जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या भागाचे अपडेट्सः

नमस्कार रसिकहो:

आज मेघनाचे बाबा हिंदकळत झोपेतून जागे झाले. शेजारी त्यांची पत्नी निद्रिस्तावस्थेत होती हे त्यांना झेपले नाही. पत्नीचे असणे झेपले, ती निद्रिस्त असणे झेपले नाही. त्यांनी आकांडतांडव करून पत्नीला जागृतावस्थेत आणले. मेघना व आदित्य प्रवासाला निघाले असतील तेव्हा त्यांना फोन करा व मी त्यांना एक सुरक्षा मंत्र सांगणार आहे तो मला सांगू द्या असे त्यांनी फर्मावले. काही लाडीक आढेवेढे घेऊन अखेर पत्नीने त्यांचे म्हणणे मान्य केले व मेघनाला फोन लावला.

मेघनाने तो फोन उचलला.

तो फोन उचलताना मेघना आदित्यच्या शेजारी कारमध्ये होती. प्रेमाची कबूली द्यायची वेळ जवळ येऊन ठेपल्यावर मुली (किंवा स्त्रिया वगैरे) आधीपेक्षा अधिक गोड दिसू लागतात ह्या उक्तीनुसार मेघना प्रफुल्लीत दिसत होती. पण आज खरा किलर दिसत होता आदित्य. ब्राऊन / मरून ग्लासेसमधून मिश्कीलपणे मेघनाकडे पाहात दिलेले किलर स्माईल अनेक मुलींसाठी भुरळ पाडणारे ठरू शकेल.

मेघनाला फोनवर आईने प्रवासास शुभेच्छा दिल्या. वडिलांनी मेघनाला 'ओम प्रणामिके देवी, लक्षं राखती यथा' असा काहीसा मंत्र सांगितला व तो रोज दहावेळा म्हणायला सांगितला. हा मंत्र म्हंटल्यामुळे दोघांचा प्रवास सुखरूप होईल असा त्यांना विश्वास वाटत होता.

त्यानंतर आदित्यने मेघनाला 'एक मित्र म्हणून एक सल्ला देऊ का' असे विचारले. 'एक पती' म्हणून काहीही करण्यास मज्जाव असल्याने त्याच्या चेहर्‍यावर क्षणभरासाठी आलेले नक्षलवादी भाव मन दुखावून गेले. सल्ला म्हणून त्याने मेघनाला सांगितले की मंत्रफंत्र म्हणू नकोस, कोणत्यातरी भडभुंज्या भोंदूने दिलेले मंत्र म्हणून काहीही होत नसते. मेघना ते मान्य करते.

इकडे तिचे वडील तिच्या आईला जागृत करून स्वतः मात्र घोरतात. आई चहा घेऊन येते व त्यांना घोरताना पाहून कर्कश्श आवाजात हाका मारून उठवते. ते दचकून उठतात. त्यांना एक हळुवार स्वप्न पडलेले असते. त्या स्वप्नात छान छान वावरणार्‍या मेघनाच्या मागे एक भयानक काळी सावली जात असते व ती मेघनाला गिळंकृत करते. काळ्या सावल्यांना उद्योग राहिलेला नसावा. दचकून उठून ते पुन्हा मेघनाल फोन करायचा आग्रह पत्नीला करतात. मेघना मोजून चाळीस कॉल्स उचलत नाही कारण तिचा फोन गाडीत तिच्या सीटखाली पडलेला असतो. सीटबेल्टमध्ये अडकल्यासारखी बसलेली मेघना नंतर मात्र रमणीय ठिकाणी आदित्यला विविध मनमोहक (त्याच्यामते) पोझेस देऊन स्वतःचे फोटो काढून घेते. बहुधा इजहार-ए-मुहोब्बत होण्याआधी एकदाची शेवटची भेट म्हणून हे फोटो आदूला देऊन टाकणार असेल. त्यातच आदित्यचा पाय सटकतो व तो पडणार तेवढ्यात त्याचा नाजूक देह मेघना आपल्या एका तळहाताच्या पकडीने सावरून धरते. खूप खूप गलबलून येते दोघांना!

नंतर ते कुठेतरी पोचतात. ते एक हॉटेल असते. तेथे त्यांच्या लक्षात येते की फोन गाडीत पडला होता आणि आईने चाळीस कॉल्स केले होते. आईला फोन करून मेघना सर्व स्पष्टीकरण मागवून घेते व शेवटी बाबांना पडलेल्या स्वप्नामुळे घाबरून एवढे कॉल्स करण्यात आलेले होते हे पाहून मनमोकळी हासते. ह्याच दरम्यान तिची आई आदित्यच्या आईलाही फोन करून हालहवाल विचारून पाहते. पण माईंना स्वतःच्याच संसारातील भानगडी इतक्या असतात की मेघनाला काळी सावली गिळणार आहे हे त्यांना समजले असते तरी त्या म्हणाल्या असत्या की 'आमच्याकडे सगळे नुसते गिळणारेच तर आहेत, त्यात आणखी एक काळी सावली'!

