Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<< १५००! >> आधीं ३०० तरी करा
<< १५००! >> आधीं ३०० तरी करा ! डोमा:
आधीं ३०० तरी करा ! >>> भाऊ
आधीं ३०० तरी करा !
>>>
भाऊ ३०० नाही ३६९ !!
आपलीं पोरं पण करतील ४५०+ या
आपलीं पोरं पण करतील ४५०+ या खेळपट्टीवर असा रास्त भंरवसा आहे मला ! अरे, विजय,पुजारा, कोहली, रोहित...... खणखणीत नाणी आहेतच ना फलंदाजीतलीं !!
>>अरे, विजय,पुजारा, कोहली,
>>अरे, विजय,पुजारा, कोहली, रोहित
रहाणे, जडेजा, भुवी ला विसरु नका..... त्यांची चलती आहे सध्या
धवन ला बसवाच आता...........
धवन ला बसवाच आता........... त्याला भारतातच खेळाअयला द्या.......... गंभीर परफेक्ट होता अश्या खेळपट्टीवर... पण धोनीशी त्याचे बरेच वाकडे आहे बहुदा त्याला मिळाणार नाहीच संधी
<< रहाणे, जडेजा, भुवी ला
<< रहाणे, जडेजा, भुवी ला विसरु नका..... त्यांची चलती आहे सध्या >> अहो, सध्या फॉर्ममधे असलेली हीं आहेतच. या खेळपट्टीवर आतां फॉर्ममधे येतील अशी खणखणीत नाणीं सांगितली; शिवाय, कप्तानभी वैसे कुछ कम नही !!
त्या धवन्याचे नाव बदलायचे
त्या धवन्याचे नाव बदलायचे आहे, "ध" च्या जागी कुठलेतरी दुसरे एखादे क्ष य झ अक्षर सुचवा
(धवन हलके घे हा !)
असो, आज ईदच्या सुट्टीला कसोटीतील एक महत्वाचा दिवस आणि भारतीय फलंदाजी बघायला मिळणार, कोहली आज तरी खेळावा आणि ७०-७५ च्या स्ट्राईकरेटने शतक-दिडशतक ठोकावे.
लंच टाईम - १०८/३ सुरुवात
लंच टाईम - १०८/३
सुरुवात आश्वासक झालेली पण हळूहळू धांदल उडायला सुरुवात झाली.
रहाणेला बाद दिले नाही अन्यथा आणखी बिकट परीस्थिती उद्भवली असती.
अजूनही उद्भवू शकते,
भारताला ३०० च्या आत गुंडाळता येईल असा आत्मविश्वास तुर्तास ईंग्लिश गोलंदाजांच्या चेहर्यावर दिसतोय.
व्यवस्थित जम बसलेला कोहली असा
व्यवस्थित जम बसलेला कोहली असा बाद व्हावा ! खूप अपेक्षाभंग झाला !

मीं म्हटलेली ४५०+ धांवसंख्या दुसर्या डावाकरतां राखून ठेवली आहे का भारताने !
<< त्या धवन्याचे नाव बदलायचे आहे >> त्याऐवजी, त्याचा फलंदाजीचा क्रम बदला, मीं सुचवल्याप्रमाणे !
ह्याला म्हणतात.. भरवशाच्या
रहाणे ५० नाबाद ! लढते रहो !!
रहाणे ५० नाबाद ! लढते रहो !!
आता पुन्हा मंबई वरच
आता पुन्हा मंबई वरच आशा.....
...
...
बघु अजुन रस्ता फार लांब आहे...
नेहमीचेच यशस्वी खेळणार बहुतेक
नेहमीचेच यशस्वी खेळणार बहुतेक आजपण!
त्याऐवजी, त्याचा फलंदाजीचा
त्याऐवजी, त्याचा फलंदाजीचा क्रम बदला, मीं सुचवल्याप्रमाणे !
>>>>>>>>>
अजून एक इनिंग फ्लॉप गेला की नक्की ......... मग पुढच्या सामन्यात तो बारावा
चहापानाला २१४/५ स्थिती बिकट
चहापानाला २१४/५
स्थिती बिकट मात्र अनपेक्षित नाही.
रहाणे खेळतोय ही जमेची बाजू.
आता धोनी येऊन काय कसा चाचपडतो हे बघूया, गेल्यावेळसारखेच आपल्याला न जमणारा नांगर टाकायचा खेळ करतो की आपले शॉट खेळतो.
मग जडेजाचा अंधाधुंद फटकेबाजीचा पत्ता पुन्हा किती चालतो हे समजेल.
