निवडणूका निकालांचा 'अगंभीर' धागा

Submitted by बेफ़िकीर on 13 May, 2014 - 10:36

मतदान संपल्याक्षणी सगळ्या वाहिन्यांवर एक्झिट पोल चा धुमाकूळ सुरू झाला आहे. सर्वच वाहिन्या भाजपच्या जागांची संभाव्य संख्या २४९ पासून ३४० पर्यंत असेल असे दाखवत आहेत. १६ मे २०१४ पर्यंत थांबण्याचा संयम कोणाकडेही नाही. लाडवांची कंत्राटे आधीच दिली गेलेली असून लक्षावधी लाडू वळण्यात येत असल्याचे चित्रण एका वाहिनीवर आत्ताच दाखवले. काँग्रेसच्या आघाडीला दिडशेच्या आसपास जागा येतील असे दाखवत आहेत. विश्लेषण, चर्चा, वाद, भांडणे सुरू होत आहेत. मोदी सरकार आल्याचा जयघोष चाललेला आहे.

प्रत्यक्षात काही तिसरेच झाले तर? शेअर बाजाराचे काय? लाडवांचे काय? (काँग्रेसकडून लाडवांना शेकडा भाव तितकाच मिळेल का जितका भाजपने कबूल केला होता?)

ह्या धाग्यावर कृपा करून गंभीर लिहू नयेत. फक्त वैयक्तीक चिखलफेक होऊ नये. मात्र धमाल येईल असे प्रतिसाद द्यावेत. प्रतिसाद वाचून हसू आले पाहिजे, आसूरी आनंद मिळू नये कोणालाही!

कदाचित मोदी सरकार येईल, कदाचित नाही, कदाचित त्रिशंकू लटकेगिरी होईल! पण आपण आपले डोके कशाला फिरवून घ्यायचे? मजा लुटा! एक्झिट पोलमध्ये काय दाखवत आहेत ते लिहा, प्रत्यक्ष रिझल्ट्स लिहा, आपली मते लिहा! फक्त सदस्यत्व स्थगित होऊ देऊ नका.

जय लोकशाही!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहुल, जहा भी हो घर वापस आ जाओ. मा परेशान है. कोई कुछ नही कहेगा. सारी जिम्मेरी मनमोहन अंकलने लेली है
प्रियांका

16 मई 2014 को दोपहर दिल्ली रेल्वे स्टेशन से पाकीस्थान के लिये स्पेशल ट्रेन रवाना होगी शाहरूख खान, लालू यादव, सैम पित्रोदा सहीत जिन भी महानूभावो ने मोदी के P.M. बनने पर देश छोडने की घोषणा की थी वह सभी समय पर स्टेसन पहूच जाये

1) 5साल से बडे बच्चो का पूरा टिकीट लगेगा (राहूल गाँधी का भी)
2) जेब कतरो से सावधान (ट्रेन मे चितमबरम भी होगे)
3) नवविवाहित जोडो के लिये S-1 मे सीट रहेगी (दिग्गी राजा)
4) सफर के दौरान दूसरो के समान पर नजर ना डाले (अभीषेक मनू सिँघवी)

सर्व भ्रष्टाचारनिरपेक्ष विरोधी पक्ष एकत्र येउन चौथी आघाडी उघडून काँग्रेसला प्रमुख विरोधे पक्ष बनण्यापासून रोखणार आहे असे ऐकले Happy

पप्पूने आता आपल्या लग्नावर फोकस करावे. देशभक्तीत वय कसे गेल लक्षात नाही आले. पण आता असलेला वेळ कारणी लावावा. उरलेले पैसे जमेल त्या लग्न साईटीवर वापरून नाव नोंदवावे व लग्न जमल्यास आमरस ठेवावा लग्नात आंब्याचा मौसम संपायच्या आत. Proud

Official statement from Pakistan:

We don't want Kashmir now, but we will not give Karachi....



16 मई 2014 को दोपहर दिल्ली रेल्वे स्टेशन से पाकीस्थान के लिये स्पेशल ट्रेन रवाना होगी शाहरूख खान, लालू यादव, सैम पित्रोदा >>

SRK नी कमेंट्स नाही केलेली तर KRK ने केलेली. कमाल खान बोललेला.
उगाच उत्साहाच्या भरात वडाची झाड पिंपळाला लावत बसु नये

मोदिपान्त्प्रधान होणार. अनंतमूर्तींना देश सोडून जायची अनंत स्फूर्ती मिळालेली दिसत नाही अजून!
-गा.पै.

मोदिंबरोबरच या ऐतिहासिक विजयाचं श्रेय सर्वश्री कपिल सिब्बल, सल्मान खुर्शीद, दिग्गीबाबु, राहुल/प्रियांका गांधी, शिंदेसाहेब या दिग्गजांना आणि माबोवरच्या सचिन पगारे, भरत मयेकर, उदयन, इब्लिस, vijaykulkarni (कोणि राहुन गेलं असल्यास क्षमस्व) यांच्या अथक इल्लॉजिकल आर्ग्युमेंट्स/दावे यांना जातं. त्यांच्या परिश्रमामुळेच भारतीय जनतेला योग्य सरकार निवडणं सोपं गेलं... Wink

लाँग लिव्ह इंडियन डेमॉक्रसी!!

हसा-हसा के रुलानेवालों.....जनता माफ नाही करेगी | Rofl

म्हणजे २००४ आणि २००९ साली श्रेय "राज, बेफीकर, केदार, विचारवंत, गामामियां, इत्यादी " यांना जाते म्हणायचे Biggrin

हणजे २००४ आणि २००९ साली श्रेय "राज, बेफीकर, केदार, विचारवंत, गामामियां, इत्यादी " यांना जाते म्हणायचे खो खो<<<

अहो, मी भाजपच्या बाजूचा वगैरे नाही. भाजपचा सध्याचा मूड काँग्रेसच्या बेताल नेत्यांपेक्षा (मला) बरा वाटत आहे इतकेच.

जसे २००४ , २००९ चा पराभव भाजपाच्या भटांना कठिण गेले ? <<<

भट नव्हे, भाट म्हणायचंय तुम्हाला भाट!

Pages