Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आयपीएलमधून वेळ मिळाल्यानन्तर
आयपीएलमधून वेळ मिळाल्यानन्तर फावल्या वेळात कसोटी खेळणार असाल तर असेच होणार... एका कसोटीचे असे किती पैसे मिळणार? आणि त्याच्या कामगिरीवर थोडेच आयपीएल मध्ये विकत घेतात. ( मला तर ते लिलावात खेळाडू विकत घेणे हे बैलबाजारात बैल विकत घेण्यासारखेच वाटते::फिदी:
मला तर ते लिलावात खेळाडू विकत
मला तर ते लिलावात खेळाडू विकत घेणे हे बैलबाजारात बैल विकत घेण्यासारखेच वाटते.
>>>>>>>>>>>
फरक आहे, तिथे बैलाला स्वताला काही नाही मिळत तर त्याची खरेदी विक्री करणारे कमावतात.
इथे खेळाडू स्वता पैसे छापत आहेत. त्यामुळे ते तिथे पैसे कमावताहेत म्हणून त्यांच्यावर "स्वताला विकताहेत" वगैरे टिका करणे चूक. जसे आपण कंपनीत नोकरी करतो तसेच हे देखील झाले. उलट परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी नोकरी करणार्यांपेक्षा भारतातील फ्रँचायझीसाठी खेळणारे जास्त सरस नाही का
त्या महिला संघाकडून पुरुष
त्या महिला संघाकडून पुरुष संघानी काहीतरी शिकायला पाहिजे राव.. त्या चक्क इंग्लंडमधे टेस्ट मॅच जिंकल्या आणि ते पण ६ विकेट्स राखून...
अभिनंदन
अभिनंदन
पुरुषानी जास्त पैसे घेवुन
पुरुषानी जास्त पैसे घेवुन वाजत गाजत घालवलेलि.. बायानी कमी पैसे घेवुन पण धुम धडाक्यात राखली..
बायांचे मनपुर्वक अभिनंदन!!! बाप्यांचा ---- निशेध!!!!
काल स्वातंत्र्यदिनानिमित्त
काल स्वातंत्र्यदिनानिमित्त केबलवर लगान लागलेला. तो बघितला आणि समाधान मानले.
टीम बिल्डिंग एक्सरसाईज म्हणून
टीम बिल्डिंग एक्सरसाईज म्हणून सगळ्या भारतीय संघाकडून (राखीव खेळाडूंसकट) 'ओ पालन हारी, निर्गुण और न्यारे' हे भजन पाठ करून घ्यावे आणी सगळ्यांनी रोज २१ वेळा त्याचे एकत्र पठण करावे असा प्रस्ताव मी मांडतो.
अभिषेक . कालच फेबुवर बहुधा
अभिषेक :). कालच फेबुवर बहुधा फेक न्यूज वाल्यांची आता भारताला तीन गुना लगान द्यावे लागणार म्हणून एक पोस्ट फिरत होती.
दिल बोले हडिप्पा-२ ची कल्पना खरेच प्रत्यक्षात उतरवायला हवी होती.
तीन टेस्ट्स झाल्या की वन डे असतात या गेल्या अनेक वर्षांच्या पॅटर्न मुळे तिसर्या मॅच नंतर आपले लोक वन डेच खेळत आहेत
इथे मला इंग्लंडची फुटबॉल
इथे मला इंग्लंडची फुटबॉल टीमची आठवण येते. प्रिमियर लीग मध्ये प्रचंड दणकून पैसे मिळतात आणि तिथे बरेच इंग्लिश खेळाडू जगतात. फक्त ऐन मोक्याच्यावेळी माती खातात. तोच प्रकार भारतीय क्रिकेटचा होतो आहे. इतकी बोम्बाबोम्ब आणि दाणादाण होवून काहीही होणार नाही. हे असेच चालू राहणार.
<< हे असेच चालू राहणार.>> '
<< हे असेच चालू राहणार.>> ' अल्कॉहॉलिक अॅनॉनिमस'सारखी क्रिकेटचं खूप जुनं व्यसन सोडायला मदत करणारी एखादी संस्था कुणी सुचवूं शकेल का ? प्लीज !
छे हो व्यसन शेवटी आपण मनात
छे हो व्यसन शेवटी आपण मनात आणले तरच सुटते त्यामुळे काही फायदा नाही बघा
भाऊ, क्रिकेटचं व्यसन नका
भाऊ, क्रिकेटचं व्यसन नका सोडू, भारतीय टीमचं सोडा! डेल स्टेनची गोलंदाजी बघण्याचा आनंद असा कसा सोडावा?
