निवडणूका निकालांचा 'अगंभीर' धागा

Submitted by बेफ़िकीर on 13 May, 2014 - 10:36

मतदान संपल्याक्षणी सगळ्या वाहिन्यांवर एक्झिट पोल चा धुमाकूळ सुरू झाला आहे. सर्वच वाहिन्या भाजपच्या जागांची संभाव्य संख्या २४९ पासून ३४० पर्यंत असेल असे दाखवत आहेत. १६ मे २०१४ पर्यंत थांबण्याचा संयम कोणाकडेही नाही. लाडवांची कंत्राटे आधीच दिली गेलेली असून लक्षावधी लाडू वळण्यात येत असल्याचे चित्रण एका वाहिनीवर आत्ताच दाखवले. काँग्रेसच्या आघाडीला दिडशेच्या आसपास जागा येतील असे दाखवत आहेत. विश्लेषण, चर्चा, वाद, भांडणे सुरू होत आहेत. मोदी सरकार आल्याचा जयघोष चाललेला आहे.

प्रत्यक्षात काही तिसरेच झाले तर? शेअर बाजाराचे काय? लाडवांचे काय? (काँग्रेसकडून लाडवांना शेकडा भाव तितकाच मिळेल का जितका भाजपने कबूल केला होता?)

ह्या धाग्यावर कृपा करून गंभीर लिहू नयेत. फक्त वैयक्तीक चिखलफेक होऊ नये. मात्र धमाल येईल असे प्रतिसाद द्यावेत. प्रतिसाद वाचून हसू आले पाहिजे, आसूरी आनंद मिळू नये कोणालाही!

कदाचित मोदी सरकार येईल, कदाचित नाही, कदाचित त्रिशंकू लटकेगिरी होईल! पण आपण आपले डोके कशाला फिरवून घ्यायचे? मजा लुटा! एक्झिट पोलमध्ये काय दाखवत आहेत ते लिहा, प्रत्यक्ष रिझल्ट्स लिहा, आपली मते लिहा! फक्त सदस्यत्व स्थगित होऊ देऊ नका.

जय लोकशाही!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

शेअर बाजाराचे काय? >>>> बहुमत मिळण्याची शक्यता असल्यामुळे शेअर बाजार नक्कीच उच्चांक गाठेल ज्यांना घ्यायचे असल्यास त्यांनी शासकिय कंपन्यांचे घ्यावे जसे की कोल इंडीया, एसबीआय, कारण काँग्रेस आले या भाजपा आले दोघांना ही शासकिय कंपन्यांना वर आणावेच लागेल आणि त्यासाठी त्याच्यात सरकार ची भागीदारी वाढवावीच लागणार . Happy

------------------

आता राहिले हास्यास्पद ...... ते लिहितो नंतर Happy

 

लाडू फुकट जाणार नाहीत.
काळजी सोडून सोडा.
Wink

मला माझ्या पैजेची काळजी आहे.
आमच्या परिपूर्णाबरोबर पैज आहे.
माझ्यामते एन्डीए लेस दॅन २१० आणि परिपूर्णाच्या मते मोअर दॅन २५०.
आता बघू.

केजरीवालांचे काय होणार? ते जिंकणार की नाही ह्यावर कोण शर्यत लावतंय? हारल्यावर ते लगेच येणार्‍या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीसाठी कुठून उभे राहणार? बारामती की पृथ्वीराज ह्यांच्या जागेवर ही एक उपशर्यत लावता येईल.

ज्योतिरादित्य सिंधिया - हारणार

कमलनाथ - जिंकणार

सुषमा स्वराज - जिंकणार

प्रिया दत्त - जिंकणार

(ह्यातच तीन काँग्रेसवाले आले ज्यापैकी दोघे जिंकणार) - स्त्रोत एबीपी न्यूज!

म्हणजे साती पैज जिंकणार तर!

मनसेमुळे भाजपला तोटा होणार असे एक मत बघायला मिळाले.

(मनसेमुळे फायदा झालेला घटक कोणता हाच आता प्रश्न आहे - स्वतः मनसेही नाही बहुधा)

केदार - केजरीवाल म्हणजे कोण म्हणताय? ते अरविंद केजरीवाल का? त्यांचे कुठे नावच नाहीये वाहिन्यांवर!

युपीए वाले स्वतःकडचे >>> त्यांनी लाडु बनवलेच नाही Biggrin आधी पासुनच माहीत होते त्यांना पैसे वाचवले Happy

आमच्या कॉंग्रेस उमेदवाराचे घर आम्हाला लागूनच आहे.
आजोबा जराजर्जर आहेत.
जिंकले तर आनंदाने, हरले तर दु:खाने सायबांचं काय खरं नाही.
मला मात्रं घरी जायला त्रास होईल एवढ्या गर्दीतून.

Congress : 355 Seats
AAP : 152 Seats
Left parties : 57 Seats
Others : 70 Seats
BJP : Only 3 Seats ( LK advani, Sushama Swaraj and MM Joshi).
The above is the list of reception invitees for Digvijay Sing Wedding.

जो पर्यंत हरेक लाडुवर मोदी सरकार अस लिहिलेल नसेल तर ते सर्व लाडु, जो कोण विजेता असेल त्याला विकता
येतीलच !!

रच्च्याकने : मोदी बिदी काही येत नाही, अंधश्रद्धा आहे ती !!

अखेरीस विजय श्रेष्ठ पक्षाचाच होणारे आणि सरकार युपीएच, नाहीच तर येईलच तिसर्या आघाडीच.
तिसर्या आघाडीचे पंप्रसुद्धा फिक्स झालेत,

तो वर ह्या एन्डीयेला नाचु दे !!

ताज्या बातमीनुसार यशवंत सिंह यांनी अर्थसंकल्प आज पत्रकारपरीषदेत मांडला त्यांच्यामते सप्टेंबर मधेच बनवलेला

The above is the list of reception invitees for Digvijay Sing Wedding<<< Biggrin

शूम्पी - डिंकाचे लाडू आहेत.

ते लाडवाचा ड्ब्बा उघडताना, चलो अगली बार ....सरकार किंवा आखरी बार ...... सरकार किंवा ...... अशी काही धुन ऐकु येणार का?

टेक्नॉलॉजी काय अवघड नाही हल्ली तर शुभेच्छा पत्रे उघडताना पण म्युझिक वाजतय (इव्हन इन इमेल अल्सो हं... फक्त स्पिकर पाहिजेत)

प्रखर राष्ट्रवादाच्या गप्फा करणार्या भाजप्यांनी खरेतर आळुच्या फदफद्याचा बेत आखायला पायचे, लाडू मूघलाई खाद्यप्रकार आहे.

दक्षिणा .. नाही गं.. पहिली ओळ स्वातीची आहे .. मग विकु ..

अरे .. लाडवांचा जरा इस्कटुन सांगा... काय माहिती नाय बा!

Pages