क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुजारा, कोहली ह्यांच्याकडे तंत्राचा अभाव नाहीये. ते दोघही, आऊट ऑफ फॉर्म असणं आपल्याला सद्ध्या भोवतय हे मात्र खरय. विजय सद्ध्या चांगला 'टिकतोय', पण तो एका बाजुने टिकलाय आणी त्याच्या अवती-भवती बाकीच्यांबरोबर मोठ्या भागीदार्या होताहेत असं अजून तरी घडत नाहीये. अजून तरी चांगलं idling असणारी, पण जरा accelerate केलं की बंद पडणार्या गाडीसारखा वाटतोय तो.

धवन आणी जडेजा हे दोघही टेस्ट मटेरिअल नाही वाटत. धवन सेहवाग अ‍ॅटीट्यूड उधार घेतल्यासारखा वाटतो (वाघाचं कातडं पांघरलेला वगैरे). रविंद्र जडेजा जर टेस्ट दर्जाचा ऑलराऊंडर असेल, तर विवेक मुश्रन हा अमिताभ बच्चन च्या दर्जाचा अभिनेता आहे हे देखील मान्य व्हावं.

एक गंमत. हा रविंद्र जडेजा मागच्या मॅच पर्यंत आपला प्रमुख फिरकी गोलंदाज होता, तर ह्या मॅच मधे ५७ षटकं होईपर्यंत त्याला एकही षटक का नाही दिलं गेलं. बरं असंही नाही की बाकीची सगळी षटकं मध्यमगती गोलंदाज टाकत होते, कारण अश्विन ने त्या ५७ मधली ११ षटकं टाकली होती. त्या कालावधीत रॉबसन, बेल आणी रूट असे ३ right-handed फलंदाज खेळून गेले (ज्यांना त्याचे बॉल्स लेगस्पिन होतात.) मग पहिल्या ५७ षटकांत एकही षटक टाकण्याच्या योग्यतेचा न वाटणारा गोलंदाज गेल्या अनेक टेस्ट मॅचेस मधे आपला प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून कसा काय खेळत होता?

>> मागच्याच इंगलड सिरिज मधले सचिन आणि द्रविड दिसू लागले असतील..
पुजारात गेल्या इंग्लंड सिरीजमधला द्र्वीड दिसला तर आणखी काय पाहिजेल मग.... मागची सिरीज तुम्ही बघितलेली दिसत नाहीये...... का तुमचा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात घोळ होतोय Wink

बाकी टेस्टमध्ये पार्टटायमर्सचे काही काम नाही हे मात्र नक्की!

बिन्नीला इंग्लंडात धोनीच्या मनाविरुद्ध पाठवलेले दिसतय.... पंकज सिंगला वरुण अ‍ॅरॉनच्या आधी संधी कोणत्या बेसिस वर मिळाली?

धोणी ने अश्विन आणि जडेजाला मध्येच गोलंदाजी देऊन पूर्ण लय घालवली असे मला वाटते. दोघेही ह्या वातावरणात उपयोगी नाहीत. जर वातावरण बदलले तर अश्विन थोडातरी.

उद्या भूवी, वरूण आणि पंकज ह्यांनीच गोलंदाजी केली पाहिजे. भूवीने थोडा(साच) स्पिड वाढवला तर तो अँडरसनपेक्षा भेदक होऊ शकेल. कृपया शॉर्ट बॉल न टाकता ४ स्लिप लावून स्विंग वर(च) भर द्यावा.

ती लेग स्लिप का लावत आहे धोणी हे पण अनाकलनिय !

फिल्ड अशी असावी.

किपर, ४ स्लिप, गली, पाँईट, कव्हर आणि शॉर्ट कव्हरच्या मध्ये एक माणूस, शॉर्टमिडविकेट, मिडॉन

लेग तर सोडा, मिडल स्टम्प वर एकही बॉल पडता कामा नये.