उलट परदेशी बहुराष्ट्रीय
उलट परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी नोकरी करणार्यांपेक्षा भारतातील फ्रँचायझीसाठी खेळणारे जास्त सरस नाही का
त्यात काय सरस? पैसे मिळवायला, ज्ञान मिळवायला जिथे जावे लागेल तिथे जातात लोक. तुम्हाला माहित नाही? - पूर्वी जेंव्हा भारतात पैसे मिळत नसत तेंव्हा इंग्लंडच्या परगण्यांतून भारतातील खेळाडू खेळले आहेत, पैशासाठीच नाही तर खेळ सुधारण्यासाठी पण.
उगीच दुसर्या कुणाला पैसे मिळतात म्हणून जळू नये. तुम्ही पण इथे या, इथे राहून, इथल्या परिस्थितीत राहून नवे शोध लावण्याची अक्कल आहे तुम्हाला. मग तुम्ही अमेरिकेत येऊन शोध लावले की त्यावरून भारतातले लोक प्रौढी मिळवतील की पहा भारतीयाने काय केले!!
तोपर्यंत नुसते घरी बसून इतरांच्या वर जळा.
आयपीएलमधून वेळ मिळाल्यानन्तर फावल्या वेळात कसोटी खेळणार असाल तर असेच होणार...
मग काय वाईट आहे? त्यांना समजते की काय केले की पैसे मिळते, सुख मिळते.
ज्यांना हे कळत नाही ते गरीब नि दु:खी राहून उगाच इतरांना नावे ठेवतात.
एकूण सर्व पैसे मिळवण्यासाठी आहे, उगाच कशाला ढोंगे करायची?
अजूनहि आशा आहे - २०-२० सारखे
अजूनहि आशा आहे - २०-२० सारखे खेळून, बाद न होता, भारत दुसर्या डावात ६०० धावा करेल नि पाचव्या दिवशी इशांत नि भुवी नि आश्विन सगळ्या विकेट्स काढतील. पुनः भारताचा जय.
मी आपले भारताच्या बाजूने लिहायचे म्हणून लिहीले - बाकी अँडरसन, ब्रॉड, इशांत, भुवी यांची गोलंदाजी, कूक, रूट, कोहली, रहाणे यांची फलंदाजी, कधी अशक्य वाटणारे घेतलेले झेल असे बघण्यात जास्त मजा.
<< क्रिकेटचं व्यसन नका सोडू
<< क्रिकेटचं व्यसन नका सोडू ........डेल स्टेनची गोलंदाजी बघण्याचा आनंद असा कसा सोडावा? >> खरंय. गेल्या कसोटीनंतर डी. के. गायकवाड [अंशुमन गायकवाडचे वडील व १९५२च्या इंग्लंड दौर्यावर गेलेल्या संघाचे फलंदाज ] यांची मुलाखत वाचली. भारताची धुळधाण उडवणार्या त्यावेळच्या इंग्लंडच्या तुफानी 'लिजंडस'पेक्षांही ते आतांच्या अँडरसनला सरस मानतात कारण त्यावेळीं खेळपट्ट्या 'कव्हर' करत नसत याचा प्रचंड फायदा त्या 'लिजंडस'ना मिळत असे; त्यामुळें अँडरसन वेगाबरोबरच अत्यंत चलाखीने व नेमकी गोलंदाजी करून बळी मिळवतो, याचं डीकेना अधिक कौतुक वाटतं. भास्कराचार्यजी, मलाही तुमचं पटतं कीं अँडरसनसारख्यांचं हें कसब बघायचं सोडून आपण भारताच्या विकेटस पडल्या म्हणून नुसतं कपाळावर हात मारत बसणं सोडायला हवं.
बोंबला ! मी तर अंशुमन गायक
बोंबला ! मी तर अंशुमन गायक वाडलाच विसरून गेलो होतो त्याचे वडील तर दूरच !
रॉबिनहूडजी, बोंबलायचं कांहीं
रॉबिनहूडजी, बोंबलायचं कांहीं कारणच नाही; आमच्या लहानपणीं कानावर पडलेलीं नांवं म्हणून लक्षांत येतात इतकंच. आणि तसं पाहिलं तर त्यावेळचे आपले दौरे व आत्तांचा हा दौरा दोन्हीही विसरण्यायोग्यच !
गेली कसोटी ३ दिवसांत
गेली कसोटी ३ दिवसांत संपल्यावर धोनीच्या संघाने एक्स्ट्रा मिळालेले दोन दिवस नक्की क्रिकेटच्या सरावासाठी वापरले की दहीहंडीच्या ????

