Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला क्रिकेटातलं फारसं कळंत
मला क्रिकेटातलं फारसं कळंत नाही, म्हणूनही असेल. >> कळत नसेल तर फार बोलू नये गापै. प्रत्येक गोष्टीवर मत प्रदर्शन केलंच पाहिजे असं काही नियम नाहिये.
मनीष, >> कळत नसेल तर फार बोलू
मनीष,
>> कळत नसेल तर फार बोलू नये गापै. प्रत्येक गोष्टीवर मत प्रदर्शन केलंच पाहिजे असं काही नियम नाहिये.
हे तुमचं मत झालं. इतरांची मते वेगळी असू शकतात.
आ.न.,
-गा.पै.
वन-डे आणी टी-२० साठी
वन-डे आणी टी-२० साठी निवडलेल्या संघात संजू सॅमसन, धवल कुलकर्णी आणी करण (कर्ण) शर्मा ची निवड झाली. युवराज बाहेर. रैना नेमक्या कुठल्या 'क्रिकेटिंग कारणां' मुळे संघात आला ते नाही कळलं. कारण तो आणी युवराज एकाच वेळी (ऑस्ट्रेलिया चा भारत दौरा), परफॉर्म न केल्यामुळे बाहेर गेले होते आणी नंतर दोघांनीही काही कमाल केलेली नाहीये.
रैना दरवर्षी न चुकता
रैना दरवर्षी न चुकता आयपीएलमध्ये कमाल दाखवतो, चेन्नईच्या संघातून खेळतो, धोनीचा लाडका आहे.
असो, माझा तो मर्यादीत षटकांच्या खेळातील आवडता खेळाडू आहे.
मात्र ईंग्लंडमध्ये तो कन्सिस्टंटली फार धमाल उडवू शकणार नाही.
पण तसेही इतरही कुठे तीसमारखे आहेत म्हणा.
धवल कुलकर्णीच्या निवडीचे खरच
धवल कुलकर्णीच्या निवडीचे खरच आश्चर्य वाटले. नो ऑफेन्स, पण तो थरारक वगैरे वाटत नाही.
धवण बसेल आणि गंभीर खेळेल असे वाटत आहे.
थरारक वगैरे >> थरारक वगैरे
थरारक वगैरे >>
थरारक वगैरे इशांत शर्मा अमावस्या पौर्णिमेलाच वाटतो, शमी रिव्हर्स स्विंगची मदत मिळाल्यावर वाटतो, भुवनेश्वर कुमार नवीन चेंडूची लकाकी असेपर्यंत वाटतो, नेहरा-आरपीसिंग सारखे गोलंदाज कारकिर्दीत कधीतरीच वाटले असतील, मुनाफ पटेल सारखे हा हा हा तो तर हास्यास्पद वाटायचा.. असो, धवल कुलकर्णीला डिफेंड करायचा वा आपले मत खोडायचा असा हेतू नाही, पण आपल्याकडे थरारक हा निकष नसावा. धवल कुलकर्णी गेले काही वर्षे / सीजन डोमेस्टीक मध्ये बरेपैकी सातत्य दाखवतोय त्यामुळे त्याचे नाव चर्चेत राहतेय आणि अधूनमधून संधी मिळतेय. बाकी मी स्वता देखील त्याचा फार मोठा चाहता आहे अश्यातला भाग नाही. पण एकदिवसीय मालिकांमध्ये काही दुसर्या फळीतले गोलंदाज वापरणे बरे असते.
खरं सांगायचं तर डी. एस.
खरं सांगायचं तर डी. एस. कुलकर्णी नावाचा माणूस फास्ट / मध्यमगती गोलंदाज आहे, नव्हे एक क्रिकेटर आहे, हे केवळ त्याच्या नावावरून (आणी शरीरयष्टी वरून देखील) वाटत नाही.
मला वाटतं त्याला त्याच्या करंट फॉर्म (ऑस्ट्रेलियातल्या) आणी प्रामुख्याने स्विंग गोलंदाजीसाठी घेतलं असावं.
आणी प्रामुख्याने स्विंग
आणी प्रामुख्याने स्विंग गोलंदाजीसाठी घेतलं असावं. >>
हो आणि स्विंग साठी ऑलरेडी भुवी आहे. भुवी कडे स्पिड तसाही नाही. जे काही आहे ते स्विंग वरच. तसेच गोलंदाज परत घेऊन फार काही अचिव्ह होईल असे वाटत नाही.
थरारक चा अर्थ ब्रेट ली वरनं नका घेऊ हो.
भारतीय थरारक असा घ्या. उदा कधी कधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सध्याच्या सुप्रसिद्ध इशांत शर्मा 
वरून एरान ला विसरलात
वरून एरान ला विसरलात
काय सुरेख हागलेत आपले
काय सुरेख हागलेत आपले बॅट्समन.. वा वा... जियो.... ४ बाद ८ धावा... वगैरे वगैरे..
