Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय राव एका मॅचने एव्हढे
काय राव एका मॅचने एव्हढे खचलात ! It's process. >>> Secretly hoping that this was sarcasm. (धोनीच्या 'प्रोसेस मोर इम्पॉर्टंट' म्हणण्यावर) तसेही मला तर साउथहॅम्प्टन बघितल्यावरच खचायला झाले! ही त्यात अजून भर
अहो भाऊ इथे अमेरिकेतले
अहो भाऊ इथे अमेरिकेतले everyone is a winner विसरला का ?
Winnah. साध्या winner ला
Winnah. साध्या winner ला आपल्या गावात कोण विचारतंय!
काय राव एका मॅचने एव्हढे
काय राव एका मॅचने एव्हढे खचलात ! It's process.
>> हो हो इट्स अ प्रोसेस
स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसेस ! ::फिदी:
आज पाऊस?
आज पाऊस?
३५/४ ...स्तॅन्डर्ड ऑपरेटिंग
३५/४ ...स्तॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसेस !
आज पाऊस? अरेरे >> होय, पण
आज पाऊस? अरेरे
>>
होय, पण विकेट्सचा !!
चला नं लागले.. कोणाला बॅटींग
चला नं लागले.. कोणाला बॅटींग करायची आहे का.. ११ संपले की .. आपण जाउ..
थोडा धीर धरा. बीसीसीआय ने
थोडा धीर धरा. बीसीसीआय ने आपल्या सगळ्यांसाठी एक चांगली योजना आणलेली आहे.
ऑक्टोबर मधे हैद्राबाद, बंगळूरू आणी अहमदाबाद येथे श्री(निवासन) कृपेकरून, सालाबादप्रमाणे वेस्ट ईंडिज संघाशी ३ कसोटी सामने आयोजित करण्याचे योजिले आहे. खरं तर श्रीलंकेलाच बोलावणार होते, पण ते हल्ली कृतघ्न झालेले असून, लोकांच्या घरी जावून, त्यांनाच हरवून यायला लागलेले असल्यामुळे (उदा. ईंग्लंड दौरा), त्यांच्या हातून हा सोनियाचा नारळ काढून घेण्यात आला आहे, अशी आतली खबर आहे.
अशा रितीने, अगदी हवा भरलेल्या शिडासारखे नसले, तरी भरल्या वांग्यासारखे, सगळ्यांचे फॉर्म्स परत येतील, आत्मविश्वास (आधीच स्काय हाय असलेला) अधिक वाढेल. तोंडाची वाफ दवडायची सोय होईल आणी अशा रितीने, हे गुणीजन, खेळाडू कम (हिंदी कम, ईंग्रजी नाही) तत्वज्ञानी कप्तानाच्या नेतृत्वाखाली आपण क्वांटास एअरलाईन ने ईग्लंड सीरिज पार्ट २ साठी ऑस्ट्रेलिया ला प्रयाण करू.
७९-८ ! सततची अशी धांवसंख्या
७९-८ ! सततची अशी धांवसंख्या अक्षम्यच, कांहीं उपरोधिक लिहावं असं वाटण्याच्याही पलीकडली !!!
भाऊ, तुम्ही जर निराश झाला
भाऊ, तुम्ही जर निराश झाला असाल, तर मला वाटतं, निराशेची नीचांकी पातळी गाठली गेलीये. तुम्ही नेहेमीच आशावादी असता. (९०/९).
एक मिनिट लोकहो. सकळच्या
एक मिनिट लोकहो. सकळच्या सत्रातली बॉलिंग बघितलीत का ? It was simply top class. Pitch is supporting स्विन्ग and ball is nipping around. Let's admit that Anderson-Broad are artist when it comes to use such condition, pitch and weather. What bothered me really is we lost it completely against woakes and jorden.This was not the toss you would have wanted to lose.
दुपारी आपण सर्व बाद झाल्यावर सूर्य डोकावेल नि पिच पण ईझ-अप होईल हे मात्र नक्की
१०० करा एव्हढीच माफक अपेक्षा.
असामी, आज कसिनो मधे जाऊन या.