कारण हि कसोटी देखील ३ दिवसांत संपवून सोमवारी हंडीसाठी फ्री होताहेत असे दिसतेय
आजच्या पहिल्या १० ओव्हर्स
आजच्या पहिल्या १० ओव्हर्स मध्ये ९२ धावा. ! च्यायला टेस्ट आहे हे की टी २०! (तसे आपले बॅटसमन टी २० असल्यासारखेच खेळतात म्हणा. १५० +/ - धावा आणि १० विकेटस. )
९.२ चा रनरेट देखील एक रेकॉर्डच ठरावा.
१७००
१७००
जो रुट संपूर्ण मालिका भारतीय
जो रुट संपूर्ण मालिका भारतीय गोलंदाजांच्या मुळावर उठलेला!
१०० च्यावर सरासरी आहे पठ्ठ्याची ह्या मालिकेत!
ईंग्लंडला हा सामना देखील
ईंग्लंडला हा सामना देखील तिसर्या दिवशीच संपवायचा आहे वाटते म्हणूनच ते फास्ट खेळत होते.. स्साला काय तो कॉप्न्फिडन्स भारतीय फलंदाजांवर .. बघूया आता जागताहेत त्यांच्या विश्वासाला की काढतात खेळून दोन सत्र ..
बघूया आता जागताहेत त्यांच्या
बघूया आता जागताहेत त्यांच्या विश्वासाला की काढतात खेळून दोन सत्र ..>>>>>
अगदी जागतायेत विश्वासाला! दोन मुंडकी गमावली!
आणि मॅच संपली... धतड ततड..
आणि मॅच संपली... धतड ततड.. काय पण बॅटींग केलीये.. वा वा..
माझ्या आजवरच्या आयुष्यात मी
माझ्या आजवरच्या आयुष्यात मी ईतकी नामुष्की नव्हती पाहिली. या आधीही भारताला कित्येकदा १०० च्या आत सर्वबाद होताना पाहिले आहे पण सलग तीन सामने जसा कचरा झालाय त्याला तोड नाही.
पण संघातील धोनीचे लाडक्यांना बदलायची गरज नाही, ते सारे वेस्टईंडिजशी घरच्या मैदानावर खेळताना पुन्हा फॉर्मला येणार आहेत. (तंत्र तर त्यांचे वादातीत आहेच.)
तर चला मित्रांनो,
वेस्टैंडिज दौर्यासाठी आपापली टीम सांगा ..
माझे प्लेयिंग ११ १. विजय २.
माझे प्लेयिंग ११
१. विजय
२. धवन
३. पुजारा
४. कोहली
५. रहाणे
६. शर्मा
७. धोनी
८. जडेजा
९. अश्विन
१० आणि ११ - दोन वेगवान गोलंदाज (इशांत, शमी, आरोन, भुवनेश्वर ... वगैरे वगैरे पैकी दमछाक न झालेले, फिट असलेले)
१२. १३, १४ राखीव खेळांडूंमध्ये गंभीर, बिनीच्या जागी एखाद दुसरा नवीन चेहरा तेवढा दिसेल, जो ईंग्लंडला नव्हता ..
चेन्नई सुपर किंग ची पुरी टिम
चेन्नई सुपर किंग ची पुरी टिम खेळणार .. परदेशी खेळाडुंच्या जागेवर रहाने आनी काही नवीन चेहरे...

हा हा .. चेन्नई सुपरकिंग ..
हा हा .. चेन्नई सुपरकिंग .. भारतीय क्रिकेट संघाचे प्रवेशद्वार ..
पुढच्या लिलावात बहुतेक भारतीय होतकरू खेळाडू बोली लावतील चेन्नई सुपरकिंगतर्फे खेळण्यासाठी ..
पासपोर्ट जप्त करा सर्वांचे.
पासपोर्ट जप्त करा सर्वांचे. पुन्हा बाहेर कोणी चुकूनही खेळायला गेले नाही पाहिजे. एक वर्ल्डकप काय तो ऑस्ट्रेलियात आहे ना, तेवढा फक्त न्या. तो देखील रांगेत, हात पाठीमागे, खेळवा आणि आणा परत लगेच. भारतातच खेळतील तर इज्जत बनी राहील आपली. उगाचच मोठमोठी नावे छोटी झाली.
एक सहज तुलना - सोर्स मटा
परदेशातील कसोटी विजय
दादा - ११ जय १० पराजय
धोनी - ६ जय १४ पराजय
येत्या काळात हा आकडा आणखी बेक्कार होत जाण्याची शक्यता ......
^^^^^^ माही धोनी विरुद्ध दादा
^^^^^^
माही धोनी विरुद्ध दादा गांगुली तुलनेत एक नव्याने हाती लागलेली माहिती.
# गांगउली आपल्या कारकिर्दीत फक्त एकदाच डावाने पराभूत झाला आहे.
# धोनीने मात्र हाच पराक्रम सात वेळा बजावला आहे.
Pages