पिटुकला कृष्णकन्हैय्या

Submitted by अवल on 28 July, 2014 - 03:44

फेसबुक वरील एका गृपमधे प्रगत क्रोशा शिकवण्याचे आमंत्रण आले. तिथे असलेल्या सदस्यांना गोकुळाष्टमीच्या निमित्ताने कृष्ण विणायला शिकवायचा आहे. त्यासाठी मुळात मला प्रयोग करावा लागला. मागे गणपती आणि जोडीने उंदीरमामा, मोदक बनवले होते. तो अनुभव उपयोगी पडला.
शिकणा-यांना करायला सोपा आणि मिनिएचर कृष्ण करायचा होता. मिनिएचर क्रोशा विणणे हे तसे किचकट आणि कौशल्यपूर्ण काम. छोटा आकार आणि त्यात तपशील भरणे हे तसे अवघड आणि आव्हानात्मक काम.
हा कृष्ण उंचीला पाच इंच आणि रुंदीला दोन इंच आहे. आत कापूस भरला आहे. यात सगळ्यात छोटी आहे बासरी. आणि सगळ्यात अवघड आहे ते पितांबर .

IMG_20140728_124644.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच सुंदर घडलाय श्रीकृष्ण! अव्वल कलाकार आहात! Happy

पण खरं सांगू का, तुम्ही केलेला गणपती, त्याच्या नैवेद्याचे अगदी तुपासगटचे मोदक, उंदीर या सगळ्यातला सुबकपणा प्रचंड आवडला.

मस्तच.
अवल, फोटो काढताना कृष्णाच्या जवळ एक पेन्सिल किंवा काही परिचित वस्तू ठेवून फोटो काढलास तर किती मिनिएचर आहे याचा अंदाज नीट येईल.

कमाल !!!
सलाम आहे तुमच्या चिकाटीला आणि कलाकौशल्याला.
आता घराघरात असतो तसा रांगणारा गोपाळकृष्णही करून बघा.
(आम्ही जितक्या सहज हे म्हणू तितक्याच सहजतेने तुम्ही ते करूही शकाल :))

Srushtichya kalakarala aani tujhyatlya kalakarala donhina dandavat.

अवलतै _/\_, आमच्यासारख्या 'ढ' लोकांनी आता तुझ्या धाग्यावर प्रतिक्रिया देणही उचित नै बै Proud पुण्यामधे घ्या की हो कार्यशाळा..... प्लिजच नोट तै. मी, शोभातै सारख्या (रखडलेल्या) शिकु इच्छिणार्‍या विद्यार्थिनींसाठी Happy

अवलतै _/\_, आमच्यासारख्या 'ढ' लोकांनी आता तुझ्या धाग्यावर प्रतिक्रिया देणही उचित नै बै>>>>> +1
सादर प्रणाम ____/\____

धन्यवाद सर्वांना. हर्षा, विनार्च असं का म्हणता ग, रसिकांचे प्रतिसाद हवेतच की ग Happy हर्षा, हो मी ठरवते लवकरच पुण्यातले वर्कशॉपचे.

Pages