नंतर एका मैदानात ब्रेकफास्ट सर्व्ह केला जातो व मेघना छान दिसत असल्यामुळे तो ब्रेकफास्ट छान आहे असा एक अद्वितीय शोध लावून आदित्य आपल्या बुद्धीची चुणूक दाखवतो. त्यानंतर हवा, पर्वत, नदी, समुद्र अशी प्रतीके वापरून दोघे तरही गझलसारखे मिसरे एकमेकांवर 'रंग खेळू चला' शैलीत उधळत अंतर्धान पावतात.

श्री स्वामी कोळवेकर महाराज प्रसन्न!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

नक्षलवादी भाव मन दुखावून गेले>>
'आमच्याकडे सगळे नुसते गिळणारेच तर आहेत, त्यात आणखी एक काळी सावली'! >> Rofl
श्री स्वामी कोळवेकर महाराज प्रसन्न! >>> हे कोण? बाबाजी ?
ह्यात पण गझल .. अवघडेय Proud

बेफी,
हाहाहा. ते एकाच कारीतून (इथल्या प्रथेनुसार कार =कारी)बाजूला बसूनसुद्धा किती ते चोरून बघणे. मेदेच जाणे ते. Proud एक इतकासा वेळ हात धरला तर लगेच कसलेसे इन्फेकशन होइल भितीने सोडणे... Proud
आता आदे एकदम चोरासारखे चट्टेपट्टे असल्यासारखे टी शर्ट घालतो. कुठेही बाहेर जाताना दाखवले कि एकच टीशर्ट. मध्ये मध्ये तो गावठी गडी दिसतो. (छी, मला तसाही आवडत नाही. हसताना भयाण वाटतो.) को. भा. दु. मा.

हवेला अडवू शकत नाही , अडवू शकतात ते फक्त पर्वत म्हणत ती मेघना इतका सुचक लूक देते आणि आदे एकदम आशाळभूतपणे बघतो... Proud
----------------------------
आजकाल मेदेचे चुडीदार जssssरा बरे असतात. अगदीच फिकट रंग उडालेले नसतात. अगदी चवथीच्या वर्गात असलेल्या काही (काही हा शब्द लक्षात घ्या) सपेतील मुली आठवल्या ते भडक रंगाची मोठी फुले असलेले चुडीदार पाहून. पण ते तरी बरे. कधी न्हवे ते जीन्स घातलेली काकूने. वर कसला तरी फिकट टॉप. ...

हि सिरियल काही १२ जूनला संपत नाही. मग उगाच ती ज्वेलरी बॉक्स खर्च( भागाचा खर्च) कशाला?

आणि ती कुठलीशी रीसीट(रीसीटा ह्या इथल्या प्रथेनुसार) आहे.
मग मेदेची पाठवणी होइल तिच्या आधीच्या आदूच्या प्रकरणावर. मग झुरणे... आहे आहे आजून चालू.

बेफी, तुम्हाला आहे अजून चान्स पोस्टी पाडायला. व आम्हाला वाचायला.

झंपेश्वरी,

आता एकदाजरी स्वतःची तीच तीच पोस्ट एडिटलीत तर तुम्हाला बाबाजी बाधतील हे लक्षात ठेवा.

तो दुसरा आदित्य "गेला" का? कालच्या भागात ते हनीमूनला जाताना दाखवलेत (म्हणजे सीर्रियल संपायला आली का?)
मधले बरेच भाग मिस झाले.

भूषणदादा, झंपे Rofl

मेघना आणि आदे दोघही काल बेक्कार दिसत होते! झालं.

बाकी सगळा प्रकार अपेक्षेप्रमाणे टुकार!

ते पर्वत , हवा वगैरे ऐकताना मला वाटलं आत्ता इथे श्री असता तर म्हणाला असता की हवेचा उप्योग उर्जा क्रिएट करायला पण होतो. आपण आधीक आधीक हवा वाचवायला हवा आपलं हवी Uhoh

तो आदे म्हणजे अक्ख्या जगातल्या मुली मेल्या आणि हिच बाय ती राहून गेलीय.

अशक्यच झालीय हि सिरियल!!