गॉन आर दोज डेज, जेंव्हा ८ +१ फिल्ड लावलेली असायची. २००८ मधील झहिर- इशांत ची ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉलिंग अजून आठवत आहे. दॅट इज ( की वॉज) टेस्ट !

इशांतला एकदा लय मिळाली ( टेस्ट मध्येच) की तो फार भेदक होतो. ती षटकं पाहातानाही मजा येते. तसेच भूवीचे आहे, पण थोडी स्पिड आणली तर जबरदस्त होईल.

धोणीने शहाणपणा करून अश्विन - जडेजाला फक्त फिल्डर म्हणूनच वापरावे उद्या. त्याने आधीच लय घालवली आहे. ८० + ची लिड आणि वेळ गेला ते वेगळेच.

भारताला बरेच गुणी कॅप्टन मायबोलीवर मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआय उगीचच त्या ढोण्याच्या नादी लागलीय.... Happy

हुडसाहेब ....... क्रिकेट मधे नॉन प्लेइंग कॅप्टन सारखी पध्दत आली नाही........ नाहीतर मी माझा नंबर पहिला लावला असता Happy

सामना वेगाने निसटतोय ...

आपली स्लिप फिल्डींग हि सुद्धा डोकेदुखीच झाली आहे, बॉर्लर्सचा आत्मविश्वास डळमळीत होतो अश्याने, खास करून आपल्या संघात तर सारे नवोदित संघात जागा पक्की करायला झुंजत असताना त्यांना हे पार्ट ऑफ द गेम म्हणत स्विकारणे अवघड जात असावे.

ईंग्लंड लीड बाय १६१ .. टोटल ३१३ /७

३ गडी अजूब बाद करायचेत मात्र शेपूट झुंजवण्याचे फुल्ल चान्स असल्याने जर हा लीड २५० ला पोहोचला तर डावाने पराभव चाखावा लागेल !

तोडले नाक................. हुर्रे..................... अ‍ॅरोन ने ब्रॉड चे नाक तोडुन त्याचा "शुर्पनका" केला

ब्रॉड नसूनही आपली हालत काही टळली नाही.
६१/४
गेल्यावेळच्या ८/४ पेक्षा सुस्थिती म्हणू शकतो का?

ये रे ये रे पा व सा .....

निकलना खुल्दसे आदमका , सुनते आये है ..
लेकिन बहुत बेआबरू होकर , तेरे कूचेसे हम निकले .....

खुल्द= स्वर्ग
आदम = अ‍ॅडम
अ‍ॅडाम आणि इव्हच्या गोष्टीत अ‍ॅडमला स्वर्गा तून हाकलून देण्यात येते त्याचा संदर्भ असलेला हा चाचा गालिबचा शेर आहे::फिदी:

रॉहू - जरा पहिल्या ओळीचे संस्प द्या. ती बाउन्सर गेली म्हणण्यापेक्षा थोडीशीच कळाल्याने 'निक' देऊन गेली असे म्हणतो Happy

लोकहो, एकसो एक खंदे वीर संघात असताना सुद्धा असे पराभव कमी होत नसत आपले. गावसकर, विश्वनाथ पासून ते सचिन, द्रविड असताना सुद्धा. कारण सगळेजण एकत्र फेल जाणेही बर्‍याच वेळा होत असे. फक्त एकदा हरल्यावर पुढच्या मॅच मधे खुन्नस ने खेळले जात असेल. बघू ओव्हल ला तसे दिसते का. आणि तेथे जडेजा, आश्विन काय करतात ते ही.

बाय द वे, तो पाकचा युनुस खान कधी परत आला संघात? की कधी गेलाच नव्हता? त्यांची रिटायरमेण्ट बाकीच्या टीम्स मधल्या लोकांच्या ब्रेक पेक्षा लहान असते Happy

उद्या दिवसभर पाऊस पडणार आहे - ईंग्लंड हवामान खाते.

आणि आपण इथे धसमुसळा खेळ करून आजच सामना संपवायच्या मागे लागलो आहोत. क्या बात है !

