चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

dreamgirl , अदिति , संदिप एस , साती , सीमांतिनी , वर्षू नील , आभा शाब्बास !!! Happy

नंदिनी , देवकी , पौर्णिमा , अखी , मंजू , अनिरूद्ध , गीतांजली कीप इट अप .

बाकी कान उपटायची यादी फारच मोठी आहे Happy

पण यातले किती जण सिरियस आहेत हे कस कळणार ? Sad

कालपासुन व्यायाम सुरु. अर्धा तासच केला - १० सु न, ३० स्कॉट्स, १५ लंजेस एवढेच. म्हणजे चार गुण मिळाले.

आज चहा २ कप झाला. एक बिन साखरेचा, एक मशिनचा. उद्यापासुन हाही बंद. खरेतच मध्यंतरी चहा पुर्ण बंद झालेला, पण कारण नसताना उगीच चाळा म्हणुन सुरू केला परत. आता परत बंद करते..

बाकी जेवणात सुधारणा आवश्यक आहे. यथातथा सुधारणा आहेत.

आजही व्यायम केलाय. बाकी जेवणात उसळ होती पण अर्धा वाटी.

त्यामुळॅ आजचेही मार्क ४.

वर लिहायला मात्र उद्यापासुन सुरवात. उद्यापासुन नक्की.

धन्यवाद केदार!

पण माझा कालचा दिवस बिना व्यायामाचा गेला. त्यामुळे माझे ५/८ ला : ३/७ Lol
आज मात्र काटेकोपणे ७/७. व्यायाम, अन आहार अगदी व्यवस्थित. चहासुद्धा कमी झालाय हल्ली.

काल बरेच काम होते त्यामुळे व्यायाम २ मैल, खाणे सांभाळले गेले.

आज खाणे सांभाळले जाणर नाहिये. आज फक्त व्यायामाचे मार्क ४

मला पण add करा यादीत. १ तारीख सोडली तर रोज १ तास व्यायाम करत आहे. आणि खाण्यावर पण बऱ्यापैकी नियंत्रण आहे.

साती, पिअर प्रेशर पटतंय.

संदीप एस, १३ मजले २ वेळा चढलात,तसे नका करू.एक्सर्शनने थकवा येईल.तसेच लिगामेंट दुखावतील/लवकरझिजतील.डॉक्टरमंडळी सांगतीलच.

आजचे गुण ५.५/ ७. (एकाचवेळी उसळ खाऊ शकते.तसेच एकच फळ खाते.सॅलड नाही खात..) त्यामुळे१.५गुण कापला.
केदार, थँक्स!
तुमच्यामुळे निदान ४-५ दिवस व्यायाम घडला.

बापरे किती उत्साही आहेत सगळे. हे असे सगळे वाचून धडकीच भरते.
मला कुठलीही गोष्ट नियमित करायला कधी जमली नाही. रोजच्या रोज अपडेट्स पण टाकताय .
सगळ्यांच्या उत्साहाला सलाम Happy

माझे अपडेटस :
ब्रेफा - १ थालिपीठ + चहा
११ वा - अर्धा कप कॉफी
दु. जेवण - २ थालिपीठ + दही काकडी + २ बेबी कॉर्न मंचुरीयन (:()
सध्याकाळी - अर्धा कप कॉफी + सफरचंद मग १:१५ तास जिम
रात्री - २ फुलके + डाळ कांदा

जेवणानंतर कलिंगड खाणं , फुल्ल कप कॉफी बंद केलय

नाश्ता: १ पोळी - मिरचीचा ठेचा
सकाळी १० वाजता : १ ग्लास दूध

बारा वाजता: दोन पोळ्या आणि दोइ बेगुन
चार वाजता: दोन पोळ्ञा आणि दोइ बेगुन
सात वाजता: १ कप चहा
डिनरः ग्रिल्ड चिकन आणि लेमन राईस

व्यायाम : तासभर. त्याखेरीज घराचा वॉटरपंप बंद पडल्यानं तो काढून दुरूस्त करायच्या वेळेला वर खाली वर खाली पाच पन्नासवेळा.

काल ६.५/७ व्यायाम झाला (बरेच दिवसांनी ट्रेडमिल वर तासभर चालले. पण योगासने आवडतात म्हणून तेच करीत जाईन.),

तळलेल इ काही खाल्ले नाही. प्रोटीनचे गणित काहीस जमतय. काल फळे मिस झाली. टेबलावर सम्मोर एक पीच पडला होता पण ते सोडून चिवडा खाल्ला. जिव्हालौल्य!! (चिवडा वाईट नाही पण आता अर्धा मार्क गेल्यापासून चिवडा वाईट्ट ठरला!!)

मंजूडी | 4 August, 2014 - 15:38 नवीन

सुकामेवा बंद करा. स्मित>>> आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितलंय म्हणून बंद करायला सांगताय का इब्लिस? फिदीफिदी
भिजवलेल्या मनुका+बदाम+खजूर बंद का करायचं त्याचं कारण सांगितलंत तर बरं होईल.

<<
तुमचा फिदिफिदि आयुर्वेदिक प्रतिसाद वाचला. यू नीड युअर कन्सेप्ट्स एक्झामिन्ड, अँड सेट स्ट्रेट. Proud

उत्तरासाठी आर्याची विपु पहा. तेवढाच फुकट व्यायाम.

अरे बापरे! देवकी खरच का?
साती, ईब्लिस काहीतरी सांगा आता Happy
चढण्या ऐवजी ऊतरुन गेलो तर चालेल का मग?

