निवडणूका निकालांचा 'अगंभीर' धागा

Submitted by बेफ़िकीर on 13 May, 2014 - 10:36

मतदान संपल्याक्षणी सगळ्या वाहिन्यांवर एक्झिट पोल चा धुमाकूळ सुरू झाला आहे. सर्वच वाहिन्या भाजपच्या जागांची संभाव्य संख्या २४९ पासून ३४० पर्यंत असेल असे दाखवत आहेत. १६ मे २०१४ पर्यंत थांबण्याचा संयम कोणाकडेही नाही. लाडवांची कंत्राटे आधीच दिली गेलेली असून लक्षावधी लाडू वळण्यात येत असल्याचे चित्रण एका वाहिनीवर आत्ताच दाखवले. काँग्रेसच्या आघाडीला दिडशेच्या आसपास जागा येतील असे दाखवत आहेत. विश्लेषण, चर्चा, वाद, भांडणे सुरू होत आहेत. मोदी सरकार आल्याचा जयघोष चाललेला आहे.

प्रत्यक्षात काही तिसरेच झाले तर? शेअर बाजाराचे काय? लाडवांचे काय? (काँग्रेसकडून लाडवांना शेकडा भाव तितकाच मिळेल का जितका भाजपने कबूल केला होता?)

ह्या धाग्यावर कृपा करून गंभीर लिहू नयेत. फक्त वैयक्तीक चिखलफेक होऊ नये. मात्र धमाल येईल असे प्रतिसाद द्यावेत. प्रतिसाद वाचून हसू आले पाहिजे, आसूरी आनंद मिळू नये कोणालाही!

कदाचित मोदी सरकार येईल, कदाचित नाही, कदाचित त्रिशंकू लटकेगिरी होईल! पण आपण आपले डोके कशाला फिरवून घ्यायचे? मजा लुटा! एक्झिट पोलमध्ये काय दाखवत आहेत ते लिहा, प्रत्यक्ष रिझल्ट्स लिहा, आपली मते लिहा! फक्त सदस्यत्व स्थगित होऊ देऊ नका.

जय लोकशाही!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/shivraj-singh-chauhan-moth...

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला आहे, याचं एक ढळढळीत उदाहरण गुरुवारी समोर आलंय. साक्षात राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या आईचीच साखळी चोरांनी भरदिवसा चोरल्याच्या घटनेनं सगळ्यांनाच चक्रावून टाकलंय. 'सीएम साहेबां'च्या आईवर ही वेळ येते, तर सामान्यांच्या सुरक्षेचं काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

------------------

गंभीर बातमी . पण काही जणांनी गंमतीदार केली आहे. काही जण म्हणतात चोरी कुठे होत नाही तर कोणी म्हणतात बघा चौहान यांची आई ची किती साधी राहणी आहे तर कोणी म्हणतात यात काय विशेष Biggrin

सुरक्षा घेतली नसेल तर त्यात काहीच विशेष नाही हे खरेच आहे.

माझ्या मामाची बॅग जर्मनीला चोरीला गेली होती. काउंटरवर उभा होता, खिशातुन पाकीट काढायला खाली ठेवली ब्रीफकेस आणि पैसे काढून खाली पाहतो तर काय ब्रीफकेस गायब. आता मी अँजेला मॉर्केल बाईंचा राजीनामा मागू का? Biggrin

तुमचा मामा आणि चौहान यांची आई काही फरक आहे का.. उद्या स्वतःची तुलना ओबामाशी कराल हो पण प्रत्यक्षात तसे होईल का ? Biggrin

मी अँजेला मॉर्केल बाईंचा राजीनामा मागू का? >> अहो तुमचे राजिनामा स्पेशालिस्ट फडणवीस आहेत ना. सकाळी उठल्याबरोबर राजिनामा मागायला सुरुवात करतात ते झोपेत देखील बडबडत असतात .. नैतिकतेची चाड वगैरे शब्द चौहान ला ऐकवा जरा Wink

मुळात ह्या बातमीची खातरजमा केली आहे का? मटा वगळता कुठल्या वृतपत्रात हे आले आहे. टिव्हीवर आले आहे का?

एखादी घटना घडणे आणि तशी मालिका असणे यात फरक नाही का?

बाकी, देवेन्द्र फडणविसांनी राजीनामा मागणे आणि तुम्ही मागणे यात काहीच फरक नाही का? Wink Happy

Biggrin खातरजमा .. शोभत नाही हो हे वाक्य खास करुन तुमच्या कडुन . भाउ चे दाखले देणारे तुम्ही मटासारख्या वृत्तपत्रावर संशय घेत आहेत Wink

राजिनाम्याचा काय संबंध ? अरे हो.. हे काय काँग्रेस च्या राज्यात नाही झाले भाजपाच्याच राज्यात झाले ज्याचा डंका पिटवला जात आहे मग कसा राजिनाम्याचा संबंध ? सामान्य लोकांची चोरी झाली त्याला प्रसिध्दी मिळत नाही बहुतेक मध्यप्रदेशात ?