च्यायला... सगळे बॉलर खेळ्वले
च्यायला... सगळे बॉलर खेळ्वले तरि चालतिल
टीम मध्ये ९ बॉलर, रहाणे आणि धोनी.. अशी टीम ... 
आता बॉलरच बँटींग करनार.. तेच बॉलींग करनार.. बाकी सगळे फक्त वर्हाडी... त्यापेक्षा ९ बॉलर असतील तर बँटींग तर ते करतातच आणि बॉलींगला ऑपशन पन भरपुर...
१५२ ऑल आउट..
चवथ्या आणी पाचव्या दिवशी
चवथ्या आणी पाचव्या दिवशी पावसाचं भाकित आहे. ती शक्यता रूल-आऊट करण्यासाठी एकदम फास्ट खेळले आपले फलंदाज. ह्याला म्हणतात खिलाडूवृत्ती! रिझल्ट-ओरिएंटेड!!
पण हे त्या ब्रीटीशांना माहिति
पण हे त्या ब्रीटीशांना माहिति आहे का???
नाहीतर ते खेळ्तील पुढचे २ दिवस..एकच डाव 
त्ये कोन लोक गंभीरला घेतलेच
त्ये कोन लोक गंभीरला घेतलेच पायजेल अशे म्हणीत हुत्ये त्ये कुट हाईत बरं ?
लोकहो, एक शंका आहे. मी ऐकलेलं
लोकहो,
एक शंका आहे. मी ऐकलेलं त्याप्रमाणे जर दिवसाच्या शेवटल्या षटकात बळी गेला तर ते षटक अर्धवट ठेवून दुसऱ्या दिवशी पुरं करतात. मात्र आज असं झालेलं दिसंत नाही. बॅलन्स गेल्यावर वरुणने उरलेले ३ चेंडू टाकले आहेत.
तर नियम काय आहे त्यावर जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.
आ.न.,
-गा.पै.
गामा, मला वाटतं, ते उरलेल्या
गामा, मला वाटतं, ते उरलेल्या वेळेवर अवलंबून आहे आणी तो निर्णय अंपायर्स घेतात. नविन फलंदाज येऊन ते षटक पूर्ण होण्याईतका वेळ जर शिल्लक असेल, तर ते षटक पूर्ण केलं जातं.
दहा मिनीटांपेक्षा जास्त वेळ
दहा मिनीटांपेक्षा जास्त वेळ शिल्लक असेल खेळ संपायला तो आउट झाला तेव्हा, त्यामुळे तो नियम लावून टाकू दिले असेल.
बॅलन्स गेल्यावर वरुणने उरलेले
बॅलन्स गेल्यावर वरुणने उरलेले ३ चेंडू टाकले म्हणजे तसा काही नियम नक्कीच नसावा..
जर(??) हा सामना हरलो तर, या
जर(??) हा सामना हरलो तर, या विषयावरून भांडायला हरकत नाही.
एक सामना तर जिंकलोच होतो, पण नंतर मात्र जडेजा, अँडरसन घोळ, उरलेले तीन चेंडू टाकायला लावले हा घोळ अश्या कारणांमुळे सगळा दौराच वाया गेला!!!
काय आहे ना, संवेदनाशील लोक आहोत आम्ही.
गझला, बॉलीवूड नाच, बॉलीवूड संगीत, बॉलिवूड नट्याची नजाकत, यात आमचे मन जास्त रमते.
हे असे काही झाले की नको ते क्रिकेट असे वाटायला लागते.
लोकांना कोहलीत सचिन आणि
लोकांना कोहलीत सचिन आणि पुजारात द्रविड दिसू लागले होते. सेहवागची जागा घ्यायला शिखर धवन आला होता. लक्ष्मणच्या जागी संघात आलेला रहाणे एक जमेची बाजू पण दादाची जागा आपण अजूनही शोधतोय. मग तिथे रैना, युवराजसिंग, रोहीत शर्मा, अरेच्छा आता तर रवींद्र जडेजा नामक अष्टपैलू आहे ..
सचिन आणि पुजारात द्रविड दिसू
सचिन आणि पुजारात द्रविड दिसू लागले होते >>> मागच्याच इंगलड सिरिज मधले सचिन आणि द्रविड दिसू लागले असतील..
काल ब्रॉड आणि अॅण्डीने अप्रतिम स्विंग गोलंदाजी केली.. ऑफ स्टंप बाहेरील चेंडू ३६डी. ने स्विंग होऊन किपरला चकवुन मागे सीमापार पोहचला होता. अश्या स्विंगला त्या दोघांनी चांगले काबुत ठेवले.
