मतदान संपल्याक्षणी सगळ्या वाहिन्यांवर एक्झिट पोल चा धुमाकूळ सुरू झाला आहे. सर्वच वाहिन्या भाजपच्या जागांची संभाव्य संख्या २४९ पासून ३४० पर्यंत असेल असे दाखवत आहेत. १६ मे २०१४ पर्यंत थांबण्याचा संयम कोणाकडेही नाही. लाडवांची कंत्राटे आधीच दिली गेलेली असून लक्षावधी लाडू वळण्यात येत असल्याचे चित्रण एका वाहिनीवर आत्ताच दाखवले. काँग्रेसच्या आघाडीला दिडशेच्या आसपास जागा येतील असे दाखवत आहेत. विश्लेषण, चर्चा, वाद, भांडणे सुरू होत आहेत. मोदी सरकार आल्याचा जयघोष चाललेला आहे.
प्रत्यक्षात काही तिसरेच झाले तर? शेअर बाजाराचे काय? लाडवांचे काय? (काँग्रेसकडून लाडवांना शेकडा भाव तितकाच मिळेल का जितका भाजपने कबूल केला होता?)
ह्या धाग्यावर कृपा करून गंभीर लिहू नयेत. फक्त वैयक्तीक चिखलफेक होऊ नये. मात्र धमाल येईल असे प्रतिसाद द्यावेत. प्रतिसाद वाचून हसू आले पाहिजे, आसूरी आनंद मिळू नये कोणालाही!
कदाचित मोदी सरकार येईल, कदाचित नाही, कदाचित त्रिशंकू लटकेगिरी होईल! पण आपण आपले डोके कशाला फिरवून घ्यायचे? मजा लुटा! एक्झिट पोलमध्ये काय दाखवत आहेत ते लिहा, प्रत्यक्ष रिझल्ट्स लिहा, आपली मते लिहा! फक्त सदस्यत्व स्थगित होऊ देऊ नका.
जय लोकशाही!
<< रा गांना विरोधीपक्ष नेता
<< रा गांना विरोधीपक्ष नेता केल्यावर काय धमाल येईल नाही! >> नाहीं येणार; लोकसभेतला त्यांच्यासमोरचा 'माईक' बंद पडलेलाच असेल याची व्यवस्था केल्याशिवाय का त्यांच्या माँसाहेब त्याना विरोधी पक्ष नेता बनवणार आहेत ?
[विषयांतराबद्दल क्षमस्व ]
असा बंद पडलेला 'माईक' मग तो
असा बंद पडलेला 'माईक' मग तो माँसाहेबांच्या व्यवस्थेने का होईना 'जागता पहारा' वर हजेरी लावेल
स्वातंत्र्याची गळचेपी, हक्कांची पायमल्ली इ. 
भाऊ मस्तच
भाऊ मस्तच
राजसी, तुम्हाला एकंदरच सर्वच
राजसी, तुम्हाला एकंदरच सर्वच प्रश्नांची पोच कमी आहे असे एक निरीक्षण नोंदवू इच्छिते.

राजसी
राजसी
फेबु वरुन साभार.. नमो : किती
फेबु वरुन साभार..
नमो : किती वाजले?
अ शाह : आप वाजुन काँग्रेस मिनिटं
नमो: म्हणजे?
अ शाह : ४ वाजुन ४४ मिनीटं..
(No subject)
(No subject)
...... << नमो: म्हणजे? अ
......
<< नमो: म्हणजे?
अ शाह : ४ वाजुन ४४ मिनीटं..>>
नमो : ठीक आहे. पण घड्याळावरही जरा लक्ष ठेवा !!
इतक्या वेळात तर आमचे केजरीवाल
इतक्या वेळात तर आमचे केजरीवाल शपथविधी करून बंगल्यात राहून योजना घोषित करून जनपथ रस्ते झाडून तिथेच झोपून आंदोलन करून बोंबा मारून राजीनामा देऊन मोकळा झाले असते.
मोदी सध्या कुणाला कुठलं
मोदी सध्या कुणाला कुठलं मंत्रीपद द्यायचं हे
ठरवत आहेत ही बातमी ऐकून मनमोहन सिंग
यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे..
ही कामं
पंतप्रधान करतात हे त्यांना माहितीच नव्हतं.