असामी, आज कसिनो मधे जाऊन या. तुमच्या अपेक्षा पूर्ण होणारा दिवस दिसतोय. १०० झाले पूर्ण.
बघा मी धोनी असतो तर टॉस
बघा मी धोनी असतो तर टॉस हरल्यावर शेवटून बॅटींग सुरु केली असती
पण बिन्नी, गंभीर नि पंकज सिंग परत टेस्ट खेळतील असे वाटत नाही.
"पण बिन्नी, गंभीर नि पंकज
"पण बिन्नी, गंभीर नि पंकज सिंग परत टेस्ट खेळतील असे वाटत नाही." - त्यांनी खेळावं असंही वाटत नाही.
खरं तर जडेजा ने सुद्धा खेळू नये.
केकेआर आता आयपीएल २०१५ पण जिंकतील, कारण गंभीर ला आयपीएल वर नीट फोकस करता येईल.
त्यांनी खेळावं असंही वाटत
त्यांनी खेळावं असंही वाटत नाही. >>
फक्त पंकज सिंग बद्दल वाईट वाटते. He seem to have lost it completely. Very strange indeed, considering he was highest wicket taker for 2 seasons in domestic tournaments, which means he must have been used to concentrate on line and length to suffocate batsmen to get wickets. त्याच्या कडे बघून तो फास्ट बॉलरपासून मिडिअयम पेसर बनला ह्याचे वाईट वाटते.
खरं तर जडेजा ने सुद्धा खेळू नये. >> That's called wishful thinking my friend.
. मागच्या सीजनपर्यंत मी नाही म्हटले असते पण अक्षर पटेल, कर्ण शर्मा हे तेव्हढेच सक्षम पर्याय उपलब्ध होताहेत म्हटल्यावर खरच नको असे वाटते. फार तर भारतात टेस्ट्मधे तिसरा स्पिनर म्हणून ठिक आहे.
केकेआर आता आयपीएल २०१५ पण जिंकतील >>
गेला बाजार सेहवागला पण एक टेस्ट मिळाली खेळायला तर त्याच्या पण १०० होउन जातील 
पुढच्या इंग्लंड सिरीजच्या आधी गूचला बॅटींग कोच म्हणून बोलावून घ्यावे. मार्टीन क्रो म्हणतो कि He feels sorry for ballers who will be balling for England in next Ind-Eng series in England. त्याची खात्री आहे कि कोहली तोवर पिसे काढायच्या मूडमधे असेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सकाळी नासीर हुस्सेन हि असेच म्हणाला कि त्याला कोहलीच्या खेळामधे technical fault आहे असे वाटत नाही फक्त तो फॉर्म मधे नाहिये त्यामूळे इरवी त्याने ज्या चूका टळल्या असत्या त्या सगळ्या इमान इतबारे करतोय नि बाद होतोय. पण तो एव्हढा टॉप क्लास प्लेयर आहे कि ह्यातून तो नक्की शिकेल and he will come back stronger. हुस्सेन कोणाबद्दल एव्हढा चांगला बोलताना फारसा आठवत नाही.
क्रिकइन्फो वरची एक कमेंट..>>
क्रिकइन्फो वरची एक कमेंट..>> "India should consider replacing Ghambhir with Kamini and Virat with Mithali Raj."
सांगलीची स्मृती मानधना मस्त खेळत आहे त्या मॅच मधे
कोहली गेले वर्ष - दोन वर्षे
कोहली गेले वर्ष - दोन वर्षे इतका भन्नाट खेळला आहे की त्याच्या तंत्रामध्ये काही दोष आहे असे विधान लोकांना धाडसाचे वाटत असून ते तसे म्हणायला धजावत नाहीयेत. त्याचे भले व्हावे असे कोणाला वाटत असेल तर ते तसे बोलून दाखवा.
आजची खेळपट्टी फार खतरनाक होती जे ९०-९ अशी स्थिती होऊ शकते हे काही पटत नाही. ईंग्लंड कंडीशनचा फायदा उचलत चांगली बॉलिंग करणारच पण आपली फलंदाजी भंकसच झाली.
