क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोहलीला काढुन अश्विन ला घ्यावा

माझी एलेव्हन

मुरली विजय ( अनपेक्षित पण पर्याय नसल्याने )
गौतम गंभीर
अजिंक्य रहाणे
संजु सम्सन / बिन्नी
रोहित शर्मा
धोनी
अश्विन
जाडेजा / नमन ओझा
शमी / इश्वर पांडे
इशांत
भुवी

चौदा लोक झाली. स्लॅशेस टाकून संघ निवडायचा असेल तर सगळे रणजी पटूही अ‍ॅकामोडेट होतील आणि तुमचा अंदाज बरोबर येईल आणि तुम्ही जाणकार समजले जाल....

कोहली संदर्भाने प्रश्न - सचिनचा, द्रवीडचा, लक्ष्मणचा, गावास्करचा, गांगुलीचा कधी अख्खा सीझन फॉर्म नसल्याने
वाया गेला होता का?
कोहली किती सीझनमधे वाईट खेळला आहे?

टेस्ट मॅच खेळण्याची आजकालच्या भारतीयांची प्रवृत्ति (टेंपरॅमेंट) आहे का?
फक्त एक दिवशीय किंवा २०-२० सामने खेळत राहिले तर चालणार नाही का?
परदेशात जाऊन बीसी सी आयचा काही फायदा होतो का? त्यापेक्षा भारतातच नेहेमी परदेशीय खेळाडूंना बोलावले तर जास्त फायदा होणार नाही का?

(क्रिकेटचा खेळ, तंत्र, निरनिराळ्या देशातील खेळपट्ट्यांवर खेळण्यातले कौशल्य हे खरेच एव्हढे महत्वाचे आहे का? का जसे दररोज, पूजा आरती, संध्याकाळी परवचा म्हणणे या गोष्टींसारखे कालबाह्य झाले आहे? कारण त्यापेक्षा दारूपान वगैरे धरून बिझनेस पार्टी वगैरे जास्त महत्वाचे?)

तसेच आपले वन डे, २०-२० खेळावे - क्रिकेटहि होईल नि फायदेशीरहि. देवाला नाही का अधून मधून नमस्कार केला की धर्म झाला.

केदार वरती तू भुवीचा स्पीड थोडासा वाढवण्याबद्दल लिहिलेले वाचले नि इरफान वगैरे आठवले. 'जेणो काम तेणॉ थाय, बीजा करे तो गोता खाय' हे आठवून त्याने असे काही न करता तो जे (बरेच) काही सुंदर करतोय ते अधिक कन्सिस्टंटली करण्याकडे लक्ष दिले तर बरे होईल.

असामी,

योगायोगाने मी मॅच संपल्यावर उगाच टिव्ही लावून बराच वेळ बसलो आणि शेन वॉर्न, दादा आणि संजय मांजरेकर अ‍ॅनलाईज करत होते. त्या तिघांचेही म्हणणे असे पडले की जर भूवीने वेग वाढवला तर त्याएवढा डेंजर बॉलर होणार नाही.

इशांत शर्मा कधीकधी अचानक का भारी वाटतो? कारण पेस सोबत तो स्विंग / व्हेरिएशन आणि आउट साईड ऑफच टाकत असतो. त्याकडे पेस नसला असता तर त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाहणे आणि पंकजला आता पाहणे ह्यात फार फरक आहे असे मला वाटत नाही.

फॉर दॅट मॅटर धवल कुलकर्णी पण स्विंग बॉलर आहे. कारण आपले तसेही ९८ % बॉलर मिडियम पेसर्सच असतात.

झक्की, तुम्ही ज्या १९५२ च्या मॅच चा उल्लेख केला आहे, (४ बाद ०), त्यातली चौथी विकेट मांजरेकर चीच आहे (वि. मांजरेकर - बोल्ड ट्रुमन ०(१)). नंतर हजारे (५६) आणी दत्तू फडकर (६४) खेळले आणी भारतीय संघ १६५ सर्वबाद अशी धावसंख्या होती. भारताची नीचांकी धावसंख्या ४२ आहे आणी ती १९७४ च्या दौर्यात होती.

