदारी आहे का ? (For that matter, Aaron had to buy 2 dozen dukes balls at his own expense to practice balling with it) जसे RSA च्या दौर्आधी A series मधून पुजारा आधी खेळला होता तसे करता आले असते का ? ह्या सगळ्या गोष्टी scheduling मधे धरल्या जायला हव्यात हा मुद्दा आहे. फक्त दोन सामन्यांमधले दिवस हा नाही.
खेळाडूच जर कसोटी मालिकांकडे
खेळाडूच जर कसोटी मालिकांकडे ............ प्राधान्य व उज्वल भविष्य देवूं शकणार नाहीं.
अनुमोदन.
कसोटी क्रिकेटचा दैदिप्यमान इतिहास खेळाडूनीं रचला आहे, ,
अनुमोदन.
माझ्या मते बीसीसीआय ही खेळाकडे पैसे करण्याचा धंदा म्हणून बघतात, तर खेळाडू क्रिकेटवरील प्रेम, त्यात जास्तीत जास्त प्राविण्य मिळवावे या उद्देशाने खेळत असत.
आताचे खेळाडू हे बहुधा क्रिकेट सुधारायचे कारण आय पी एल मधे जास्तीत जास्त पैसे मिळावे म्हणून, असे समजत असतील.
आपण प्रेक्षक, क्रिकेटप्रेमी म्हणून जे दिसेल ते बघावे, त्या मागची कारणमीमांसा जास्त खोलात शिरून करायची गरज नाही. उदा. जरी भारतीय फलंदाज लवकर बाद झाले तरी अँडर्सन, ब्रॉड, अलि, वगैरे लोकांची गोलंदाजीहि बघण्यासारखी होती. अधून मधून इशांत नि भुवी ची पण. नि कोण खेळते आहे या ऐवजी जर खेळ कसा होतो आहे, गोलंदाजी, फलंदाजी क्षेत्ररक्षण कसे होते आहे हे बघण्यात मजा आहे.
अर्थात मनुष्यस्वभाव असा आहे की कुठेतरी कुणाला तरी हिरो नि कुणाला तरी व्हिलन समजायचे.
असामी, BCCI विषयीच्या तुमच्या
असामी, BCCI विषयीच्या तुमच्या निरिक्षणांबद्दल बर्याच अंशी सहमत आहे. पण म्हणून खेळाडू त्यांची जवाबदारी झटकू शकत नाहीत. अर्थात हे फक्त आज्चं चित्र नाहीये. पार राजे-रजवाडे ईंग्रजांशी जवळीक साधण्यासाठी क्रिकेट खेळायचे (उदा. रणजीचं क्रिकेट खेळणं आणी eventual राज्याभिषेक ई.) तेव्हापासून आजतागायत, एक खेळ म्हणून आपण कधीच क्रिकेट प्रामाणिकपणे खेळलेलो नाहीये. कदाचित धोनी scapegoat असेलही. पण हे सगळं बाजूला ठेवून थोडासा खेळाचा विचार करू या.
विजय ऊभा राहीला, पण त्याच्या अवती-भवती भागीदार्या नाही ऊभ्या राहू शकल्या. पुजारा, आणी विराट ह्यांना त्यांच्या तंत्रातल्या उणीवा हेरून सातत्यानं बाद करण्यात आणी दबावाखाली ठेवण्यात ईंग्लंड ने यश मिळवलं. ह्यापैकी पुजारा झगडताना दिसत होता, पण कोहली चं 'I am going to hit out of this slump rather than grinding it out' चं तंत्र फारसं उपयोगी नाही ठरलं. रोहित शर्मा टेस्ट मधे ऑफ-स्टंप च्या बाहेर खूप जास्त tentative असतो. तसाही तो ऑफ साईड स्ट्राँग असलेला खेळाडू नाहीये, पण मर्यादित षटकांच्या सामन्यात हे खपून जातं. धवन चा बचाव कमकुवत आहे. (NZ मधल्या मोठ्या ईनिंग मधे देखील त्याने बरेचसे चेंडू सोडून दिले होते, बचावात्मक शॉट्स खूप कमी खेळले होते). जडेजा खूप बचावात्मक गोलंदाज आहे. तो एक लाईन - लेंग्थ पकडून बॉलिंग करू शकतो, पण जर फलंदाजाने काही चुका केल्या नाहीत, किंवा विकेट कडून साथ नसेल, तर तो फार काही घडवू शकत नाही. एक फलंदाज म्हणून देखील तो one-dimensional आहे आणी मॅच च्या परिस्थितीनुसार फलंदाजीत बदल करत नाही.