सर जडेजा , आजही वेगवान गोलंदाजाला पुढे येऊन चौकार मारत होते. क्या बात है !
त्याच्या आधी आश्विनला खरे तर पाठवायला हवे होते, तो निर्विवादपणे त्यापेक्षा चांगला कसोटी फलंदाज आहे.

मोईन ने ४ विकेट घेतल्या
यावरून आपल्या फलंदाजीची लायकी दिसून येते

तो बिचारा चुपचाप गोलंदाजी टाकत आहे

चला रविवार मोकळा झाला.. नायतर उगाच अर्ध लक्श मॅच वर.. तशे आपले प्लेअरस दयाळु आहेत.. सगळ्यांचा त्रास वाचवला.... आता ते पण इग्लंड फिरायला मोकळे...

त्यांना पण रक्षाबंधन करायचे असेल
नारळी भात खायचा असेल
बाकी अश्विनला फलंदाज म्हणून विराटच्या जागी घ्यायला हरकत नाही

त्यांना पण रक्षाबंधन करायचे असेल >>>> कोहलीला अनुष्का राखी बांधतेय असे चित्र नजरेसमोर आले उगाचच्या उगाच Wink

कोहलीला अनुष्का राखी बांधतेय असे चित्र नजरेसमोर आले उगाचच्या उगाच डोळा मारा
ओह नोSSSSS.
कोहलीला हार्ट अटॅक येइल हो! विनोद म्हणून सुद्धा असे लिहू नका!!

अश्या वेळी, पूर्वी १९५२ साली चार बाद शून्य अशी अवस्था होती मग विजय मांजरेकरने (तो तेंव्हा जेमतेम विशी पार केलेला बच्चा होता) २४ धावा काढल्या नि एकूण ३२ धावात सर्व संघ गुंडाळल्या गेला होता. त्या पेक्षा बरे असे म्हणा.
दुसर्‍या कसोटीत कसे जिंकलो होतो याच्या आठवणी काढाव्यात.
तसे आपण मागेहि काही वेळा इंग्लंड विरुद्ध जिंकलो होतो एकदा जीत दहादा हार असे व्हायचेच क्रिकेट या अन्सर्टन बट ग्लोरियस गेम मधे.
तर भारतात या म्हणावे, मग दाखवू इंगा!!

<<कोहलीला अनुष्का राखी बांधतेय असे चित्र नजरेसमोर आले उगाचच्या उगाच डोळा मारा
ओह नोSSSSS.
कोहलीला हार्ट अटॅक येइल हो! विनोद म्हणून सुद्धा असे लिहू नका!! >>

हे मात्र खर आहे.. बिचारा वन डे आणि २०/२० खेळतो ते पन बंद होइल Dolo.gif

पण मला वाटते त्याच्या या साडेसातीवर कोण्या मांत्रिकाकडून ताईत बांधून घेण्यापेक्षा अनुष्काताईंच्या हातून राखी बांधून घेणे फायद्याचे ठरेल.

किंवा हा उपाय अघोरी वाटत असेल तर अनुष्का वहिनींच्या मांग मध्ये दो चुटकी सिंदूर टाकावे एकदाचे म्हणजे मग प्रेयसीची बायको झाली की खेळात लक्ष लागून राहील.

चला मित्रांनो, आता शेवटच्या सामन्याचा संघ निवडा.

माझ्यामते सर जडेजा विश्रांती घेतील आणि त्या जागी गोलंदाज भरती न करता रोहित शर्माला पुन्हा आत घेतील.
(अर्थात ओवलवर स्पिन मिळेल या आशेवर किंवा या बहाण्यावर कदाचित तो संघातील जागा टिकवूनही धरेल.)

पंकज सिंगला आराम देऊन फिट असल्यास इशांत किंवा शमी आत येतील हे नक्की.

गंभीरला अजून एक संधी मिळेलच. कोहली-पुजारा यांना पर्याय नसल्याने खेळवावेच लागणार.

Pages