निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिये, सापसुरळी सापापेक्षा छोटी, पण तश्याच रंगाची असते. तिला ४ पाय असतात. आमच्या लहानपणी एक कैच्याकै समज होता. ती कुठेही दिसली की तिच्या शेपटीला आपल्या हाताची करंगळी लावली तर म्हणे परिक्षेत पास होतं. Lol आणि ती घरात आली तर चांगलच असतं म्हणे...लक्ष्मी येते.ती चिचुंद्री पण घरात आली तर लक्ष्मी येते म्हणे घरी. काही का असेना, अशा समज गैरसमजुतीने अशा प्राण्यांची हत्या तर होत नव्ह्ती. बाकी आता सा.सु. कुठे दिसत नाही ब्वॉ!

ईईईईईईईईईईईई आर्यातै, मग तुम्ही हात लावायच्या तिच्या शेवटीला? Sad
मी नापास होणं प्रेफर केलं असतं Sad

सुप्रभात.

हे हे आम्ही मुळ मिठाअग्री. अग्री म्हणजे आगर असणारे. आमच्या पूर्वजांची मिठाची आगरे होती. पण लोक हल्ली अग्री चा अर्थ भांडण करणारे लोक असा धरतात. Angry

आता आमच्याइथे कंपन्या आल्या मुळे शेतांना भराव पडले आहेत व ही आगरे फक्त नाममात्र राहीली आहेत. मी लहान असताना आमच्या घरी मिठाची पोती अशीच भेट म्हणून यायची. राशीचे तळाचे मिठ थोडे काळपट असते माती लागल्याने असे मिठ वडील मागवायचे ते नारळाच्या बुंधामध्ये गोलाकार चर खणून त्यात वर्षातून एकदा किंवा दोनदा घालायचे. त्याने नारळाला जोम येतो.

आम्ही पूर्वी हेच भेटी आलेले जाडे मिठ वापरायचो. जाड्या मिठाचा मोठा रांजण आमच्या घरात भरलेला असे. सगळ्या जेवणात हेच जाडे मिठ आम्ही वापरायचो. माश्यांच्या रश्याला तर ह्या मिठामुळे खासच चव येत असे. शेतावर पिकलेली टोमॅटो आम्ही ताजी ताजी तोडून खायचो. तेंव्हा जाडे मिठ थोडे पाट्यावर घसपटून ते सोबत न्यायचो व त्यासोबत शेतातच बसुन टोमॅटो खायचो. आहाहा तोपासु झाले. चिंचा कैर्‍याही तशाच. खुप आठवणी आल्या मिठामुळे. धन्स जिप्स्या.

व्वा, जागु! मस्त आठवणी सांगितल्यास!
आमच्याकडे आम्ही अजुनही स्वयंपाकात खडे/जाडे मीठच वापरतो.

रीये, हो हो आम्ही लावायचो तिच्या शेपटीला हात.
तीच गोष्ट भारद्वाज पक्षाची. हा पक्षी दिसणं खुप भाग्यशाली असतं म्हणे. त्याच्याभोवती ३/५ फेर्‍या मारल्या तर मनातली इच्छा पुर्ण होते म्हणे. Lol

भारद्वाज काय वडाचे झाड आहे फेर्‍या मारायला. तो असा फोटो काढायला पण भाव खातो. जरा एका ठिकाणी राहत नाही तो फेर्‍या मारायला कसा उभा राहील ? Lol Light 1

हो ना! खुप त्रास द्यायचा तो. फेर्‍या पुर्ण होउ देत नाहीच! त्यामुळेच आमच्या मनातल्या इच्छा अपुर्ण राहिल्या ना!! Lol

@अन्जू मिठागरे पार वसईपर्यंत होती. गोगटे salt कंपनी नालासोपारा (वेस्ट) येथे होती, अजूनही असेल.
हो आहे आजुन ती कंपनी आता बाजुलाच मोठे गणपती मंदिर बांधले आहे.

वा जागुताई सुंदर आहे प्रचि.

सापसुरळी ला सापाची मावशी पण म्हणतात...आम्ही पण खुप हिम्म्त करुन हिच्या शेपटीला करंगळी लावायचो... नंतर खुप वेळ हात थरथरायचा आणि हार्ट बीट्स वाढायचे.... पण मज्जा यायची...

आर्या, भारद्वाज पक्षाबद्द्ल अस पण ऐकीवात आहे की तो झाडावर बसला असतांना त्या झाडाला प्रदक्षिणा
घातली की यमाला जिंकल्या सारखे म्हणे..... तसेच श्री गुरु दत्तांच्या फोटोत पहा, कुत्रा आणि भारद्वाज पक्षी हमखास दिसतील...

जागु कसली गोड फुल आहेत व्वा... मी पण जांभळे क.कमळ आणुन कंडीत लावले आहे.... फुलं येतील का
कुंडीत? बारा महिने बार असतो का?

मस्त गप्पा चालल्या आहेत.. रिया.. ईईई करून दमली असशील ना... नसशील तर थांब तुला बीजिंग च्या खाऊ गल्ली चे फोटो दाखवते Proud

.'पाट्यावर घसपटून' .. आय लव जागु'ज टर्मिनोलॉजी , अगदी डोळ्यासमोर दृष्ये उभी करते.. Happy

सश्या Angry

एवढं बोल्ड मध्ये लिहुन पण लिंक दिलीच. पण मी बघितली नाही Proud टुकटुक jibh dakhavanari chhan smiley.gif

आता सापसुरळीहुन पुढे जाऊयात
(हे बोलताना पण यक वाटतय Proud )

जागूतै फुलं मस्तच!