धोनी, जो अॅट बेस्ट एक सेफ विकेटकीपर होता, त्याच्या शरीराने त्याला साथ देणं कमी केलय हे दिसतं (त्याचं पूर्ण खाली न वाकणं, अधिक मागे ऊभं रहाणं, स्लीप आणी विकेटकीपर च्या मधून जाणारे कॅचेस अटेंप्ट न करणं, दर वेळी स्टंप्स पर्यंत धावत न येणं). एक कप्तान म्हणून आणी एक फलंदाज म्हणून टेस्ट मधे त्याच्या मर्यादा खूप आहेत.
हे उदाहरण मी आधीही दिलय, पुन्हा लिहीतो.
चौथ्या सामन्यात अश्विन खेळेपर्यंत, मागचे अनेक सामने आपण जडेजा ला प्रमुख स्पिनर म्हणून खेळवलं होतं. पण चवथ्या सामन्यात पहिल्या ५७ ओव्हर्स मधे जडेजा ने एकही ओव्हर टाकली नाही. अश्विन ने ११ ओव्हर्स टाकल्या आणी पहिल्या ५ पैकी ३ फलंदाज right-handed होते. apparently, he was not good enough to bowl a single over in first 57 overs. तसं असेल, तर आपण त्याला ईतक्या मॅचेस prime spinner म्हणून कसं खेळवलं (किंवा ५८व्या ओव्हर च्या आधी गोलंदाजीला का नाही आणलं)?
एक सेशन खेळून काढल्यावर आक्खी मॅच वाचणार आहे (हरिकेन बर्था) हे माहीत असताना मँचेस्टर ला एकाच सेशन मधे ९ फलंदाज आऊट झाले. त्या २० ओव्हर्स मधे १०८ धावा काढल्या. कशासाठी ही घाई?
साऊथअँप्टन सामन्यात, दुसर्या ईंनिंग मधे विजय फलंदाजीला आल्यापासून थकल्यासारखा वाटत होता. चवथ्या दिवसाचं शेवटचं सेशन होतं ते. एखादा खेळाडू, २ दिवस सलग फिल्डिंग करून थकलेला असणं स्वाभाविक आहे. पळून धावा काढताना ते दिसत होतं. धवन आणी विजय मधे हे सामंजस्य दिसलं नाही, की आपला पार्टनर दमला आहद, तेव्हा आजचं हे सेशन शांतपणे खेळून काढून, उद्या सकाळी फ्रेश गार्ड घेता येईल. धवन एक क्विक सिंगल घ्यायला गेला आणी विजय रन-आऊट झाला आणी परत गळती लागली. मुळात त्या मॅच मधे ती क्विक सिंगल ची सिच्युएशन नव्हती.
ही काही उदाहरणं अशासाठी दिली, की प्रश्न अॅटिट्यूड चा आहे. टेस्ट खेळण्याचा, ईनिंग्स बिल्ड करण्याचा, सेशन्स खेळून काढण्याचा प्रयत्न दिसत नाही.
वर आयपीएल चा मुद्दा आलाय. ती एक चांगली करमणूक (प्रेक्षकांची) आणी कमाईची संधी (खेळाडूंची) आहे हे मान्य. पण त्यातून क्रिकेटिंग स्किल्स कितपत डेव्हलप होतात हा चर्चेचा मुद्दा आहे. मागच्या वर्षी हैद्राबाद कडून खेळताना डेल्स स्टेन ने बाऊंड्री वर डाईव्ह मारून एक बॉल अडवल्यावर एक कॉमेंटेटर म्हणाला होता की हा वेडेपणा आहे. ही आयपीएल आहे, आंतरराष्ट्रीय सामना नाही हे तरी स्टेन ल कळायला हवं.
असो, आजच BCCI ने धोनी चं स्थान अबाधित राखून फारसे मुलभूत बदल करणार नसल्याचं सांगितलच आहे. रवी शास्त्री, भारती अरूण, संजय बांगर वगैरे वरवरचे काही बदल केले आहेत. तेव्हा ह्या चर्चेला माझ्याकडून तूर्तास विराम!