काल ते कारमध्ये बसलेले दाखवत होते तेव्हा मला जुन्या मुव्हीजची आठवण झाली.
खरी कार दाखवायचे सोडुन ते तो कारचा सांगाडा गदागदा हलवत होते.
आणि आदे स्टिअरींग व्हील एकदा उजवीकडे..एकदा डावीकडे..
प्रत्यक्ष अशी गाडी चालवली तर?

पुर्वी फार लोकांकडे गाड्या नसायच्या तेव्हा हे असे सांगाडे आणि स्टिअरींग व्हीलचे खेळ चालुन जायचे.
आता या काळात सुद्धा तेच? Uhoh

ओ दाखवली आहे की स्वीफ्ट नंतर Happy पण ते नाटकी लाजणं बुजणं जरा अतीच होतय मेघनाच. आणि आता तरी पुस्तकी भाषा नको सामान्य माणसाप्रमाणे वागावं त्यांनी.

मागची झाडं नुसती पळायची तेव्हा.... ते दाखवले नाही?

>> दाखवले कि..

ओ दाखवली आहे की स्वीफ्ट नंतर

>> हो गं. पण ती नंतर. सुरुवातीला त्यांचा प्रवास सुरु होतो तेव्हाचे ते लाजणे नी बाबांचा कॉल वै. ते सगळे त्या सांगाड्यातच आहे. आज रिपीट बघ हवं तर. Happy

नंतर स्विफ्ट दाखवली तिला कुणी तरी डमी ड्रायव्हर होता बहुतेक.
शेजारच्या सीटवर कुणीच दिसले नाही कारण त्या सीनमध्ये.
.....
(आता आहे माझं निरीक्षण तेवढं बारीक... :फिदी:)

आणि आदे स्टिअरींग व्हील एकदा उजवीकडे..एकदा डावीकडे.. >>>> पियु ते बघुन मी नवरर्‍याला म्हटल पण यांच्या गाडिला गिअर वगैरे नाहीत का? मागे एकदा मी तुतिमीच्या धाग्यावर पण लिहील होत की कलाकाराला जर गाडी चालवता येत नसेल ऑर मालिकावाल्यांच्या बजेटमध्ये कार बसत नसेल तर उगाच अट्टाहासाने कार ड्राईव्ह केलेली का दाखवतात? तो गाडीचा सांगाडा इतका जोरात हलवतात की बघणार्‍याला वाटाव यांनी यांची कार उधाणलेल्या समुद्रात घातली आहे की काय...

पण आज खरा किलर दिसत होता आदित्य. ब्राऊन / मरून ग्लासेसमधून मिश्कीलपणे मेघनाकडे पाहात दिलेले किलर स्माईल अनेक मुलींसाठी भुरळ पाडणारे ठरू शकेल. >>>> बेफी प्रचंड अनुमोदन.. मालिकेच्या सुरुवातीला हा आदे आवडला नव्हता फारसा... पण फिदा होण्याइतपत प्रगती झालीय माझी आजकाल... Wink

मुग्धा तो आदित्य इथे चांगला दिसतो आधी इ टीव्हीच्या एका शिरेलीत व्हिलन होता कसला सुकडा दिसायचा, इथे मात्र मला आवडला.

तो गाडीचा सांगाडा इतका जोरात हलवतात की बघणार्‍याला वाटाव यांनी यांची कार उधाणलेल्या समुद्रात घातली आहे की काय >> Biggrin खरंय मुग्धा.

आदित्य आणि मेघना ब्रेफा करायला बसलेले लॉनवर तेंव्हा (बाईंनी जीन्स घातलेली) कसले विजोड दिसत होते.आणि काहीही भयंकर गुढकथेतले डॉयलॉग तु सुंदर दिसतेस म्हणुन नाष्टा सुंदर???

एखादी चेटकीण बंगल्यात शिरलेल्या सावजाला म्हणते जितनी तुम घबराओगी उतना तुम्हाला गर्म खून पिनेमें मुझे मजा आयेगा. अस काहीस वाटत होतं मला.

एखादी चेटकीण बंगल्यात शिरलेल्या सावजाला म्हणते जितनी तुम घबराओगी उतना तुम्हाला गर्म खून पिनेमें मुझे मजा आयेगा. अस काहीस वाटत होतं मला.>>>>> गुब्बे Lol

काल शेवटी शेवटी एकदाच आदेने गिअर बदलेला दाखवला तेव्हा अगदी हुश्श झाल मला गाडीला गिअर आहेत ते बघुन...

कार मधे शेजारी बसून रिअर व्ह्यू मिरर मधे कसं काय एकमेकांना बघतात ब्वॉ... काही झेपलं नाही.

Pages