९०-९ वरून १५८ सर्वबाद .. वन्स अगेन थँक्स टू आणि जोरदार टाळ्या तंत्रात जेमतेम पण फायटर धोनी साठी ... १५ चौकार, एक षटकार आणि ८२ धावा !
मला वाटते technique is
मला वाटते technique is overrated असे हुस्सेनला सांगायचे आहे. आजची धोनीची इनिंग बघितल्यावर त्यात फारसे चुकीचे आहे असे वाटत नाही खरे. कोहलीने आज मारलेला कव्हर ड्राईव्ह पाहिला का ? तो जेंव्हा फूल फ्लोमधे असतो तेंव्हा तो बॉल बॅट्ला लागल्यापासून झूममधे सुटतो. आज तसे वाटले नाहि तेंव्हा सारखे लवकर बाद झाल्यामूळे तो tentative झालाय असे वाटले. bottom hand hang किती वेळा केला त्याने आज. अर्थात हा तंत्राचा भाग नाही असे नाही पण त्याला माहित नाही असे नाही कारण तो काढत होता फक्त थोडा उशिरा त्यामूळे बॉल शार्प एज घेत होता. असो एका इनिंगवर फारसे काही बोलणे श्रेयस्कर नाही.
धोनी मस्तच खेळला. आजची press conf ऐकायला मजा येईल. Dhoni has earned right to complain today
कोणी तरी आपल्या स्लिप्स थोड्या पुढे लावा रे.
<< भाऊ, तुम्ही जर निराश झाला
<< भाऊ, तुम्ही जर निराश झाला असाल,...... तुम्ही नेहेमीच आशावादी असता. (९०/९). >> ज्यांच्यावर भविष्याचा भंरवसा ठेवतो - व तोही त्यांची गुणवत्ता पारखल्यावर - त्यानीच असा सतत अपेक्षाभंग केला तर निराश होणारच ना ! आपल्यासाठी क्रिकेट हें नुसतंच मनोरंजन नाही , एक जीवनसाथीही आहे.
पण धोनीला खरंच मानलं !!!
पण धोनीला खरंच मानलं !!! >>
पण धोनीला खरंच मानलं !!! >> मग ही मॅच संपेपर्यंत त्याच्यावर टीका करू नका कसे
<< कोणी तरी आपल्या स्लिप्स
<< कोणी तरी आपल्या स्लिप्स थोड्या पुढे लावा रे. >> पुढे काय मागे काय, झेल सोडणारे हात तर तेच असणार ना !
जगात १०० टक्के परफेक्ट
जगात १०० टक्के परफेक्ट कोणाचेही तंत्र नसते. प्रत्येक फलंदाज त्यातील दोष लपवून आपल्या स्ट्रेंथवर खेळत असतो. मात्र जेव्हा तुमचा फॉर्म जातो तेव्हा त्यातील दोष उघड व्हायला सुरुवात होतात. आणि हिच खरी वेळ असते त्यावर मेहनत करायची, न की ते दोष झाकायचा प्रयत्न करून पुढच्या मालिकेत बदललेल्या परिस्थितीत फॉर्म पुन्हा गवसेल याची वाट बघायची.
. आणि हिच खरी वेळ असते त्यावर
. आणि हिच खरी वेळ असते त्यावर मेहनत करायची, न की ते दोष झाकायचा प्रयत्न करून पुढच्या मालिकेत बदललेल्या परिस्थितीत फॉर्म पुन्हा गवसेल याची वाट बघायची. >> कोण झाकतेय दोष नि पुढच्या मालिकेत बदललेल्या परिस्थितीत फॉर्म पुन्हा गवसेल याची वाट बघतोय ? हे जे कोणी बोलले तो कोहली नसून मार्टीन क्रो नि हुस्सेन होते. ते सध्या क्रिकेट खेळत नाहीत. कोहली २ आठवडे त्या चूका टाळण्यासाठी फ्लेचरबरोबर सराव करतोय असे commentrators म्हणत होते. ते प्रत्यक्षात England मधे असल्यामूळे त्यांची सरावाबद्दलची माहिती आपल्यापेक्षा अचूक असेल असा त्यांना संशयाचा फायदा देऊया रे.