ही काही उदाहरणं अशासाठी दिली,
ही काही उदाहरणं अशासाठी दिली, की प्रश्न अॅटिट्यूड चा आहे. टेस्ट खेळण्याचा, ईनिंग्स बिल्ड करण्याचा, सेशन्स खेळून काढण्याचा प्रयत्न दिसत नाही. >> फेरफटका हा निव्वळ अॅटिट्यूड चा प्रश्न नाहिये तर ती का तयार झाली हे शोधण्याचा आहे. अशी अॅटिट्यूड तयार होउ देणे ह्याचा दोष प्लेयर्स वर येतो का ? जरुर येतो पण फक्त तेव्हढेच कारण आहे का हे शोधणे जरुरीचे आहे. नि तो शोध BCCI कडे जातो असे मला वाटते. हे थोडेसे 'आधी अंडे, कि आधी आमलेट' ह्या प्रकारात येतेय. 'बीसीसीआय ही खेळाकडे पैसे करण्याचा धंदा म्हणून बघतात' ह्या विधानात बरीच उत्तरे सापडुन जातील असे वाटते. जर BCCI T-20 कडे मुख्य स्त्रोत म्हणून बघत असेल तर खेळाडूही त्याच विचाराने त्यांचा खेळ बदलणार हे नैसर्गिक आहे. test series कडेही फक्त पैसे कमावण्याचा मार्ग ह्यापलीकडे BCCI ची नजर नसेल (उदा : England series आधी बांग्लादेश ची ODI series घुसडणे - तोच वेळ खेळाडूंना इंग्लंडमधे आधी पाठवून घालवता आला असता) तर खेळाडू पण तेच बघणार. शेवटी तो त्यांचा चरितार्थाचा मार्ग आहे. जे विकतेय तेच पिकवणे हा मनुषस्वभाव आहे. नुसत्या Test cricket च्या दैदिप्यमान कामगिरीवर पोट भरणार आहे का ह्याचा विचार ते करणारच. (उदा : पुजाराची केस घ्या. IPL नि ODI team मधे येता यावे म्हणून त्याने off spin balling practice करण्यात वेळ घालवला.) BCCI कडून काही तरी योग्य incentive असल्याशिवाय हे होणे कठीण वाटते. players नि BCCI ला drive करणे नि BCCI नि players ना drive करणे ह्यात probability कसली जास्त आहे ह्याचे उत्तर उघड आहे.
आजच BCCI ने धोनी चं स्थान अबाधित राखून फारसे मुलभूत बदल करणार नसल्याचं सांगितलच आहे. >> That's the crux of it
अवांतर : तुम्ही 'जवाबदारी' हा शब्द प्रयोग केलेला आवडला.
भाऊ ह्या विधासंदर्भात
भाऊ ह्या विधासंदर्भात "जोपर्यंत खेळाडू आपलं सर्वस्व पणाला लावून कसोटी क्षेत्रात आपलं नांव व्हावं ही जिद्द बाळगून कामगिरी करत नाहीत[ हरणं, जिंकणं दुय्यम ], तोपर्यंत लोकाना तरी कसोटी क्रिकेटचं आकर्षण, जाण व आवड निर्माण होईल अशी अपेक्षा करतां येईल का?" हे प्रश्न आहे. IPL सुरु होण्या आधी ४-५ वर्षे, म्हणजे जेंव्हा सचिन, राहुल, लक्ष्मण, सेहवाग नि गांगुली ऐन भरात असताना, जेंव्हा आपण australia च्या नं. १ टिमला तोडिस तोड उत्तर देत होतो, england मधे series जिंकली होती, साऊथ आफ्रिके बरोबर draw केली होती. (२००१-२००७) चा काळ बघा. तेंव्हाच्या खेळाडूंनी तुम्ही म्हणताय तसे सर्वस्व पणाला लावून कसोटी क्षेत्रात आपलं नांव कमावले होते. लोकांना कसोटी क्रिकेटचं आकर्षण निर्माण झाली होती. (जाण नि आवड ह्याबद्दल वाद होउ शकतो तेंव्हा ते बाजूला ठेवतो). तरिही t-20 नि IPL आले नि डोई जड झाले. ह्याचे कारण काय असेल असे वाटते ?
गंमतीची गोष्ट हि आहे कि
गंमतीची गोष्ट हि आहे कि आपल्यापैकी कोणालाही (अगदी गावस्करलाही) ह्या सिरीजच्या आधी संघ निवडायला सांगितला असता तर धोनी, पुजारा, कोहली, धवन, रोहित शर्मा, जाडेजा त्यात असतेच.