ओके जागु, डन...
स_सा, काय भयंकर आहे फोटो...
रिया ला काही रात्री झोप यायची नाही आज.... थोड्या वेळानी ऑफीस मधेच भास होतील.. फ्लोअर वर काहीतरी सळसळतय.....:P Proud Proud
वर्षु दी... चमकीली ठीक आहे... पण सीता की लट म्हणजे कैच्चाकै... सीता कीती सुंदर असेल आणि तीची लट इतकी भयंकर कशी असेल.... Happy Happy Happy खरच मजेदार नावं आहेत नाही!

भारद्वाज ला सकाळी सकाळी उडायचा कंटाळा येतो. बर्‍याचदा तो जमिनीवरून चालत जाताना दिसतो.
आमच्याकडे नाही दिसत पण कोल्हापूरला, मलकापूरला, गणपतीपुळ्याला मी खुप वेळा असा चालताना बघितलाय.

या पाली, सापसुरळ्या इ. बाबत - यांच्या शेपट्या वैशिष्ट्यपूर्ण असतात - Autotomy या करता त्या शेपट्या फेमस असतात. म्हणजे समजा एखाद्या भक्षकाने यांची शेपूट पकडली तर हे प्राणी शेपूट स्वत:हून तोडून पळ काढतात (self amputation ) - त्यामुळे त्या भक्षकाच्या तावडीत फक्त शेपूट येते आणि यांचा जीव वाचतो - शेपूट गेली तर गेली - परत येईल - पण जीवावरचे शेपटीवर निभावले ना ??? Happy

आमच्या कडे तिला चोपई म्हणतात.

काल इतके काळे ढग आले होते की पावसाला सुरुवात होणार असे वाटले पण आज लख्ख प्रकाश आणि निळे आकाश.

जागू, परत ढग आले कि फोटो काढ.. मला बघावासा वाटतोय. पहिल्या पावसात मनसोक्त भिजायची परवानगी असे आम्हाला लहानपणी. त्यामूळे अंगावरचे घामोळे जाते असा समज होता.

रिया सॉरी, माझ्यातर्फे मी टाळतोय खरे पण एकच.. पाल ( आणि साप ) सोडली तर कुणाला छतावरून उलटे
लटकत चालता येत नाही. उंदराला नाही. आणि सापसुरळीलाही नाही. तिला तर भिंतीवर उभे चढणेही जमत नाही. ( व्हर्टीगो असणार तिला. बिच्चारी. )

रायलिंग पठारावर काढलेला हा स्टार ट्रेलचा फोटो (रायलिंगच्या धाग्यावरही टाकला आहे).

(प्रचि: जिवेश)

स्टार ट्रेल फोटोग्राफी, अधिक माहिती इथे पहा:
http://en.wikipedia.org/wiki/Star_trail

व्वा!सुप्परब फोटो.... पण स्टार ट्रेल म्हणजे नेमकं काय?

धन्यवाद जिप्सी.... मिलीयन लाईक्स फोटो.... खुप छान...

जिप्स्या उत्तर देईलच, तरी पण

पृथ्वीचा अक्ष ( सध्या तरी ) ध्रुवतार्‍याकडे रोखलेला आहे. त्यामूळे आपल्याला रात्री इतर ग्रहतारे जरी उगवताना
व मावळताना दिसत असले तरी ध्रुवतारा एका जागी स्थिर दिसतो. बराच वेळ निरिक्षण केल्यावर इतर ग्रहतारे त्याच्या भोवती फिरताहेत असे भासते.
कॅमेरा एकाच जागी स्थिर ठेवून थोड्या थोड्या वेळाने क्लिक करून सगळे फोटो एकत्र केले तर असा फोटो दिसतो.

( हे बर्‍याच सोप्या भाषेत लिहिलेले आहे Happy )

जिप्स्या, सिंपली वॉव!!!!!!!!!!!!!!!!

दिनेशदा, माहिती द्या फोटो नको Happy

सासुबद्दल (:फिदी: किती ते यतार्थ नावं Lol ) आईला माहीत आहे का ते विचारून बघते.

फोटो मस्तच सगळ्यांचे.

आज नवऱ्याने हापिसात 'अळू' (फळ) खाल्ले, कोणीतरी आणलं होतं मला मेसेज आला, पण त्याने फोटू नाही काढला. त्याला सांगितलं बाजारात बघ मिळालं तर.

मस्त फोटो स्टार ट्रेलचा.
exposure times for a star trail range from 15 minutes to several hours, requiring a 'bulb' setting on the camera to open the shutter for a longer period than is normal.>>> हा फोटो काढायला किती वेळ लागला?

धन्यवाद दिनेशदा. अगदी सोप्या भाषेत सांगितल. मी मराठीत सांगण्यासाठी शब्द जुळवत होतो. Happy

सासु >>>>रिया Proud

हा फोटो काढायला किती वेळ लागला?>>>>मोनाली, अर्धा तास Happy बल्ब मोडवर अर्धातास सेटिंग ठेवून काढलाय. यासाठी कॅमेरा रिमोट वापरलाय. हाताने तेव्हढा वेळ न हलता बटन प्रेस करणे शक्य नसते.

पुर्वी बीबीसी ची व्हॉट युअर आईज कांट सी नावाची व्हीडीअओ कॅसेट होती, आता त्यांचीच टाईम मशीन ही मालिका आहे. दोन्ही मधे असे अफलातून चित्रण आहे.

Pages