"सचिनचा, द्रवीडचा, लक्ष्मणचा, गावास्करचा, गांगुलीचा कधी अख्खा सीझन फॉर्म नसल्याने
वाया गेला होता का? कोहली किती सीझनमधे वाईट खेळला आहे?" - फॉर्म नसल्यामुळे टूर / सिझन मधे धावा न होणं हे भल्या-भल्यांना चुकलेलं नाही (ब्रॅडमन ला वगळू या, कारण आक्ख्या कारकिर्दीत त्याचा नीचांकी अ‍ॅव्हरेज ५६.५७ होता). पण पुढे ग्रेट म्हणून ओळखले गेलेले हे खेळाडू त्या बॅड पॅच मधून बाहेर कसे आले (सचिन - सिडनी २००४ मधल्या २४१ धावा), ते करताना त्यांनी गोलंदाजांच्या डावपेचांना कसं थोपवून धरलं,फॉर्म परत आल्यावर प्रत्त्युत्तर कसं दिलं हे बघणं महत्वाचं ठरतं.

केदार गेल्या काही वर्षांमधले भारतीय बॉलर बघ. जेंव्हा जेंव्हा त्यांनी काहीतरी त्यांच्या normal comfort zone च्या बाहेरचे करायचा प्रयत्न केलाय तेंव्हा तेंव्हा तो अंगाशी आला आहे. भुवीला पेस असता तर मस्तच झाले असते हे साहजिकच आहे पण ते practically शक्य आहे का ह्याचा विचार करायला हवा ना. नुसता पेस वाढला तर त्याची नवा बॉल स्विंग करायची due to wrist position राहिलच कि नाही हे बघावे लागेल. त्याचा आज जसा कंट्रोल आहे तो राहिलच का ? त्याची शरिर यष्टी, stamina वाढवावा लागेल. तेंव्हा हे जेव्हढे बोलायला सोपे आहे तेंव्हढे होणे शक्य आहे का ह्याचा सगळ्या बाजूने विचार केला जावा.

सगळे जण कोहली-पुजारा ची तुलना सचिन-द्रविडशी का करत आहेत ? They are different player and who knows they might grow up to be as great as other 2. अजून बराच वेळ आहे.

मोईनला खेळताना आपले बॅट्समन स्विप का वापरतात एव्हढे, footwork ऐवजी ? ते जास्त natural नाही का आपल्या खेळाडूंसाठी ?

<> सहमत.
<< मोईनला खेळताना आपले बॅट्समन स्विप का वापरतात एव्हढे, footwork ऐवजी ? >> आपल्याकडे दर्जेदार फिरकी गोलंदाज तयार होत नाहीत याचाच दुसरा स्वाभाविक परिणाम म्हणजे आपले फलंदाजही फिरकी खेळण्याच्या तंत्रात कमजोर होत जातात, असं तर नाही ना ?

याचाच दुसरा स्वाभाविक परिणाम म्हणजे आपले फलंदाजही फिरकी खेळण्याच्या तंत्रात कमजोर होत जातात, असं तर नाही ना ? >>>> हा परीणाम स्वाभाविक आहेच, पण तरीही फिरकीला पोषक खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव मात्र असतोच की.
माझ्यामते हा देखील झटपट आणि वेगवान क्रिकेटचा दुष्परीणाम असावा. स्वीप-स्लॉगस्वीप वापरा आणि भिरकावून द्यायला बघा फिरकी गोलंदाजी. पण हे असे फटके मारून टेस्टमध्ये फिरकीवर डॉमिनेट किंवा काऊंटर अ‍ॅटेक करणे या भारतीय जातकुळीच्या फलंदाजांना जमणे कठीण. पण आपले बेसिक गिरवायला टाईम कोणाला आहे.