असामी, "हा निव्वळ अॅटिट्यूड
असामी, "हा निव्वळ अॅटिट्यूड चा प्रश्न नाहिये तर ती का तयार झाली हे शोधण्याचा आहे. अशी अॅटिट्यूड तयार होउ देणे ह्याचा दोष प्लेयर्स वर येतो का ? जरुर येतो पण फक्त तेव्हढेच कारण आहे का हे शोधणे जरुरीचे आहे. नि तो शोध BCCI कडे जातो असे मला वाटते." - हा तर मुद्दा अगदी मान्यच आहे. मी तो फारसा elaborate नाही केला, कारण तुम्ही त्यावर already लिहीलं होतत आणी काही राहिल्यासारखं वाटलं नाही. मुळात देशातल्या बहुतांश क्रिकेट संघटना आणी त्या सगळ्यांच्या वर असणारी बीसीसीआय ईतक्या सगळ्या राजकारण्यांच्या प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष असल्यामुळे त्या दिशेनं काही चांगलं घडायची अपेक्षा नाही. बीसीसीआय चा आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर जसा-जसा प्रभाव वाढलाय, तसं तसं, क्रिकेट चा धंदा वाढण्याव्यतिरिक्त एक खेळ म्हणून क्रिकेट चं फारसं भलं झालेलं नाही (बांगलादेश चा कसोटी दर्जा, भारंभार भरवलेले सामने, ज्या ICL ला बदनाम करून, बंद पाडलं, त्याचच IPL हे रूप, ईंग्लंड दौर्याची तयारी म्हणून मधेच घुसवलेला बांगलादेश दौरा - कारण बांगलादेश च्या विकेट्स, वातावरण, बॉलर्स हे सगळे एकदम ईंग्लंड सारखच आहे आणी बांगलादेश ला गेलेलीच टीम ईंग्लंड मधे नाही का खेळली ९०% अपवादानं). असो.. ह्या सगळ्या गोष्टींसाठीच ते राजे-रजवाड्यांच्या क्रिकेट खेळण्याचा उल्लेख केला होता.
<< तरिही t-20 नि IPL आले नि
<< तरिही t-20 नि IPL आले नि डोई जड झाले. ह्याचे कारण काय असेल असे वाटते ? >> असामीजी, कसोटी क्षेत्रात सचिन, द्रविड, लक्ष्मण, गांगुली, सेहवाग ह्यांची जागा भविष्यात आत्तांच्या संघातले पुजारा, धवन, कोहली इ.इ. घेतील ही अपेक्षा रास्त होती कारण हे सर्व फलंदाज नि:संशय प्रतिभावान आहेत. कमी पडली ती त्यांची कसोटीमधे स्वतःला सिद्ध करण्याची इच्छाशक्ती आणि हेंच तें कारण असावं असंच मला वाटतं. [कसोटी क्रिकेटची आवड निर्माण व्हायला क्रिकेटची थोडी तरी जाण असणं अपरिहार्य असावं ,म्हणून जाण व आवड हे दोन्ही शब्द मीं वापरले होते
]
गंमतीची गोष्ट हि आहे कि
गंमतीची गोष्ट हि आहे कि आपल्यापैकी कोणालाही (अगदी गावस्करलाही) ह्या सिरीजच्या आधी संघ निवडायला सांगितला असता तर धोनी, पुजारा, कोहली, धवन, रोहित शर्मा, जाडेजा त्यात असतेच.
>>>>>>>
एकतर मी जाडेजाला नसता नेला इंग्लंडला. त्यापेक्षा आजही हरभजनवरच भरवसा टाकला असता वा गेला बाजार मिश्राला तरी नेला असता किंवा उदयोन्मुख खेळाडू म्हणून अक्षर पटेलला नेले असते. आणि तरीही हे तेव्हा डोक्यात न आल्याने किंवा दुर्बुद्धी झाल्याने जडेजाला नेलेही असते तरी दौर्याची सुरुवात आश्विन या एकमेव मेन स्पिनरपासून केली असती आणि जोपर्यंत आश्विन समाधानकारक कामगिरी बजावत असता त्याला नक्कीच बदलले नसते.
दुसरे म्हणजे कोहलीला मी तिसर्या सामन्यानंतर किंवा फार तर चौथ्या सामन्यानंतर शेवटच्या सामन्यात तरी नक्कीच विश्रांती दिली असती, जी धमक धोनीने शेवटपर्यंत नाही दाखवली. त्या केसमध्ये कोहलीच्या क्रमांकावर रहाणेला खेळवला असता.
अरे हो, धवनला कदाचित मी नेलाही असता, खेळवलाही असता पण सेहवाग माझ्या ईंग्लंडला जाणार्या टीममध्ये नक्कीच असता. आणि या द्रुष्टीने मी आधीच त्यालाही तसा विश्वास दिलवून त्याकडून तयारी करवली असती. म्हणजे आधीच्या त्या बांग्लादेश दौर्यालाही सेहवाग नेला असता.
बिन्नीला नसता नेला मी असा पटकन ईंग्लडला. गेल्या दौर्यात रैनाला पण नेऊन खेळवून फ्लॉप करवून झाले होते. त्याला टेस्ट प्लेअर बनवायचा हट्ट चेन्नई सुपर्किंगचा का? असो, असेच असते तर मग युवराजला का नाही खेळवत रेग्युलर कसोटी.
आई हाक मारतेय जेवायला..... आलोच मी
Pages