आयपीएल-७ (२०१४)

Submitted by स्वरुप on 10 April, 2014 - 11:11

आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच Happy

माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!

असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)

नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< एकदा नाव कानफाट्या ठेवायचे नि सतत तसेच बोलायचे! >> झक्कीजी, अहो, मलिंगाचे यॉर्कर्स पण चुकून कधी कधीं अंगावर टाकलेले बीमर होतातच ना ! दिले ते 'नो बॉल' म्हणून काय 'यॉर्कर्स स्पेश्यालिस्ट' या त्याच्या किर्तिला गालबोट थोडंच लागतं !! Wink
कालची मॅच सॉल्लीडच सनसनाटी झाली ! मॅक्सवेलच्या डोक्यावरची ती कुठच्या रंगाची कॅप असेल ती काढून आतां मोदींच्याच डोक्यावर ठेवायला हवी !! Wink

झक्की, तुमचे बरोबर आहे, ह्या विषयावर उगाच येता जाता काड्या टाकणार्‍या पोस्ट करता करता, संदीप शर्माने नेमक्या एका मॅचमधे खराब गोलंदाजी केल्यावर योगायोगाने तुमचे ह्रुद्यपरीवर्तन झाल्यामूळे त्याच वेळी केलेले "भाउ, आय पी एल च्या सगळ्या निकालांचे खरे कारण तुम्ही लोकांसमोर आणले." हे तुमचे वाक्य संदिप शर्माला मिळणार्‍या पगाराबद्दलच असणार. Lol

जाउ द्यात, भांडू नका
गांगुलीने दिलेल्या मोलाच्या सल्ल्यामुळे गंभीरचा आणि पर्यायाने केकेआरचा परफॉर्मन्स सुधारला आणि आता गांगुली कोअहलीला पण मार्गदर्शन करतोय, कदाचित बंगळूरपण उसळी मारुन वर येउ शकेल

खर म्हणजे गांगुलीच्या ज्ञानाचा या आयपीएल संघांनी उपयोग करुन घेतला पाहिजेल, तो एक चांगला कोच होउ शकतो

गांगुलीने दिलेला सल्ला अर्थपूर्ण असला तरीही केवळ त्या सल्ल्यामुळे कोहली, गंभीर यांच्या कामगिरीत आमूलाग्र बदल झाला हें स्विकारणं कठीण आहे. कारण- १] 'अंडर १९' संघापासून कित्येक वर्षं उच्चतम स्तरावर क्रिकेट खेळणार्‍या, अनेक देशातल्या दिग्गज खेळाडूना कप्तान म्हणून जवळून पहाण्याची संधी मिळालेल्या या दोन खेळाडूंसाठीं हा सल्ला अगदींच प्राथमिक स्वरुपाचा वाटतो व २] आयपीएल मधें प्रत्येक संघासाठी गोलंदाजी, क्षेत्ररक्षण यासाठीसुद्धां दिग्गज प्रशिक्षक, 'लिजंडस' असलेले मेंटॉर्स,जागतिक स्तरावरच्या संघातील कसलेल्या खेळाडूचं मार्गदर्शन इ.इ.चा इतका प्रचंड आश्वासक आधार कप्तानाना उपलब्ध असतानाही टी-२०च्या कप्तानाची वैयक्तीक कामगिरी केवळ कप्तानपदाच्या ओझ्यामुळे खराब होत होती म्हणणं खरंच कितपत योग्य आहे ?
गांगुलीने खास टी-२० साठी गोलंदाज आतां ज्या युक्त्या वापरतात, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करतात त्याचं प्रत्युत्तर कसं द्यावं यावर फलंदाज म्हणून कांहीं 'टीप्स' दिल्या असत्या तर तें कोहली, गंभीरच्या कामगिरीतल्या सुधारणेचं कारण ठरूं शकलं असतं; किंबहुना, ह्या आयपीएलमधे अग्रक्रमावरचे सहाही फलंदाज परदेशी खेळाडू असावेत, याची कारणमीमांसा होणं हें गांगुली, सचिन, द्रविड यांच्याकडून खरं तर अपेक्षित आहे !!

अजुन एक भाऊ, आणि जरी दिला सल्ला आणि सुधारला गंभीर तरी ते गंभीरच्या तोंडून ऐकायला जास्त बरे वाटले असते... गांगुलीच्या नव्हे!

एखाद्या संघाकडून मँटोरपद मिळावे म्हणून सेटींग लावतोय का तो? Wink

अरे काय हे..... आज कुणीच फिरकले नाही इकडे?.... मुंबई आणि राजस्थानची मॅच असुन?