हे. भुवीला पेस असता तर मस्तच झाले असते हे साहजिकच आहे पण ते practically शक्य आहे का ह्याचा विचार करायला हवा ना. नुसता पेस वाढला तर त्याची नवा बॉल स्विंग करायची due to wrist position राहिलच कि नाही हे बघावे लागेल. त्याचा आज जसा कंट्रोल आहे तो राहिलच का ? त्याची शरिर यष्टी, stamina वाढवावा लागेल. तेंव्हा हे जेव्हढे बोलायला सोपे आहे तेंव्हढे होणे शक्य आहे का ह्याचा सगळ्या बाजूने विचार केला जावा.
>>>

अरे आयपीएल बघतोस ना? तिथे तो १३२-१३५ रेंज मध्ये टाकतो ऑलरेडी. पेस म्हणजे मी १४०+ असे लिहिलेले नाही तर त्याने टेस्ट मध्ये १३२ + क्लॉक केले पाहिजेत असे लिहिले आहे. म्हणजे टेस्ट असल्यामुळे १२०-१२५ रेंज कशाला?

केदार आयपीएल मधे २ ओवर आणि ४ ओव्हर इतक्याच टाकायच्या असतात म्हणजे इतकीच जीव तोडुन गोलंदाची करायची असते म्हणुन तिथे १३५ जात असेल

टेस्ट मधे तसे नसते तिथे १० सलग कराव्या लागतात सुरुवाती पासुनच १३५ ने करायला लागला तर नंतर १२० च्या खाली येईल .......त्याचा जीव केवढा तुमच्या अपेक्षा केवढ्या.. Wink
तो शोएब अख्तर च्या बॉडीएवढा नाही... तो भाई तर पहिल्या बॉल पासुन सुस्साटच १५०च्या वरच असायचा.. ते शेवट त्याचा १४५ असायचा .. ब्रेटली सुध्दा १३५ -१४० ठेवायचा टेस्ट मधे

टेस्ट मधे तसे नसते तिथे १० सलग कराव्या लागतात सुरुवाती पासुनच १३५ ने करायला लागला तर नंतर १२० च्या खाली येईल .......त्याचा जीव केवढा तुमच्या अपेक्षा केवढ्या.. >>

टेस्ट मध्ये सलग १० ओव्हर्स टाकाव्या लागतात अशी माहिती असल्यामुळे पुढे बोलणे व्यर्थ आहे. पण तरीही प्रयत्न करतो.

मिचेल जॉन्सन फक्त ३ ते ४ ओव्हर्स सलगच्या स्पेल घ्यायचा. त्याचे मागचे वर्ष कसे होते? किती विकेट मिळाल्या? कम्पॅरिझन नाहीये तर स्पेल १० ओव्हर्सच्या वगैरे असतात ह्यावर टिप्पनी आहे.
आणि इथेच कॅप्टनशीप महत्वाची असते. आपल्या बॉलर्सला चांगले वापरून घेता आले पाहिजे. धोणीने एकदा बॉल दिला की पार भूवी थके पर्यंत तो चेंज करत नाही, ही चूकीची पद्धत आहे.

अगदी वन डे मध्ये पण भूवीने ७०% वेळापेक्षा जास्त सलग ७ ओव्हर्स केल्या आहेत. तिथे स्पिड १३२-१३५ असतो. त्यामुळे त्याच्यात कॅपॅसिटी नाही हे म्हणणे म्हणजे भूवीच्या बोलिंग बद्दल माहिती नसने आहे.

धोणीने एकदा बॉल दिला की पार भूवी थके पर्यंत तो चेंज करत नाही, ही चूकीची पद्धत आहे. >>>>> बघा हे मान्य आहे ना... हे तुम्हाला माहीत आहे मग भुवीला देखील माहीतीए असणारच.. हे बेण पार थकवल्या शिवाय बॉल काढुन घेणार नाहीच.... म्हणुन असेल...