त्यानंतर मात्र रहाणे आणि भुवी यांच्या भागीदारीवर सामना कुठे जातोय हे समजावे. (या भुवनेश्वरला आपण ८ व्या क्रमांकावर राखून ठेवल्याने अजून मला तरी काही टेंशन नाही या सामन्याचे)
सो, ढोबळमानाने सामन्याचे चित्र असे दिसतेय.
मीं म्हटलेली ४५०+ धांवसंख्या
मीं म्हटलेली ४५०+ धांवसंख्या दुसर्या डावाकरतां राखून ठेवली आहे का भारताने !
>>>>>>>>>
भाऊ चांगला गेमप्लान आहे, आता ३००-३२५ ला सर्वबाद व्हा. ज्यात आजचा दिवस आणि उद्याचा तासभर जाईल. मग निगेटीव्ह गोलंदाजी करून ईंग्लण्डला जास्त भराभर धावा जमवू देऊ नका. जेणेकरून ४००-४२५ चे टार्गेट ३.५ च्या धावगतीने ते आपल्याला देतील. आणि मग आपला चांगला खेळ दाखवत वाचवायचा सामना चक्क जिंका.
रहाणे गेला .. शॉकिंग डिसमिसल
रहाणे गेला .. शॉकिंग डिसमिसल .. खास करून या स्टेजला
मोईन अलीला फटकावण्याचा फाजील आत्मविश्वास आणखी एकाला नडला .
अजुन ७० धावा.. नायतर भारत
अजुन ७० धावा.. नायतर भारत पुन्हा खेळ्नार.. भुवी वर नजरा.. फाँलो ऑन टाळने गरजेचे..
फॉलो-ऑन मिळाला , नाहीं मिळाला
फॉलो-ऑन मिळाला , नाहीं मिळाला तरी हा सामना अनिर्णित रहाण्याचीच शक्यता अजूनही मला जाणवते कारण १] ह्या भारतीय फलंदाजीवरचा माझा दृढ विश्वास व २] इंग्लंडकडे स्वानसारख्या फिरकीचा अभाव [गेल्या कसोटीत शेवटच्या डावात ईशांतने जें केले तें व काल मोईनने इंग्लंडसाठी केलें तें अपवादात्मक; दर्जेदार फिरकीशिवाय भारताला दुसर्या डांवात गुंडाळणे इंग्लंडला अशक्य नसलें तरी महाकठीण, हें माझं मत.]इंग्लंडने शेवटीं धांवांची गती वाढवून भारताला दोन्ही डांवात बाद करायला अधिक वेळ राखायला हवा होता, हेंही माझं असंच एक मत.
कांहीं विपरीत घडलेंच तर स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायला मीं नेहमीं सज्ज असतोच, हे तर इथें सर्वज्ञात आहेच !
भुवी आउट झालेला आहे.....
भुवी आउट झालेला आहे..... त्याच्या कडे कशाला नजरा .... ?
धोनी आणि सामी ने काही चमत्कार केला पाहिजे ......
व काल मोईनने इंग्लंडसाठी
व काल मोईनने इंग्लंडसाठी केलें तें अपवादात्मक;
>>>>>
आपणच त्या मोईन अलीसाठी बरेच काही करतो.
सामना अनिर्णित नक्कीच राखू
सामना अनिर्णित नक्कीच राखू शकतो. काल एकूण एक जण स्टार्ट करून गेला पण त्यानंतर प्रत्येकाचे पेशन्स कमी पडले, ते जर कोणी दोघांनी दाखवले तरी १२० षटके निघून जातील. अर्थात त्यातही मुरली विजय आणि पुजारा या भागीदारीला महत्वाची भुमिका निभवावी लागणार. कारण रन बनवून नाही तर चेंडू खर्ची घालून सामना वाचवायचा आहे.
ह्या मॅच मधे आत्तापर्यंत तरी
ह्या मॅच मधे आत्तापर्यंत तरी एकही सेशन भारताने जिंकलेलं / राखलेलं नाही. ही टेस्ट मॅच वाचवण्यासाठी आता ३.५ सेशन्स राखावी लागणार आहेत, जे अशक्य नसलं तरी अवघड आहे. ४ दिवस खेळल्यानंतर आणी एकाही सेशन ला वर्चस्व न राखता आल्यामुळे, शारिरीक आणी मानसिक ताकद उभं करणं अवघड आहे. त्यातून कोहली, पुजारा चं फॉर्म मधे नसणं, नोहिट शर्मा चं नुसतच टॅलेंट आणी अॅप्लिकेशन मधला आळस, धवन ची लिमिटेशन्स हे बघता हे आणखीन अवघड आहे.