पुढे काय मागे काय, झेल सोडणारे हात तर तेच असणार ना ! >> :D. सुटायला आधी हातत तर येउ दे मूळात
<< प्रत्येक फलंदाज त्यातील
<< प्रत्येक फलंदाज त्यातील दोष लपवून आपल्या स्ट्रेंथवर खेळत असतो.>> जागतिक स्तरावरच्या क्रिकेटमधे गोलंदाज नेमके तेच दोष हेरून फलंदाजांची त्रेधा उडवत असतात; म्हणूनच अव्वल दर्जाचे फलंदाज आपल्या तंत्रातील दोषांवर मात करायला सतत झटत असतात. मोहिंदर अमरनाथ जो बाऊन्सरचा 'बकरा' समजला जायचा, तोच नंतर शॉर्ट पिच चेंडू खेळण्यातला दादा झाला !! सध्याच्या संघातले तरूण फलंदाज इतर देशातील खेळपट्ट्यांबाबत अगदींच नवखे नाहीत. 'अंडर १९' संघापासून ते बाहेर खेळताहेत व स्वतःच्या तंत्रातले दोष समजण्याइतके क्रिकेटचे जाणकारही आहेत. म्हणूनच काळजी वाटते व वाईटही वाटतं.
मिसिंग सेहवाग
मिसिंग सेहवाग !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!११
सध्याच्या संघातले तरूण फलंदाज
सध्याच्या संघातले तरूण फलंदाज इतर देशातील खेळपट्ट्यांबाबत अगदींच नवखे नाहीत. 'अंडर १९' संघापासून ते बाहेर खेळताहेत व स्वतःच्या तंत्रातले दोष समजण्याइतके क्रिकेटचे जाणकारही आहेत. म्हणूनच काळजी वाटते व वाईटही वाटतं.
>>>>>>
काळजी आणि वाईट ... सहमत ..
पुर्वी आपण परदेशात पहिल्या कसोटीत मार खायचो पण स्पर्धा पुढे सरकायची तसे कंडीशनला सरावत परफॉर्मन्स सुधारायचा. या इथे मात्र सुरुवातीला जिंकलो, (आता असे वाटतेय की त्यात ईंग्लंडच्या खराब फॉर्मचा मोठा हात असावा) आणि मग हरायला सुरुवात झाल्यावर स्पर्धा जशी पुढे सरकली तसे आपली अजून अजून कचरापट्टी होऊ लागली. हे खरेच धोक्याचे लक्षण आहे, कारण हा दौरा संपल्यानंतरही आपण यातून शिकलो असेही म्हणता येणार नाही. (आता लाज राखायला किंवा ठरलेला डायलॉग म्हणून बोलले जाईलही पण तो अप्रामाणिकपणाच)
असामी, ओके, पण माझे ते जनरल
असामी, ओके, पण माझे ते जनरल विधान होते आणि इथे कोहलीलाही लागू. पण कोहली स्वता तसे समजतोय या आशयाने नाही, तर इतर कोणीही त्याचे तंत्र भारीच आहे फक्त फॉर्म गंडलाय असे म्हणत आहेत त्यांच्यासाठी होते. कारण बरेच क्रिकेटप्रेमी कोहलीसारख्या क्लासिकल प्लेअरच्या तंत्रात काही गडबड असू शकेल हे मान्यच करायला तयार नाहीत. तो स्वता मनावर घेऊन चुका शोधून त्याद्रुष्टीने मेहनत घेत असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि तेच अपेक्षित आहे.
आपल्यासाठी क्रिकेट हें नुसतंच
आपल्यासाठी क्रिकेट हें नुसतंच मनोरंजन नाही , एक जीवनसाथीही आहे. >>> अनुमोदन भाऊ!
' यांत माझ्यासाठी काय आहे ' ,
' यांत माझ्यासाठी काय आहे ' , हा विचार सोडून 'यांत देशासाठी काय आहे' असा विचार करा, असं कांहींसं नरेंद्र मोदी काल म्हणाले; बहुतेक इंग्लंडमधल्या आपल्या क्रिकेट संघाला उद्देशूनच मुख्यतः तें असावं असं आतां वाटतंय !!
Pages