निवडणूका निकालांचा 'अगंभीर' धागा

Submitted by बेफ़िकीर on 13 May, 2014 - 10:36

मतदान संपल्याक्षणी सगळ्या वाहिन्यांवर एक्झिट पोल चा धुमाकूळ सुरू झाला आहे. सर्वच वाहिन्या भाजपच्या जागांची संभाव्य संख्या २४९ पासून ३४० पर्यंत असेल असे दाखवत आहेत. १६ मे २०१४ पर्यंत थांबण्याचा संयम कोणाकडेही नाही. लाडवांची कंत्राटे आधीच दिली गेलेली असून लक्षावधी लाडू वळण्यात येत असल्याचे चित्रण एका वाहिनीवर आत्ताच दाखवले. काँग्रेसच्या आघाडीला दिडशेच्या आसपास जागा येतील असे दाखवत आहेत. विश्लेषण, चर्चा, वाद, भांडणे सुरू होत आहेत. मोदी सरकार आल्याचा जयघोष चाललेला आहे.

प्रत्यक्षात काही तिसरेच झाले तर? शेअर बाजाराचे काय? लाडवांचे काय? (काँग्रेसकडून लाडवांना शेकडा भाव तितकाच मिळेल का जितका भाजपने कबूल केला होता?)

ह्या धाग्यावर कृपा करून गंभीर लिहू नयेत. फक्त वैयक्तीक चिखलफेक होऊ नये. मात्र धमाल येईल असे प्रतिसाद द्यावेत. प्रतिसाद वाचून हसू आले पाहिजे, आसूरी आनंद मिळू नये कोणालाही!

कदाचित मोदी सरकार येईल, कदाचित नाही, कदाचित त्रिशंकू लटकेगिरी होईल! पण आपण आपले डोके कशाला फिरवून घ्यायचे? मजा लुटा! एक्झिट पोलमध्ये काय दाखवत आहेत ते लिहा, प्रत्यक्ष रिझल्ट्स लिहा, आपली मते लिहा! फक्त सदस्यत्व स्थगित होऊ देऊ नका.

जय लोकशाही!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< अरे थोड्याफार गंभीर गोष्टी कुठे लिहायच्या? >> आयपीएलच्या धाग्यावर सध्यां कोलकता नाईट रायडर्सच्या कप्तानावर चर्चा सुरूं आहे; कसल्याही गंभीर गोष्टी सहज खपून जातील तिथं ! Wink

मोदी: अहो नितीश, किती सिट्स आल्या हो तुमच्या?
नितीशः दोन Sad
मोदी: माझ्या पण. एक वाराणसी, आणी दुसरी वडोदरा. Proud आता काय करायचे ठरवलेय?
नितीशः मी मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा देणार आहे.
मोदी: मी पण. Lol
नितीशः ठेवा फोन आता. Angry

Sonia gandhi gave her resignation to Sonia gandhi which was rejected by Sonia gandhi because Sonia gandhi said resignation is not a solution of problems created by Sonia gandhi

अब सिर्फ दिग्विजय सिंग और एन. डी. तिवारी ही कांग्रेस को कोई गुड न्यूज़ दे सकते है !

त्यांच्या राजवटीदरम्यान देशांत मन्सूनचा पाऊस चांगला झाला तरी त्याचं श्रेय काँग्रेस स्वतःला घेत असे; त्याच न्यायाने <<अब सिर्फ दिग्विजय सिंग और एन. डी. तिवारी ही कांग्रेस को कोई गुड न्यूज़ दे सकते है ! >> या संभाव्य 'गुड न्यूज'चं श्रेय काँग्रेसला नव्हे तर मोदी राजवटीलाच जाईल ना !!! Wink

जब से नरेन्द्र मोदी "नमो" और राहुल गांधी "रागा" हो गए , यानि नेताओं के नाम
shortform में आने लगे ....
....
मेरे दो मित्रों हरीश गोयल और मुकेश तोमर ने राजनीति छोड़ दी ।
क्यूंकि उनके नाम की shortform ना देश
बर्दाश्त कर सकता था , ना वो खुद ..

Aache din aa rahe hain
Today I saw a girl on scooty...
She gave left indicator and she actually turned left...
Unbelievble..

काय राव एवढा वेळ काढतायत मोदी पंतप्रधान व्हायला?

इतक्या वेळात तर आमचे केजरीवाल शपथविधी करून बंगल्यात राहून योजना घोषित करून जनपथ रस्ते झाडून तिथेच झोपून आंदोलन करून बोंबा मारून राजीनामा देऊन मोकळा झाले असते.

Proud

She gave left indicator and she actually turned left...
Unbelievble.. >>> Lol

भाऊ जबरीच !

रा गांना विरोधीपक्ष नेता केल्यावर काय धमाल येईल नाही!

Pages