जडेजा ला अट्टाहासानं टेस्ट प्लेयर बनवणं हा अजून किती वर्षाचा प्लॅन आहे कुणास ठाऊक! धोनी ने टेस्ट मधे कॅप्टन्सी करणं म्हणजे वाढदिवसाच्या पार्टीज अॅरेंज करणार्याला पंतप्रधानांचा शपथ-विधी समारंभ आयोजित करायला देण्यासारखं आहे. ३.५ बॉलर्स घेऊन टेस्ट खेळणं - 'प्लान ही गलत है|' कसोटी हा प्युअर फॉर्म ऑफ क्रिकेट मानला जातो. तिथे प्रॉपर बॅट्समन, बॉलर्स ना (जास्तीत जास्त) घेऊन खेळायचं असतं, आणी कमीत कमी पार्ट टाईमर्स ना. (अशी थिअरी आहे). असो. बघू काय काय होतं ते. विजय, रहाणे आणी थोडासा पुजारा, कोहली (फॉर्म मुळे) ह्यांचा खेळ बघायचा.
ईतकं सगळं टाईप करेपर्यंत, त्या रूट ने आपल्या बॉलिंग चा चांगलाच स्क्वेअर रूट काढलाय.
४४४ चे लक्ष्य
४४४ चे लक्ष्य दिले....................... रुट आउट झाला
हो .. आता आजच्या ४२ आणि
हो .. आता आजच्या ४२ आणि उद्याचा (tomorrow)
एक दिवसातली ९० षटक.. म्हणजे एकुन १३२ षटक आणि ४४४ धावा.. 
जिंकण की अनीर्नीत हा प्रश्न.. दोन्ही सुटले नाहि तर आहेच १-१....
४४४ चं लक्ष्य दिलय
४४४ चं लक्ष्य दिलय म्हणण्यापेक्षा ४.२५ सेशन्स दिले आहेत. टेक्निकली ही मॅच जिंकता पण येईल, पण odds are in England's favor.
१ बाद ४० ओवर मधे जर १००-१२५
१ बाद ४० ओवर मधे जर १००-१२५ मारलेत तर उद्या जिंकायला प्रयत्न करायला हवा.. महत्त्वाचे म्हणजे शिखर फास्ट खेळला पाहिजे.........
धोनी जिंकण्यासाठी प्रयत्न करेल ही शंका वाटत आहे
३.५ बॉलर्स घेऊन टेस्ट खेळणं -
३.५ बॉलर्स घेऊन टेस्ट खेळणं - 'प्लान ही गलत है|' कसोटी हा प्युअर फॉर्म ऑफ क्रिकेट मानला जातो. तिथे प्रॉपर बॅट्समन, बॉलर्स ना (जास्तीत जास्त) घेऊन खेळायचं असतं, आणी कमीत कमी पार्ट टाईमर्स ना. (अशी थिअरी आहे). >> आता तसे बघितले तर धोनीचा एक अधिक बॅट्समन घेण्याचा निर्णय बरोबर ठरला असेच म्हणायला लागेल
इंग्लंडच्या दुसर्या डावात आपले नक्की डावपेच काय होते ? धावा रोखणे कि विकेट्स घेणे ? जवळजवळ प्रत्येकाने विचित्र बॉलिंग केली. भुवी नि शमीच्या बोलिंगमधे फटीग जाणवायला लागलाय. पंकज सिंगचे आश्चर्य वाटते. तो २-३ वर्षे रणजीमधे लीड बॉलर आहे तेंव्हा पेशन्स त्याच्याकडे नॅचरल असायला हवा पण तो अधिक frustrate वाटला. कदाचित इतकी वर्षे संधी न मिळणे नि मिळाली तीसुद्धा फारशा हेल्पफुल नसलेल्या पिचवर असल्यामूळे असेल.
Anderson master of swing आहे निर्विवाद मान्य करूनही ज्या तर्हेने जुना बॉलही जितक्या लवकर रिव्हर्स स्विंग करतात ते फार विचित्र वाटते. इथे आशियायी बॉलर असता तर आत्तापर्यंत प्रश्न विचारले गेले असते.
1-1 बरोबरी होणार ११२-४ कोहली
1-1 बरोबरी होणार
११२-४ कोहली पण गेला
उद्या फार फार तर लंच नंतर 1-2 तास पर्यंत टिकू
मोईन सारखा आपली विकेट काढतोय म्हटल्यावर कोहली ने अनुष्काचा पदर घेऊन तोंड लपवायला हवे
जोपर्यंत संपुर्ण नीराशा होत
जोपर्यंत संपुर्ण नीराशा होत नाहि तोपर्यंत आशा सोडु नये. अजुन ९० षटके.. आपले ६ फंलदाज खेळनार नक्कि...
Pages