अच्छे दिन आने वाले है.......... आणि लगेच चांगले दिवस यायला सुरुवात पण झाली
.
.
.
.
.
.
.
.
तू तिथे मी serial संपली
तू तिथे मी serial संपली<<<
तू तिथे मी serial संपली<<<
<< तू तिथे मी serial संपली >>
<< तू तिथे मी serial संपली >>

येते दिवस असेच ' सिरियल कीलर ' ठरोत !!
सिरियल कीलर<<<
सिरियल कीलर<<<
कोकणचा नासका आंबा पडल्यामुळे
कोकणचा नासका आंबा पडल्यामुळे व्यक्तीशः खूप आनंद झाला. मी नेमका या वेळेला सिंधुदुर्गातच असल्याने नासक्या आंब्याच्या कार्यालयातील स्मशान शांतता पाहून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. सगळ्या गावा-गावांमध्ये दिवाळी साजरी झाली, सावंतवाडी-वेंगुर्ला मध्ये जरा जास्तच. पोलिसांनी निर्बंध घातलेले असल्यामुळे मिरवणूक काढता आली नाही, अन्यथा मी सुद्धा पाय मोकळे करून घेतले असते.
नासका आंबा ५०००० च्या फरकाने आडवा होईल असा पत्रकारांनी अंदाज केला होता. पण जनतेने सर्व अंदाज फोल ठरवून जवळपास दीड लाखांच्या फरकाने चारी मुंड्या चीत करून टाकले.
भाऊ.
भाऊ.:हहगलो:
सूनटून्या >> आनंदात
सूनटून्या >>
आनंदात सहभागी,
साहेबांनी घोषणा केलीये की कोकानात जी विकास काम सुरु केली हायेत ती थांबवनार हाय म्हणुन..
प्रश्न हा आहे की काम सुरु होती का?
फेसबुकवरुन साभार (मूळ गीत:
फेसबुकवरुन साभार
(मूळ गीत: ‘तोच चंद्रमा नभात)
तोच धुंद अरविंद, तोच आम आदमी
एकांगी मज समेत, रुसूनी एकटाच मी
त्या पहिल्या मस्तीच्या, आज लोपल्या खुणा
पांगल्या गर्दीत व्यर्थ, वाजवितो तुणतुणा
विझलेल्या विस्तवाची, फ़ुंकतोय राख मी
एकांगी मज समेत, रुसूनी एकटाच मी
शाई जरी ती तशीच, डाग आज ते कुठे
झाडू तोच तीच टोपी, लोक म्हणती पळपुटे
दारूण त्या अपयशात, विजयाची दुमदुमी
एकांगी मज समेत, रुसूनी एकटाच मी
पक्ष नवा रोग जुना, ती तशीच भांडणे
लोकपाल राजघाट, नाटक किती देखणे
राळेगणी अण्णा अन, भंगल्या स्वप्नात मी
एकांगी मज समेत, रुसूनी एकटाच मी
- भाऊ तोरसेकर
<< मी कोकणचा नाही, तरीही मला
<< मी कोकणचा नाही, तरीही मला जबरी आनंद झाला >> मीं कोकणचाच आहे व मला आनंद झालाय हें सांगणे नलगे ! देशातील या एका विजयाचं श्रेय मात्र कोणत्याही पक्षाला , मोदी लाटेला नसून सर्वस्वी पराभूत खासदारालाच आहे, हें मात्र मी ठामपणे सांगूं शकतो !!
भाऊ, +१
भाऊ, +१
भाऊसाहेब सुस्साट सुटलेत!
भाऊसाहेब सुस्साट सुटलेत! खरोखरच अच्छे दिन आले म्हणायचे!
-गा.पै.
(No subject)
(No subject)
छे त्यापेक्षा ते चित्र असं
छे त्यापेक्षा ते चित्र असं हवं.
तरी मी सांगतो होतो तुम्हाला, अब की बार, मोदी सरकार !
....
....
इमेज दिसत नव्हती म्हणून डिलिट
इमेज दिसत नव्हती म्हणून डिलिट केली.
इमेज दिसत नव्हती म्हणून डिलिट
इमेज दिसत नव्हती म्हणून डिलिट केली.
(No subject)
राजसी सर्वात भारी - सुन रहा
राजसी
सर्वात भारी - सुन रहा है ना तू, रो रही हूं मै!
तीनशे
तीनशे
Pages