निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी, तुम्ही सांगितलेलं प्रदर्शन बघून आले. तुम्ही काढलेला फोटो सुंदर आलाय. खूप खूप अभिनंदन. मी रोज त्याच मैदानातून जाते येते. त्यामुळे जराही वाकडी वाट करावी लगली नाही.

जिप्सी आधी कधी सांगितलंय का ते आठवत नाही.
तो कोलाजातला रंगित छत्रीचा फोटो आहे ना, तो माझा जीव की प्राण आहे अगदी. तो धागा वर यायचा तेंव्हा मी तो फोटो शाहरूखचा असल्यासारखं मन भरूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊन पाहुन घ्यायचे.
तो फोटो मला प्लिज देशील का रे?

तुझ्या ब्लॉग किंवा माबोवर कुठे आहे का?
मला माझ्या संग्रहात हवाय तो. माझ्या ऑफिसमध्ये वॉलपेपर म्हणून ठेवायचाय.
सध्या मानुषीताईंनी टाकलेला अमेरिकेतल्या कोणत्याश्या तळ्याचा फोटो आहे.
निगवरच टाकलेला Happy

सध्या मानुषीताईंनी टाकलेला अमेरिकेतल्या कोणत्याश्या तळ्याचा फोटो आहे.
निगवरच टाकलेला स्मित>>>>>>>>>>>>>>>>>>
रिये...........शो श्वीट ऑफ यू!
प्रज्ञा.............सुप्र! ब्रह्मकमळ सुंदर!
कंसराज फूल मस्तय. असंच बरंच मोठं आणि एकेकटं जमिनीवर येणारं लाल रंगाचं मे फ्लॉवर. ते पूर्वी होतं घरी. त्या फुलावरून पोकळ ओंजळ करून हळूवार फिरवायची. तळवे परागाने मस्त पिवळे! (त्या वयातले निरर्थक टाइमपास)!
गुर्जींच्या टेन्टचा फोटो सायन्स फिक्शन मुव्हीतला वाटतोय! जबरी आलाय! आणि हा टेन्ट एलियनचा वाटतोय!
अदिजो मस्त फोटो.
जागू २ नं फोटो अमांडा आहे. माझ्याकडे आहे. मागे मी टाकला होता फोटो.

ते बटन बूशचं (Button bush) फूल आहे.>>>धन्यवाद तन्मय. दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडचा कळमसुद्धा असाच दिसतो. Happy

प्रज्ञा, छान फोटो. Happy

जिप्सी, तुम्ही सांगितलेलं प्रदर्शन बघून आले.>>>>>धन्यवाद मनीमोहर. Happy मी आज जातोय. Happy

तो फोटो मला प्लिज देशील का रे?>>>रिया,१-२ दिवसात तुला हाय रिजोल्युशन आणि विदाऊट वॉमा फोटो ईमेल करतो. सोबत तो साप सुरळीचा फोटोही (मोठ्ठा) पाठवतो. काहि दिवस तो ही डेस्कटॉपवर ठेवून बघ, छान वाटेल. Proud

गुर्जींच्या टेन्टचा फोटो सायन्स फिक्शन मुव्हीतला वाटतोय! जबरी आलाय! >>>>धन्यवाद, मानुषीताई Happy

suprabhat .

मनिमोहर काय लकी आहात तुम्ही... लगेच प्रदर्शन बघुन पण आलात...
सरिवा, जागु अलमांडा मस्तच.. त्यावर दिनेशदांचे निरीक्षण काय सांगायचे....
जिप्सी... तारांगण खुपच आल्हाद दायक आहे....
प्रज्ञा... ते ब्रम्हकमळ कसलं गोड आहे....
बटन बुश खरच कळम सारखेच भासते आहे...
रियाचे स्माईलीज धमाल आहेत....

वाह.. वृश्चिक राशीचा फोटो मस्त आहे, जरी खूप क्लिअर नसला तरी..

बटन बुश, ब्रम्हकमळ खूपच गोड..

जिप्स्या या बाजूला नाही का लागत तुझी प्रदर्शने?? जहाँगीर मे भी चलेगा... Happy

जिप्सी प्रदर्शन उद्यापर्यंतच आहे का?

माझा नवरा ठाण्याला जातो जॉबसाठी आणि गावदेवी मैदानाजवळून जातो, काल मी त्याला सांगितलं प्रदर्शन आहे ते पण आज नेमका तो वरळीला गेलाय. उद्या सुट्टी.

जिप्स्या या बाजूला नाही का लागत तुझी प्रदर्शने??>>>>वर्षूदी, हे प्रदर्शन ठाणे महानगरपालिकेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भरवलेले आहे. Happy वन्यजीव फोटो प्रदर्शन सोबत निसर्गाशी संबंधित अजुन बरच काही आहे प्रदर्शनात. नक्षत्रवनही वसवले आहे.

जिप्सी प्रदर्शन उद्यापर्यंतच आहे का?>>>>>>>हो अन्जू, उद्यापर्यंतच आहे. Sad

नविन भागाबद्दल शुभेच्छा.
जिप्सि, नविन भागाचं ॠतूसमर्पक कोलाज सुरेख आणि पुष्पा पागधरेंनी गायलेल्या गाण्यांच्या ओळींनी एकदम नोस्टाल्जिक केलं.
आकाशगंगा आणि आमचा टेन्ट >>> वा मस्त आलाय फोटो .
प्रज्ञा... ते ब्रम्हकमळ कसलं गोड आहे...माझ्याही कुंडीत फुललं होतं मागच्या आठवड्यात..

धन्यवाद अंजली.
दिनेशदा, लिंक चेक करतो. Happy

अभिनंदन मनीमोहर!!!!
आजच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये हा लेख छापून आला आहे.
हि लिंकः
http://maharashtratimes.indiatimes.com/artic.../36210744.cms

जिप्सी, माधव आणि मानुषी.. जरा आठवणीतली गाणी बीबी वर नजर टाका बरं.>>>>>>>>>>>> ओक्के बॉस! जरूर!
अरे त्या गरीब बिचार्‍या(!!!!!!!!!!!!!!!!!??????????????)रियाला कोण रडवतंय रे? आँ?

जिप्सी, दिनेशदा खूप खूप आभार.
जिप्सी, काल ठाण्याला येऊन गेलात पण मीच घरी नव्हते. नाहीतर भेटीचा योग जुळून आला असता.

Pages