देवेन्द्र फडणविसांनी राजीनामा मागणे आणि तुम्ही मागणे यात काहीच फरक नाही का? >> आहे ना.. आम्ही झोपेत बडबड करत राजीनामे मागत फिरत नाही हो Biggrin असे कधीतरी मागतो Wink

घटना भले गंभीर आहे पण वृत्तपत्राच्या बातमी खाली काही प्रेमी लोकांनी गंमतीदार आणि विनोदी बनवले आहे म्हणुनच इथे दिले Happy

मुख्यमंत्र्याच्या आईची चैन गळ्यातुन हिसकावुन गेले तेही भरदिवसा घटना गंभीरच आहे.

पुरावा मागत आहे ? >>>> खरच धागा अगंभीर आहे म्हणुन ठिक आहे Wink अन्यथा विनोदाच्या धाग्यावर हलवावे लागले असते आपले वाक्य Wink

>>> मुख्यमंत्र्याच्या आईची चैन गळ्यातुन हिसकावुन गेले तेही भरदिवसा घटना गंभीरच आहे.>>

आम्ही कुठे म्हणतोय गंभीर नाही?

(१) मुख्यंंमंत्र्यांची आई असा बोर्ड गळ्यात अडकवून फिरत होती का ती बाई?
(२) सुरक्षा घेतली नसेल तर जगातल्या कुठल्याही देशात अशी घटना घडू शकते
(३) गळ्यातली चेन चोरणे आणि दहशतवादी कारवाई यातला फरक समजत नसेल तर शिशुवर्गात जाऊन बसा.

Happy

आणि आता किल्लर बातमी:
पोलीसांच्या मते असे काहीही घडले नाही आहे. सविस्तर वृत्ताची जरा वाट पहा आणि मगच उड्या मारा.

पोलीस आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी बरेच काही बोलत असतात खोटे वाटल्यास पेपरावर केस करुन दाखवा मग Wink
आता उड्या मारुन दाखवा..:खोखो:

माफ करा, तुमच्या इतका रिकामा वेळ असल्या गोष्टीवर घालवण्यासाठी माझ्याकडे नसल्याने या विषयाबाबतीत लेखनसीमा. Happy

कोळश्या सारख्या वस्तुवर सुद्धा डल्ला मारणारे सरकार गेल्यावर एखाद्या राज्यातील एका किरकोळ गोष्टीवर

उहापोह करताहेत!!

निवडणूक निकालांचे पडसाद -
नारायण राणेनी पराभवामागे पवारांच्या काँग्रेसचं षडयंत्र आहे, असा जाहीर आरोप केला आहे. 'निवडणूकीत हार-जीत चालतेच' असंही ते अगदीं सहजपणाने म्हणाले. पण चेहर्‍यावर, बोलण्यात कुठेही आपलं किंवा पक्षाचं कांहीं चुकलं असण्याच्या शक्यतेचा मागमूसही नव्हता. आपण किंवा आपला पक्ष [त्या त्या वेळचा] हरतो तेंव्हा आपली सोडून इतरांचीच ती चूक, मूर्खपणा, दगलबाजी असते यावर नेहमी इतका ठाम असणारा महान नेता कोकणाने जगाला दिला, याचा एक कोकणी म्हणून मला आत्यंतिक अभिमान वाटतो ! Sad

उदयन, एका शुल्लक घटनेतून बीजेपीला जबाबदार धरु नका, आजकाल मायबोलीसारख्या उत्तम प्रशासन असलेल्या संकेतस्थळवरही किशोरडीसारखे भामटे आहेत म्हणुन मायबोलीला कुणी बोल लावत नाही. तुर्तास इथेच थांबतो कसे.?

>>>> आजकाल मायबोलीसारख्या उत्तम प्रशासन असलेल्या संकेतस्थळवरही <<<< म्हण्जे? पूर्वी उत्तम प्रशासन नव्हते का मायबोलीचे? फक्त आजकालच आहे का? Wink
>>>> किशोरडीसारखे भामटे आहेत म्हणुन मायबोलीला कुणी बोल लावत नाही <<<< गैरसमज आहे हा...... आमच्यावेळेस २००५ ते २००८ दरम्यान मधे लिम्ब्या मायबोलीवर आहे म्हणून बर्‍याच जणान्नी बर्‍याच प्रकारे बोल लावला होता Proud

मला जरा -
विचारवंत
किशोरडी
राजु ठाकरे
इडलीवाला
दुकान

हे कुणाचे आय / ड्यू आय आहेत याची माहिती हवी आहे. 'माहिती हवी आहे ' मध्ये धागा उघडू का?
आजकाल जाल त्या धाग्यावर या लोकांचा धुमाकूळ चालू असतो.

Pages