कॅपॅसिटी असणे आणि दाखवणे हे दोन वेगवेगळे प्रकार आहे... कॅपॅसिटी आहे त्याच्यात परंतु दुसर्या बाजुने कोणी विकेटच काढत नसेल तर स्वतःचा स्टॅमिना लवकरात लवकर तो कशाला घालवेल ?

अरे मीच तर लिहितोय अनेकदा की धोणीच्या टॅक्टीज चूकीच्या आहेत. मग मान्य होण्याच्या प्रश्नच कुठे आहे?

तुम्ही लिहिताय तो टाकू शकत नाही, आणि तो टाकतो हे मी लिहितोय.

सपोर्ट बॉलर महत्वाचा आहे. इशांत आणि भूवी ने दुसर्‍या टेस्ट मध्ये वाट लावली होतीच की. पण त्यामुळे (कोणी सपोर्ट बॉलर नसेल तर) मी माझ्या बॉलिंग मध्ये आणि कॅप्टन्सी मध्ये काहीच बदल करणार नाही असे नसते. शेवटी टेस्ट नावच का आहे? तर कस लागायला पाहिजे. मग भूवीने वन डे / टि २० स्पिड ठेवला तो ही स्पेशली सकाळच्या पहिल्या सत्रात किंवा ओव्हरकास्ट वातावरणात तर त्याचे परिणाम खूप चांगले दिसतील.

मी कुठे लिहिले की तो टाकु शकतच नाही............ मी म्हणलो की तो टाकत नाही .. कारण देखील लिहिले आहे...

तो शोएब सारखा तगडा नाही म्हणुन तो सलग ओवर टाकायचे असेल तर हातचे राखुन बॉलिंग करत आहे.. त्याला त्याच्या मर्यादा माहीत आहे... उगाच अतिताण घेउन जायबंदी होण्याऐवजी या स्पिड ने विकेट्स ही मिळत आहे आणि ताण देखील कमी होत आहे..

विसरु नका आयपीएल मधे तो डेन स्टेन च्या साथी ने गोलंदाजी करतोय .. Happy त्याचा फुल्ल सपोर्ट असतो. भुवी ला.
बहुदा स्टेन नेच मंत्र दिला असेल.. कशी आणि किती ताण द्यायचा शरीरावर...

सपोर्ट बॉलर महत्वाचा आहे. इशांत आणि भूवी ने दुसर्‍या टेस्ट मध्ये वाट लावली होतीच की. पण त्यामुळे (कोणी सपोर्ट बॉलर नसेल तर) मी माझ्या बॉलिंग मध्ये आणि कॅप्टन्सी मध्ये काहीच बदल करणार नाही असे नसते. शेवटी टेस्ट नावच का आहे? तर कस लागायला पाहिजे. मग भूवीने वन डे / टि २० स्पिड ठेवला तो ही स्पेशली सकाळच्या पहिल्या सत्रात किंवा ओव्हरकास्ट वातावरणात तर त्याचे परिणाम खूप चांगले दिसतील. > >तू पहिल्या दोन मॅचेस बघितल्या होत्यास ना ? त्यात तो सुरूवातीला अधिक स्पीड ने टाकत होता, त्याचा ताण येणारच ना तिसरी चौथी टेस्ट खेळताना ? दोन टेस्टमधे किती गॅप आहे हे लक्षात घे. परत तो १००% फिट नाहिये. हे सगळे लक्षात घेऊन ह्या अपेक्षा फार नाही वाटत ? मूळात आपल्या गोलंदाजांची फिटनेस लेव्हल हि अधिक स्पीडने consistently long term balling करण्यासाठी फिट नसते. (हा त्यांचा दोष आहे असे मी म्हणत नाहिये तर फक्त सांगतोय) त्यामूळे 'फट करता ब्रह्महत्या नको'

तू म्हणतोस धोनीचे टॅक्टिक्स चुकीचे आहेत नि परत म्हणतओस ह्या टेस्ट मॅचेस आहेत. नक्की काय ते ठरव बर Happy

मिचेल जॉह्न्सन वगैरे च्या स्पेल शी तुलना करणे चुक आहे. तिथे मिचेल जॉह्न्सन हा स्ट्राईक बॉलर आहे नि सिडल भुवीचे काम करतो. (work horse) हॅरीसला दोन्ही प्रकारे वपरतो क्लार्क (he is equally potent in both ways) इशांतच्या दुखापती नंतर आपला बॅलन्स पूर्णपणे बिघडलाय.