राजस्थानने या सीझनमध्ये सोडून दिलेल्या ३-४ मॅचपैकी ही एक...... अनाकलनीय डावपेच!
हॉज वरती आला असता आणि बाकीच्यांनी जरा सपोर्ट दिला असता तर या पीचवर १७८ काही जास्त नव्हते

बिन्नीला आता बसवायची वेळ आली आहे... इथुन पुढे आता त्यांनी आपली प्लेयींग-११ कॉन्स्टंट ठेवायची वेळ आली आहे
माझी प्लेयींग ११:
रहाणे, करुण नायर, वॉटसन, सॅमसन, हॉज, स्मिथ, फॉल्कनर, अंकीत शर्मा, भाटीया, धवल कुलकर्णी, तांबे

पहील्या दोन संघात जाउन फायनलसाठी अजुन एक संधी मिळवायची सुवर्णसंधी आज राजस्थानने गमावली Sad

मलाही भाऊंचे वरचे मत पटले. गांगूलीच्या सल्ल्याने नेमका गंभीरच्या फॉर्‍ममधे फरक पडला असेल का ह्याची शंका वाटते. अर्थात मेंटॉर चा उपयोग इथे स्वतःचे furstration काढायला अधिक होत असेल असे मला वाटत असल्यामूळेही असेल. गंभीरच्या फॉर्ममधला चढ हा उत्थप्पाला गवसलेल्या सूराशी अधिक सुसंगत वाटतो. बाकी गंभीरच्या आधीचा नि सध्याच्या captancy मधे फारसा फरक पडलेला जाणवत नाही.

>>अर्थात मेंटॉर चा उपयोग इथे स्वतःचे furstration काढायला अधिक होत असेल असे मला वाटत असल्यामूळेही असेल.
समजले नाही!

<< गंभीरच्या फॉर्ममधला चढ हा उत्थप्पाला गवसलेल्या सूराशी अधिक सुसंगत वाटतो. >> सहमत. आतांपर्यंत हसी-ना असलेला हसी आतां फॉर्मात येवून मुंबईला तारायला बघतोच आहे ना !

स्वरुप म्हणजे हे सगळे international players आहेत, continuous media scrutiny मधे असतात. प्रत्येक गोष्ट कोणी तरी बघत असतो नि त्यावर comments येत असतात. This must be frustrating experience and having mentor to talk about this and getting out of your system may be helpful असे म्हणत होतो.

MI ची नेमकी पंचाईत अशी असणार आहे (मलिंगा गेल्यामुळे) कि आजच्या सारखे पिच नसेल तर एका स्पिनर च्या जागी कोण फास्ट बॉलर आणणार ? प्रवीण कुमार ?

<< MI ची नेमकी पंचाईत अशी असणार आहे (मलिंगा गेल्यामुळे) >> यंदा मुंबईचा आतांपर्यंतचा फलंदाजीतला एकंदर फॉर्म बघतां, मलिंगा हाच त्यांचा एकमेव आधार वाटत होता; पण अचानक मुंबईची फलंदाजी आतां बहरायला लागलीय व त्यामुळे कदाचित मलिंगाची गैरहजेरी तितक्या तीव्रतेने नाही जाणवायची मुंबईला. [ आणि हो, मलिंगा असता तरी मुंबईची गुणांच्या तक्त्यातील परिस्थिती पंचाईत करण्यासारखीच राहिली असती ! Wink ]

<< काळे बुट का घालतात डोळ्यांना खटकते फार >> खरंय, पण होईल हळू हळू त्याचीही संवय डोळ्याना; रंगीत कपड्यांची, सफेत चेंडूची झालीच ना , तशीच !! [ उद्यां बॅटवर बिबळ्याचे ठीपके किंवा जिराफाचे पट्टे येतील, कप्तानाची कॅप मुकूटासारखी असेल, अंपायर्स विदूषकाचे कपडे घालतील....पण जोपर्यंत कुणीतरी चेंडू टाकतोय व कुणीतरी तो अडवतोय, तोपर्यंत तें क्रिकेट आहे असं समजून आपण बघायचं ! Wink ]

भाऊ Rofl

कोलकताची बॉलिंग स्ट्रोंग आहे म्हणुन पहिल्यांदा बॅटींग घेतात प्रतिस्पर्धी.. पण तिथेच फसतात.. कमी स्कोर असल्याने कोलकत्यावर दडपण कमी येते आणि आरामात बॅटींग करतात

आज चेन्नई बरोबर बघु काय करतात इथे जर ते जिंकले तर जागा पक्की

काल मनन वोहराने बॅकफूटवरून पंच करत शमीला मारएला सिक्स पाहिलात का ? This guy has some serious talent.

आणि हो, मलिंगा असता तरी मुंबईची गुणांच्या तक्त्यातील परिस्थिती पंचाईत करण्यासारखीच राहिली असती >> MI अगदी भारतासारखे खेळतेय. नाका तोंडाशी आल्याशिवाय काही करणार नाही.