मला ५/६ एक पाउंड कमी करायचे होते आणि बरेच महीने वजन काटा जराही खाली सरकायला तयार नव्हता. आज अचानक १ पाउंड ने खाली गेला. मी माझ्या व्यायामाच्या रुटीन मधे काही बदल केला नाही फक्त आधी आठवड्यातुन एखाद दिवस केला नाही तर काही वाटायचे नाही आता वाइट वाटते इतकच :). बदल खाण्यात केला. खाण्यामधे आता न चुकता डाळी/उसळी आल्यात. गोड्/तेलकट खाण बरच कमी केलं. फळ न चुकता आलीत. पालेभाज्या आधीही होत्याच.

केदार थॅन्क्स!

संदिप एस,

कोणतीही गोष्ट अती करू नये.

सुमारे एक-दीड वर्षापूर्वी मुंबईतल्या एका मोठ्या कॉलेजचे कार्डिऑलॉजी डिपार्टमेंटचे प्राध्यापक, हार्ट अ‍ॅटॅकने गेले. तेही असेच अती व्यायामाने, असे वाटावे अशी परिस्थिती होती. He had just come back from his gym, and climbed 13-14 stairs to his flat. And had an infarct.

व्यायाम करा. करायलाच हवा. पण लिमिट ठेवा. तुमच्या शरीराचं ऐका. अती करू नका. कार्डिओ, कॅलरी बर्निंग, मसल टोनिंग/बिल्डिंग या सर्वांचा समतोल साधला गेला पाहिजे.

जसं जेवण कंट्रोलमधे ठेवताहात, तसंच व्यायामही कंट्रोलमधे ठेवा. किती करायचा, याचं लिमिट वयावर, अन तुम्ही कधीपासून व्यायाम करताहात, यावर अवलंबून आहे. कीप पुशिंग द लिमिट, पण पन्नाशीत सुरू करायचा व्यायाम अन १८ वर्षांच्या मुलाने रोज करायचा व्यायाम. फरक आहे.

३०+ असाल, तर सोपी गोष्ट लक्षात ठेवा, व्यायाम करताना घाम निघाला पाहिजे, धडधड वाढून दम लागला पाहिजे, श्वास फुललाच पाहिजे. अन हे सगळे पटकन, तुम्हाला त्रास न जाणवता परत नॉर्मलला आलं पाहिजे. सुमारे ५, मॅक्स १० मिनिटांत. अन व्यायाम झाल्यावर दिवसभर 'फ्रेश' वाटलं पाहिजे. दमलेलं, झोपाळू नव्हे. (आधी नुसतेच बश्या बैल असाल, तर सुरुवातीचे सुमारे महिनाभर थकवा जाणवतो. व्यायाम मधेच बंद केला तर अंग दुखते. तितके अ‍ॅक्सेप्टेबल आहे.)

सॉरी अदिती तुला नाउमेद नाही करीत पण १ पाउंड कमी हे वजन करण्याआधी ५ तास फक्त पाणी नाही प्यायल तरी होत. ४-५ पेक्षा जास्त घट झाली तर ती खरी!!

वॉव.. केदार कडून सर्टिफिकेट्..यिप्पी!!!
आज दुगना व्यायाम..
थांकु केदार..

हो माहीत आहे ग सीमंतिनी पण हे एक पाउंडच खुप त्रास देत होते. आज अचानक तो नंबर क्रॉस झालेला बघितला म्हणुन आनंद झाला Happy

अदिति , छान !!
पण पहिले ३-४ आठवडे कसलीही अपेक्षा न ठेवता व्यायाम अन डाएट करायचा आहे हे लक्षात ठेवा . Happy

This is a test match not T20 Happy

इब्लिस छान पोस्ट..

मी काल लिहायला विसरले, दोन दिवसांपासून आहारात माझ्या प्रिय सॅलड्सचा समावेश केला आहे. माझ्या सॅलडची कृती, कोणाला इंटरेस्ट असल्यास..

भरपूर कोलस्लॉ( कोबी+गाजर) , भरपूर लेट्युस, (पालक, केल, अजुन कुठल्या पालेभाज्या हव्या असतील तर त्या मुठभर) , चिरलेली कोथिंबीर, अगदी थोडी पार्सली, वाटीभर एडमामे, अर्धी सिमला मिरची चिरून व वाफवून, छोटी वाटी ब्रोकोली वाफवून, मुठभर दाणे, बदामाचे स्लाइसेस, क्रश्ड रेड पेपर थोडी स्प्रिंकल, जवसाची चटणी चमचाभर (चैन हवी असेल तर वॉन्टॉन स्ट्रिप्स.. कुरकुरीत मस्त लागतात) व ड्रेसिंग म्हणून ऑलिव्ह ऑईल (विथ गार्लिक & बेसिल) .. कधी कधी चमचाअभर सेस्मी जिंजर ड्रेसिंग..

असं पोट भरतं.. आणि इतकी टेस्टी लागतं!! नक्की करून बघा!

बस्के छान रेसीपी, मी कोबी/गाजर्/सफरचंद किसुन घेते त्यात बदामाचे तुकडे आणि नावाला कोथींबीर. ड्रेसिंग म्हणून, ऑलीव्ह ऑईल, लिंबू, मध चांगले फेटुन घ्यायचे.

Roj ३० min spinning chalu aahe. Khane dalmalit. Protein jaast jaat nahiyet sharirat. Shijawaaycha kantala. Sad koni protein sathi soppe options suchwel ka? Eggs sodun.

इब्लिस .. छान पोस्ट!

माझ्या रुममेटची हीच अवस्था असते.. जिम करुन येते २ तास.. पण आल्यावर तिला अति आळस येतोच! जेवुन लगेच झोपायला जाते..
मी म्हटलं जिम ट्रेनरला विचार की तुझा व्यायाम अति होतोय का तर तिला पटत नाही

Pages