पण हे असे फटके मारून टेस्टमध्ये फिरकीवर डॉमिनेट किंवा काऊंटर अ‍ॅटेक करणे या भारतीय जातकुळीच्या फलंदाजांना जमणे कठीण. पण आपले बेसिक गिरवायला टाईम कोणाला आहे.

हे चांगले की वाईट मला माहित नाही. पण याचा अर्थ जर टेस्ट क्रिकेट जमणार नसेल तर खेळायलाच पाहिजे का?
किंवा फक्त भारतातच टेस्ट खेळाव्यात, बाहेर ५०-५० नि २०-२०.

.....फलंदाजांना जमणे कठीण.
ते जमाव म्हणूनच परदेशी जाण्याची संधि देतात. पण खेळाडू त्याचा फायदा घेतात का?

उद्या १४ ऑगस्ट पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी त्यांची कसोटी सुरू होतेय तर १५ ऑगस्टला आपली ... काही नाही हो, फिक्स असतात हे सारे सामने Wink

अरे यार मेन संघ (पन इंटेण्डेड) हरत असल्याने पाचव्या टेस्ट मधे महिला संघच दाढी मिशा लावून खेळतो व इंग्लंड ला हरवतो असा एक दिल बोले हडिप्पा-२ काढता येइल या थीमवर.

अरे यार मेन संघ (पन इंटेण्डेड) हरत असल्याने पाचव्या टेस्ट मधे महिला संघच दाढी मिशा लावून खेळतो व इंग्लंड ला हरवतो असा एक दिल बोले हडिप्पा-२ काढता येइल या थीमवर.
>>>>>>>
पिक्चरचीच थीम उचलायची असेल तर मग चैन कुली की मैन कुली सारखे जादूची पॉवरबाज बॅट पण दाखवता येईल.

महेला जयवर्धनेची लास्ट मॅच आज पासून सुरु..

महिला क्रिकेटही एक गम्मत आहे.. पण टेस्ट मधली पहिली डबल सेंच्युरी इंडियाच्या नावावर आहे.

सुरुवातीच्या दोघी बर्‍या खेळल्यावर बाकीच्यांनी नांगी टाकलीच.. सातवी जोडी खेळते आहे म्हणून एकाच दिवशी २० खेळाडू बाद होण्याचा प्रकार घडला नाही इतकेच.. तेही घडले असते..

फारेण्डा सारखे सारखे पन पन करतोस म्हणूनच आपल्या लोकांचे पण पूर्ण होत नाहीत बघ.

त्या बाया लोकांना कोणिच सांगितल नाही वाटत.. कि ४ दिवस खेळायच आहे म्हणुन Dolo.gif

२ डाव संपले आणि ३ डावतले ३ गडी बाद.. आजच मॅच संपनार वाटते. भारताला पहिल्या डावात आघाडी.. चांगली गोष्ट...

<< त्या बाया लोकांना कोणिच सांगितल नाही वाटत.. >> त्या बाप्या लोकाना तरी कुणी सांगितलं होतं, इंग्लंड एका डावात करेल तेवढ्या धांवा आपण दोन डावांत करायचा प्रयत्न करायचाय म्हणून !! Wink

त्या बाप्या लोकाना तरी कुणी सांगितलं होतं, इंग्लंड एका डावात करेल तेवढ्या धांवा आपण दोन डावांत करायचा प्रयत्न करायचाय म्हणून >> Lol

काय राव एका मॅचने एव्हढे खचलात ! It's process.

Pages