मुंबईला सूर गवसण्यात आणि योग्य टीम कॉम्बिनेशन सापडण्यात उशीर झाला असे वाटते, सध्याचा त्यांचा परफॉर्मन्स पाहता आणि काल मलिंगा आणि भज्जी नसतानाही पंजाबशी जिंकलेले बघून वाटते की पहिल्या चारात येण्याच्या लायकीचा संघ होता मुंबई.... श्या, एक मुंबई सपोर्टर आणि मुंबईकर म्हणून आता त्यांना बाहेर जाताना बघून वाईट वाटतेय.

अभिषेक.. अजून आशा सोडू नकोस.. काहीही घडू शकते... काल थोडा लवकर विजय मिळवायला हवा होता.. नेट रनरेट मध्ये अजून फरक पडला असता..

सिमन्सचे शतक जबरी होते.. रायडू बाद झाल्यावर थोडा हळू खेळ झाला.. तो बाद नसता झाला तर अजुन लवकर संपली असती मॅच..

मनन वोहरा बरोबरच राजस्थानचा करुण नायर सुद्धा सही वाटतोय. मुंबईच्या विरुद्ध एकटाच खेळत होता पण काय क्लास खेळत होता. त्याचबरोबर रॉबिन उथप्पाला सुद्धा एवढे कन्सिस्टंटली खेळताना बघणे सुखावह आहे. त्या दिवशी चेन्नईबरोबर त्याची फलंदाजी पाहिली. स्नूकर खेळल्यासारखे टच ड्राईव्ह मारत होता. तिकडे तो सेहवाग सुद्धा आपण संपलो नाही असे दाखवतोय, ते जर खरे असेल तर त्याला नव्याने आपला क्लास सिद्ध करायची काही एक गरज नाही, तो भारतीय उपखंडातच नाही तर परदेशात जाऊनही वर्ल्डक्लास गोलंदाजांना धोपटू शकतो. युवराज देखील आपण अजूनही ६ चेंडूत ६ षटकार आजही मारू शकतो हे दाखवतोय... थोडक्यात भारतीय फलंदाजीचे तरी अच्छे दिन आने वाले है..

<< एक मुंबई सपोर्टर आणि मुंबईकर म्हणून आता त्यांना बाहेर जाताना बघून वाईट वाटतेय.>> खरंय. अर्थात, थिऑरेटिकली, मूबई अजून बाहेर गेलेली नाही; काल सिमन्सच्या सेंच्यूरीसाठी रन-रेट वर आणण्याची संधी मुंबईने घालवली का ? समजा, चौथ्या जागेसाठी चुरस निर्माण झालीच तर हें फारच महागात नाही पडणार ? कीं , माझं कांही मूळातच चुकतंय ?

रनरेटमध्ये खूप फरक आहे, राजस्थानचा तर बराच जास्त आहे, त्यामुळे कलकत्ता दोन्ही मॅच हरते का हे बघायला हवे, त्याहूनही ते देखील बरेपैकी फरकाने हरावे लागतील.. पण सध्या त्यांचा फॉर्म जोरात आहे.. अर्थात तो सुरुवातीच्या फलंदाजीच्या भरवश्यावर आहे, ते गडबडले तर मागचेही ढेपाळतील.. बघूय, आज आहे ना त्यांचा सामना.. बेंगलोरशी.. कोहलीला फॉर्म गवसलाय.. खेळ आमच्यासाठी Happy गेलनेही तुडवावे मजबूत.. फक्त त्या नारायणला सांभाळोन ..

<< फक्त त्या नारायणला सांभाळोन ..>> १६ तारखेपासून सगळेच नारायण फॉर्म गमावून बसलेत अशी आशा करायला काय हरकत आहे ! Wink

शर्मा फलंदाजीला उतरला तेव्हाच मला मुंबईचे इरादे काही ठिक वाटले नाही, कारण तो अश्यावेळी नेहमी काही चेंडू सेट व्हायला खर्ची घालतो, तरी बघूया म्हटले तर तेच केले, त्यापेक्षा कोणालातरी फटकवायला पुढे पाठवले असते वा पोलार्डलाच १६ ओवरला सामना संपवायचाय असे सांगून पाठवले असते तरी काम झाले असते. रायडू बाद झाल्यावर जी स्थिती होती तिथून हाराकिरी करून सामना हरणे खूपच कठीण होते. किंबहुना दोन फटके मारताक्षणीच पंजाबशी उरलीसुरली आशा संपली असती आणि मग अश्या मनस्थितीतील गोलंदाजांना फटकावणे आणखी सोपे जाते.

१२०-२ असताना मला वाटलं मुंबई धमाल करणार ; मुंबईने सुवर्णसंधी घालवली ! आतां रन-रेटचा प्रश्नच आला नाही तर गोष्टच वेगळी; पण आला तर ... नामुष्कीच !! Sad

Pages