फिकर नॉट ....... आजच्या
फिकर नॉट ....... आजच्या दिवसात २५० च्या आत ऑलआउट होतील ..........
मला वाटतं कोहली आणि पुजारा
मला वाटतं कोहली आणि पुजारा कॅन गेट द रोप ! त्यांच्यात धमक आहे.
शिखर धवनही चांगलाच आहे पण बाहेर चालत नाही हे ऑलमोस्ट सिद्ध होत चालले आहे. (खरं तर बाहेर कोण चालतं हा प्रश्नच आहे.)
रविंद्र जडेजा का आहे हे काही कळत नाही. तो बॅट्समन म्हणून आला (त्याने दोनदा ३०० केले आहेत आणि तरीही त्याला नीट बॅटिंग येत नाही !!) आणि आता नं १ फिरकी झाला आहे. मला समहौ तो टेस्ट मटेरियल वाटत नाही.
<< लोकांना कोहलीत सचिन आणि
<< लोकांना कोहलीत सचिन आणि पुजारात द्रविड दिसू लागले होते. सेहवागची जागा घ्यायला शिखर धवन आला होता. लक्ष्मणच्या जागी संघात आलेला रहाणे ...>> मला अजूनही तसंच दिसतं व वाटतंही; या सर्वांच्या तंत्र व प्रतिभेबद्दल शंका नसावी . अनुभवाची, विशेषतः स्विंगला खूपच अनुकूल असलेल्या वातावरणांत खेळण्याची, जोड तेवढी कमी असावी. त्याना बहरायला थोडा वेळ देणं योग्य.
रविंद्र जडेजा का आहे हे काही
रविंद्र जडेजा का आहे हे काही कळत नाही. तो बॅट्समन म्हणून आला (त्याने दोनदा ३०० केले आहेत आणि तरीही त्याला नीट बॅटिंग येत नाही !!) आणि आता नं १ फिरकी झाला आहे. मला समहौ तो टेस्ट मटेरियल वाटत नाही. >> तोही युसुफ पठाण सारखा मटका आहे.. आकडा लागला तर लागला
मागच्याच इंगलड सिरिज मधले
मागच्याच इंगलड सिरिज मधले सचिन आणि द्रविड दिसू लागले असतील.. >>>>>> गेल्या आपल्या ४-० ईंग्लंड पराभवात द्रविडची ३ शतके होती ना ..
मला अजूनही तसंच दिसतं व
मला अजूनही तसंच दिसतं व वाटतंही; या सर्वांच्या तंत्र व प्रतिभेबद्दल शंका नसावी . >>>> भाऊ, थोडी शंका तर आहे. पुजाराबद्दल त्या दिवशी माझा एक मित्र म्हणाला, पुजारा कदाचित आपल्या संघातील भुमिकेबद्दल कनफ्यूज वाटतोय, चेंडू जुना करायला येतो बहुतेक. कोहलीचे म्हणाल तर सध्या ज्या पद्धतीने बाद होतोय त्याच्या तंत्रावर शंका घेण्यास पुरेपूर वाव आहे. निदान या कंडीशनमध्येतरी. बाकी अनुभवाने शिकाल म्हणालात तर सचिन १८ वर्षांचा असताना ईंग्लंडमध्ये कसा खेळला होता त्याची इनिंग जरूर पुन्हा बघा. द्रविड-दादा यांनीही इंग्लंडमधील पदार्पणातच आपली चुनुक दाखवली होती. ती गुणवत्ता तरी नक्कीच कुठे दिसत नाही. त्यामानाने मग धोनीला मानले, तंत्रात बरेच कच्चा असून कमालीचा झुंजला.
आपले लोकं महान आहेत ! मोईन
आपले लोकं महान आहेत ! मोईन अली शॉर्ट बॉल वर आउट होतो झाला म्हणून तेच टाकत आहेत. अरे इथे २० चा स्विंग भेटतोय तर चार स्लिप लावा की राव! टू मच.
सध्या मॅच इव्हन आहे. आता धोणीच्या कॅप्टन्सीवरच डिपेंड. त्याने आउटसाईड ऑफ चा मारा करा असे सांगावे.
मला समहौ तो टेस्ट मटेरियल
मला समहौ तो टेस्ट मटेरियल वाटत नाही. >> >>>>>>
जो ईंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडूवर पुढे येऊन फटकवायला बघतो त्याला समहौ वगैरे शब्द वापरून अतिरीक्त मानसन्मान देऊ नका.
अॅरॉननी स्वतःच डो़कं वापरावे
अॅरॉननी स्वतःच डो़कं वापरावे की पण.. तीन पैकी फक्त कूक शॉर्टबॉलवर बाद झालाय.. बाकीचे दोघेही फुललेन्थ वर गेलेत.. फुल टाकल्यावर विकेटची शक्यता जास्त आहे हे ही कळत नाही का त्याला..
Pages